Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शर्माला ह्या वर्षी कॅप्टन कसा
शर्माला ह्या वर्षी कॅप्टन कसा ठेवला काय माहित. I think he is done.>>>>>>
दुसरे आहे तरी कोण शर्मा पेक्षा चांगले मुंबई कडे
आणि टीम मधले बाकी खेळाडू पण धड खेळत नाहीयेत
मागच्या सिझन पासूनच
Auction मध्ये सगळे बदलल्यानंतर मुंबई पूर्वी सारखी राहिली नाहीये आता
मुंबईचं काही खरं नाही.>>>>
मुंबईचं काही खरं नाही.>>>>
अत्यंत जड मनाने मान्य करावेसे वाटतेय
खर आहे
ह्या सिझन मध्ये काय करतात काय माहीत
रहाणे जबरा खेळला आज...
रहाणे जबरा खेळला आज... क्रिकिन्फो चा मोस्ट व्हाल्युएबल प्लेयर! पूर्ण सीझन असाच फॉर्मात राहू दे!
“ Simply Sublime Batting” -
“ Simply Sublime Batting” - always love to watch him bat!! तो आज एकदम ‘नथिंग टू लूज’ मोडमधे खेळत होता. वानखेडे वरची त्याची द. अफ्रिकेविरुद्ध ८७ रन्सची इनिंग आठवत होती.
‘नथिंग टू लूज’ मोडमधे खेळत
‘नथिंग टू लूज’ मोडमधे खेळत होता. >> +१. सारखे सारखे मुंबईच्या नव्या खेळाडूंनी स्टेप अप व्हायला पाहिजे हे ऐकून वैताग आलाय. जुने खेळाडू काय दिवे लावताहेत तसहि ? नव्या खेळाडूंना सपोर्ट देण्याएव्हढे तरी खेळायला हवे ना जुन्या अनुभवी खेळाडूंनी ? आज स्टब ला का आणले संघामधे बेबी अॅबे ऐवजी ? चेन्नई स्पिनर्स वर अवलंबून असते नि बेबी अॅबे स्पिन झक्कास खेळतो हे उघड असतानाही हा प्रकार का होता ? आर्चर नसेल तर मुंबई ने सरळच रोहित ला आराम करून टेस्ट वर्ल्ड कप फायनलसाठी ताजेतवाने राहू द्यावे
“ टेस्ट वर्ल्ड कप फायनलसाठी
“ टेस्ट वर्ल्ड कप फायनलसाठी ताजेतवाने राहू द्यावे” - कदाचित ब्लेसिंग इन डिसगाईज ठरू शकेल. आयपीएलशी संबंधित नाही, पण टेस्ट चँपियनशिपचा विषय निघाला म्हणून आठवलं - पुजाराने काऊंटीमधे कडक सेंच्युरी मारलीय ससेक्स कडून.
पुजाराने काऊंटीमधे कडक
पुजाराने काऊंटीमधे कडक सेंच्युरी मारलीय ससेक्स कडून. >> तिथे धोनी होता का ?
आज जाडेजा ने घेतलेली ग्रीनची विकेट बघितली का ? तो कॅच नि ती विकेट फक्त जाडेजाची होती पण कोणी तरी कॉमेंट्री करणारा मास्टर स्ट्रोक बाय धोनी म्हणाला ? हाच महाभाग सूर्याच्या विकेट च्या वेळी गप्प होता. एकंदर WIPL च्या वेळची कॉमेंट्री मिस करतोय मी. 'म स्पॉइल्ड
Difference Between CSK and 9
Difference Between CSK and 9 other teams
Rayudu Uthappa Rahane
They thought it's over for them..
CSK told : Over to You Guys
“तिथे धोनी होता का ?” -
“तिथे धोनी होता का ?” -
“एकंदर WIPL च्या वेळची कॉमेंट्री मिस करतोय मी” - खरंय. छान वाटायची ती कॉमेंट्री.
