Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बाकी लास्ट ओवर मध्ये टिम
बाकी लास्ट ओवर मध्ये टिम डेविडला का बरं आज फटके मारायला जमत नव्हतं काय माहित. भारी जमली लास्ट ओवर!>>>>>>>
खेळलाच कुठे टीम डेविड जास्त लास्ट ओव्हर मध्ये
कॅम ग्रीन ला जमले नाही यॉर्कर्स मारायला किंवा कमीतकमी एक दोन रन घायला
लास्ट ओव्हर च्या 6 पैकी 4 बॉल ग्रीन खेळला आणि त्यातले 2 डॉट आणि जे दोन कनेक्ट केले त्यात 2 रन फक्त
कदाचित टीम डेविड जास्त बॉल खेळला असता तर जमले असते काहीतरी
कॅम ग्रीन चा मुंबई काय प्लॅन
कॅम ग्रीन चा मुंबई काय प्लॅन करतेय समजत नाहीये
सुरूवातीला 3 नंबर ला
एक मॅच मध्ये ओपन
आता 3 ते 4 मॅच पासून एकदम उशिरा बॉलर्स च्या आधी फक्त
ओके बिंग. मग आधीची ओवर असेल.
ओके बिंग. मग आधीची ओवर असेल. मला डेविडनी २ शॉट मिस केल्याचे आठवते आणि मग एक सरळ सिक्स मारला.
कॅम ग्रीन चा मुंबई काय प्लॅन
कॅम ग्रीन चा मुंबई काय प्लॅन करतेय समजत नाहीये >> त्यच्या बॉलिंग चा पण फारसा उपयोग होत नाहीये. एकंदर आर ओ आय कमी निघालाय असे जाणवतेय.
हो 19व्या ओव्हर मध्ये 19 रन
मला डेविडनी २ शॉट मिस केल्याचे आठवते आणि मग एक सरळ सिक्स मारला.>>>>>
हो 19व्या ओव्हर मध्ये 19 रन काढले टीम डेविड ने
पण 20वी ओव्हर मोहसीन ने एकदम जबरदस्त टाकली
जॉर्डन ला साईन करण्यापेक्षा
जॉर्डन ला साईन करण्यापेक्षा अर्जुन काय वाईट होता राव ? मला जनरली त्याने नेहमी मार खाल्लेलाच आठवतो. >>>
माझ्या मते रीसेन्सी बायस चा मोठा भाग आहे. आपल्या समोर (सेमी फायनल मध्ये) आणि पाकिस्तान समोर (फायनल मध्ये) डेथ ला चालून गेला होता.
पंजाबनेही मागे बरेच पैसे देऊन
पंजाबनेही मागे बरेच पैसे देऊन त्याला उचलला होताच कि. मला वाटते बाहेरच्या टी २० मधे चाललेले इथे उचलले जातात - टाय, लिव्हिंग्स्टन , कॉर्ट्रेल अशी बरीच उदाहरणे आहेत.
शॉ ने बाहेर बसवणे एकदम मनावर घेतलेले दिसतेय. पण एकंदर आधीछे फॉल्ट्स तसेच आहेत हेही जाणवतेय.
जॉर्डन ला साईन करण्यापेक्षा
जॉर्डन ला साईन करण्यापेक्षा अर्जुन काय वाईट होता राव ? मला जनरली त्याने नेहमी मार खाल्लेलाच आठवतो. >>>
माझ्या मते रीसेन्सी बायस चा मोठा भाग आहे. आपल्या समोर (सेमी फायनल मध्ये) आणि पाकिस्तान समोर (फायनल मध्ये) डेथ ला चालून गेला होता.
>> बोलिंग फारच खराब आहे जॉर्डनची. अर्जुनला जरी मार मिळाला (टेंपरामेन्ट मुळे) तरी बोलिंग बरी टाकतो. आपल्या समोर (सेमी फायनल मध्ये) आणि पाकिस्तान समोर (फायनल मध्ये) पण जॉर्डनची बोलिंग खराबच होती पण बॅटिंग अजुन खराब केली गेली. काय टप्पी बॉल टाकतो हिटींग झोन मध्ये.
