मी माझ्या बाबांवर गेलो आहे.
मला माझ्या आर्मीतल्या काकासारखं व्हायचं आहे.
मी ही सवय माझ्या आजीकडून घेतली.
'अब्दूल कलाम' माझा आदर्श आहेत.
मुंबईच्या पावसानंतर माझं आयुष्यं बदललं.
'ब्लड डायमंड' सिनेमानंतर मी हिरे वापरणं सोडून दिलं.
स्वदेसपासून प्रेरणा घेऊन मी अमेरिका सोडून भारतात गेलो.
तिबेटला जाऊन आल्यापासून मी बौद्ध धर्माचा अभ्यास चालू केला.
पहिल्याने वडिलोपार्जित घराला/गावाला भेट दिल्यानंतर माझा दृष्टीकोनच बदलला.
आजोबां गेल्यानंतर मी वृद्धाश्रमातून आजोबा दत्तक घेतले.
सत्यमेव जयते बघून मी स्त्री भ्रूण हत्येविरोधात काम करणार्या संस्थेत रुजू झालो.
अश्या एक ना अनेक गोष्टी.
बरेचसे ड्रॉइन्गपेपर/ कागद नासल्यामुळे रागावल्यावर, जेव्हा सान्गितले की अग कागदच कशाला हवेत? घराच्या भिन्ती आहेत ना? मग काढ त्याच्यावर चित्र, असे सान्गितल्यावर गेल्या वर्षी धाकटीने स्टुलवर उभे राहुन काढलेले हे चित्र. ते कसे आहे यापेक्षा ते काढताना तिने ज्या निष्ठेने जेवढे कष्ट घेतले ते जाणवल्यामुळे मुळे हे चित्र मी इथे सादर करीत आहे.
नावः धनश्री
वयः १५ वर्षे
मदतः भितीवर चित्र काढायला परवानगी
वीर हनुमान
सानिकाला तुझी आवडती व्यक्तीरेखा कोण म्हणून विचारलं,तर म्हणाली व्यक्ती म्हणजे कोण? म्हण्ट्ल तुझ आवडत माणूस , लगेच उत्तर आलं ,माझा बाबा!
मग त्याचच चित्र तिने काढायचं ठरवल.
ह्या चित्रात तिही आहे , अन बाबाच्या आवडीच्या वस्तू ही तिने त्याच्यासाठी काढल्यात