वेळ असेल तर आणि वाचला नसेल तर आधी हा पहिला भाग वाचून आलात तर आवडेल
मला मिळालेला पहिला नकार ! - प्रस्तावना
_____________________________________________________
-------------------------------------------------------------------------------
बराच वेळ आम्ही दोघेही शांत होतो. मग ती अचानक म्हणाली,
"काय मग, स्कूल कॉलेज ऑफिसमध्ये कोणी गर्लफ्रेंड?"
हल्ली हा प्रश्न फार महत्वाचा झाला आहे. एकवेळ मुलगा/मुलगी काय करतो/करते हे नाही विचारले तरी चालते. पण त्याचे/तिचे काय करून झाले आहे हे जास्त महत्वाचे समजले जाते. याच्या उत्तराने निर्णयावर फरक पडतो की नाही याची मात्र कल्पना नाही.
तर मी हसलो...
"स्कूलचे आठवत नाही. वेडपटपणा असतो तो. पण कॉलेजपासून मात्र कधी कोणत्या मुलीकडे मान वर करून पाहिले नाही. एखादी मुलगी स्वत:हून समोर आली तरी अलगद पापण्या मिटतात माझ्या.."
आता ती हसली...
"वाटत नाही तसं. माझ्याकडे तर डोळे फाडून फाडून बघत होतास"
मी ओशाळलो!
कुठलेही नाते खोट्याच्या आधारावर बनवायचे नसते हे आपले तत्व. पण इथे नाते बनवायचेच नव्हते म्हणून थोडीफार फेकाफेकी चालू होती.
"ठिक आहे रे, गंमत केली मी तुझी. आपल्याकडे मान वर करून बघू न शकणारा नवरा काय कामाचा? उलट तुझ्या बघण्यातून मला तुझी पसंती कळली
पसंती!!
काहीतरी फार मोठा गैरसमज होत होता. प्रवाह उलट्या दिशेने वाहायला सुरुवात झाली होती.
"तुझा जॉब प्रोफाईल काय आहे?
म्हणजे ईंजिनीअर आहेस असे ऐकलेय, पण नेमके काय करतोस?"
"ते तर मलाही माहीत नाही, बॉस सांगेल ते सारे करतो."
ती पुन्हा गोड हसली!
"गूड, मला असाच नवरा हवा होता
.... मी आणखी फसत चाललो होतो
"पॅकेज किती आहे तुझे?"
हायला डायरेक्ट पॅकेज... आधी बाऊन्सर मग गूगली !
"तरी आहे दहा लाखाच्या आसपास.." मला या अनपेक्षित प्रश्नाने बसलेल्या झटक्यातून सावरत मी खराखुरा आकडा सांगितला.
माझ्या एक्सपिरन्सच्या मानाने चांगलाच होता. पण ती मात्र काहीशी विचारात पडलेली दिसली,
"मी काहीतरी वेगळा आकडा ऐकला होता"
अरेच्चा!
मुलगी तर सारा अर्थशास्त्राचा अभ्यास करून आलेली.
"काय ऐकलेलास?" मी कुतूहलाने विचारले.
"हेच, थर्टीन पॉईंट फाईव्ह लॅक्स!"
मलाही हा आकडा कुठेतरी ऐकल्यासारखा वाटला.
अरे हो, आठवले...
नुकताच मी माझा सीवी एके ठिकाणी पाठवला होता. त्यात हा आकडा होता. तिच्याकडे कुठून आला?
"मला माहीत नाही, तू हा आकडा कुठून ऐकलास. पण आज जो आहे तो हा आहे. आणि तू जो म्हणत आहेस तो पुढेमागे लवकरच होईलही"
"उद्या होईल रे.. पण आज नाहीये ना.. यापेक्षा माझे पॅकेज जास्त आहे. आणि उद्या तुझे ईतके होईस्तोवर माझे आणखी जास्त झाले असेल. काय माहीत पुढचे कित्येक वर्षे तू माझ्या मागेच राहशील, कदाचित शेवटपर्यंत.."
मगापासून माझ्यासाठी जी नदी उलटी वाहत होती तिच्यावर आता दहा लाखांचा बंधारा पडला होता. जे मला तिच्याकडून हवे होते तेच मला मिळत होते.. ते म्हणजे, नकार!
पण आता मला या नकाराचा त्रास होत होता. माझा पगार तुझ्या पगारापेक्षा दोनेक लाख कमी काय आहे तर तू मला लग्नासाठीच नालायक ठरवणार? हे कसलं कारण?
आजवर लाखो करोडो अब्जो मुलांनी आपल्यापेक्षा कमी पगार असलेल्या मुलींशी हसत हसत लग्ने केली ना. मग आजच्या स्त्री-पुरुष समानतेच्या युगात एखाद्या मुलाचा पगार कमी असणे मुलींनी चालवून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे?
