Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
इंग्लंडमधे किशन काय नि भरथ
इंग्लंडमधे किशन काय नि भरथ काय दोघेही अन टेस्टेड आहेत. तेंव्हा किशनला लेफ्टी असल्याचा फायदा देता येईल. बाकी बॅटींग पुरती माझी दोघआंकडूनही फारशी अपेक्षा नाही - गाजराच्या पुंगीचा प्रयोग.
>>अजून काही गमती जमती पण आहेत
>>अजून काही गमती जमती पण आहेत, त्या नंतर सांगतो.
नक्की सांगा!
WTC फ़ायनल मध्ये निवड
WTC फ़ायनल मध्ये निवड होण्यासाठी इशान किशन ने रणजी मध्ये काही विशेष केलंय का?
इशान किशन ने रणजी मध्ये काही
इशान किशन ने रणजी मध्ये काही विशेष केलंय का? >> तो झारखंडकडून पूर्ण सीझन खेळलाय हे सुद्धा पुरे आहे मला वाटते मी त्याचे नाव वाचलेले एखाद्या मोठ्या इनिंगसंदर्भात. चु.भू.दे.घे.
लम्बोदर शर्मा सिंगल डिजिट
लम्बोदर शर्मा सिंगल डिजिट मध्ये तंबूत परत!
“किशन ची फायनलसाठी राहुलला सब
“किशन ची फायनलसाठी राहुलला सब म्हणून निवड म्हणजे तो किपिंङ करणार असे धरून चालायचे का ?” - मला वाटतं भरत फर्स्ट चॉईस कीपर आहे. मागच्या सिरीजला सुद्धा किशन त्याचा बॅकप होता. हा केडन्स एकाच सिरीज नंतर लगेच बदलणार नाहीत.
द्रविडने साहाला बाहेर काढलं नव्हतं. जेव्हा साहाने त्याला फ्युचर प्लॅन्सविषयी विचारलं तेव्हा त्याने ‘पंत हा फर्स्ट चॉइस कीपर असल्यामुळे, त्याचा बॅकप म्हणून बीसीसीआय तरूण कीपर (भरत) तयार करणार असल्याचं‘ सांगितलं होतं. साहाने हे कॉन्व्हर्सेशन पब्लिक करून, त्यात परत गांगुलीने आपल्याला नुकतीच काँप्लिमेंट दिल्याचं अॅड करून न्यूज बनवली होती.
वॉव फेफ. हे नवीनच कळलं. आजकाल
वॉव फेफ. हे नवीनच कळलं. आजकाल खुप कॉमन झालय स्टोरी बनवायचं. मध्यंतरी शॉ चे क्रिप्टिक विडियोज येत होते ते पाहिलं का? त्याला भारतीय टीम मध्ये घेण्यावरुन? टोटल लोल होते
सुर्या आता सुटला तर काही होऊ शकतं. लागलाच आहे बॅट सोडायला तो. वाधेरा पण मस्त निक मध्ये आहे.
रवी शास्त्री हिंदीत कॉमेंट्री
रवी शास्त्री हिंदीत कॉमेंट्री करतो तेंव्हा संजय दत्तचा मुन्नाभाई बोलतोय असेच वाटते
लोल स्वरुप. एकलेत त्याचे काही
लोल स्वरुप. एकलेत त्याचे काही विनोदी कॉमेंट्स.
सुर्या घेऊन चालला मॅच घरी. चौफेर धोपटतोय
आधी बंगलोर कडून अॅबे पिडायचा
आधी बंगलोर कडून अॅबे पिडायचा मुंबईला, आता सूर्या त्याची परतफेड करतोय. काहीच्या काहि इनिंग्स दोघांच्याही !
सुर्या फुल्ल ३६० डिग्रीज
सुर्या फुल्ल ३६० डिग्रीज प्लेयर आहे राव!!
खुप खुप डेंजरस. फिल्ड लावणार
खुप खुप डेंजरस. फिल्ड लावणार कसं त्याला? त्यानी चुक केली मारताना तरच काही खरं नाही तर तुम तो गयो!
वैशाखचा पार भाद्रपद करुन टाकला शॉट मारू मारू अन आता काय उपेगे हॅटट्रिक वर असून?
एक ते २०२० चे कोहली आणि
एक ते २०२० चे कोहली आणि सुर्या आणि एक हे आजचे कोहली आणि सुर्या
मुंबैने 100 पर्यात षटकाला 10
मुंबैने 100 पर्यात षटकाला 10 ची सरासरी ठेवून नंतर नियोजितपणे वेग वाढवून लक्ष्य पार केलं. भागीदारी अप्रतिम !! अभिनंदन!
