किलबिलाट सारा आज शून्य होता,
दुडदुडत्या पैंजनाचा आवाज संथ होता
कोपऱ्यातून हुंदक्याच्या आवाज आला कानी,
व्याकुळ झाला तो, पाहता रडती चिमणी
उंबऱ्यात दिसता बाबा, आता उधाण आले
भरले तुडुंब डोळे, गाली काजळ ओघळले
त्याने पसरता हात, चिमणी धावत आली
पैंजनांचे मौन तोडीत ती, बाबाला बिलगली
डोळे पुसता पुसता, त्याला हुंदक्यात बोलली
मलाही हवा शालू, चिमणी हट्टाला पेटली
मिळाला नवा शालू, नटली नवरी लाडकी
गालावर खळ पेरीत चिमणी आनंदून हसली
"गप्प मरं नुसतं तटा-तटा तोडीत..." पार्थच्या पाठीत जोरात धपाटा घालतं पल्लवी म्हणाली. गोचीड तोडून काढावा अंगावरचा तसा पार्थ तिनं बाजूला केला. ढकलूनच दिलं त्याला. जाम वैतागआला होता तिला. गोचिड अन लेकरू… एक अंगातल रक्त पितं. दुसरं दुध… दुध पण रक्ताच तयार होत असेल ना? तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हतां. पार्थतर सारखाच चिटीत होता. तिनं बाजूला केला पण त्यानं भोकाड पसरलं. लेकराला कसली कळते रात्र अन बित्र? घडयाळात पाहीलं. दोन वाजल्या होत्या. बाहेर सारा अंधारच दिसत होता. इकडं तिकडं पाहिलं. जय जवळ नव्हता. कुठं गेला जय? आता तर इथ होता तो. इथं म्हणजे त्याच्या किठ्ठीतच होती ना ती?

(या कथेतील पात्रे व घटना काल्पनिक आहेत.)
‘लग्न’ हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. म्हटलं तर हो , म्हटलं तर नाही सुद्धा. लग्न का करावे? ह्या बद्दल बरीच अनुमाने वा निष्कर्ष थोऱ्या मोठ्यांनी त्यांच्या अनुभवातून काढले आहेत आणि त्यालाच तिखट मीट लावून एक झणझणीत फोडणी हि युवा पिढीसमोर ठेवलेली आहे. माझ्याच एका मैत्रिणीच्या वडिलांनी तिला ,”लग्न का करायला हवे?” याचं कारण सांगितलं. कारण तसे खुपच मजेशीर आहे. लग्न केल्यामुळे हाडांचे शुद्धीकरण होते म्हणे. आता हाडांचे शुद्धीकरण म्हणजे नेमके काय? हा विषय खुप मोठा असेल हि.
मीराचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं. ऑस्ट्रेलियाला जाऊन MS केलं आणि तिकडेच पुढे PhD देखील करण्याची तिची इच्छा होती. पण आई-वडिलांच्या मते वय वाढत चालल्याने आता तिच्या लग्नाचं बघायला सुरुवात करणं आवश्यक होतं. 'तुझं कुठं काही आहे का? आत्ताच सांग बाई! नंतर अभ्रूचे धिंडवडे नकोत आमच्या.' असं तिच्या वडिलांनी विचारल्यावर तिचं कोणावरही प्रेम नाही किंवा तिच्या मनात देखील कोणी नाही असे सांगताच 'आम्ही आता तुझ्यासाठी स्थळ बघायला मोकळे, हो की नाही?' असे तिच्या वडिलांनी विचारले. जरा नाराज होऊनच तिने 'हो' म्हणून सांगितले. तिला पुढे अजून शिकायचं होतं. अगदी परदेशातच नाही तर भारतात सुद्धा तिला चाललं असतं.
वेळ असेल तर आणि वाचला नसेल तर आधी हा पहिला भाग वाचून आलात तर आवडेल 
मला मिळालेला पहिला नकार ! - प्रस्तावना
_____________________________________________________
-------------------------------------------------------------------------------
हो !! मला मिळालेला नकार ...
लग्नाचाच नकार !!
बेफिकीर यांच्या लग्नविषयक धाग्यावर लग्नात होणार्या खर्चावर चर्चा चालू होती. चर्चेच्या ओघात लग्नाआधी एकमेकांना समजून घेणे कसे आवश्यक असते यावर गाडी वळली. तिथे मी लग्नाआधी दोघांनी काही काळ एकत्र घालवण्याची गरज असते असे विधान केले. एकादोघांनी चुकून त्याचा अर्थ लिव्ह ईन रिलेशनशिप असा काढला आणि मला लिव्ह ईनवर वेगळा धागा काढायला सुचवले. पण मला लिव्ह ईन अभिप्रेत नव्हते. तरी जे म्हणायचे होते ते त्या धाग्याशी संबंधित नसल्याने हा वेगळा धागा काढला.
दुसरया धाग्यावर निघालेल्या विषयावर तिथे अवांतर पोस्ट नको म्हणून हा स्वतंत्र धागा.
____________________________
फार पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. नवीन जोडप्याला एकत्र वेळ घालवायला योग्य ते स्थळ काळ मिळायचे नाही. म्हणून मनाने तसेच शरीराने जवळ येण्यासाठी त्यांच्यासाठी मधुचंद्र आयोजित केला जायचा.