Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एक दणकन उसळला नि बरगड्या
एक दणकन उसळला नि बरगड्या काळ्या निळ्या करून गेला>>> डेंजर!!!
मी पण बहुतेक टेनिसला शिफ्ट होईन. जरा वशिला लावावा लागेल काहीतरी.
अरे काय! करनला पण चोपला! एकत नाय आज बिग मान ड्रे!
आख्खी ओव्हर इतकी सेंसिबल
आख्खी ओव्हर इतकी सेंसिबल टाकणाऱ्या अर्शदीपने लास्ट बॉल इतका फालतू कसा टाकला राव!!
मलाही शंका यायला लागलीये आता.
मलाही शंका यायला लागलीये आता.
बुवा आयपील सोडा. आमच्या
बुवा आयपील सोडा. आमच्या इथल्या लीग मधे बत्तीस टीम्स आहेत नि आमच्याकडे प्रत्येकाची खेळण्याची स्टाईल, अमका कुठे चाचपडतो, तमका बॉलर कॉमनली काय पॅटर्न मधे बॉलिंङ करतो वगैरे (अक्चुअली) लिहिलेले आहे. आपण हे आधीही नकळत करत होतो - आता डेटा ड्रिव्हन प्रकारांची जाणीव झाली आहे म्हणून थोडं पद्धतशीर रित्या केले जाते हा मोठा फरक. अॅम्पायर म्हणून आपणच रोटेट होत असतो त्यावेळी नोट्स घेतल्या जातात. आता एव्हढ्या लो स्केल वर आम्ही हे करतो तर आयपील मधे काय होत असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. >>>
पण तुम्ही लीग फिक्स करायला काय करता ते सांग बरं?
नाही शंका म्हणून नाही पण एक
नाही शंका म्हणून नाही पण एक चांगला वाईड यॉर्कर वगैरे मॅचचा रिझल्ट बदलू शकला असता
अर्शदीप आणि शिखर धवनचा चेहरा बघवत नव्हता!!
रिंकू परत एकदा हिरो
हो ना!!! त्याधी काय खत्रा
हो ना!!! त्याधी काय खत्रा बाउन्सर टाकला तो पण ड्रे रसल्ला! काय कळत नाही बट अगेन. It's that moment and what you think, what you do during that split second is what tips the balance one way or the other. But I'll say this, that's how legends are born. You think about Akram, Imran, Shane Warne, Lilee etc. That's what made them legends. Plus this format of the game is so hard for bowlers.
हळूहळू चेसेसमध्ये ड्यू फॅक्टर
हळूहळू चेसेसमध्ये ड्यू फॅक्टर जाणवायला लागलाय की काय जणू!
पण तुम्ही लीग फिक्स करायला
पण तुम्ही लीग फिक्स करायला काय करता ते सांग बरं? >> आम्ही एक नो बॉल टाकायचा नि बॅटसमन ने मारायचा, फिल्डर ने कसा कॅच पकडायचा हे ठरवतो. लोकांचे सोपे असते, बीयर मधे काम होते. बॅटला मात्र आंजारून गोंजारून घ्यावे लागते - ऑइलिंग करायचे प्रॉमिस द्यावे लागते - म्हणजे बॉल मिडल झाला पाहिजे. वार्याला पण सांभाळून घ्यावे लागते कि बॉल फिल्डरच्या हातात गेला पाहिजे वगैरे वगैरे. टीम भीमरुपीचे पारायण करतात. येराबागाळ्याचे काम नव्हे
बुवा रिंकुला पहिला बॉल टाकला होता तोच बॉल होता तो. रिंकूने नीट मिडल केला नि गॅप पण परफेक्ट शोधली. रसेल ह्या मॅच मधे खेळला सो त्याचा सीझनचा कोटा संपला
अर्शदीप आणि शिखर धवनचा चेहरा बघवत नव्हता!! >> +१
आम्ही एक नो बॉल टाकायचा नि
आम्ही एक नो बॉल टाकायचा नि बॅटसमन ने मारायचा, फिल्डर ने कसा कॅच पकडायचा हे ठरवतो. लोकांचे सोपे असते, बीयर मधे काम होते. बॅटला मात्र आंजारून गोंजारून घ्यावे लागते - ऑइलिंग करायचे प्रॉमिस द्यावे लागते - म्हणजे बॉल मिडल झाला पाहिजे. वार्याला पण सांभाळून घ्यावे लागते कि बॉल फिल्डरच्या हातात गेला पाहिजे वगैरे वगैरे. टीम भीमरुपीचे पारायण करतात. येराबागाळ्याचे काम नव्हे>>>>>> टोटल लोल!!