बरे कमी म्हणजे तुलनेत कमी. अन्यथा माझ्या पोटापाण्यापुरता मी कमावतोय, तुझ्या पोटापाण्यापुरता तू कमाव. माझी सेव्हिंग मी करतो, तुझी सेव्हिंग तू कर. मला कुठे तुझ्या पैश्यावर ताजमहाल बांधायचाय..
मी तिला स्पष्ट शब्दात याचा जाब विचारला. म्हटलं हे कारण पटणारे नाही. लग्नाचे राहू दे बाजूला. या कारणामागचा तुझा विचार काय आहे?
तिने एक दिर्घ श्वास घेतला,
आणि म्हणाली, "ईगो क्लॅश!"
बायकोचा पगार नवर्यापेक्षा जास्त असल्यास हमखास होतो. आज नाही तर उद्या होणारच. मला ते नकोय. मला पैश्याची हाव नाहीये. पण मला सुखी संसार हवाय. तो मला या दोन लाखाच्या फरकात दिसत नाहीये. सॉरी .. समजून घे मला"
एवढे बोलून ती आपली पर्स उचलून चालू पडली.
आणि मी भारावलेल्या अवस्थेतच ही गूड न्यूज द्यायला गर्लफ्रेंडला फोन लावला !
- ऋन्मेऽऽष
तुमच्या कल्पनाशक्तीचे करावे
तुमच्या कल्पनाशक्तीचे करावे तितके कौतुक कमी आहे !
>>आणि मी भारावलेल्या अवस्थेतच
>>आणि मी भारावलेल्या अवस्थेतच ही गूड न्यूज द्यायला गर्लफ्रेंडला फोन लावला !<<![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
साला, एकदम चालु आहेस. रिवर्स सायकालजी वापरुन तिचा पत्ताच कट केलास...
नुकताच मी माझा सीवी एके
नुकताच मी माझा सीवी एके ठिकाणी पाठवला होता. त्यात हा आकडा होता. तिच्याकडे कुठून आला?
>>> सिवी मध्ये पॅकेज लिहितात?
सिवी मध्ये पॅकेज लिहितात?
सिवी मध्ये पॅकेज लिहितात?
Expected
काहीही ..ही कथा आज्जीबात
काहीही ..ही कथा आज्जीबात आवडली नाही
सुटली बिचारी.
सुटली बिचारी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कथा फेक वाटली म्हणजे निदान
कथा फेक वाटली म्हणजे निदान मलातरी, खरीही असेल कदाचित ..
अन आवडली पण नाही
.
.
.
[[[[ तिने एक दिर्घ श्वास घेतला,
आणि म्हणाली, "ईगो क्लॅश!"
बायकोचा पगार नवर्यापेक्षा जास्त असल्यास हमखास होतो. आज नाही तर उद्या होणारच. मला ते नकोय. मला पैश्याची हाव नाहीये. पण मला सुखी संसार हवाय. तो मला या दोन लाखाच्या फरकात दिसत नाहीये. सॉरी .. समजून घे मला"
एवढे बोलून ती आपली पर्स उचलून चालू पडली. ]]]]] >>>>> फक्त एवढेच पटले अन आवडले
हो. कथेत फक्त साडेतेरा टक्के
हो. कथेत फक्त साडेतेरा टक्के भाग सत्य आहे.
मला मुलीने नकार दिला हे सत्य आहे.
मला तिने पगारातील फरकामुळे नकार दिला हे सत्य आहे.
पण ती मला भेटायला आली हे असत्य आहे.
तिने मला न भेटताच नकार दिला.
मुलगी वाशीची नसून पुण्याची होती. मुद्दाम लेखात पुण्याचे नाव टाळले.
ईगो क्लॅश हे मी तिच्या दृष्टीकोनातून सकारात्मक विचार करता मला सापडलेले कारण आहे.
ऋ, लेखनाची शैली आणि मांडणी
ऋ, लेखनाची शैली आणि मांडणी आवडली. दोन्ही भाग...
पहला नकार पहला खुमार..
पहला नकार
पहला खुमार..
जाने दो नवीन धागा काढ.
जाने दो नवीन धागा काढ. "पुण्याच्या मुलींच्या अपेक्षा "![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
कथा अगदी काहीही असली तरी
कथा अगदी काहीही असली तरी लेखनशैली आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पाफा
(No subject)
(No subject)
मुळात तुझ्या गफ्रेने हे खपवुन
मुळात तुझ्या गफ्रेने हे खपवुन घेतलंच कसं? प्रेम आहे लग्न करायचंय आणि तु चक्क इतर मुली पहायचा कांदेपोह्यांचा कार्य्क्रम करतोय्स.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मला नाही वाटत कुठल्याही कमिटेड रीलेशन्शिप मधे मुलगी असं काही खपवुन घेईल.
