आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जयस्वाल, सलाम ! त्यांचं शतक सहज होवू शकलं असतं व ते न्याय्य ठरलं असतं ! >> +१ सॅमसन ला काय झाल मधेच - नि चार रन्स हवे असताना प्लेड करून सिक्स मारायला सांगतो. काय इनिंङ होती पण - क्लीन हिट, संयम, झक्कास ग्राऊंड शॉट्स !! Take a bow !

आजचे चार हायलाईट्सः

रॉयल्सची फिल्डिंग - जीव टाकून फिल्डिंग केली रॉयल्सनी. कॅचेस तर घेतलेच पण ग्राऊंड फिल्डिंग पण जबरदस्त होती.

चहलची बॉलिंग - स्मार्ट, धूर्त, चाणाक्ष!!

जैस्वालची बॅटींग - वेगळ्याच प्रतलावर खेळत होता जैस्वाल. सुपर्ब टॅलेंट!

संजू - तो सुयश चा शेवटचा वाईड लेगच्या बाहेर जात खेळून त्याने जैस्वाल ला शतकाची संधी देऊन छान gesture दाखवलं. स्वतःसुद्धा वेळप्रसंगी सेकंड फिडल खेळत, कधी मोठे शॉट्समारत मस्त बॅटिंग केली.

(इथून पुढे रॉयल्स, 'तेच का हे' असं वाटावं इतकं भिकार क्रिकेट खेळून हेल्दी रन-रेट ठेवून पण पॉईंट्सच्या तक्त्यावर सहावे वगैरे आले तर फारसं आश्चर्य वाटायचं कारण नाही. Happy )

फेफ, पूर्ण पोस्टला अनुमोदन!!

संजूचे ते वाईडला जाणारा चेंडू फक्त तटवून यशस्वीला स्ट्राईक देऊन शतक करण्याची संधी देणे आणि सिक्स मार असे खुणेने सांगणे मस्त होते Happy

अजुन एक हायलाईट म्हणजे पोस्ट मॅच मध्ये हर्षाने आधी यशस्वीशी हिंदी मध्ये बोलायला सुरुवात केली पण यशस्वी इंग्रजीतुन उत्तरे देतोय म्हंटल्यावर हर्षा पण परत इंग्रजीवर आला Happy

आणि नितिश राणा पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मधे म्हणाला होता की today was one of the day when nothing going wrong for yashasvi की असेच काहितरी, तोच धागा पकडून जेंव्हा हर्षाने बोलायला सुरुवात केली तेंव्हा यशस्वीने त्याला पोलाइटली जाणीव करुन दिली की it was not like that; but i tried and my best and there is good amount of process involved.
थोडक्यात माझा दिवस होता म्हणून मी चाललो वगैरे पेक्षा याच्यामागे माझे परीश्रम आहेत; प्रोसेस आहे Happy

यशस्वी जैस्वालच्या टॅलेंटची पहिल्या सीजनपासून वा त्या आधीपासूनच कल्पना होती. फक्त आला तेव्हा फार लुकडा होता. भले गेम टायमिंगचा असला तरी वरच्या लेव्हलला खेळताना थोडी तरी ताकद हवी अंगात. ती आल्यावर तो नेक्स्ट लेव्हलला जाणार असेच वाटायचे. ते गेलाय वाटते तो आता. तरी या सीजनला अजूनपर्यंत त्याला एकही बॉल खेळताना पाहिले नाहीये.

आपल्याकडे प्रोसेसला आणि त्या प्रोसेसमागे जो कोच कर्णधार असतो त्याला श्रेय कमी दिले जाते वा द्यायला जीवावर येते. खेळाडूतच टॅलेट आहे तर तो चमकणारच हा क्रिकेटमधील सर्वात मोठा गैरसमज आहे.

