आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ज्यांची कारकीर्द पीक मधून खाली निघालेली आहे किंवा ते नॅशनल टीम मधून कमी आत नि जास्त बाहेर करू लागले आहेत असे प्लेयर्स घेऊन चेन्नई जिंकत आलय हे फारसे चुकीचे विधान आहे असे मला वाटत नाही - माझाही तोच समज आहे - हसी, वॉटसन, ब्राव्हो, मोईन अली , रैना, हे काअही नावे पटकन आठवली.

मुंबई चा टेम्पो सूर्या च्या इनिंगवर चालतोय सध्या तरी नि सूर्या वानखेडेच्या बाहेर ह्या आय पील मधे तरी चमको मोड मधे नाहिये हा माझ्या मते सर्वात मोठा काळजीचा मुद्दा आहे. तिलक वर्मा परत येणे हि जबरदस्त आशादायक बाब आहे. स्टॉनिस नि पूरन पिच चा मुद्दा निकालात काढतात Sad

दुसरे 2 धक्के
दोन्ही ओपनर गेले>>>> Lol

मला हार्दिक पंड्या टॅलेंटेड वाटतो पण काय माहित का, बाराच्या भावात जाऊ शकतो असं फिलींग येतं त्याच्या विषयी. माज नाही दिसला त्याचा पण खुप जास्त सल्ला देणारे बघितलं की शंकेची पाल चुकचुकते. कृणाल मलाही वाटतं की बळच बनवलाय त्याला कॅप्टन.

सुर्या आणि मुंबई बद्दल +१ असामी. तो एक खुप मोठा एक्स फॅक्टर आहे टीम मध्ये. पुर्ण मॅच फिरवू शकतो!

जाऊ द्या विकेट
थांबू नका
काही रन्स एक्स्ट्रा लागतात मुंबईला.. गोलंदाजी दुबळी आहे

ह्या वेळेला जिंकले ट्रॉफी तर खरंच मजा येईल खूप* - तथास्तु ! आमेन! Wink>>>>>>>>
तुमच्या तोंडात गूळ साखरेचा शिरा पडो भाऊ

एक व्यंगचित्र होऊन जाऊ द्या

अरे पण मुंबई विषयी इतकं प्रेम का? Lol
ओह! तुम्ही मुंबईचे राहणारे का? मग बरोबर आहे.
आम्ही नाशिककर असलो तरी गुजरात ला आवा दे करतो. Proud रोहित शर्मा फार बोअर माणूस आहे.

अजून एक गंमत म्हणजे, एकदा रोहित आउट झाला आणि त्यानंतर समजा इशान किशन किंवा सुर्यकुमार खुप जबरदस्त धुलाई करायला लागले की त्याचा चेहरा कॅमेरा वर फार बघण्यासारखा होतो. म्हणजे त्याला आनंद व्यक्त करायचा तर असतो पण त्याला ह्याची पण खुप खंत असते की आपण हे नाही करु शकलो.
फॉर्म उपर नीचे चलते रेहता है त्यामुळे चालायचच. मध्यंतरी कोहलीचे ही तेच झाले पण मला वाटतं रोहितचा थंड फेज खुप लांबला आहे. चु. भु. द्या घ्या..

गेला... ग्रीन पण. भारी स्लो बॉल!

तो जायंट्सच्या मॅनेजमेंट मधला सारखा देवाचा की कोणाचातरी फोटो कपाळाला लावतो सारखा तो कोण आहे? Lol

चांगले मारले. सगळ्यांनी थोडा थोडा हातभार लावला. वाधेरा बेस्ट!

आता तो वाधेरा फूल टू सुर्यकुमार सारखा आउटसाईड ऑफचे बॉल लेगला मारतोय. त्यात बॉलरची काय चूक? तो कृणाल पंड्या तिकडे खवळला बॉलरवर. मुर्ख आहे स्वतःच. उगाच आपलं जिथे तिथे आपलं घोडं घुसवायच जसंकाय सगळच कळतं त्याला. डोक्यात जातोय सध्या तो.

182 ! आता मात्र मुंबै गोलंदाजांनी आधीच्या सामन्यांतील कसर भरून काढलीच पाहिजे !!

आता मात्र मुंबै गोलंदाजांनी आधीच्या सामन्यांतील कसर भरून काढलीच पाहिजे !! >> आज जर ड्यू आले तर मॅच नक्कीच फिक्स्ड आहे असे म्हणायचे कारण काल नव्हते Wink

तो तिलक वर्मा पण कामचलाऊ स्पिन बॉलिंग करतो नि ह्या पिचवर कामाला येऊ शकतो.

*आता मात्र मुंबै गोलंदाजांनी आधीच्या सामन्यांतील कसर भरून काढलीच पाहिजे !! * - पुरेपूर कसर भरून काढलीच! शिवाय, क्षेत्ररक्षण पण मदतीला आलं ( 3 धावचीत ) !!!
मुंबै, अभिनंदन व शुभेच्छा !!!!

मधवाल नि फिल्डींग ने जिंकून दिली आहे. पूरन ला काढला तो बॉल खतरा होता. एव्हढ्या उशिरा बॉल मूव्ह झाला ! वॉव ! रन आउट एकदम राहुलच्या टीमला साजेसे होते असे म्हणून शकतो Wink

कैच्या कै हारले राव. एकदम लहान मुलांची टीम खेळतेय असं वाटत होतं पण ठीक आहे. नॉट देअर डे टुडे. मधवाल! बापरे! डेंजर.

