आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

त्यामुळे अश्विन च्या बॅटींग ची गरज पडणार नव्हती - हे ऑक्शननंतरच कळलं होतं. उगाच कशावरूनही स्वतःची पाठ काय थोपटून घ्यायची!
>>>>

तुम्ही सारे सामने पाहिले नसावेत. आश्विन प्रयोग यंदाही करून झाला.
तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवत माझी पाठ थोपटली तरी चालेल Happy

बाई दवे

गावस्करने जो वर धोनीचा सन्मान केला तो ईंग्लिश कॉमेंटरी चॅनेलवर दाखवला की नाही Wink

"तुम्ही सारे सामने पाहिले नसावेत." - by your own admission, तू फक्त मुंबई आणी चेन्नईच्या (काही) मॅचेस बघतोस.

आज गुजराथ नेहमीच्या डॉमिनन्सने खेळतंय. गिलने पाया रचलाय आणि बॉलर्स कळस चढवतायत. स्पेअर अ थॉट फॉर भुवी.

तू फक्त मुंबई आणी चेन्नईच्या (काही) मॅचेस बघतोस.
>>>
छे, त्याही जेमतेमच क्लायमॅक्स वगैरे.
पण स्कोअरकार्ड सर्व सामन्यांचा फॉलो करतो. तितके पुरते आता ईतके आयपीएल ओळखून आहे मी Happy

IMG_20230515_231751.jpg

मी आशेनी बघत राहिलो, म्हणलं क्लासेन आणि भुवी काहीतरी चिमित्कार दाखवतात की काय! पण दुर्दैवाने तसं झालं नाही.

"आणि क्लासेन." - टोटली. मी मेसेज थोडा आधी टाकला.

"मी आशेनी बघत राहिलो, म्हणलं क्लासेन आणि भुवी काहीतरी चिमित्कार दाखवतात की काय! पण दुर्दैवाने तसं झालं नाही." - जितक्या शांतपणे खेळत होते दोघं, ते पहाता, असा काही चमत्कार व्हायची शक्यता वाटत होती. नूर बाहेर गेल्यावर तर गुजराथ एक बॉलर शॉर्ट होते (तेवाटिया आनि पंड्याने तोपर्यंत एकही ओव्हर टाकलेली नव्हती). त्यामुळे उत्सुकता होती. पण परवा हैद्राबादने जसा वेडेपणा (अभिषेक शर्मा च्या ओव्हरचा) केला, तसा न करता पंड्याने आधी मुख्य बॉलर्स आणून मॅच कंट्रोलमधे घेतली.

अरे हो, त्या नूरला सॉलिड जोरात लागला बॉल. I am really hoping it's nothing serious.

खरं तर मुंबई बरोबरच्या मॅचच्या वेळेस सुद्धा रोहित आणि इशान किशन कैच्या कै सुटले होते आल्या आल्या. तेव्हा सुद्धा लागलीच पंड्यानी रशिद आणि नूरला पण (बहुतेक) दिली. मुख्य म्हणजे लगेच कंट्रोल मध्ये पण आणली. फक्त सुर्याला कंट्रोल करणे मुश्किलही नही नामुमकिन था.

गावस्करने जो वर धोनीचा सन्मान केला तो ईंग्लिश कॉमेंटरी चॅनेलवर दाखवला की नाही>>>>>> Lol
गावस्करना धोनी आवडतो आणि त्याहीपेक्षा धोनीचे भारतीय क्रिकेटला लाभलेलं योगदान ह्यामुळे ते जास्त भारावून गेले होते.
त्याच बरोबर भारावून गेले म्हणून ते वाट्टेल त्या गोष्टीचे श्रेय धोनीला देणार नाहीत ह्याची खात्रीच आहे. त्यामुळे उगाच गावस्कर सुद्धा धोनीला मानतात ह्या वरुन स्वतःची पाठ थोपटवून घेणे म्हणजे परत नेहमीसारखा स्ट्रॉमॅन आर्ग्युमेंट झाला.