"रवी शास्त्री हिंदीत
"रवी शास्त्री हिंदीत कॉमेंट्री करतो तेंव्हा संजय दत्तचा मुन्नाभाई बोलतोय असेच वाटते" - टोटली - हिंदी आणि अॅटीट्यूड दोन्ही.
कालच गावसकरची हिंदी कॉमेंट्री ऐकण्याचा योग आला (इंग्लिश फीड नीट चालत नव्हतं). त्यात त्याने 'एखादी ओव्हर' म्हटलेलं ऐकलं.
सूर्याचा परतलेला फॉर्म बघून फार फार बरं वाटतंय.
गुज्जू किरण मोरे ची मराठी
गुज्जू किरण मोरे ची मराठी कमेंट्री अगाध आहे.
"लगातार दोन सिक्सर हिट केलेत" वगैरे
आणि सर्व प्लेअर्स चा उल्लेख आदरार्थी बहुवचनात...
(No subject)
नुसती धमाल चालूय
खरंय, सूर्य तळपतो आहे, आणखी
खरंय, सूर्य तळपतो आहे, आणखी रवि कशाला ?
आणखी रवि कशाला ? >>>
आणखी रवि कशाला ? >>>
विचारमंथन करायला!
११ फेर्या झाल्या तरी
११ फेर्या झाल्या तरी स्पर्धेची रंगत कायम आहे. कोणताही संघ अन्तिम ४ मध्ये येऊ शकतो अगदी शेवटच्या स्थानावर अगदी असला तरी दूर
दिल्ली देखिल.
*११ फेर्या झाल्या तरी
*११ फेर्या झाल्या तरी स्पर्धेची रंगत कायम आहे.* -
बव्हंशी, टी 20 फॉरमॅटमुळे असावं. आता, दोन तीन षटकात टी 20 सामना फिरवता येतो याची खेळाडूंची खात्री पटलीय व तसं करू शकणारे खेळाडू मोठ्या प्रमाणात वर येत आहेत.
चांगलीच पडझड झाली की! अजून ४
चांगलीच पडझड झाली की! अजून ४ जणं आहेत म्हणा पण २०० वगैरे नाही व्हायचे.
धोनीच्या करंट फॉर्म कडे बघता
धोनीच्या करंट फॉर्म कडे बघता अजूनही १७० कठीण नाही वाटत.
“ धोनीच्या करंट फॉर्म कडे
“ धोनीच्या करंट फॉर्म कडे बघता” - शॉर्ट बर्स्ट्समधे मस्त मारतोय धोनी.
फायटिंग टोटल आहे. पण सध्या
फायटिंग टोटल आहे. पण सध्या कॅपिटल वाले ऑन फायर आहेत.
पण सध्या कॅपिटल वाले ऑन फायर
पण सध्या कॅपिटल वाले ऑन फायर आहेत. >> अजून एक पाऊल पुढे जाऊन ते सेल्फ इमोलेशन मोडमधे आहेत
काल नेहल वधेराच्या शॉट्स
काल नेहल वधेराच्या शॉट्स बद्दल लिहायचे राहिले. कसले बंदूकीच्या गोळीसारखा बॉल जात होता ग्राऊंड शॉटस च्या वेळी - काय टायमिंग आहे का मस्करी. एकदम भुंगाट. हा मनुष्य एकही टी २० खेळला नाव्हता आधी म्हणे.
सेल्फ इमोलेशन मोडमधे आहेत>>>>
सेल्फ इमोलेशन मोडमधे आहेत>>>>> हो. आता तसच वाटतय.
व्हय व्हय! वाधेरा एकदम अप अॅण्ड कमिंग पोर्या वाटतोय. कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे मात्र.
“ कसले बंदूकीच्या गोळीसारखा
“ कसले बंदूकीच्या गोळीसारखा बॉल जात होता” - जबरदस्त खेळतोय ह्या सीझनला.
“ एकदम अप अॅण्ड कमिंग पोर्या वाटतोय.” - कन्सिस्टंटली खेळला पाहिजे ह्याला अनुमोदन.
जबरदस्त खेळतोय ह्या सीझनला. >
जबरदस्त खेळतोय ह्या सीझनला. >> कर्तुत्व त्याचेच का ? नाहीतर कर्णधार किंवा ड्रेसिंगरूममधे ओले टॉवेल जमा करुन धुवायला टाकणार्याचा मास्टरस्ट्रोक असायचा
Pages