नंबर १ आणि २ वर टिकमार्क Happy
अदबशीरपणे या शब्दालाही जागले Happy

१) चेन्नई टॉस हरली. पण मॅच जिंकेल.

) लखनऊ उद्या स्वत: अदबशीरपणे मुंबईला पहले आप बोलून पुढे पाठवेल.

३) मग मुंबई पांड्याचे विमान जमिनीवर आणेल. कारण त्याने मुंबईबद्दल काहीतरी डायलॉग मारला आहे.

४) फायनलला एका रोमहर्षक सामन्यात मोठ्या दिमाखात रोहीत शर्मा सहाव्यांदा ट्रॉफी उचलेल Happy

धोनी पुढच्या आयपीएलला मी असेनच असा गुप्त संदेश देऊन अंतर्धान पावेल.

आधीच भ्रमाचा भोपळा फोडतो. ह्यातलं सगळं जरी बरोबर आलं तरी इट डझंट मीन शिट माय फ्रेंड! Lol
Also, doesn't mean you know shit. Let's not forget that. Proud

182 छान स्कोर होता पण अजून जास्त झाला पाहिजे होता

सूर्या ग्रीन आणि निहाल सोडता कोणीच काही केले नाही

अजून एक प्रॉब्लेम म्हणजे एक विकेट गेली की लगेच दुसरी पडली
रोहित नंतर लगेच ईशान
सूर्या नंतर लगेच ग्रीन
One brings two

टीम डेविड उंच आहे त्याचा आज थोडा तोटा झाला
तिथे कदाचित ईशान असता तर नो बॉल असता
Proud Proud Proud

इतर कोणत्या दिवशी क्यू डी के, स्टोईनीस आणि निकी पी ने चेस केले असते
राहुल सोबत असता तर अजून जास्त चान्स असता कदाचित

खरं तर इंडियन्स खुप वलनरेबल टीम वाटते. जायंट्स तर त्याहूनही. टायटन्स बरे वाटतात मला त्यामानाने पण शेवटी त्यांना पण धक्के बसले आहेत. जबरी स्ट्राँग असं कोणीच वाटत नाही त्यामुळे उलटी स्केल वापरून लेस वलनरेबल कोण आहे असं बघावं लागतय.
ते करुन सुद्धा कसलीच शाश्वती नाही. पण त्यातच खरी मजा आहे. आणि आयपिएल असल्यामुळे एखादी टीम फॉलो केली आणि ती फायनलला नाही गेली तरी बघायला तेवढीच मजा येते. मॅच चुरशीची झाली म्हणजे झालं! अपना पैसा वसूल! Happy
टायटन्स कडून तेवढीच अपेक्षा आहे माझी. टफ फाईट द्या लेको! हार गये तो वांदा नही! च्यामारी सोडा बॅटी मोकळ्या आणि नवनवीन युक्त्या करा बिन्धास्त बॉलिंग मध्ये.

अरे हो..
झोपायला जायच्या आधी सारे जण मोठ्या मनाने शर्माचे कौतुक जरूर करूया
अननुभवी आणि नवखे गोलंदाज घेऊन काय कमाल करतोय पठ्ठ्या..
आज तर क्षेत्ररक्षणातही त्याने कॅप्टन लीडींग फ्रॉम द फ्रंटचे उदाहरण दिले. त्याला वडापाव चिडवणाऱ्यांना आपल्या कामगिरीतून कडक उत्तर दिले.
थ्री चीअर्स फॉर मुंबई ॲंड ईंडियन कॅप्टन हिटमॅन..

थ्रो चांगलाच होता. पण त्याचा जाँटी र्होड्स करुन लगेच घोड्यावरुन वरात काढण्याइतकी कन्सिस्टन्सी नाहीये भौ अजून. वडापाव जायला वेळ लागतो... Proud

तो जायंट्सच्या मॅनेजमेंट मधला सारखा देवाचा की कोणाचातरी फोटो कपाळाला लावतो सारखा तो कोण आहे? Lol >>>

संजीव गोएंका. LSG (आणि गोएंका ग्रुप च्या अर्ध्या भागा) चा मालक.

इतर कोणत्या दिवशी क्यू डी के, स्टोईनीस आणि निकी पी ने चेस केले असते > अ‍ॅग्रीड. स्कोअर कमी होता हे नक्की . टाईमली केलेले रन आउट कामाला आले. सात ओव्हर पर्यंत पांड्या बाद होइतो शर्माने कुरतडलेली नखे बघून , अजून काही ओव्हर्स असेच सुरू राहिले असते तर सगळी नखे गायब झाली असती.

“अजून काही ओव्हर्स असेच सुरू राहिले असते तर सगळी नखे गायब झाली असती.” - त्याला पुढच्या सीझनच्या आधी रामदेवबाबाच्या क्लास ला घातलं पाहिजे. मन शांत होईल कि नाही ते माहित नाही, पण अश्या परिस्थितीत तो हाताची खाऊन झाल्यावर, पायाची नखं सहजतेनं खाऊ शकेल. Happy

Pages