अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग ३

Submitted by मिर्ची on 26 November, 2015 - 10:51

२६ नोव्हेंबर २०१२ ला स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाचा आज तिसरा वाढदिवस. विश्वास उडावा आणि 'मरो ते राजकारण,सगळे एकाच माळेचे मणी' असं वाटण्यासारखं अजून तरी अरविंद केजरीवालांनी काही केलेलं नाही.
लगे रहो, लडाई लंबी है ! शुभेच्छा. Happy

अके आणि आप - भाग १
अके आणि आप - भाग २

अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.

अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

अरविंद केजरीवाल

Submitted by अभय आर्वीकर on 18 December, 2013 - 11:51

मला अरविंद केजरीवालांच्या वागण्याच्या पद्धतीत, बोलण्यातील ढबीत आणि पेहरावाच्या स्टाईलमध्ये एक "महात्मा" दिसत आहे.
ही त्यांची नौटंकी की निसर्गदत्त गुणविषेशता हे काळाच्या ओघात स्पष्ट होईलच. Happy

तुम्हाला काय वाटते?

विषय: 

तिजा की फज्जा

Submitted by नितीनचंद्र on 17 October, 2012 - 23:17

अरविंद केजरीवालांनी प्रथम काँग्रेसच्या अध्यक्षांचा जावई नंतर सलमान ख्रुर्शीद आणि तिजा करुन नितीन गडकरींवर शरसंधान केले.

संध्याकाळी सहा वाजता इतका गोंधळ आणि इतके आरोप होते ( पुढे वेगवेगळ्या वाहिन्या आणि प्रतिस्पर्धी पक्षांचे नेते व कार्यकर्ते ) यात मुळ आरोप काय होता हेच समजत नव्हते.

आरोप होता कोणत्याश्या धरणाची अतिरिक्त जमीन अजित पवारांच्या काळात नितीन गडकरी यांना दिली.
आरोपाची धार अशी होती.

१) ती जमिन आता नितीन गडकरी यांच्या खाजगी मालकीची आहे
२) शेतकर्‍यांचा हक्क डावलुन नितीन गडकरी यांना देण्यात आली आहे.
३) चार दिवसात यावर निकाल झाला म्हणजे सर्व पक्षांचे एकमेकांशी साटेलोटे आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - अरविंद केजरीवाल