शिक्षण

जो जे वांछिल तो ते लाहो... सुमति बालवन - पुणे भेटीचा सचित्र वृत्तांत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 25 June, 2014 - 11:17

''दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो |
जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात || ''

मायबोलिवर सर्वात हुशार कोन आहे ?

Submitted by Babaji on 20 June, 2014 - 13:57

इथ आल्यापासुण निट वाचतो आहे. बरेच जन माज्यापेक्षा हुशार आहेत. मिर्चि ताईंच्या धाग्यावर तर सगलेच हुशार लोक जमले अस्म वाटत. माज्यासारख्यांन्ना हे सगलं नवीन आहे. डोक्यावरुन जात आहे. पन यान्च्यापेक्षा पन हुशार लोक असतिलच. जुन्या लोकान्ना सर्वात हुशार कोन ते बरोबर माहित असल. एकच नसल तर दोन चार पाच सात धा काय असतिल त्यान्चि माहिति दिलि तर नविन लोकाना त्यान्च्याकडुन बरच काय काय शिकता येइल.

शब्दखुणा: 

१० वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी DY PATIL मधे admission procedure काय आहे

Submitted by प्रितीभुषण on 19 June, 2014 - 05:18

१० वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी DY PATIL मधे admission procedure काय आहे

विषय: 

माझे विस्मृतीत गेलेले निकाल

Submitted by रसप on 18 June, 2014 - 01:00

परीक्षा म्हणजे माझ्यासाठी नेहमीच एक सोहळाच असायचा. माझी प्रत्येक परीक्षा अत्युत्कृष्ट व आनंददायीच गेली. गडबड फक्त निकालात व्हायची. पण अतीव क्लेश दिलेल्या घटना लक्षात न ठेवता पुढे जात राहावे, ह्या विचारावर माझा दृढ विश्वास असल्याने आता मला माझ्या कुठल्याही परीक्षेतले गुण आठवत नाहीत. एव्हढे नक्की की, प्रत्येक वेळी ते नेत्रदीपकच होते.

घटना लक्षात नसल्या तरी काही क्षण मात्र आपल्या नकळतच आपल्या मन:पटलावर कोरले जातात. दहावीच्या निकालाचा क्षणही असाच काहीसा होता.
परीक्षा संपल्यापासून मला एकच आनंद होता की, 'परीक्षा संपली !'

'हसत खेळत स्पोकन इंग्लिश' शिकवण्यासाठी स्वयंसेवक शिक्षक हवेत! (वर्ष २०१४-१५)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 16 June, 2014 - 07:20

''केल्याने होत आहे रे...'' ह्या उक्तीनुसार गेल्या वर्षी आपल्या काही मायबोलीकरांनी एकत्र येऊन पुण्याच्या बुधवार पेठ येथील रेड लाईट एरियामधील नूतन समर्थ प्राथमिक विद्यालयात 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश'चे वर्ग घ्यायला सुरुवात केली. हे विद्यालय परिस्थितीने निम्नवर्गीय व रेड लाइट एरियातील मुलामुलींना शिक्षण देण्याचे कार्य करते. ऑगस्ट २०१३ पासून सुरु केलेल्या 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश' ह्या उपक्रमाला मायबोलीकरांच्या माध्यमातून मिळालेले स्वयंसेवक शिक्षक व शाळेतील विद्यार्थ्यांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.

काय करतो आपण ह्या उपक्रमात?

भारतातील नोकरदार स्त्रियांना मिळणारी प्रसूतीची रजा व फायदे

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 3 June, 2014 - 14:04

एखाद्या नोकरदार स्त्रीला जेव्हा मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा आनंदासोबत तिच्या मनात भविष्यात लागणार्‍या बाळंतपणासाठीच्या रजेचे, ऑफिसातल्या आपल्यावरील जबाबदाऱ्यांचे व आर्थिक जुळवाजुळवीचे विचारही येऊ लागतात. आपण काम करत असलेल्या कंपनीची प्रसूती रजेबाबत काय पॉलिसी आहे, कोणाकडून व्यवस्थित माहिती मिळेल, रजेसाठी काय करावे लागेल, कोणकोणत्या बाबींची पूर्तता केली की आपली प्रसूती रजा मंजूर होईल, त्या अंतर्गत आपल्याला कोणकोणत्या सवलती मिळतील... एक ना दोन गोष्टी असतात! तुम्ही सरकारी, निमसरकारी क्षेत्रात काम करता की खाजगी क्षेत्रात, यावरही बरेच काही अवलंबून असते.

