आंतरजालावर मिपा, मायबोली, उपक्रम, मनोगत, ऐसी अक्षरे या सारखे काही संवादी संकेतस्थळे असतात. या आभासी मंचावर अनेक लोक आपल्या विचारांची, भावनांची अभिव्यक्ती मांडत राहतात. विषय कुठलेही वर्ज्य नाहीत, व्यक्त होणे सुसंस्कृत असावे एवढीच अपेक्षा. सभासद लिहू वाचू शकतात. सभासद नसलेले फक्त वाचु शकतात. सभासदाचा बायोडेटा त्याच्या अकाउंटवर ठेवता येतो. काही लोक तो फक्त आपल्या आयडी पुरता मर्यादित ठेवतात. खर्या नावाने लिहिणारे, पारदर्शी माहिती ठेवणारे फार थोडे. स्त्री की पुरुष,वय,रहिवास,व्यवसाय नोकरी इत्यादी व्यावहारिक माहिती. काही लोक देतात काही नाही.पारदर्शक नसण्याची अनेक कारणे असू शकतात.
0-6 वर्षे या वयात मुलांचा मेंदू अतिशय जास्त कार्यश्रम असतो, अक्षरशः समोर ठेऊ ती गोष्ट ते आत्मसात करायला पाहात असतात,
मोठी माणसे जाणते-अजाणतेपणी त्यांच्या बरोबर जी इन्ट्रॅकशन करतात त्यातून मुले खूप गोष्टी शिकत असतात,
आपण मुद्दामहून ठरवून किंवा सहज झाले म्हणून मुलांबरोबर काही साधे सोप्पे खेळ खेळतो, त्यातून मुलांना काहीतरी नवीन शिकायला मिळते. अगदी साध्या नावाच्या भेंड्या पण मुलांचे फोनेटिक साऊंड पक्के करतात, मोठ्याना इंटरेस्ट असेल तर नावांचे अर्थ वगैरे गोष्टी सांगू शकतात,
असे काही खेळ आपण खाली लिहुया.
मला बरेच दिवस ह्या विषयावर लिहू असं वाटत होत . “ व्यक्तित्व “ ह्या वर आपले काही “ माईंड सेट “ असतात, उदाहरण स्वरूप जर एखादी व्यक्ती धार्मिक प्रवचन करत असेल तर ताबडतोप डोळ्या समोर एक संत येतो, राजकारणी व्यक्ती म्हटलं तर खादी वस्त्रधारी, व्यापारी/ उंच पदावर असेल तर सूट घातलेला. तसच एखादी महिला जर जीन्स- शोर्ट इत्यादी वस्त्रधारी असेल तर “ मॉड “ असं समजलं जातं. तसच एखादी बाई–मनुष्य केसात तेल लाऊन वेणी घातलेतली असेल तर “ मागसलेली’ समजली जाते.
आज तू चक्क तीन वर्षांची झालीस! वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत! तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास! दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस! गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे! अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस! जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस! तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात! माणसं चांगले लक्षात राहतात!
२६ नोव्हेंबर २०१२ ला स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाचा आज तिसरा वाढदिवस. विश्वास उडावा आणि 'मरो ते राजकारण,सगळे एकाच माळेचे मणी' असं वाटण्यासारखं अजून तरी अरविंद केजरीवालांनी काही केलेलं नाही.
लगे रहो, लडाई लंबी है ! शुभेच्छा.
अके आणि आप - भाग १
अके आणि आप - भाग २
मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे! तुला पत्र लिहिताना प्रचंड आनंद होतोय. अक्षरश: शब्द सुचत नाहीत. काय लिहू, किती लिहू आणि कसं लिहू अशी अवस्था होतेय! खूप भरून येतंय.
तू! तुझ्याबद्दल काय लिहू? लिहून व बोलून जे सांगता येईल ते फार फार थोडं आहे. कणभर आहे. पण तू, तुझं व माझं नातं, तू माझ्या आयुष्यात आलीस तो काळ व तिथून बदललेलं आयुष्य... काय काय आणि कसं सांगू!
नव्या जागी मित्र मैत्रिणी कसे मिळवावेत?
आधीच ग्रुप्स असलेल्या ठिकाणी कसे मिसळावे?
नोकरी निमित्त देशोदेशीच्या लोकांशी संपर्क येतो अशावेळी बोलण्याचे विषय, संभाषणातल्या ओपनिंग लाईन्स (मराठी शब्द?) काय असावे?
आपले बोलणे प्रभावी पण नाटकी किंवा आढ्यताखोर न वाटण्यासाठी काय करता येईल?
संभाषणातील सहजता कशी आणावी?
मी माझ्या बाबांवर गेलो आहे.
मला माझ्या आर्मीतल्या काकासारखं व्हायचं आहे.
मी ही सवय माझ्या आजीकडून घेतली.
'अब्दूल कलाम' माझा आदर्श आहेत.
मुंबईच्या पावसानंतर माझं आयुष्यं बदललं.
'ब्लड डायमंड' सिनेमानंतर मी हिरे वापरणं सोडून दिलं.
स्वदेसपासून प्रेरणा घेऊन मी अमेरिका सोडून भारतात गेलो.
तिबेटला जाऊन आल्यापासून मी बौद्ध धर्माचा अभ्यास चालू केला.
पहिल्याने वडिलोपार्जित घराला/गावाला भेट दिल्यानंतर माझा दृष्टीकोनच बदलला.
आजोबां गेल्यानंतर मी वृद्धाश्रमातून आजोबा दत्तक घेतले.
सत्यमेव जयते बघून मी स्त्री भ्रूण हत्येविरोधात काम करणार्या संस्थेत रुजू झालो.
अश्या एक ना अनेक गोष्टी.