धवन ने घेतलेला कॅच एकदमच भारी
धवन ने घेतलेला कॅच एकदमच भारी होता. धवन फिल्डर म्हणुन एकदमच अंडर रेटेड आहे. रिलायेबल पण जाडेजा, सूर्यासारखा चमकता नाही पण बेटर दॅन एव्हरेज .
पंजाब ने ही मॅच नाहि काढली तर एक पाय बाहेर ठेवून बसायला लाग्णार आहे त्यांना.
"शॉ ने बाहेर बसवणे एकदम मनावर
"शॉ ने बाहेर बसवणे एकदम मनावर घेतलेले दिसतेय. पण एकंदर आधीछे फॉल्ट्स तसेच आहेत हेही जाणवतेय." - त्याने रन्स केलेले पाहून बरं वाटलं. पण सुरूवातीचा खेळ - टेंटेटिव्ह शॉट्स, अनसर्टन फूटवर्क आणि आळशी रनिंग बिटवीन द विकेट्स पाहून वाईटही वाटलं.
"धवन फिल्डर म्हणुन एकदमच अंडर रेटेड आहे" - मला त्याच्या बॅटिंगविषयीसुद्धा असंच वाटतं. बिग मॅच प्लेयर आहे धवन, आणी आता गिलने कदाचित त्याचे परतीचे दोर कापले आहेत, पण अजून थोडा खेळू शकला असता इंडियासाठी (टी-२० नाही, पण इतर दोन फॉर्मॅट्स).
काल मॅच बघता बघता झोप लागली,
काल मॅच बघता बघता झोप लागली, आणि पंजाब जिंकला असं स्वप्न पडलं!
७ बॉल मध्ये ८ रन्स हवेत, ७ विकेट्स हातात, आणि लिआम खेळ्तोय असं दिस्लेलं.
मग त्याने ६ मारला आणि त्यात त्याची बॅट तुटली असं पुढे दिसलं
काल डी सी ने सोडलेले कॅचेस ,
काल डी सी ने सोडलेले कॅचेस , रन आउट हे स्ट्रॅटेजिक होते का ? तायडे एव्हढा अडखळत होता हे बघूनही त्याला आधी रीटायर केले नाही हे कमाल आहे.
फाफ अन् कोहली मस्त खेळले...
फाफ अन् कोहली मस्त खेळले...
कोहली काय खेळलाय आज - लाजवाब
कोहली काय खेळलाय आज - लाजवाब ! बँगलोरने सगळ्यांची गोची करून ठेवली आहे आता - रेट पण वाढवलाय. जायंट्स, जायंट्स, मुंबई ला शेवटच्या मॅचेस जिंकणे मस्ट झाले आहे. परत बँगलोरची मॅच शेवटी असल्यामूळे काय करावे लागेल हे ही क्लीयर होईल तोवर. मुंबई ची सगळ्यात टाईट हवा झाली असणार. बंगलोर बरोबर चौथ्या क्रमांकासाठी टाय झाले तर काहीच्या काही मार्जिन ने सामना जिंकलेला असावा लागेल चौथा असायला मुंबई साठी.
आज बेंगलोरचा अपेक्षेप्रमाणे
आज बेंगलोरचा अपेक्षेप्रमाणे विजय
आज राजस्थान ला भारी मार्जिन
आज राजस्थान ला भारी मार्जिन ने जिंकून देव पाण्यात घालून बसावं लागेल
जस्ट गंमत:
जस्ट गंमत:
जर चेन्नई दिल्ली विरुद्ध अन् लखनौ कोलकाता विरुद्ध हरले
आणि मुंबई हैदराबाद विरुद्ध अन् बंगलोर गुजरात विरुद्ध जिंकले तर चेन्नई - लखनौ पैकी जास्ती रन रेट असलेले पुढे जातील...