बुवा रिंकुला पहिला बॉल टाकला होता तोच बॉल होता तो. रिंकूने नीट मिडल केला नि गॅप पण परफेक्ट शोधली.>>>>>>> अय अरे भौ, आता मला बघू दे परत. मी साईडला काम करत होतो (करावं लागतं बाबा पोटा पाण्याकरता ) आता बघतो आणि मग सांगतो. तुझ्या प्रत्येक बॉलनबॉल लक्षात राहतात राव
रसेल ह्या मॅच मधे खेळला सो त्याचा सीझनचा कोटा संपला Wink>>>>>>
आजची मॅच सुद्धा
आजची मॅच सुद्धा
एक रुका हुआ फैसला चित्रपट आठवला.
शेवटी सगळे माझ्या मताचे होणार
हे वेंकटेश अय्यर ला सारखे वर
हे वेंकटेश अय्यर ला सारखे वर खाली का करत असतात ऑर्डर मधे ? त्याला अजिबात झेपत नाही खाली आला कि. >>>
वेंकी फिल्डिंग करताना शेवटच्या ओव्हर बाहेर बसला होता. त्यामुळे तेवढाच टाइम दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग ला येऊ शकत नव्हता.
रसेल कसा खेळला हाच विचार करत
रसेल कसा खेळला हाच विचार करत होतो मी.
“ येराबागाळ्याचे काम नव्हे” -
“ येराबागाळ्याचे काम नव्हे” - सगळा पॅराच सुपरलोल आहे
“ खालिद ची बिल्ट नि एकंडर
“ खालिद ची बिल्ट नि एकंडर बॉलिंग सुधारली आहे यंदा असे वाटले का ?” - खलिदची बिल्ट नक्कीच सुधारली आहे. तो, जैस्वाल ई. यंदा जिमचे पैसे सत्कारणी लागल्यासारखे दिसतायत. अंडर द रडार असल्यामुळे (प्रेशर कमी) खलिद बॉलिंगपण पुष्कळ डिसिप्लिन्ड करतोय.
यंदा जिमचे पैसे सत्कारणी
यंदा जिमचे पैसे सत्कारणी लागल्यासारखे दिसतायत. >> कोहली ने लावलेले फिटनेस चे झाड जिवंत राहिले पाहिजे राव. ऑस्ट्रेलियन नि किवीज फिल्डर्स बघितले कि ......
हौ, जैस्वाल टोटली बफ झालाय.
हौ, जैस्वाल टोटली बफ झालाय. ठोकतो पण सॉलिड. फिटनेस खरच पाहिजे.
खलिदची बिल्ट नक्कीच सुधारली
खलिदची बिल्ट नक्कीच सुधारली आहे. तो, जैस्वाल ई. यंदा जिमचे पैसे सत्कारणी लागल्यासारखे दिसतायत. अंडर द रडार असल्यामुळे (प्रेशर कमी) खलिद बॉलिंगपण पुष्कळ डिसिप्लिन्ड करतोय. >>>
कोहली ने लावलेले फिटनेस चे झाड जिवंत राहिले पाहिजे राव. >>>
फिल्डिंग चं काय पण ? खलील कुंबळे, प्रसाद, श्रीनाथ यांची परंपरा चालू राहिली पाहिजे अशी फिल्डिंग करतो.
बाकीचेही नवे गोलंदाज तसेच आहेत - आवेश, अर्षदिप इत्यादी. सगळयांना फिल्ड मध्ये लपवावे लागते.