क्रिकेटमधे डावपेच, प्रति-आक्रमणं, क्लृप्त्या, हे पूर्वापार चालत आले आहेत. काही काही वेळा कॅल्क्युलेटेड किंवा डेस्परेट चान्स घेतला जातो आणि ते यशस्वी ठरतं. त्या त्या प्रसंगी त्या डावपेचाचं, खेळाडूचं कौतूकही व्हावं. पण शब्दसंपत्तीच्या अभावामुळे आणि व्यक्तीपूजेमुळे हल्ली प्रत्येक गोष्ट एकदम ‘मास्टरस्ट्रोक’ च ठरते.
पण टेस्ट चँपियनशिपचा विषय
पण टेस्ट चँपियनशिपचा विषय निघाला म्हणून आठवलं - पुजाराने काऊंटीमधे कडक सेंच्युरी मारलीय ससेक्स कडून. >>>
काऊंटी शी रिलेटेड बातम्या - आपले अजून दोन गडी IPL कमिटमेंट संपल्यावर काऊंटी टीम ना जॉईन करणार आहेत.
अर्षदिप सिंग केंट साठी आणि रहाणे लेस्टरशायर साठी खेळणार आहे.
“अर्षदिप सिंग केंट साठी आणि
“अर्षदिप सिंग केंट साठी आणि रहाणे लेस्टरशायर साठी खेळणार आहे.” - येस्स! अर्षदिपच्या करियरला फायदा व्हावा ही सदिच्छा! रहाणे ने थोडा उशीर केला असं वाटतं. मागच्या वर्षी टेस्ट टीममधून ड्रॉप झाल्यावर आयपीएल ऐवजी त्याने काऊंटीचा स्वीकारावा असं फार वाटत होतं.
मागच्या वर्षी टेस्ट टीममधून
मागच्या वर्षी टेस्ट टीममधून ड्रॉप झाल्यावर आयपीएल ऐवजी त्याने काऊंटीचा स्वीकारावा असं फार वाटत होतं. >>>>
कदाचित अनपॉप्युलर ओपिनियन असेल पण सरफराज ने हि हा ऑप्शन स्वीकारला पाहिजे होता असं माझं मत आहे.
“ कदाचित अनपॉप्युलर ओपिनियन
“ कदाचित अनपॉप्युलर ओपिनियन असेल पण सरफराज ने हि हा ऑप्शन स्वीकारला पाहिजे होता असं माझं मत आहे.” - अनपॉप्युलर नसावं. स्तुत्य विचार आहे.
आपल्याकडचा ट्रेण्ड बघता, जर
आपल्याकडचा ट्रेण्ड बघता, जर रहाणेने आयपीएल मधे फॉर्म परत मिळवला, अन् काऊंटीत बरा खेळला तर त्याचा पूर्वीचा इंग्लंड मधला परफॉर्मन्स बघता तो टेस्ट चॅम्पयनशिप फायनल ला जखमी अय्यर ऐवजी पुनरागमन करू शकेल.
सर्फराज जरी नेक्स्ट दावेदार असला तरी त्याला थेट फायनल ला खेळवण्याचा धोका आपण पत्करणार नाही. त्यामुळे हा रहाणे साठी शेवटचा मोका आहे, अन् कुठेतरी हे त्याला ही माहिती आहे...
रशीद कमाल प्लेयर आहे.
रशीद कमाल प्लेयर आहे.
मॅच फसली असतांना येतो आणि हॅट ट्रिक घेऊन KKR च्या चेस चं कंबरडेच मोडतो.
वर्थ एव्हरी पेनी ऑफ दॅट 16 करोड प्राईस.
गुजराथने आणखी एक मॅच खेचली.
गुजराथने आणखी एक मॅच खेचली. जिंकण्याची सवय लागते म्हणतात ती अशी. spare a thought for Iyer. तो खेळत असताना केकेआर सहज जिंकतील असं वाटलं होतं.
“ रशीद कमाल प्लेयर आहे.” -
“ रशीद कमाल प्लेयर आहे.” - येस्स! पण जोसेफ ने मॅच ओपन केली आधी राणा आणि नंतर अय्यरच्या विकेटनी.
व्हॉट!!!!! मी कुठलीही पोस्ट
व्हॉट!!!!! मी कुठलीही पोस्ट डिलीट करणार नाहीये!! हे अविश्वसनीय आहे! रिंकू - कमाल!!!
