Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कालची मॅच टोटली मिस केली.
कालची मॅच टोटली मिस केली. त्यामुळे इतक्या रोमहर्षक मॅचविषयी लिहिण्यासारखं काही नाही जे वाचलं त्यावरून एक सॉलिड अनुभव मिस झाल्याचं कळलं.
“ पियुष चावला हे ही एक सरप्राइज पॅकेज आहे.” - पर्पल कॅपच्या रांगेतले पहिले तीन लेगस्पिनर्स आहेत. तिघंही सीझन्ड प्रो आहेत
आज हैद्राबाद - लखनौ छान
आज हैद्राबाद - लखनौ छान चाललीय. हैद्राबाद निकरानं डिफेंड करतायत. लखनौ पॅनिक न होता प्रेशर soak करतायत. it’s a matter of who blinks first. डि-कॉक असले चेस पेस करण्यात मास्टर आहे.
लारा आणि मार्करम चा अनाकलनीय
लारा आणि मार्करम चा अनाकलनीय कॉल. लखनौ हेल फॉर लेदर जाणार हे माहित असतांना तुम्हाला पार्ट टाइम बॉलर आणायची काय गरज होती.
“ लारा आणि मार्करम चा
“ लारा आणि मार्करम चा अनाकलनीय कॉल.” - एका ओव्हरमधे मॅच घालवली हैद्राबादने. त्यांना एक ओव्हर कुणाकडून तरी काढून घ्यावी लागणारच होती. पण टायमिंग चुकलं. शर्मा (२ ओव्हर्स १२), फिलिप्स (२ ओव्हर्स १०) ह्यापैकी लेफ्ट आर्म स्पिनर म्हणून शर्माला प्रिफर केलं हे पण समजू शकतो. पण कदाचित अजून एखाद-दुसर्या ओव्हर नंतर चाललं असतं असं हाईंडसाईट मधे वाटलं.
पूरण एक अंडर द रडार फ्लाय
पूरण एक अंडर द रडार फ्लाय करतोय. पण सॉलिड इंपॅक्ट इनिंग्ज खेळलाय तो ह्या आयपीएल मधे.
लाराचा इम्पॅक्ट प्लेयर चा हि
लाराचा इम्पॅक्ट प्लेयर चा हि कॉल कळला नाही. विवरांत शर्मा ला आणलाच कशाला जर त्याला बॉलिंग किंवा बॅटिंग देणार नव्हतात.
“लाराचा इम्पॅक्ट प्लेयर चा हि
“लाराचा इम्पॅक्ट प्लेयर चा हि कॉल कळला नाही.” - खरंय. बर्याच टीम्स चा हाच प्रॉब्लेम होतोय.
त्यांना एक ओव्हर कुणाकडून तरी
त्यांना एक ओव्हर कुणाकडून तरी काढून घ्यावी लागणारच होती. पण टायमिंग चुकलं >> मलाही असंच वाटलं. एव्हढा चोपला जाईल असे त्यांना वाटले नसणार.
पण सॉलिड इंपॅक्ट इनिंग्ज खेळलाय तो ह्या आयपीएल मधे. >> तो उशिरा आला कि दणकून खेलतो. वर आला कि त्याची काय गडबड होते देव जाणे.
“ वर आला कि त्याची काय गडबड
“ वर आला कि त्याची काय गडबड होते देव जाणे.” - बहुदा हे प्लेयर्स स्पेसिफिक रोल्ससाठी खूप जास्त ट्रेन करतात स्वतःला (व्हिज्युअलायझेशन, सिच्युएशनल प्ले वगैरे). त्यामुळे त्या रोल्समधे आणि सिच्युएशनमधे त्यांचा कंफर्ट झोन तयार होत असावा आणि त्या सिलॅबसच्या बाहेरचा पेपर आला कि गंडत असावेत.
लखनौ ने काल पुरण पोळी खाउन
लखनौ ने काल पुरण पोळी खाउन विजय साजरा केला असेल!
दिल्ली ने काल हातातली मॅच
दिल्ली ने काल हातातली मॅच टाकली!