बिष्णोई हा एकच सणसणीत अपवाद आहे, जीव तोड फिल्डिंग करतो.
आवेश, अर्षदिप इत्यादी.
आवेश, अर्षदिप इत्यादी. सगळयांना फिल्ड मध्ये लपवावे लागते.>>>>> ह्यांचा फिटनेस बरा वाटतो पण सराव करत नाहीत वाटतं फिल्डींगचा.
“ खलील कुंबळे, प्रसाद,
“ खलील कुंबळे, प्रसाद, श्रीनाथ यांची परंपरा चालू राहिली पाहिजे अशी फिल्डिंग करतो.” - ह्याच विविधतेनं नटलेल्या परंपरांचा चहलही पाईक आहे.
खलीलने परवा शॉर्ट फाईनलेगला कोहलीच सोपा कॅच जगल करत घेतला तेव्हा त्याच्या चेहर्यावर स्वतःच चकित झाल्याचे भाव होते. आधीच्या एका मॅचला त्याने मायर्सचा कॅच (अक्षरशः गोळा) गलीत सोडला होता. त्यामुळे त्या अंगानं सगळी तयारी झालीय. आता फक्त कुंबळे, श्रीनाथ इतकी नाही तरी प्रसाद, चहल इतकी सॉलिड बॉलिंग केली तर करियर होईल पोराचं.
फारच टाकून बोलता बॉ असामी आणि
फारच टाकून बोलता बॉ असामी आणि फेफ, तुम्ही लोक.
फारच टाकून बोलता बॉ असामी आणि
फारच टाकून बोलता बॉ असामी आणि फेफ, तुम्ही लोक
>>
आपण बॉल टाकून रन अडवत / विकेट घेत असल्याने कॅच टाकून ढिसाळ फिल्डींग केली तरी चालेल असं समजणाऱ्या लोकांना टाकूनच बोललं पाहिजे...
कधी कधी कॅच पकडण्यापेक्षा
कधी कधी कॅच पकडण्यापेक्षा जास्त पैसे कॅच सोडायचे मिळतात
असामी आणि वैद्यबुवा, कुठे
असामी आणि वैद्यबुवा, कुठे खेळता तुम्ही?
मला वाटते वायफळ बोलायचे पैसे
मला वाटते वायफळ बोलायचे पैसे अधिक मिळत असावेत
फिटनेस चा उपयोग फिल्डींग पलिकडे पण आहे. ओव्हरऑल इंजरी होण्याचे प्रमाण कमी होईल - विशेषतः बॉलर्स चे. स्टॅमिना वाढेल.
जनरली डीप मधे उंच लोक असतात - बिश्नोई नि वॉर्नर हे दोन सणसणीत अपवाद. ते कुठेही कमी वाटत नाहीत डीप मधे. यंदा मनिष पांडे ची फिल्डींङ एकदम गंडलीये - एकदम त्याच्या बॅटींग सारखी झाली आहे
इथे लीग आहेत तीन - एक टेप टेनिस बॉल ची , दुसरी हार्ड लेदरची नि तिसरी सॉफ्ट लेदरची. मी तरी सध्या शेवटच्या मधे आहे. त्यांचे सामने मर्यादित प्रमाणात असतात - बाकीचे दर वीकेंडला खेळतात. काही अजून नुसत्य टेनिस बॉल वाल्या लीग्स पण आहेत पण आता त्यात मजा वाटत नाही.
काल हरप्रीत ब्रार ला एकच
काल हरप्रीत ब्रार ला एकच ओव्हर दिली... खरं तर पिच बघुन त्याला आणखी ओव्हर्स द्यायला हव्या होत्या असं वाटून गेलं.
चला मुंबई परत दोनशे चेस
चला मुंबई परत दोनशे चेस करायची प्लॅनिंग करायला लागली असेल. आज चावला पण ऑफ दिसतोय. जॉर्डन जेव्हढा सीम फ्रेंडली कंडीशन्स मधे चालतो तेव्हढा इथे चालत नाही. अगदीच डेस्परेट कॉल वाटतोय त्याचा. आज शर्मा खेळला नाही तर खरच ब्रेक घेऊन टेस्ट फायनलसाठी तयारी करावी त्याने.