GT ची स्क्रिप्ट त्यांच्या वरच
GT ची स्क्रिप्ट त्यांच्या वरच पालटली. टेक अ बाव रिंकू सिंग !!!!
चन्द्रकांत पंडितला इतका
चन्द्रकांत पंडितला इतका इमोशनल मी क्वचित पाहिलंय. केवळ त्याच्यासाठी मी केकेआरला चान्स आहे असं मानतो.
काहीच्या काही राव ! दयाळ चा
काहीच्या काही राव ! दयाळ चा कंप्लीट कोअर डंप झाला. तीन फुल टॉसेस नि २ हाफ ट्रॅकर. फूल मार्क्स टू रिंकु तो कॅपिटलाईझ ऑन देम. नेहरा आज रात्रभर बडबडत राहील. के के आर शेवटचे दोन्ही गेम्स एकदम एंटरटेनिंग खेळलय . फूल पैसा वस्सूल.
चन्द्रकांत पंडितला इतका इमोशनल मी क्वचित पाहिलंय. >> हो हे पण बरोबर.
शेवटचे 5 बॉल अविश्वसनीय होते.
शेवटचे 5 बॉल अविश्वसनीय होते... रिंकू ने पारच कोलला!
शिखर धवन वि. हैद्राबाद मॅच
शिखर धवन वि. हैद्राबाद मॅच चालू आहे
पाच बॉल पाच सिक्स..
पाच बॉल पाच सिक्स..
तीन लागोपाठ सरळ सरळ पट्ट्यात बसावे असे फुलटॉस आणि त्यानंतर दोन सलग आपटून टाकलेले हाफ पीच बॉल..
टिपिकल आयपीएल फालतूगिरी..
तरी मी विचार करतच होतो.. सुरू कशी झाली नाही अजून
6 संघ 3 सामने आणि 4 गुण या
6 संघ 3 सामने आणि 4 गुण या स्थितीत आहेत.
आणि उद्या आरसीबी जिंकली तर 4 गुणांवर सातवा संघ (लखनौ 4 सामने 4गुण) अशी स्थिती होईल.
फार रोचक होतेय या वर्षीची स्पर्धा!
टिपिकल आयपीएल फालतूगिरी..
टिपिकल आयपीएल फालतूगिरी..
तरी मी विचार करतच होतो.. सुरू कशी झाली नाही अजून Happy
>>
या वयात बाकी काहीही मॅच प्रॅक्टिस नसताना धोनी नी 2 सिक्स मारल्या तेंव्हाच सुरू झाली होती रे... :Wink:
धोनी च्या वेळी मास्टर स्ट्रोक अन् रिंकू च्या वेळी फालतुगिरी?? हीपोक्रसी की भी सीमा होती है...
ठरवून 5 सिक्स तर बेनेफिट मॅच मधे ही बसत नाहीत रे...
Don't take the credit away from young chap on his special day...
धोनीचे दोन सिक्स पाहिले नाहीत
धोनीचे दोन सिक्स पाहिले नाहीत
याचे पाहिलेत
हास्यास्पद चेंडू आणि एकूणच हास्यास्पद प्रकार होता. असे चेंडू कधी गल्ली क्रिकेटमध्ये पाहिले नाहीत. क्रेडीट द्यायचे झाल्यास आधी बॉलरला द्यावे लागेल.
बाई दवे
गेल्या एका वर्षी धोनीलाही एका सामन्यात मारायला दिलेले. हिरो बनवलेला अशी माझी पोस्ट होती. चेक करा सापडेल.
Don't take the credit away
Don't take the credit away from young chap on his special day... >> +१.
मला तर वाईट गोलँदाजाबद्दल
मला तर वाईट गोलँदाजाबद्दल वाटते
या प्रकारात त्याच्या खेळावर नाहक बदनामीचा शिक्का बसतो.
२००८ पासून या वर्षा पर्यंत
२००८ पासून या वर्षा पर्यंत आयपीएल खेळलेले कोण कोण आठवतायत?
जडेजा (राजस्थान रॉयल्स)
कोहली (RCB)
पियूष चावला (किंग्ज xi)
धोनी (चेन्नई)
दिनेश कार्तिक आणि अमित मिश्रा (बहुतेक दिल्ली)
आणखी कोण?
Pages