तरुण मतदार, अपेक्षा आणि सत्यस्थिती!

Submitted by कौस्तुभ बंकापुरे on 15 April, 2014 - 00:09

हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे गेले काही दिवस निवडणुकीच्या निमित्ताने विविध गोष्टी बघायला मिळत आहेत. विविध प्रकारचे, विचाराचे लेख समोर येत आहेत. विनोदी, मार्मिक आणि अगदी गालीच्छ sms पण येत आहेत. या सगळ्यामध्ये 'तरुण मतदार' हा एक विशेष भाग आहे. 'हा तरुण मतदार यंदाच्या निवडणुकीचे चित्र बदलणार' वगैरे घोषणा होत आहेत. चित्र बदलेलही कदाचित पण तरुण मतदाराच्या मनात नक्की काय चाललंय?

स्पोकन इंग्लिश वर्ग : एका अभिनव उपक्रमाचा प्रवास व हृद्य समारोप

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 31 March, 2014 - 05:53

गेल्या वर्षी ध्यासपंथी पाऊले ग्रुपच्या अंतर्गत मी 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश शिकवू शकणारे स्वयंसेवक हवे आहेत!' असा धागा काढला आणि अन्य उपक्रमांपेक्षा जराशा वेगळ्या अशा ह्या उपक्रमात सामील होऊ इच्छिणार्‍यांना आपली नावे द्यायला सांगितली. अट होती ती दर शनिवारी किमान एक तासाभराचा वेळ देऊन पुण्याच्या बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात राहाणार्‍या व तेथील नूतन समर्थ विद्यालयात शिकणार्‍या मुलांना इंग्रजी भाषा शिकवायची, तिचा सराव करून द्यायचा! अशा प्रकारे मुलांना शिकवण्याची एका संपूर्ण शालेय वर्षाची कमिटमेन्ट घेणे ही खरोखर सोपी गोष्ट नाही.

अंधत्वावर मात करणारी दृष्टी

Submitted by शोभनाताई on 21 March, 2014 - 04:53

मीरा बडवे यांचे "टीम निवांत" वाचायला घेतले फक्त प्रस्तावनाच वाचली आणि मी भाराऊन गेले.निवांत अंध मुक्त विकासालय या शाळेच्या पलीकडच्या विद्यापीठीय विद्यार्थ्यासाठी रचल्या गेलेल्या विलक्षण प्रयोगाची सकारात्मक गाथा.बडवे कुटुंबाच्या घराचा निवांत टीमपर्यंत झालेला जीवन प्रवास.पुस्तक पूर्ण वाचल्यावर परिचय लिहायलाच हवा.अपंग दिनी बडवे कुटुंबियांच्या कार्याला डोळस माणसानाही शिकवणा-या त्यांच्या चमूला सलाम.मला राहून राहून आज विजय कुदळेची आठवण येते.त्याच्यापर्यंत हे पोचवायला हव.
अपंग दिनानिमित्त त्याची ही कहाणी. १० वर्षापूर्वी केसरी या वृत्तपत्रात लिहिलेली.

नवीन अभ्यासक्र्म

Submitted by निर्मल on 11 March, 2014 - 07:18

नमस्कार मंडळी.
सध्या १२ वी च्या परीक्शा चालू असतील. नंतर कोणाला संशोधनात रस असेल तर, शास्त्र शाखेकडे जायचे असेल तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एड्युकेशन अँड रिसर्च हा चांगला पर्याय आहे. मुंबई, ठाण्यातील मुले फार कमी दिसतात म्हणून लिहिले आहे. थोड्याच दिवसांपूर्वी जाहिरात आली होती. कोणाला माहिती हवी असल्यास देउ शकेन.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - शिक्षण