आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

rcb

गो गुज्रात!
रोहित ला रिटेन केला का इंडियन्स नी? कमाल आहे. बरय. आय पि एलच खेळ म्हणा भौ. तिथे हारला तर मुकेश अंबानीची नुस्कानी होईल. मला त्रास होणार नाही. भारताच्या सामन्यात नाही खेळला आणि टीम हारली की फार त्रास होतो राव!

KKR तर १६ खेळाडूंना रिलीज केलंय आणि ३ खतरनाक प्लेअर्स पण ट्रेड केलेत. सात करोडमधे अजून मोठे प्लेअर्स टार्गेट करायचा स्कोपही कमी दिसतोय. तसेच हेल्स नसल्यानेही आता फरक पडेल.

केकेआर ची स्ट्रॅटेजी काही कळलीच नाहीये. म्हणजे कळलीय, but it doesn’t make much sense. ७.५ कोटीमधे बरेच स्वस्त खेळाडू घेऊन कुणीतरी चमकण्याची अपेक्षा धरून बसावं लागणार आहे.

तिकडे मुंबई आर्चरच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत.

७.५ कोटीमधे बरेच स्वस्त खेळाडू घेऊन कुणीतरी चमकण्याची अपेक्षा धरून बसावं लागणार आहे. नि तिकडे मुंबई आर्चरच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. - दोन्ही एकाच दर्जाचा मूर्खपणा वाटतो मला. रिलीज झालेल्यांमधे ३-४ वेस्ट इंडियन ऑल राऊंडर्स आहेत त्यांच्यासाठी मारामारी होणार परत. मयांक साठी पन बिडींग वॉर होईल. श्रेयस गोपाल साठी पण बिडींग होईल वाटतेय लेगी नि कामचलाऊ बॅटसमन असल्यामूळे.

फे फ जयदेव चे काय होणार ? Happy

मला सेन, मोहसीन खान, मलिक, मुकेश कुमार ह्यांच्या बॉलिंग मधे काय काय बदल झाला आहे ह्याचे कुतुहल आहे.

अरे तो स्टार आहे ............................. आयपीएल बिडींग राऊंड चा >> एकून रिलीज केलेले भारतीञ पेसर्स बघता तो लंगडी गाय आहे रे.

सेन, मुकेश कुमार ने सैद मुश्ताक अली ला चांगलं परफॉर्म केलं. मुकेश चौधरी सद्ध्या विजय हजारे ला चांगला खेळतोय.

उम्रान मलिक मला तरी आयपीएल स्टार वाटतो. नुसत्याच रॉ पेसला डोमेस्टीकमधे जरी लोकं घाबरत असली तरी इंटरनॅशनल ला बाकी स्किल्स नसतील (दिशा, टप्पा, व्हेरिएशन्स) तर रॉ पेस शत्रू ठरू शकतो.

"एकून रिलीज केलेले भारतीञ पेसर्स बघता तो लंगडी गाय आहे रे." - नेहमीच असतो. तो आणि खलील (इतक्यात त्याचं काही ऐकलं नाही) हॉट कमोडिटीज असतात आयपीएल बिडिंगला.

खलील गायब होता मुश्ताक अली मधून. मुश्ताक अली ला दर दिवशी कोणि तरी नवीन दिसत होत खर. उमरान मलिक बद्दल अनुमोदन. खरतर १५० ची सातत्याने गरज नाही १४०+ ला कंट्रोल असेल तर भारी पडू शकतात.

उमरान मलिक ला बघायला मजा येइल. आशा आहे की त्यानी कंट्रोल वर प्रॅक्टिस केली असेल. हाईट, बॉडी च्या मानाने जबरी आहे पेस.

माझ घोडं मोहसीन खान वर अडकलय. तो लेफ्टी आहे, निपी आहे, उंच आहे. थोडक्यात तरुण इशांत चे डावखुरे रुप. जर अर्शदीप्सारखी त्याने परत कंसिस्टंसी दाखवली तर एक वेगळा नि चांगला बॉलर मिळेल.

असामी

हो, मोहसीन चा स्किलसेट खूपच इम्प्रेसिव्ह आहे.

पण त्याचा फिटनेस रेकॉर्ड बऱ्यापैकी चिंता करण्यासारखा आहे.

IPL 2022 नंतर तो एकही मिनिट स्पर्धाजनक क्रिकेट खेळलेला नाही. (रणजी किंवा विजय हजारे किंवा मुश्ताक अली).

IPL 2022 च्या आधीही तो कित्येक स्पर्धा दुखापतीमुळे मुकला होता.

लोणच्या

KKR ला त्या तिघांना सोडण्या शिवाय दुसरा काही ऑप्शनच नव्हता.

कमिन्स ने ipl पेक्षा ऍशेस ला प्राधान्य देऊन आपले नाव काढून घेतले,

बिलिंग्स ने पण ऍशेस स्क्वाड मध्ये स्वतःचे नाव पक्के करायच्या कारणाने आपली अनवेलेबिलिटी कळवली.