किशन ची फायनलसाठी राहुलला सब म्हणून निवड म्हणजे तो किपिंङ करणार असे धरून चालायचे का ? भरत नि किशन मधे बॅटींग नि किपिंग मधे काही फारसा फरक नाही. किमान हा डावखुरा आहे नि डोमेस्टिकमधे थोड्या मोठ्या इनिंग्स आहेत हा प्लस पॉइंट. द्रविडला साहाला बाहेर ढकलल्याबद्दल पश्चाताप होत असेल का ?
जॉर्डन फिल्डिंग मध्ये जीव ओतत
जॉर्डन फिल्डिंग मध्ये जीव ओतत आहे पण.
साहाला बाहेर ढकलला तेव्हा चांगल्या टच मध्ये होता का तो? अजुन एक म्हणजे आय पि एल म्हणजे सगळे भारतीय पिचेस. तिथे चालला म्हणून बाहेर चालेल का? लाईक ऑल्वेज. ओन्ली आस्किंग
बुवा काही चुकार जीव वगळता
बुवा काही चुकार जीव वगळता साहाच्या किपींग बद्दल He is best keeper in India ह्याबद्दल लोकांचे एकमत आहे. पंतची बॅटींग नि त्यातला एक्स फॅक्टर त्याला साहाच्या वर नेऊन ठेवतो. पण पंत नसेल तर बॅटींग पुरते साहा नि बाकीचे कोणी ह्यात फार डावे-उजवे नाहि. ह्याउलट किपिंग बाबत साहा हेड अँड शोल्डर (अजूनही) पुढे आहे - निव्वळ किपींग बाबतही खर तर पंतच्याही. द्रविडला त्याच्या किपिंग काय बॅटींग बद्दल पण प्रॉब्लेम नव्हता - फक्त वयाबद्दल होता नि नवा चेहरा ग्रूम करायला हवा हाविचार त्यामागे होता. इंग्लंडमधे बॉल स्विंग झाला तर बेस्ट किपर पाहिजे असा मतप्रवाह आहे. (मला विचाराल तर आपण बाहेर पहिली मॅच बॅटींङ मुळे हरतो बहुतेक वेळा - त्यामूळे किपिंग वर काँप्रो चालेल असे माझे मत - कदाचित काँप्रो किपरने मिस केलेल्या कॅच मूळॅ मॅच हरूही - पण नवीन ट्रेंड तरी असेल )
अरे हे काय ते स्कूप करायच्या
अरे हे काय ते स्कूप करायच्या नादात आउट होत आहेत? तो रावत आणि आता डु प्लेसी पण असाच गेला. मॅक्सी पण तसच काही ट्राय करताना गेला का? मी त्याची विकेट नाही बघितली.
mayu4u , मी पण एका लीग कडून खेळलो. जर्सी मध्ये खुप आहेत पण जागा मिळणे पण अवघड आहे. पब्लिकची स्किल लेवल खुप वर आहे. मला लकिली एका लीग मध्ये चान्स मिळाला पण ऑनेस्टली पहिल्या सीजन मध्ये आजिबात खेळायला नाही मिळालं फार. अजून काही गमती जमती पण आहेत, त्या नंतर सांगतो.
मला विचाराल तर आपण बाहेर
मला विचाराल तर आपण बाहेर पहिली मॅच बॅटींङ मुळे हरतो बहुतेक वेळा - त्यामूळे किपिंग वर काँप्रो चालेल असे माझे मत - कदाचित काँप्रो किपरने मिस केलेल्या कॅच मूळॅ मॅच हरूही - पण नवीन ट्रेंड तरी असेल >>>>>> एकदम क्रेक्ट! अगदी हेच लिहिणार होतो. किपर हा अर्थातच चांगला बॅट्समन पाहिजे. पण थोडा कीपिंग मध्ये वीक आणि बॅटिंग मध्ये भारी हा ऑप्शन बेस्ट आहे दोन्ही मध्ये बेस्ट नसेल तर. जस्ट कॉमन सेन्स.
Pages