चेन्नई - लखनौ पैकी जास्ती रन
चेन्नई - लखनौ पैकी जास्ती रन रेट असलेले पुढे जातील..>>>>>>आणि ते चेन्नई किंवा लखनऊ कोण जास्त वाईट हरेल त्यावर ठरेल
माझा अंदाज
गुजरात पहिले
चेन्नई दिल्ली ला हरवून दुसरे
मुंबई हैद्राबाद ला हरवून तिसरे
लखनऊ कोलकाता सोबत हरून चौथे
Rcb गुजरात विरुद्ध हरून पाचवे
मग
राजस्थान
कोलकाता
पंजाब
Rcb गुजरात विरुद्ध हरून पाचवे
Rcb गुजरात विरुद्ध हरून पाचवे >> हो हे चान्सेस अधिक वाटतात कारण कोहलीची मोठी इनिंग जस्ट झाली आहे
मॅच बघता नाही आली त्यामुळे
मॅच बघता नाही आली त्यामुळे हायलाईट्स बघितले. जब्बरदस्त इनिंग्स! काय क्लिन आणि वेल हिट शॉट्स होते. एकदम ट्रडिशनल कोहली!
क्रेक्ट वाटतात मला अंदाज तुमचे, बिंग. फक्त कॅपिटल्सनी एकदा धक्का दिलाय चेन्नई ला आणि आर सि बि वाल्यांचे पण कधी कधी सांगता येत नाही.
पडीकल जैस्वाल पेक्षा चांगला
पडीकल जैस्वाल पेक्षा चांगला खेळत होता...
आता संजू पण गेला...
तुमचा लाडका रियान पराग आलाय
कठीण दिसतय राजस्थान चं!
अरे ३३ बॉल ५१ पाहिजेत. शक्य
अरे ३३ बॉल ५१ पाहिजेत. शक्य आहे हेटमायर आहे तो पर्यंत.
पराग बद्दल काय बोलणार?
जुरेल बसलाय पॅड लावून.
33 ला अर्थ नाही... 24 बॉल्स
33 ला अर्थ नाही... 24 बॉल्स मध्ये केले तरच अर्थ आहे.
हरप्रीत ब्रार ला शो पीस म्हणून खेळवतात का?
माय गूडनेस! २ बॉल १३ रन!
माय गूडनेस! २ बॉल १३ रन!
गूड जॉब पराग.
>>गूड जॉब पराग
>>गूड जॉब पराग
हेच लिहायला आलेलो
जुरेल!!!!
जुरेल!!!!
दोन्ही सिक्स आंडू पांडू
दोन्ही सिक्स आंडू पांडू नव्हते माझ्यामते. अगदी पट्ट्यात नव्हता दिला बॉल रबाडानी. पहिला सिक्स विशेष होता! दुसरा पण पायावरुन उचलला आणि टायमिंग खतरा असणार त्यामुळेच सिक्स गेला.
राजस्थानला जिंकायचेच होते
राजस्थानला जिंकायचेच होते
ते जिंकले
राजस्थानला जिंकायचेच होते
राजस्थानला जिंकायचेच होते
ते जिंकले
>>
काहीही कमेंट
कुठल्या टीम ला जिंकायचं नसतं? पण कुणीतरी एकच जिंकतं.
अशी कमेंट कुठल्याही मॅच नंतर विनिंग टीम चं नाव टाकून लिहिता येईल.
दुसरा पण पायावरुन उचलला आणि
दुसरा पण पायावरुन उचलला आणि टायमिंग खतरा असणार त्यामुळेच सिक्स गेला. >> नि जवळजवळ तसाच शॉट खेळताना बाद झाला. फेफ ने परत केस उपटले असणार.
गब्बर एकदम फॉर्म मधे होता फिल्डींग करताना मात्र.
मुंबई सहावी झालीये आता.
Pages