आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ग्रीन मुंबईला दिमाखात प्लेऑफ्समधे घेऊन निघालाय. >> ग्रीन आज एकदम जायंट वाटतो आहे. बाकीची लहान मुले आहेत नि हा एक मोठा त्यांच्यात येऊन धुडगूस घालतोय असा फील.

बंगलोर ची मॅच शॉर्ट किंवा सुपर ओव्हर झाली तर बंगलोर चे पारडे जड असेल असे वाटते - फाफ नि मॅक्सीमूळे.

“बंगलोर ची मॅच शॉर्ट किंवा सुपर ओव्हर झाली तर बंगलोर चे पारडे जड असेल असे वाटते” - Hope, cricket decides the playoffs, not weather.

चेन्नई लखनऊ पाठोपाठ मुंबईलाही त्यांचा सामना जिंकायचा होता ते जिंकले. लास्ट सामन्यापर्यंत प्लेऑफची शर्यत कायम Happy

आत्ता मलाही रुंमेश सराच्या बोलण्यात तथ्य वाटायला लागले आहे. Ipl सारख्या format मध्ये खर तर पहिल्या एक दोन सामन्यांमध्ये च सेमी ल कोणते संघ जाणार हे फिक्स व्हायला पाहिजे, एवढच काय IPL जिंकणार कोण हे पहिल्या आठवड्यातच हे जाणकार प्रेक्षकांना समजल असेल. पण उगाच धोनी, कोहली सारखे players लाच घेऊन पैसे कमवत आहेत. यांच्या जोडीला रिंकू, जयस्वाल सारखी नवीन पोरगी फिक्सिंग करतात. सेमी ला गुजरात, लखनऊ जाणार हे मी आयपीएल च्या ह्या सिझन चा पहिल्या मॅच लाच आमच्या whatapp ग्रुप वर सांगितले होते. मी ऐकल की गांगुली आणि ponting ने ही दिल्ली का बाहेर जाण्यासाठी पैसे खाल्ले. मॅच चालू असताना एक हेडफोन खेळाडूंच्या कानात बसवलेला असतो आणि तिथून त्यांना सूचना मिळत असतात हे कालच एका पानाच्या टपरीवर मी ऐकले.

रात्रीचे चांदणे
भारी पोस्ट

पण काही फरक पडणार नाही
पालथ्या घड्यावर पाणी आहे

इतकी मोठी tournament फिक्स करणे practically अशक्य आहे
काही काही लोक फार negative energy टाकत असतात सगळीकडे
दुर्लक्ष करणे हाच उपाय

सेंच्युरी च्या नादात मॅच जाते का काय? >> तीच शंका आली. १९ व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला ती रावतची एक धाव दोन मधे बदलण्याची गरज होती पण कोहली ९९ वर होता व रन घेण्यात रिस्क होता. तेव्हा ज्या तडफेने त्याने दोन रन्स पूर्ण केले ते पाहून टोटल रिस्पेक्ट वाटला. तो तेव्हा खाली असल्याने दोन रन्स काढल्यावर तो पुढच्या ओव्हरला वर (स्ट्राइकवर) आला. पण २० व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला शतकाकरता एकच रन काढल्याने त्यावर जरा विरजण पडले. तो ज्या वेगात खेळत होता त्या हिशेबाने ६ बॉल्स मधे एक रन कधीही झालाच असता. आता चेस मधे कळेल की संघाला ते किती महागात पडते.

रात्रीचे चांदण्यातली पोस्ट बरोबरच आहे. शेवटपर्यंत रंगत टिकावी म्हणून बीसीसीआयने बंगलोरात पाऊस पण पाडून घेतला आणि अगदी वेळेत थांबवला सुद्धा.

विको - टोटल रिस्पेक्ट! शॉट्स, फिटनेस, इनिंग पेस करण्याची कपॅसिटी - सगळंच कमाल!!