त्याच बरोबर भारावून गेले म्हणून ते वाट्टेल त्या गोष्टीचे श्रेय धोनीला देणार नाहीत ह्याची खात्रीच आहे
>>>>

ठिक आहे बघूया मग येत्या काळात गावस्कर कुठल्या कुठल्या गोष्टींचे श्रेय धोनीला देतात Happy

गावस्करने सांगितल्याशिवाय तुम्ही ऐकणार नाही असे दिसतेय.

Mahi is different. He is a different captain. There hasn't been a captain like him and there will never be one like him in the future," said Gavaskar in a release from IPL broadcasters.

IMG-20230516-WA0004.jpg

अहो हो.. पण गावस्कर आणि त्यांच्या शब्दाला क्रेडिबिलिटी आहे. जी त्यांनी भारताकरता क्रिकेट खेळून, १०,०० हजार टेस्ट रन, ३,००० वन्डे रन बनवून आणि त्याही पेक्षा इतकी वर्षं सातत्याने मचुअर विधानं करुन कमवली आहे.
आपलं म्हणजे उचलली जीभ आणि लावली..... ह्यावरुन क्रेडिबिलिटी बिल्ड होते का?
Proud

इथे माबो हिस्ट्री बघता असंख्य शेंडा न बुडखा असलेले विधानं सापडतील. आता त्यावरुन कोणत्या प्रकारची क्रेडिबिलिटी बिल्ड होते? असो... आपलं म्हणजे असं आहे there's no such thing as bad publicity. Lol

एकीकडे "धोनी ब्रँडींग आहे" म्हटल्यानंतर "अमक्याने धोनी चे कौतुक केले, तमक्याने हार घातले" असे लिहिणे ह्यात किती विरोधाभास दिसतो हे बघून मजा येते.

साधा माणूस तुम्ही वेगळ्या विषयावर लिहा - त्यावरून चर्चा करणारे भरपूर आहेत. लिहिल्याने बोळा निघेल , बाफ वाहता होईल.

ब्रेक नंतरचा वाईड चॅलेंज का केला ? टप्पा सुद्धा बाहेर होता नि स्टोनिस टप्पा पडल्यावर शफल झाला होता .

लखनौ ने सेन्सिबल क्रिकेट खेळलंय आत्तापर्यंत. होपफुली, मुंबई त्यातून हिंट घेतील. ह्या पीचवर १५० च्या आसपासचा स्कोअर चेस करणं ट्रिकी आहे. पार्टनरशिप बिल्डिंग गरजेचं आहे.

"विरोधाभास दिसतो हे बघून मजा येते." - तो तर वाक्या-वाक्याला आहे रे. एखादं ठाम विधान करायचं आणि त्याला सपोर्टिंग वाक्यात 'कदाचित', 'असेल' वगैरे बॅक-डोअर एक्झिट्स ठेवून द्यायचे. मजा तर भरपूर आहे. Happy

जॉर्डन ला साईन करण्यापेक्षा अर्जुन काय वाईट होता राव ? मला जनरली त्याने नेहमी मार खाल्लेलाच आठवतो. पांड्या खरच इंजर्ड झाला कि पूरन ला आणण्यासाठी केले देव जाणे. स्टॉनिस ने एकहाती मॅच जिंकली कि जॉर्डन ने एकहाती घालवली असे म्हणायचे. पिच थोडा ट्रिकी वाटते आहे पण पॉवर गेम चालला तर चेस नक्कीच होउ शकतो हे स्टॉनिस च्या शॉत्स कडे बघून कळातय. वर ड्यू आलं तर चेस सहज शक्य आहे.

पण गावस्कर आणि त्यांच्या शब्दाला क्रेडिबिलिटी आहे. >>>>> 100 टक्के अनुमोदन.
म्हणुन त्याला गुटख्याची जाहिरात करताना बघून चीड येते.

कसली भारी टाकली लास्ट ओवर! >> एकदम. जुना मोहसीन खान असल्यासारखी. पण त्याच्याकडे बघून एकंदर त्याच्या फिटनेसची बोंब लागली आहे असे वाटते. सूर्या ह्या विकेटवर तो शॉट का मारायला गेला ? वढेरा ला नक्की काय प्लॅन दिला होता खेळायला ? रोहित नि लेगी ( बिष्नोई ला लेगी बोलायला जीवावर येते) हे प्रेमप्रकरण सुरू राहिले.