हेल्सला एक करोड च्या बेस प्राईझ मध्ये IPL खेळण्यात काही इंटरेस्ट नाहीये. त्या ऐवजी तो ऑक्शन मध्ये उतरला तर तुफान कमाई करेल.

पण त्याचा फिटनेस रेकॉर्ड बऱ्यापैकी चिंता करण्यासारखा आहे. >> हे माहित नव्हते. वीस वर्षांच्या तरुण पोरांची हि हालत Sad

हेल्सला एक करोड च्या बेस प्राईझ मध्ये IPL खेळण्यात काही इंटरेस्ट नाहीये. त्या ऐवजी तो ऑक्शन मध्ये उतरला तर तुफान कमाई करेल. >> हेल्स पण अ‍ॅशेस मुळे पूर्ण सीझन नसेल असे मी वाचलेले बहुतेक . तसे असेल तर त्याच्या भारतातल्या अनप्रोव्हन रेकॉर्ड ला किती बिडींग होईल कोण जाणे

असामी

हेल्स >>>>>>>
हो, हेल्स भारतात खेळला नाहीये. पण त्याच्या कडे भारतीय उपखंडात खेळण्याचा (PSL, BPL आणि SPL) बऱ्यापैकी अनुभव आहे.
शिवाय वर्ल्ड कप मध्ये चालल्याने (त्यातही भारता विरुद्ध) रेसेन्सी बायस तर आहेच.

हे माहित नव्हते. वीस वर्षांच्या तरुण पोरांची हि हालत>>>>
हो, तरुण भारतीय पेस बॉलर्स चा फिटनेस रेकॉर्ड ओव्हरऑल बघितला तर वाईट आहे.
ह्या मागची कारणे अनेक असू शकतात.

नि तिकडे मुंबई आर्चरच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत>>
मुंबईचा गेल्या वर्षीचा मोठा प्रॅाब्लेम फ्रंटलाईन बोलिंग अटॅक होता. एकदा का बुमरा रिकव्हर होऊन आला, त्याच्या जोडीला आर्चर असला तर फ्रंटलाईन बोलिंग अटॅक गेल्या वेळेसपेक्षा चांगला असेल. पण तरीही मुंबईला अजून चांगल्या बोलर्सची गरज आहे जे गरजेनुसार रिप्लेसमेंट म्हणून खेळतील.

“आर्चर फुली फीट नि त्या फॉर्‍म मधे असेल हि अपेक्षा वेडगळपणाची आहे.” - अजून तो फिट व्हायचाय. मग तो फॉर्ममधे येणार. बुमराहसुद्धा इंज्युरीमुळे बाहेर आहे. कोंबड्याने कोंबडीला पाहिलं पण नाहीये आणि ह्यांनी ऑम्लेटची गाडी सुद्धा लावलीय.

कोंबड्याने कोंबडीला पाहिलं पण नाहीये आणि ह्यांनी ऑम्लेटची गाडी सुद्धा लावलीय Lol
हे घ्या, गाडीवर बोर्ड सुद्धा लावलाय
98EC20ED-BFE1-4FCE-9901-C47EDCD104ED.jpeg

आणि ह्यांनी ऑम्लेटची गाडी सुद्धा लावलीय >> Lol जेंव्हा होईल तेंव्हा हा प्रयोग बघायला मजा येईल हे मात्र खरे !

हा IPL चा धागा आहे तरीही,

चेतन शर्मा च्या निवड समितीची हकालपट्टी झालेली आहे.

अशीहि वार्ता आहे कि स्प्लिट कॅप्टनसी ची अनोऊन्समेंट हि येत्या दिवसात होईल, रोहित एकदिवशी / कसोटी कर्णधार तर हार्दिक T20 संघाचा कर्णधार.

आरसीबी माझं हिडन लव्ह आहे. कोहलीची टीम आहे. एके काळी द्रविड आणि कुंबळेने लीड केलीय. त्यामुळे सॉफ्ट कॉर्नर आहेच.

IPL सुरु व्हायला एक आठवडा उरला आहे. ह्या वेळी दुखापतीमुळे पूर्ण सिझन कन्फर्मड बाहेर असलेल्या खेळाडूंची लिस्ट अशी आहे.

मुंबई - जसप्रीत बुमरा आणि जाय रिचर्डसन (अजूनही रिप्लेसमेंट म्हणून कोणाला घेणार हे माहित नाही).

दिल्ली - ऋषभ पंत (अजूनही रिप्लेसमेंट म्हणून कोणाला घेणार हे माहित नाही).

राजस्थान - प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेद मॅक्कॉय (अजूनही रिप्लेसमेंट म्हणून कोणाला घेणार हे माहित नाही).

चेन्नई - काईल जेमिसन (रिप्लेसमेंट म्हणून द आफ्रिकेच्या सिसांदा मागला ला घेतले आहे).

पंजाब - जॉनी बेअरस्टो (रिप्लेसमेंट म्हणून ऑस्ट्रेलिया च्या मॅथ्यू शॉर्टला घेतले आहे).

बंगलोर - विल जॅक्स (रिप्लेसमेंट म्हणून न्यूझीलंडच्या मायकल ब्रेसवेल ला घेतले आहे).

Pages