आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आता चान्स आहे पराग ला. सॅमसम उगाच गेला. सॉलिड टच मध्ये वाटत होता. पडिक्कल अजून चाचपडतोय. आता फक्त हेटमायर उरला ह्या जोडीखाली.

पडिकल हा ओपनर असताना अश्विन ला ओपन करायला पाठवायचा निर्णय कळला नाही. >> दोन लेफ्टी नको म्हणून ? तरीही अश्विन का हा प्रश्न आहेच. संजू होता ना.

असामी, तू तेवाटियासाठी पिटिशन सुरू कर. मी संजू साठी करतो >> तू पार्टी बदललीस ? Happy

काल लखनौ आणि आज राजस्थान- दोघांनी टॉस जिंकून बॉलिंग घेतल्याचे निर्णय उलटले आहेत त्यांच्यावर.

बॉलिंग नीट नाही झाली रॉयल्सची. ऑफ द बॅट २०० च्या जवळ स्कोअर असला की प्रेशर असतच. फार कमी मार्जिन ऑफ एरर आहे हे प्लेयरांच्या डोक्यातून जात नाही आणि चुका होतात. त्यात बटलर आणि पडिक्कल दोघंही टच मध्ये वाटले नाही. ह्या विकेट रेटनी तर १५० चा स्कोअर पण खुप असता रॉयल्सला.

हेटमायर आणि जुरेल ने मस्त खेचली होती. पुढच्या मॅच ला पडिक्कल ऐवजी जुरेल ला खेळवायला हरकत नाही. वेल डन पंजाब!

हो, भारी फिनिश झाली.

पंजाब साठी पॉसिटीव्ह गोष्ट म्हणजे प्रभसिम्रन, जितेश आणि एलिस चा परफॉर्मन्स. दोन्ही मॅचेस मध्ये चांगला इम्पॅक्ट दिला आहे.
राहुल चाहर ने हि दोन्ही सामन्यात टाईट बॉलिंग टाकली आहे.

आता रबाडा परत आल्यावर पुढल्या मॅच पासून हा प्रश्न असणारे कि बाहेर कोणाला बसवणार ? कदाचित एका भारतीय ऑलराऊंडर ला घेऊन सिकंदर रझा बाहेर बसेल

पडिक्कल अज्जिबातच टचमध्ये नाहिये; त्याला दोन चार मॅच बसवून बाकी ऑप्शन ट्राय केले पाहिजेत
अश्विनचा प्रयोग इतक्यांदा फेल गेल्यानंतरही परत परत का करतात??
हॅटमायर आणि जुरेलने काल कॉंफिडंस दिला..... ते मॅच काढू शकतात!!
कालची मॅच काढू शकले नाहीत याचे पूर्ण श्रेय सॅम करनच्या बॉलिंगला..... आधीच्या दोन्ही ओव्हरला १९-१९ रन्स निघाल्या असताना १६ डिफेंड करणे अवघड होते!!
भारी झाली मॅच Happy

काल त्या जुरेलने बलिदान देत हेटमायरला ३ बॉल १२ ला मारायचा चान्स द्यायला हवा होता असे वाटले. ते संघहिताचे ठरले असते. हेटमायरकडे जास्त अनुभव आणि कॅरेबियन पॉवर होती. तसेच सॅम करनला आदल्या ओवरला त्याने मारलेले. हे बॉलरच्याही डोक्यात असते. एक बाऊंडरी येताच प्रेशर ईकडचे तिकडे गेले असते.
पण ठिक आहे, त्या सिच्युएशनला असा निर्णय घेणे जुरेलसाठीही जड होते. त्याच्यासमोर धोनी असता तर निर्णय सोपा झाला असता.

आश्विनबाबत पहिल्यापासूनच मी ठाम आहे की त्याला उगाच नारायण बनववायचा प्रयत्न करत आहेत. तो नॅचरल हिटर बिलकुल नाहीये. कधीतरी मारेलही. पण ते जैसवाल, बटलर, सॅमसनही रिस्क न घेता मारू शकतात. राजस्थानच्या बॅंटींगला डेप्थ नाही म्हणून हा प्रयोग केला जातो. पण याने केवळ आभासी डेप्थ तयार होते.

>>त्याच्यासमोर धोनी असता तर निर्णय सोपा झाला असता.
हे मात्र खरय!! धोनीला कोण स्ट्राईक देईल सध्याच्या फॉर्ममध्ये Wink

>>राजस्थानच्या बॅंटींगला डेप्थ नाही म्हणून हा प्रयोग केला जातो
आठव्या नंबर वर होल्डर, नवव्या नंबर वर अश्विन आणि दहाव्या नंबरवर बोल्ट..... अजुन किती बॅटींग डेप्थ पाहिजे??
कालचे कारण वेगळे होते.... बटलर त्याच्या दुखावलेल्या बोटावर उपचार घेत होता!!
पडिक्कलला पाठवायला हरकत नव्हती पण तो सध्या फॉर्म मध्ये नाहिये आणि कदाचित त्यामुळे पॉवरप्ले वाया गेला असता!! आणि संजू म्हणाला बहुतेक पोस्टमॅचमध्ये की मधल्या ओव्हर्समध्ये त्यांच्या फिरकीला रोखण्यासाठी लेफ्टी हवा होता म्हणून पडिक्कलला मागे ठेवले

संजूने स्वत यायला हवे होते ओपनिंगला Happy

असो!! मॅच चांगली झाली Happy

हे मात्र खरय!! धोनीला कोण स्ट्राईक देईल सध्याच्या फॉर्ममध्ये
>>>>

टायमिंग चुकला या जोकचा
मागच्याच सामन्यात धोनीने आल्या आल्या पहिल्याच दोन चेंडूत दोन सिक्स मारले Happy
काल हे कोणाला जमले असते लास्ट ओवरला तर सामना खिश्यात असता.