चेन्नई लखनऊ पाठोपाठ मुंबईलाही त्यांचा सामना जिंकायचा होता ते जिंकले. लास्ट सामन्यापर्यंत प्लेऑफची शर्यत कायम >>>>
चेन्नई लखनऊ हरले असते तरीही प्लायऑफ ची शर्यत कायम राहिली च असती
उलट चेन्नई लखनऊ जिंकले म्हणून शर्यतीत कमी संघ राहिले

मुद्दाम फिक्स करायचे असते तर मी चेन्नई लखनऊ ला हरवून रंगत वाढवली असती

मुद्दाम फिक्स करायचे असते तर मी चेन्नई लखनऊ ला हरवून रंगत वाढवली असती >> तसे न करणे हा मास्टर स्ट्रोक असावा बहुधा. सगळेच प्रेडिक्टेबल नको. चांदणे अहो चेन्नई च आइपील जिंकणार नि धोनीच्या उज्ज्वल कारकिर्दी ला सांगता देणार हे मी धोनी भारतीय संघात येण्याच्या अगोदर ऑर्कूटवर पानवाल्यांच्या ग्रूपवर सांगितले होते हे पण नम्रतेने नमूद करू इच्छितो.

कोहली नि गिल काय खेळलेत राव - मजा आ गया.

मुद्दाम फिक्स करायचे असते तर मी चेन्नई लखनऊ ला हरवून रंगत वाढवली असती
>>>
ईतके सरळसोट असते तर बेटींग घेणारे डुबले असते. Happy

चेन्नईचे प्लेऑफमधील पहिल्या दोघातले स्थान हक्काचे होते.
आज मुंबईनेही त्यांचे हक्काचे तिसरे-चौथे स्थान पटकावले.
मुंबई तळाला राहील अशी भाकिते सर्वांनीच वर्तवली होती. ते प्लेऑफला तर पोहोचले. आणि काहीही द्या आमही चेस करतो अश्या आत्मविश्वासाने पोहोचली.

इझी मारले एकदम! दादा टीम होत चालली आहे! Happy
सुरवातीला साहा चाचपडत होता असं वाटलं आणि गेलाच लगेच. गिल तर आज अनस्टॉपेबल होता. ऐय्यर पण अडखळला थोडा पण बॉस सिक्स काय ठोकले! मजा आली!

आत्ता कोहलीची इनिंग्स पाहिली. क्लास!
बाकी पडझड सुरु असताना एकटं उभं राहून इनिंग खेळून काढत ते पण पेस मेन्टेन करुन, हे तोच करु शकतो. मास्टर!!!

बाकी सगळ्यांची धुलाई होत असताना रशिदचं अ‍ॅवरेज बघा! प्लस मॅक्सीची मोठी विकेट!

कोहली-नेक्स्ट जेन (२.०) >>> सही फेफ! क्रिकइन्फो ही आज "transfer of baton" असे काहीतरी म्हणत आहे.

गिल! बापरे. बोले तो कमांडिंग इनिंग्स! क्लीन हिट्स! सा न घे भौ! >>> टोटली.

१६ व्या ओव्हरच्या आसपास जेव्हा विजय शंकर आउट झाला व लगेच पुढच्या एक दोन विकेट्स गेल्या तेव्हा बंगलोरचा आवाज परत वाढू लागला, त्यांची बॉडी लॅंग्वेजही बदलली. पण दुसर्‍या बाजूने गिलने जे काय ३-४ सिक्सेस मारलेत त्याला तोड नाही. सगळे क्लीन हिट्स. एकतर इतका फ्लॅट होता की बॅटच्या अ‍ॅक्शनवरून सिक्स आहे असे वाटलेच नाही. प्रत्येक सिक्सने चिन्नास्वामीचा आवाज बंद केला Happy

टायटन्सचे "चेसिंग" चे क्रेड्स या मॅचमुळे आणखी वाढले. त्यांच्या खर्‍या चेसर्सना फार काही करावेच लागले नाही आज. तेवातिया ,पंड्या आणि रशीद यांनी फारसे काही न करताच मॅच जिंकले.

पण मी त्याहीपेक्षा जास्त खुश ते मुंबई पुढे गेल्याने. बिशप का कोणीतरी लगेच म्हंटला सुद्धा: "...but the real celebrations are a thousand km away" Happy

त्यांची बॉडी लॅंग्वेजही बदलली. पण दुसर्‍या बाजूने गिलने जे काय ३-४ सिक्सेस मारलेत त्याला तोड नाही. सगळे क्लीन हिट्स. एकतर इतका फ्लॅट होता की बॅटच्या अ‍ॅक्शनवरून सिक्स आहे असे वाटलेच नाही. प्रत्येक सिक्सने चिन्नास्वामीचा आवाज बंद केला >>>>>>>>>> यास्स!!!
बेसिकली टीमच्या बेस कँप मध्ये जाऊन आपलं वर्चस्व गाजवत मॅच जिंकणे तसं रेअरली होतं. आज सायलेन्स खुप जाणवत होता गिलच्या प्रत्येक हिट वर.

