आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>> भारताच्या संघाला without doubt स्टार प्लेयर्स MI नेच दिलेत.

१. स्टार प्लेयर्स ची व्याख्या काय?
२. उदा?

धन्यवाद.
(*खरोखर आहे ना?)* - केवळ योगायोगाने खरंच आहे पण बाकी त्याचा व्यंचिशी संबंध नाही ! Wink )

बघा.... नाहीतर काही उगाचच फिक्सिंगला सगळे क्रेडीट देतात >> Lol

शुभेच्छा , भाऊ !!!

पुढच्या दोन मॅचेस चेन्नई मधे आहेत जिथे बहुतेक वेळा स्लो पिचेस असतात नि टायमिंगची बोंब लागलेली असते.

शुभेच्छा भाऊ!

आपली वोट तर टायटन्सना पण सिएस्के च काही सांगता नाही येत. त्यात एकदा टायटन्सची पण गडगडली होती जेव्हा कोणीच फायर नाही झालं. मला वाटतं एकटा रशिद लढला होता.

आता मुंबैला फायनल जिंकवून द्यायचं सचिनला एवढं टेन्शन आणि तुम्हाला आपल्या लग्नाचा वाढदिवस सुचतोय. ? >>> Happy शुभेच्छा भाऊ!

यावेळेस मुंबई कप घेऊन गेली तर मजा येईल. पूर्ण स्पर्धाभर चर्चेतही नव्हती मुंबई Happy

अरे शुभ बोल फारेण्डा!
Lol
माय ब्वाईज टायटन्सवर फारच अन्याय होईल मग. चांगले खेळले अख्खी टुर्नामेंट.

न्यूझीलंड १९९२. आख्खी टुर्नामेण्ट भारी खेळले होते. मग पाकने खिंडीत गाठून हरवले Happy

आपली वोट तर टायटन्सना पण सिएस्के च काही सांगता नाही येत. >>

CSK उद्या गुजरातला हरवणार असं मला वाटतं.

शक्य आहे पण मला वाटतं खुप पॉजिटिव्स आहेत टायटन्स कडे जिंकण्याकरता. कालची मॅच त्यांनी चेस करताना सुद्धा डॉमिनेट केली आणि ते पण त्यांच्या गावात! त्यामुळे मला जास्त आशा आहे.

CSK उद्या गुजरातला हरवणार असं मला वाटतं. >> +१ . चेन्नई ला मॅच आहे हा मोठा फॅक्टर आहे. एकदा रशिदला टॅकल केले कि चेन्नई सुटलीच. हेच समीकरण मग फायनल मधे अहमदाबादमधे बदलेल.

बुवा कालची मॅच बंगलोरमधे होती ज्यांच्या बॉलिंग रिसोर्सची बोंब आहे. चेन्नई ची तसे नाही हा मुख्य फरक असेल असे वाटते.

मला चेन्नई नि अहमदाबादमधे मॅचेस असणे चुकीचे वाटते. सगळ्या मॅचेस न्यूट्रल ठिकाणी हव्यात. ( १-२ ला खूप प्रेफरेंशियल ट्रीतमेंट सगळ्यात स्पोर्ट्स मधे दिली जाते हे मान्य आहे. )

बुवा कालची मॅच बंगलोरमधे होती ज्यांच्या बॉलिंग रिसोर्सची बोंब आहे>>> अग्रिड.

पण रशिदला टॅकल करणे ही मोठी गोष्ट आहे. जबरी प्लेयर आहे यार! त्यात नूर पण त्याचा कित्ता गिरवतोय. शमी पण चांगला अंगावर येत होता काल. १३६ किमी... नी टाकला एक बॉल त्यानी. ऑडियन्स त्यांच्या बाजूनी नसलं तरी फिकिर नाही हे कालच कळलं. फक्त पिच चेन्नईच्या खुप सरावाचे असणार जो मोठा फॅक्टर आहे. बॉलिंग मला चेन्नईची पण फार भारी नाही वाटत. बॅटिंग मात्र फार डीप आहे आणि २-३ जणं जरी चालले तर खुप स्कोअर होऊ शकतो.

सुरवातीच्या सामन्यातील संघाची धावसंख्या, फॉर्म इ.चा प्ले ऑफच्या सामन्यातील खेळाशी ताळमेळ असतोच असं नाही, हे अनेक राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दिसून येतं. संभाव्य कारण - प्रत्येक संघ भिन्न परिस्थितीतून प्ले ऑफ स्टेजला आलेला व म्हणूनच भिन्न मानसिकतेने तिथे खेळणार असतो. आधीच्या सामन्यांतील कामगिरीवरुन म्हणूनच प्ले ऑफ सामन्यांचा कयास बांधण जरा जपूनच केलेलं बरं!