पंजाब अजून आशेवर आहे.
“ इथून पुढे रॉयल्स, 'तेच का
“ इथून पुढे रॉयल्स, 'तेच का हे' असं वाटावं इतकं भिकार क्रिकेट खेळून हेल्दी रन-रेट ठेवून पण पॉईंट्सच्या तक्त्यावर सहावे वगैरे आले तर फारसं आश्चर्य वाटायचं कारण नाही.” - इतक्या लवकर मला नॉस्टरडॅमस च्या पंगतीला बसायचं भाग्य लाभेल असं वाटलं नव्हतं. थँक यू रॉयल्स!
RCB ने वाईट मारलाय राव आज.
RCB ने वाईट मारलाय राव आज. सकाळी उठून दुसरी इनिंग बघेन हा प्लॅन होता. मॅच त्या आधीच संपली.
पुन्हा एकदा, राजस्थान प्ले
पुन्हा एकदा, राजस्थान प्ले ओफ़ मध्ये पोचणं डिझर्व करत नाहित.
रॉयल्स
रॉयल्स
लखनौ ला पावसाच्या एका पॉइंट
लखनौ ला पावसाच्या एका पॉइंट चा फायदा होईल असं वाटतं आहे आत्ता तरी...
पण चौथ्या जागेसाठी बेकार टाईट सिच्युएशन आहे...
राजस्थान रॉयल्सबद्दल भाकीत
राजस्थान रॉयल्सबद्दल भाकीत करायला नॉस्त्रादेमस असायची गरज नाही. स्पर्धेच्या सुरुवातीलाच हे लिहिले होते. अध्येमध्येही लिहित होतो. त्यांनी मला निराश केले नाही
जडेजा गेल्यावर जाहिराती
जडेजा गेल्यावर जाहिराती दाखवल्या, बरं का!
दहाव्या ओव्हर मधे मोईन अली
दहाव्या ओव्हर मधे मोईन अली गेल्यावर लेफ्टी दुबे असताना परत जडेजा ला पाठवले असेल धोनीने ? तो येणे जास्त योग्य ठरले नसते का ?
धोनीला जास्तवेळ फलंदाजी
धोनीला जास्तवेळ फलंदाजी करायचीच नाहीये हे अजूनही कळले नाहीये का...
हा डिसीजन कदाचित त्याचा एकट्याचा नसून चेन्नई मॅनेजमेंटसोबत मिळून घेतला गेला असेल...
धोनीने फलंदाजीत कमी योगदान देऊन फिट राहावे. किपींग आणि कप्तानी करावी..
आयपीएल आहे. क्रिकेटिंग नॉलेजच्या पलीकडे जाऊन विचार करा. धोनी हा एक ब्रांड आहे आयपीएलचा. त्याचे नुसते संघात असणेही भलामोठा आर्थिक फायदा मिळवून देते.
जडेजा गेल्यावर जाहिराती
जडेजा गेल्यावर जाहिराती दाखवल्या, बरं का!
>>
कदाचित त्यासाठी एक्स्ट्रा पैसे घेतले गेले असतील
असो.. मी अजून एकदाही पाहिली नाही त्याची एंट्री
फेफ, मला वाटतं तुम्ही लिहिलं
फेफ, मला वाटतं तुम्ही लिहिलं आहे आधीच्या पानांवर. की इतके चांगले खेळतायत रॉयल्स, असं म्हणाल्यावर पुढे त्यांनी माती खालली म्हणजे काय घ्या?!
मला तुमचीच आठवण आली आधी दण्दणीत पराभव बघून.
राजस्थान रॉयल्सबद्दल भाकीत करायला नॉस्त्रादेमस असायची गरज नाही. स्पर्धेच्या सुरुवातीलाच हे लिहिले होते. >>>> हो, नॉस्ट्रडॅमस किंवा तुक्काबहाद्दर असायची गरज असते. स्पर्धेच्या
सुरवातीला असं काही भाकित म्हणजे प्युअर स्पेक्युलेशन असतं. Because no one knows shit about anything at that point. And to take credit for that is like…
किपींग आणि कप्तानी करावी.. >>
किपींग आणि कप्तानी करावी.. >> जनरली true leader leads from front वगैरे म्हणतात. धोनी चांगला कप्तान आहे / होता (??) असा माझा समज होता .
