लव्ह बर्डस..
Submitted by Happyanand on 1 October, 2019 - 04:13
‘लग्न’ हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. म्हटलं तर हो , म्हटलं तर नाही सुद्धा. लग्न का करावे? ह्या बद्दल बरीच अनुमाने वा निष्कर्ष थोऱ्या मोठ्यांनी त्यांच्या अनुभवातून काढले आहेत आणि त्यालाच तिखट मीट लावून एक झणझणीत फोडणी हि युवा पिढीसमोर ठेवलेली आहे. माझ्याच एका मैत्रिणीच्या वडिलांनी तिला ,”लग्न का करायला हवे?” याचं कारण सांगितलं. कारण तसे खुपच मजेशीर आहे. लग्न केल्यामुळे हाडांचे शुद्धीकरण होते म्हणे. आता हाडांचे शुद्धीकरण म्हणजे नेमके काय? हा विषय खुप मोठा असेल हि.