रिस्पेक्ट खूप कमावलाय या माणसाने
तो फलंदाजीला मैदानात उतरताच जो माहौल तयार होतो तो कमाल असतो...
तो जर ईंग्लिश कॉमेंटेटरना दिसत नसेल आणि त्याबद्दल ते काही बोलत नसतील तर असे जळकुटे कॉमेंटेटर कोण आहेत हे बघायला एकदा ईंग्लिश कॉमेंटरी ऐकायला हवी Happy

सुयश शर्माने जाणूनबुजून हा चेंडू डाव्या यष्टी बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून चेंडू वाईड जाऊन बाईजच्या दोन धावा राजस्थानला मिळाल्या असत्या व राजस्थान विजयी झाली असती.
>>>>>

हे खरे असेल तर निषेध या अखिलाडूवृत्तीचा.

संजूचे ते वाईडला जाणारा चेंडू फक्त तटवून यशस्वीला स्ट्राईक देऊन शतक करण्याची संधी देणे आणि सिक्स मार असे खुणेने सांगणे मस्त होते >> सॉरी ! ते फार लेट केले त्याने. त्या आधीच्या ओव्हर मधे एकदम आक्रमक खेळला नि हव्या असलेल्या रन्स चे मार्जिन एकदमच कमी केले होते. नेट रन रेट महत्वाचा ठरनार हे माहित असल्यामूळे ते केले सम्जऊ शकतो पण जयस्वल ची इनिंग खास होती. १०० ची चुट्पुट लागून गेली.

असामी, फेफ, जैस्वाल बद्दल पुर्ण अनुमोदन. क्लास खेळी!

स्वरुप, आता मुलाखत बघितली पाहिजे पण जैस्वाल नी तसं म्हणणं समजू शकतो. त्याच बरोबर राणा जे म्हणाला ते जैस्वालचे क्रेडिट कमी करायला असं नाही वाटत. शेवटी सगळ्यांचीच प्रोसेस असते पण एखाद्या दिवशी त्या प्रोसेस मध्ये काहीच अडथळा येत नाही.
जैस्वालची आत्ता ही दुसरीच इनिंग आहे, त्या आधीही त्याची प्रोसेस होतीच की.
बोलायची पद्धत असते, बाकी काही मलिशियस असं नाही त्यात. Happy

बॉलिंग तर भारी आहेच पण आज लक पण आहे. गेला वाधेरा!
काय देखणे शॉट मारले पण. शमीला (बहितेक)मारलेला सिक्स अप्रतिम होता.

जयस्वाल तिन्ही फॉरमॅट मध्ये लंब्या रेस चा घोडा आहे.
अनलाइक अ लॉट ऑफ न्यू कमर्स, तो बॉलर डोक्यावर चढले असताना तंबू ठोकूनही लांब इनिंग खेळू शकतो.

अरे सुर्याचे शॉट पाहिले का? कैच्या कै आहे आरे. शास्त्री आणि दुसर्‍या कॉमेंटेटरचा मतभेद होता आधी. शास्त्री म्हणाला डेलिबरेट आहे. मलाही वाटलं की काहीही सांगतोय शास्त्री. पण भौ! खरच डेलिबरेट होता. डेंजर. बॅटचा फेस बाहेर ओपन करुन त्यानी ऑफ ला स्लाईस केल्यासारखा गलीच्या डोक्यावरुन सिक्स मारला राव! काय डोंबलाचं फिल्ड सेट करणार?

हे भगवान! काय मारले!

व्हॉट अँन इनिंगज!!! शिवाय, शेवटच्या चेंडूवर षटकार मारून शतक!! ग्रेट, सूर्या !!!!
*खरच डेलिबरेट होता. डेंजर. बॅटचा फेस बाहेर ओपन...* -
डेलिबरेटच होता: सचिनने लगेचच पियुषला सूर्याने बॅट कशी फिरवली हे प्रात्यक्षिकही दाखवलं !!!