मुंबई हरण्याची मुख्य कारणे - मुंबईने गोलंदाजीत बेशिस्तीमुळे 17 व 18 व्या षटकात दिलेल्या 30 + धांवा व 9+ च्या सरासरीने लक्ष्याकडे व्यवस्थित वाटचाल सुरू असताना सूर्याने इतक्या लवकर धाडसी फटका मारण्याची केलेली चूक. !!!
अभिनंदन लखनौ!
( कदाचित तसं नसेलही, पण कृणाल पांड्या आपण कर्णधार असल्याचे फारच प्रदर्शन करतो असं वाटलं. )

जॉर्डन ची आठवण नेहमीच भरपूर मार खाल्लेला, मोक्याच्या वेळी कच खाणारा बॉलर अशीच आहे. कोव्हीड काळातल्या काही वन-डेज मधे त्याने बरी बॉलिंग केली होती, पण ती अपवादात्मक. आयपीएलमधे तर ९.५२ ची सरासरी आहे. २०१६ नंतर एकही उल्लेखनीय वर्षं नाही. बंडल टाकली त्याने आज (पण) बॉलिंग!

सूर्याने ह्या पीचवर रँप शॉट च्या नादी लागायला नको होतं ह्या बाबतीत टोटल सहमत! त्यावेळी तशी काही गरजही नव्हती. जिंकत असलेली मॅच घालवली मुंबईने.

लखनौकडून स्टॉयनिस मस्तच खेळला. प्रेशर सोक करून, पार्टनरशिप बिल्ड करून, नंतरचा ऑनस्लॉट खासच होता.

पण कृणाल पांड्या आपण कर्णधार असल्याचे फारच प्रदर्शन करतो असं वाटलं. )>>>> अगदी हेच लिहिणार होतो Lol
हार्दिक पण खुप ग्यान देत असावा असं वाटतं मला. खुप बोअर नाही केलं इतरांना म्हणजे झालं!

मला तर सुर्याची विकेट बघून हसायलाच आलं. अजूनही येतय. डायरेक बद्कन पडलाच तो! त्यात दांडकं पण उडालं! Lol

हार्दिक पण खुप ग्यान देत असावा असं वाटतं मला. खुप बोअर नाही केलं इतरांना म्हणजे झालं! >> हार्दिक राहू दे - तो किमान मैदानावर तरी असतो. नेहरा बाउंडरीच्या कडेला येतो एकदम. कधी तरी मैदानात येऊन 'आण बॉल इकडे , मी दाखवतो कुठे नि कसा टाकायचा ते' असे सांगेल असे वाटते Wink

मला तर सुर्याची विकेट बघून हसायलाच आलं. >> हो मलाही. वाय झेड शॉट होता. स्टॉनिस च्या इनिंग मधे कळत होते कि समोर पॉवर हिटींग करायची गरज आहे. उगाच का तो शॉट ? वढेरा नि विनोद ने पण विकेट मागे मारायचे उगाचच प्रयत्न केले. बिझार होते डावपेच.

नेहरा बाउंडरीच्या कडेला येतो एकदम. कधी तरी मैदानात येऊन 'आण बॉल इकडे , मी दाखवतो कुठे नि कसा टाकायचा ते' असे सांगेल असे वाटते >>>>>>> Rofl क्रेक्ट एकदम!!! नशिब कॉलवर नव्हतो नाहीतर फूर्र्कन हसलो ते डायरेक बघितलं असतं लोकांनी.

सुर्याला जमतं बर्‍याच वेळा पण अंदाज चुकला वाटतं ह्यावेळी. खुप जास्त फास्ट आला बहुतेक बॉल त्याच्या अपेक्षेपेक्षा.
बाकी लास्ट ओवर मध्ये टिम डेविडला का बरं आज फटके मारायला जमत नव्हतं काय माहित. भारी जमली लास्ट ओवर!

>>डायरेक बद्कन पडलाच तो!
अनेकदा पडतो तो असा रॅम्प स्कूप करताना, पण कालच्या विकेट वर दॅट शॉट वॉज नॉट ऑन!

>>खुप जास्त फास्ट आला बहुतेक बॉल त्याच्या अपेक्षेपेक्षा.
मला वाटलं स्लो आला...

Pages