हो, बिश दोनदा म्हणाला रियल सेलिब्रेशन बद्दल.
आय होप मुंबई टसल देतिल चांगली.

लोकांनो
गुजरात चेन्नई चे अंदाज लावा काय वाटतं कोण जिंकेल

*टॉस जिंकून चेस करा, * प्रॅक्टीस करूनही टॉस जिंकता येतं नाहीं, इथेच तर ग्यानबाची मेख आहे. !! Wink
*गुजरात चेन्नई चे अंदाज लावा काय वाटतं कोण जिंकेल* - गुजरात- चेन्नई चा निकाल कांहीं झाला तरी फायनल ' वेस्ट' इंडियन्स मध्येच होणार ! Wink

एक फॉर्वर्ड
___

4 most deserving team in झाल्यात

Csk ला जिंकायचं होत csk जिंकली
Lsg ला जिंकायचं होत lsg जिंकली
मुंबई ला जिंकायचं होत ... मुंबई जिंकली

Rcb ला जिंकायचं होत
Rcb नेहमी प्रमाणे हरले....

अजून एक फॉर्वर्ड
__

रोहित आउट ऑफ़ फॉर्म आहे, सूर्या सुरवातीला शून्य कुमार म्हनून ट्रोल झाला, बुमराह नाही, आर्चर नाही, टीम मध्ये कोणी सुपरस्टार उरल नाही, बॉलिंग मध्ये एकही well known बॉलर नाही, स्पिनर retired झालेला प्लेयर, बेस प्राइसला घेतलेले यंग रॉ प्लेयर्स आणि परत मुंबई बॉटमला राहिल अशा शक्यता निर्माण झालेल्या.

End of लीग फ़ेज़
टेबल टॉपर आणि MI या दोन संघात ४ आणि तीन आणि चार नंबरच्या संघात फ़क्त १ पॉइंटचा फ़रक, This is MI
विपरीत परिस्थितित, सर्व गोष्ठी विरोधात असताना qualify झालीये टीम.

दर वर्षी एक दोन नाही १४ मैच होतात, त्यातल्या किमान ८ जिंकने, NRR वर लक्ष ठेवून, महीना दीड महीना आपली टीम फिट ठेवन, अनफिट प्लेयरला रिप्लेसमेंट देन, Auction मध्ये प्लेयर गमावला तर नवीन प्लेयर आणन, यातून टॉप २ मध्ये यायचा प्रयत्न, टॉप २ मध्ये आलो तर मैच जिंकून फाइनल आणि फाइनलचा प्रेशर झेलत विजेते पद, समजा टॉप २ मध्ये नाही आलो तर दोन knock आऊट मैच टूर्नामेंटच्या टॉप टीम्स सोबत जिंकण आणि मग फाइनल आणि ट्रॉफी! इतकी अवघड असते IPL ट्रॉफी! आणि त्याने त्याच्या टीमला अशा एक दोन नाही तर ५ ट्रॉफिस दिल्यात.

तुम्ही त्याची खिल्ली उडवता कारण तुमच्या ट्रॉफी cabinet मध्ये एकही ट्रॉफी नाही किंवा तुमच्या टीमला त्याने प्रत्येक फाइनलला पराजित केलय आणि म्हनून एकतर तुम्हाला जेलसी आहे किंवा भीति..

तो मात्र चिल आहे, कॉन्फ़िडेंट आहे आणि वड़ापाव खाऊन खुश आहे. आणि काही झाल तरी ७ जूनला तुमचा captain तोच असनार आहे.

MI IPL च्या पहिल्या एडिशन पासून champion टीम नव्हती पण त्या Dugout मध्ये आमचा देव बसायचा आणि आजही तो तिथे बसतो, MI चा Honest Fan बेस आहे आणि टीम पण त्या फैन्सला honestly आनंद देत राहते.

भारताच्या संघाला without doubt स्टार प्लेयर्स MI नेच दिलेत.

*...आमचा देव बसायचा आणि आजही तो तिथे बसतो, MI चा Honest Fan बेस आहे ..*. -

आता मुंबैला फायनल जिंकवून द्यायचं सचिनला एवढं टेन्शन आणि तुम्हाला आपल्या लग्नाचा वाढदिवस सुचतोय. ? 20190715_131637_0.jpg

Pages