वेल प्लेड KKR. राणा आणि रिंकू
वेल प्लेड KKR. राणा आणि रिंकू दोघांनीही ट्रिकी होऊ शकणारी चेस आरामात काढली.
दोघेही स्पिनर ला चांगले खेळतात आणि 7-8 धावा मोठे फटके न मारताही मिल्क करू शकतात हा मोठा प्लस पॉईंट होता.
नॉस्ट्रडॅमस किंवा
नॉस्ट्रडॅमस किंवा तुक्काबहाद्दर असायची गरज असते.
>>>
गेले दोन सीजन मी त्या कागदावर बलाढ्य दिसणाऱ्या संघाबद्दल हेच लिहितोय. ईतके वर्षे क्रिकेट बघतोय. जे कागदावर दिसते त्यापलीकडे विचार करता येतात... तुक्के ड्रीम ईलेव्हन जुगार खेळणाऱ्यांना लखलाभ
बाई दवे,
तो फलंदाज आश्विनचा प्रयोग अखेरीस गुंडाळून ठेवलाच ना
“ गेले दोन सीजन मी त्या
“ गेले दोन सीजन मी त्या कागदावर बलाढ्य दिसणाऱ्या संघाबद्दल हेच लिहितोय.” - मागच्या वर्षी रनर-अप होते ते.
“ फलंदाज आश्विनचा प्रयोग अखेरीस गुंडाळून ठेवलाच ना” - सगळ्याच टीम्स काही प्रयोग करतात. काही वर्क होतात, काही नाही होत. यंदा त्यांनी जुरैल, रूट/होल्डर असे मिडल ऑर्डर बॅट्समेन घेऊन मिडल ऑर्डर स्ट्राँग केली, त्यामुळे अश्विन च्या बॅटींग ची गरज पडणार नव्हती - हे ऑक्शननंतरच कळलं होतं. उगाच कशावरूनही स्वतःची पाठ काय थोपटून घ्यायची!
>> राणा आणि रिंकू दोघांनीही
>> राणा आणि रिंकू दोघांनीही ट्रिकी होऊ शकणारी चेस आरामात काढली.
मस्तच खेळले दोघेही. नितीश ने (बहुतेक) तीक्षणा ला मार्लेला स्ट्रेट ड्रैव चा चौका तर खल्लास होता! शेवटि क्विक सिंगल चा मोह टाळायला हवा होता, रिंकू शेवट पर्यन्त टिकला असता त मजा आली असती!
थोडी गंमत: उरलेले सामने आणि
थोडी गंमत: उरलेले सामने आणि मला लागावेत असे वाटणारे निकाल:
१५ मे: गुजरात वि हैद्राबाद: हैद्राबाद
१६ मे: लखनौ वि मुंबई: लखनौ
१७ मे: पंजाब वि दिल्ली: पंजाब
१८ मे: हैद्राबाद वि बंगलोर: हैद्राबाद
१९ मे: पंजाब वि राजस्थान: राजस्थान
२० मे: दिल्ली वि चेन्नई: दिल्ली
२० मे: कोलकाता वि लखनौ: कोलकाता
२१ मे: मुंबई वि हैद्राबाद: हैद्राबाद
२१ मे: बंगलोर वि गुजरात: बंगलोर
मग गुणतालिका अशी असेल:
गुजरात: १६
चेन्नई, लखनौ: १५
मुंबई,बंगलोर, राजस्थान, कोलकाता, पंजाब, हैदराबाद: १४
४थ्या स्थानासाठी ६ संघांमध्ये चुरस असेल!
Once a “THALA” is always a
Once a “THALA” is always a “THALA”
लिटल मास्टर सुनिल गावस्कर यानी एखाद्या चाहत्या प्रमाणे पळत येऊन टी शर्ट वर धोनीची सही घेतली.
#यूही_कोई_नहीं_बनता_थाला.
भुवी
भुवी
Pages