मुळात तुझ्या गफ्रेने हे खपवुन
मुळात तुझ्या गफ्रेने हे खपवुन घेतलंच कसं? प्रेम आहे लग्न करायचंय आणि तु चक्क इतर मुली पहायचा कांदेपोह्यांचा कार्य्क्रम करतोय्स. >>> +१.
मला नाही वाटत कुठल्याही
मला नाही वाटत कुठल्याही कमिटेड रीलेशन्शिप मधे मुलगी असं काही खपवुन घेईल.
>>>>>
त्या घाडग्यांच्या सूनेची सिरीअल बघा. ईथे कोणी बघते का?
आपला आपल्या प्रेमावर आणि जोडीदारावर किती विश्वास आहे याची हिच कसोटी असते.
सस्मित, ऋ चा लास्ट प्रतिसाद
सस्मित, ऋ चा साडेतेरा टक्केवाला प्रतिसाद बघा.
मुलगा: मी तुझ्यावर
मुलगा: मी तुझ्यावर लग्नानंतरही असेच प्रेम करत राहीन
मुलगी : मी सुध्दा. पण आपल्या जोडीदारांना आवडेल का रे?
वरील विनोदाचा फक्त आस्वाद घ्या. त्याचा धाग्यावरील चर्चेशी संबंध नाही![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
पाफा... खतरु जोक.. लोल
पाफा... खतरु जोक.. लोल
पाफा... खतरु जोक.. लोल >>+१
पाफा... खतरु जोक.. लोल >>+१ ..![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
तर ती ईथे आली. तेवढीच तिचीही
तर ती ईथे आली. तेवढीच तिचीही जीवाची मुंबई झाली. आमची भेट झाल्यावर मी तिला राणीबागेत सोडून आलो.>>> म्हणजे मागच्या धाग्यातला राणीबाग वगैरे अफवाच होत्या होय?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
हो. कथेत फक्त साडेतेरा टक्के भाग सत्य आहे.>> आणि हे १३.५% कसे मोजले राव तुम्ही?
पा.फा.
आणि हे १३.५% कसे मोजले राव
आणि हे १३.५% कसे मोजले राव तुम्ही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>
मला वाटलेलेच हा प्रश्न येणार
सोप्प आहे. कथेत जेवढे शब्द / वाक्य आहेत त्यातीक किती शब्द वाक्य सत्यवचन आहे त्याची टक्केवारी
राणीबाग ना १३.५ टक्क्यात होती ना ८६.५ टक्क्यात होती. ते प्रतिसादात होते. त्यात मी थोडे ईथले तिथले गंमतीचे लिहित असतो काहीबाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पाफा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हा भाग एकदम पुचाट. पहीला
हा भाग एकदम पुचाट. पहीला भाग काही पंचेस मस्त होते, एन्जॉय केला.
पहीला भाग काही पंचेस मस्त
पहीला भाग काही पंचेस मस्त होते, एन्जॉय केला. << +१ हा उगाच ताणलाय
अन्जू, अदिती ओके, आणि सहमत
अन्जू, अदिती ओके, आणि सहमत आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक अवांतर, तो तुमचा मराठी
एक अवांतर, तो तुमचा मराठी संस्थळांचा धागा थांबलाय का? मी प्रतिसाद नाही देवू शकत त्यावर...बरीच वादळी चर्चा चालली होती त्यावर...![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
हो, मास्तरांनी थांबवला. वादळ
हो, मास्तरांनी थांबवला. वादळ शांत. थांबवण्याआधी शंभर झाले हेच काय ते समाधान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो, मास्तरांनी थांबवला. >>
हो, मास्तरांनी थांबवला. >> छान, आता इथे नको विषयांतर. तुमची प्रस्तावना छान वाटली, परंतू 'द कन्क्ल्युजन' कुछ जम्या नही. पण तुमचा तो इगो क्लॅश वाला पॉइंट मात्र व्हॅलीड आहे. माझ्या मित्राची गफ्रे त्याच्या बरीच वर्षे मागे लागली होती की लवकरात लवकर जॉब स्वीच मारून तिच्या पेक्षा जास्त पॅकेजचा जॉब मिळव, तोपर्यंत लग्न करायचे नाही. झाले शेवट त्याचे लग्न २ वर्षांपूर्वी.
ऋ. दोन्ही लेख आवडले. पण
ऋ. दोन्ही लेख आवडले. पण पहिला जास्त आवडला. खुसखुशीत लिहिलायस.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इगो क्लॅश हे खरंच होऊ शकतं. लगेच नाही झालं तरी नंतर कधीही अगदी लग्नानंतर 25-30 वर्षांनंतरही. नवरा किंवा बायको कोणाकडूनही चुकून बोललं गेलं तरी दुसरा प्रचंड दुखावला जाऊ शकतो. अगदी परकाच कोणी बायको जास्त कमावतेय असं म्हटलं तरी ही इगो क्लॅश होऊ शकतो/ होतोच.
Pages