>>मागच्याच सामन्यात धोनीने
बात निकलेगी तो दूरतलक जायेगी Wink
थोडा धीर धर.... अजुन चार-पाच मॅच जर या सीझनमध्ये तो असाच खेळला तर मी तुझ्या पार्टीत Wink

धोनीचे वय झालेय. आणि आयपीएल सोडून काही खेळत नसल्याने मॅच प्रॅक्टीसही नाही. फॉर्मशी काही संबंध नाही.

तो स्वत:च ज्या नंबरवर फलंदाजीला येतोय त्यानुसार आता तो संघाला आपल्या फलंदाजीने नाही तर कप्तानी आणि लीडरशिपने योगदान देणार हे उघड आहे.

पण त्यातल्या त्यातही त्याने मसल गेन करून पॉवर हिटींगने कसे योगदान देता येईल हे बघतोय हे कौतुकास्पद आहे. दोन्ही सामन्यात त्याने ते योगदान दिले आहे. दुसऱ्या सामन्यात तर त्याचेच दोन सिक्सर निर्णायक ठरले. त्याच १२ धावांनी जिंकले Happy

मात्र एक आहे
आजही लास्ट ओवरला पंधरावीस धावा हव्या असतील (मग आयपीएल असो वा वन डे ईंटरनॅशनल).. आणि धोनी स्ट्राईकला असेल तर प्रेशर धोनीवर नाही तर गोलंदाजावरच असते.

>>त्यानुसार आता तो संघाला आपल्या फलंदाजीने नाही तर कप्तानी आणि लीडरशिपने योगदान देणार हे उघड आहे.

You proved my point..... Thanks Happy

>>आजही लास्ट ओवरला पंधरावीस धावा हव्या असतील आणि धोनी स्ट्राईकला असेल तर प्रेशर धोनीवर नाही तर गोलंदाजावरच असते.

सहमत!

You proved my point..... Thanks Happy
>>>

कुठला पॉईंट..
उलट वयाच्या विविध टप्प्यावर ॲडजस्टमेंट करता येणेच हेच तर लिजंड खेळाडूंचे लक्षण असते.
तशीच गरज नसताना पुढे न येऊन तो आपली उर्जा राखून ठेवतोय. He is very brilliant in mindgames .. आपले विचार संपतात तिथे धोनीचे सुरू होतात

>>कुठला पॉईंट..
म्हणून उगाच भरकटायच नसत Wink
जिथून राजस्थान आणि पंजाबमधल्या मॅचच्या चर्चेत कारण नसताना धोनी घुसला तो मुद्दा Wink

मुद्द्याशी संबंध नसलेली पण सर्वसाधारणपणे सगळ्यांना मान्य होईल अशी वाक्ये उगाचच टाकली की समजायचे ते समजते Happy

स्वरुप Lol

काल त्या जुरेलने बलिदान देत हेटमायरला ३ बॉल १२ ला मारायचा चान्स द्यायला हवा होता असे वाटले. ते संघहिताचे ठरले असते. हेटमायरकडे जास्त अनुभव आणि कॅरेबियन पॉवर होती. तसेच सॅम करनला आदल्या ओवरला त्याने मारलेले. हे बॉलरच्याही डोक्यात असते. एक बाऊंडरी येताच प्रेशर ईकडचे तिकडे गेले असते.>>>> अरे कुठे कुठे चाल्लास भौ? बलिदान वगैरेचा प्रश्नच नाही. हेटमायरचे लक्षच नव्हतं. जुरेलनी केव्हाच हात करुन नो सांगितलेलं असून सुद्धा तो पळत सुटला आणि नंतर त्यानी जुरेलकडे पाहिलं आणि मग मागे वळून पाहिलं तर स्टंप उडवले होते.
जाताना त्याला सांगून गेला की तू भारी खेळतोयस आणि चालू ठेव हेच, ते भारी वाटलं.
ह्यात धोनी कुठून आला? अन तो असता तरी काय वेगळं झालं असतं? Typical, last moment misunderstanding होतं. अगदी जर जुरेलला शक्य असतं बलिदान देणे तर त्यानी दिलं असतं माझ्यामते.

हा करण शर्मा कधीचा आयपीएल खेळतोय!!
हसरंगा येईपर्यंत मिळालेल्या संधीचा तो पुरेपूर फायदा उठवतोय Happy

टॉपली बद्दल एकलं अत्ताच. संजय बांगर बोलत होता. बाहेर आहे म्हणे टुर्नामेंटच्या. दुर्दैव. दुसरी इंजुरी झाली बिचार्‍याला ही.
ओढतायत थोडीफार मॅच. मला वाटलं आता १२०-१३० तरी होतात का. अजून सुनिल नराईन यायचाय.

Pages