त्यात नूर पण त्याचा कित्ता गिरवतोय. शमी पण चांगला अंगावर येत होता काल. १३६ किमी... नी टाकला एक बॉल त्यानी. >>>

नीटपीक करायचं झालं तर माझे हे ऑबजर्वेशन आहेत.
नूर अजून नवखा आहे. विकेट घेतो पण धावा हि भरपूर देतो. अनलाइक रशीद त्याला टार्गेट करू शकतो.
शमी हा पावरप्ले मध्ये खतरनाक आहे. पण मिडल ओव्हर मध्ये आणि डेथ ला सपाटून मार खातो.
यश दयाळ / जोश लिटल /शिवम मावी हे त्यांच्या अटॅक मधले वीक लिंक आहेत.
धोनी / फ्लेमिंग / हस्सी ने ह्या इशूना स्पेसिफिकली टार्गेट केलं तर नवल वाटणार नाही.

*ह्या इशूना स्पेसिफिकली टार्गेट केलं तर नवल वाटणार नाही.* -
या संदर्भात प्ले ऑफ मध्ये कर्णधाराची भूमिका निर्णायक म्हणण्या इतपत महत्त्वाची ठरत असावी. स्वतःच्या व विरूद्ध संघाची शक्तिस्थळ व मर्मस्थळ अचूक हेरून त्यानुसार डावपेच रचणारा कर्णधार यशस्वी ठरण्याची शक्यता अधिक व त्या बाबतींत धोनी निःसंशय माहिर आहे. अर्थात, टी20 मध्ये एखादा फलंदाज/ गोलंदाज अफलातून खेळी करून सर्व डावपेच उधळवू शकतो, हे आहेच !

चेन्नई मधे ड्यू फॅक्टर येऊ शकतो. त्यामूळे टॉस जिंकणे मह्त्वाचे ठरेल. दुबे वि. रशिद नि कॉनवे वि. शमी ह्या चुरशीच्या लढती असतील असे धरूया. चेन्नई मस्त विश्रांती घेऊन येते आहे ह्याउलट टायटन'स रवीवारी मोठा गेम खेळले आहेत.

दुसरी बॅटिंग घेतली टॉस जिंकून म्हणजे डेअरिंग मूव वाटली मला पण नक्की पिच मुळे निर्णय घेतला पंड्या नी.

१८० किंवा अगदी २०० जरी झाला तरी मोठा चान्स आहे असं वाटतं. फक्त त्यापुढे नको जायला टोटल. टू मच प्रेशर.

चेन्नई टॉस हरली. पण मॅच जिंकेल.

लखनऊ उद्या स्वत: अदबशीरपणे मुंबईला पहले आप बोलून पुढे पाठवेल.

मग मुंबई पांड्याचे विमान जमिनीवर आणेल. कारण त्याने मुंबईबद्दल काहीतरी डायलॉग मारला आहे.

फायनलला एका रोमहर्षक सामन्यात मोठ्या दिमाखात रोहीत शर्मा सहाव्यांदा ट्रॉफी उचलेल Happy

धोनी पुढच्या आयपीएलला मी असेनच असा गुप्त संदेश देऊन अंतर्धान पावेल.

प्ले ऑफ मधील प्रत्येक निर्धाव चेंडूमागे ५०० झाडे लावायचा संकल्प आहे म्हणे. कोणता फलंदाजी करणारा संघ जास्तीत जास्त झाडे लावेल?

शेवटी चेन्नई बॅटींग ला बूस्ट देण्याचे काम धोनीलाच करावे लागेल असे दिसतेय. प्रत्येक मोठ्या शॉट नंतर विकेट गेली आहे.

लखनऊ उद्या स्वत: अदबशीरपणे मुंबईला पहले आप बोलून पुढे पाठवेल. >>> Lol दादरला लोकल आल्यावर एखादा नवाब "पहले आप" करेपर्यंत अस्सल मुंबईकर लोकल थांबायच्या आत उडी मारून उन न येणार्‍या साइडची खिडकी पकडून मोबाईल मधे काहीतरी पाहूही लागला आहे असे डोळ्यासमोर आले. Happy

मधे पांड्या बॉल पुसत होता तेंव्हा ड्यू आहे असे वाटतेय. त्यावर सगळे ठरेल. बोल स्किड करायला लागला कि बॅटींगच नाही तर बॉलिंङ पण बोंबलू शकते.

गुजरात वाल्यांच्या "नर्व्हज" जाणवत आहेत. चेन्नईने बोलिंग, फिल्डिंग टाइट ठेवली आहे. ८ व्या ओव्हरपर्यंत नाहीतर गिल पूर्ण सुटला होता बंगलोरविरूद्ध.

Pages