नाव--ईशिका
वय--आठ वर्षे नऊ महिने
आमची मदत--कुंडीतली थोडी माती घेऊन ती चाळून देणे, जून्या झाडूचे(जो दिवाळीत पूजेला वापरतो तसल्या छोटा झाडूचे) ऑर्डर येईल त्याप्रमाणे तूकडे करून देणे.:
ईशिकाला खरतर पूठ्ठ्याच्या खोक्याच घर बनवून त्यावर वारली पेंटिंग करायच होत, पण एकतर मी तीला ह्या उपक्रमाबद्द्ल काल बोलले आणि मला तीला हव असलेल सामान ( पूठ्ठ्याचा खोका ,गेरू ,पांढरा पोस्टर कलर) आणून द्यायला न जमल्यामूळे शेवटी हे आता बनवलय तस कागदावर चित्र काढायच ठरल व तिने हे घर बनवल.ह्यात जे घर दिसतय त्याला रंगवलेल नसून त्यावर चाळलेली माती फेविकॉल वर टाकून चिकटवली आहे.
सामान--
पाल्याचे नावः वेद
वय: साडेतीन वर्षे
आवडते घर : अॅक्टिविटी म्हणून हे घर एकदा केले होते त्यामुळे काडेपेटीच्या काड्यांचं घर करूया का म्हणल्यावर वेद लगेच तयार झाला. पूर्वी लावली होती तशीच खरी झाडं चिकटवायची असं आधीच सांगून झालं
माझी मदत : घराचा आकार काढून दिला. काड्या मात्र सगळ्या त्यानेच चिकटवल्या. सगळ्या चिकटवेपर्यंत हात फेव्हिकॉलने माखला होता आणि चिकटवण्याचा पेशन्स संपला होता. मग झाडं चिकटवताना फेव्हिकॉल मी लावून दिला. आणि शेजारच्या पानावर वेद कसं लिहायचं ते दाखवलं.
ही तयारी
![Picture 057.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u11081/Picture%20057.jpg)
बरेचसे ड्रॉइन्गपेपर/ कागद नासल्यामुळे रागावल्यावर, जेव्हा सान्गितले की अग कागदच कशाला हवेत? घराच्या भिन्ती आहेत ना? मग काढ त्याच्यावर चित्र, असे सान्गितल्यावर गेल्या वर्षी धाकटीने स्टुलवर उभे राहुन काढलेले हे चित्र. ते कसे आहे यापेक्षा ते काढताना तिने ज्या निष्ठेने जेवढे कष्ट घेतले ते जाणवल्यामुळे मुळे हे चित्र मी इथे सादर करीत आहे.
नावः धनश्री
वयः १५ वर्षे
मदतः भितीवर चित्र काढायला परवानगी ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वीर हनुमान
![hanuman by dhanashri.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u69/hanuman%20by%20dhanashri.jpg)
नावः सानिका नवरे
वयः ८ वर्ष
मायबोली आयडी (पालक): कविता नवरे
पालकांची मदतः काहीही नाही
माझं आवडतं घर - जलमहाल आणि आवडतं कॅरेक्टरः जलपरी (ह्यातली गुलाबी आहे ती सानु जलपरी आणि दुसरी * आहे ती आई जलपरी असं तिचं म्हणणं आहे :P) (*च्या इथे आधी जाडी असा शब्द लिहिलेला, पण "माझ्या आईला कोणी जाडी नाही म्हणायचं, आईनेही नाही ह्या मागणीमुळे तो गाळला आहे. आईचं शेपूट असण्याचा काळ आहे सध्या म्हणुन नो बॅड रिमार्क्स फॉर आई :P)
![i.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10863/i.jpg)
ही आमची सुरवात
![2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10863/2.jpg)
नाव- ईशिका
वय- आठ वर्षे नऊ महिने
आमची मदत- चित्र काढण्यात काहिच नाही,फोटो काढून इथे अपलोड करणे इतकीच.
ईशिकाच आवडत कार्टून आहे डोरा, त्यामूळे जेव्हा तिला मायबोली उपक्रमाबद्द्ल सांगितले तेव्हा तिनी डोराबाईंच चित्र काढणार असल्याचे सांगितले.
पूर्व तयारी
![10092011693_0.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5699/10092011693_0.jpg)
नंतर सूरू झाले रेखाटन
![10092011699_0.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5699/10092011699_0.jpg)
मग आवडत्या कामात गढून गेलेली ईशिका, चित्र रंगवताना
नावः ईशान
वयः सव्वा चार वर्षं
घरच्यांची मदतः टाचण्या लावून जोडा-जोड
खरं तर ईशानला आर्ट/क्राफ्टमध्ये अजिबात रस आणि/म्हणून/व्हाइस व्हर्सा गती नाही. पण आधी आम्ही गणपती बाप्पासाठी आसन वगैरे बनवले ते बघितलेले असल्याने आणि त्यातली गंमत (उर्फ रहाडा) माहिती असल्याने घराचे चित्र काढतोस का असे विचारल्यावर त्याने गणपती बाप्पासाठी घर बनवायचे आहे सांगितले. आलीया भोगाशी असावे सादर ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नावः तन्वी उपकारे (तनु) / (माउ)
वयः ४.५ वर्ष
घरच्यांची मदत :- रंगसांगती निवड. सांगणे
सामान :- पेन्सिल, खडूचे रंग, कागद.
आवडते काम :- चित्रकला आणी पडद्याला लटकणे
![2011-09-09 22.50.26.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u1030/2011-09-09%2022.50.26.jpg)
कॅमरा सेट करेपरयन्त मॅडम चे स्केच पूर्ण झाले.
![2011-09-09 22.51.00.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u1030/2011-09-09%2022.51.00.jpg)
.
चित्र दाखवायची घाई ...
![2011-09-09 23.03.19.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u1030/2011-09-09%2023.03.19.jpg)
पाल्याचे नावः परी
वय: पाउणे तीन
साहित्य : पेपर, पेन्सिल्स ,स्केच पेन, र्थमाकोलचे बॉल, रबर, फेवीस्टीक
मदत : रेषासाठी थेंब काढले जेणे करुन सरळ रेष, तिरपी रेष काढता येईल, तिच्या हात पकडून फेविस्टीक वापरणे.
![DSC05223.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u1197/DSC05223.JPG)
![DSC05226.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u1197/DSC05226.JPG)
हे झाल घर तयार
![DSC05229.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u1197/DSC05229.JPG)
सानिकाला तुझी आवडती व्यक्तीरेखा कोण म्हणून विचारलं,तर म्हणाली व्यक्ती म्हणजे कोण? म्हण्ट्ल तुझ आवडत माणूस , लगेच उत्तर आलं ,माझा बाबा!
मग त्याचच चित्र तिने काढायचं ठरवल.
ह्या चित्रात तिही आहे , अन बाबाच्या आवडीच्या वस्तू ही तिने त्याच्यासाठी काढल्यात ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![IMG_3768.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u8508/IMG_3768.JPG)