खरच डेलिबरेट होता >> सूर्या डेलिबरेट मारतो हे बोलायचा पण कंटाळा येतो आत्ताशा Happy काय फिल्डींग लावायची भाऊ अशा शॉट्स ना ? बेसिकली बॉल टाका नि मजा बघा कि हा भाऊ कुठे मारणार बॉल त्याची.

मध्वाल कसला स्किडी आहे मस्त - मजा येते बघायला. बाकी चावला ला सध्या बॉलिंग करताना बघून सारखे 'भल्या माणसा भारतीय संघात असताना कुठे विसरून आला होतास हे ?' हे विचारावेसे वाटते.

, तो बॉलर डोक्यावर चढले असताना तंबू ठोकूनही लांब इनिंग खेळू शकतो. >> डोमेस्टीक मधे गिरवलेल्या दोन वर्षांचा परीणाम आहे. त्याचे टेंपरामेंट जबरदस्त सुधारलय. शॉ ला त्याने रेस मधे कुठल्या कुठे सोडलय. सिरीयसली गिल ला त्याच्या नॉर्मल मिडल ऑर्डर स्लॉट मधे आणून जयस्वाल ला ओपनर म्हऊन आणण्याची वेळ आली आहे.

मुंबई ने वढेरा, विनोद नि तिलक असे तीन मिडल ऑर्डर मेन स्टे बिल्ड करायला सुरूवात केलेली दिसतेय .

>>बोलायची पद्धत असते, बाकी काही मलिशियस असं नाही त्यात. Happy

नाही, मला राणा किंवा हर्षा काही मुद्दामुन चुकीचे बोलले असे म्हणायचे नव्हते पण तरीही यशस्वीने ते करेक्ट करण्याची तसदी घेतली हे सांगायचे होते

सुर्याचे येऊन शमीने अभिनंदन करणे; किंवा काल चहल सुयशच्या गळ्यात हात टाकून त्याला काही युक्तीच्या चार गोष्टी सांगत होता ते बघायला जास्त छान वाटते उगा त्या रायव्हलरी वीकच्या ओढूनताणून दिलेल्या तडक्यापेक्षा!!

अग्रीड ऑन सुर्या असामी. अवघड प्रकरण आहे तो.

आलं लक्षात स्वरुप. अणि अग्रिड ऑन कमराडरी. रायवलरी पेक्षा खुपच छान वाटतय बघायला.

IMG-20230513-WA0009.jpg

काय फिल्डींग लावायची भाऊ अशा शॉट्स ना ? बेसिकली बॉल टाका नि मजा बघा कि हा भाऊ कुठे मारणार बॉल त्याची. >>>
खरच डेलिबरेट होता. डेंजर. बॅटचा फेस बाहेर ओपन. >>> टोटली! अफलातून बॅटिंग आहे त्याची. मजा येते बघायला. तरी काल डीप फाइन लेग चा एरिया त्याने सोडला होता. फक्त स्क्वेअरलेगपर्यंतच मारले काल लेग साइडला.

शास्त्रीच तेंडुलकरच्या कॉमेण्टबद्दल सांगत होता ना - की असा शॉट मला मारता आला असता तर मी अजून ३०००-४००० रन्स केले असते Happy

सूर्या हा आयपीएल मधला रिचर्ड्स होत चालला आहे असे लिहायचा मोह आवरत आहे सध्या Happy

ओव्हरऑल मुंबईचा लेट सर्ज मस्त आहे. इतके दिवस बाकी टीम्स चा गवगवा सुरू होता पण आता यांचे लोक फॉर्म मधे आले आहेत. सूर्या वगैरे तर आहेतच पण वढेरा, विनोद, तिलक आणि टिम डेव्हिड हे ही आहेत. आणि अजून रोहित फारसा न खेळताच ही सिच्युएशन आहे. पियुष चावला हे ही एक सरप्राइज पॅकेज आहे.

रशिद खानला मात्र टोटल रिस्पेक्ट!

Pages