आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

क्रेडिट टू ठाकूर फॉर शुअर पण आता मात्र ढिसाड बॉलिंग करत आहे आर सि बी वाले. पार त्यांचा रिदमच घालवला ठाकूरनी जसं काय.

अरारारारा.... टोटली कानामागून येऊन तिखट झाले केकेआर. अवघड करुन घेतली परिस्थिती आर सि बि नी.
केकेआर मध्ये आता इंट्रेस्ट निर्माण झाला.

मुद्द्याशी संबंध नसलेली पण सर्वसाधारणपणे सगळ्यांना मान्य होईल अशी वाक्ये उगाचच टाकली की समजायचे ते समजते >> स्वरुप ला एव्हढा वैतागलेला क्वचितच पाहिलाय. बात निकलेगी तो ... Wink

सगळ्या डोमेस्टिक फास्ट बॉलर्स ना ओव्हर स्टेपिंग च्या बूट कॅम्प ला पाठवायची गरज आहे. >> +१

जाताना त्याला सांगून गेला की तू भारी खेळतोयस आणि चालू ठेव हेच, ते भारी वाटलं. >> +१. स्वतःची चूक ओपनली मान्य केली त्याने. व्हेरी कमेंडेबल.

RCB ची हवा टाईट झालीये. >> एकदम कोअर डंप झाल्यासारखे खेळले . ब्रेसवेल खेळला तर धमाल येईल.

>>स्वरुप ला एव्हढा वैतागलेला क्वचितच पाहिलाय
वैतागलो नाहिये रे..... धोनी माझा पण आवडता प्लेयर आहे पण नको तिथे अतिरेक केला की मग राहवत नाही Happy

शार्दुल ठाकूरने मॅच फिरवली आज....... आजतर रिंकूपण खेळला पण आमचा पराग कधी खेळणार? Wink

आमचा पराग कधी खेळणार? >>>

माझ्या मते तो (आणि हेटमायरही) खूप खाली येतो. त्याचे भारतीय डोमेस्टिक क्रिकेट / बाहेर च्या फ्रॅंचाईस क्रिकेट मधले बेस्ट परफॉर्मंस 4 किंवा 5 नंबर वर आहेत.
दोघेही जनरली मॅच मध्ये जेमतेम फक्त 10-15 बॉल खेळणार असतील तर त्यांच्या बॅटिंग ऍबिलिटी चा कितपत उपयोग होतोय.
तसंही T20 क्रिकेट मध्ये 6 किंवा 7 नंबर हि पोझीशन कंसीस्टंट्ली परफॉर्म करायला अत्यंत कठीण आहे.

जुरेलनी केव्हाच हात करुन नो सांगितलेलं असून सुद्धा तो पळत सुटला...
>>>>

तसे नव्हते ओ ते.
मिसफिल्ड नाही होत तर त्या दोन धावा नव्हत्याच मुळात हे हेटमायरलाही ठाऊक होते.
पण हेटमायरला स्ट्राईक हवा होता. त्यामुळे जुरेलने एखाद्या टेलेंडरसारखे पर्वा न करता धावत सुटावे अशी त्याची अपेक्षा होती.
जुरेल मात्र टेलेंडर नसल्याने आता हा सिंगलच आहे तर आता मीच स्ट्राईक घेऊन मारेन असा विचार त्याने केला.

ईथे धोनी यासाठी आला कारण अश्या सिच्युएशनला धोनी शॉट खेळताच दोन बोलला असता तर जुरेलने मागचा पुढचा विचार न करता दुसरी धाव घेऊन बलिदान दिले असते आणि धोनीला पुन्हा स्ट्राईक मिळवून दिला असता. असा त्याचा ऑरा आहे.

असो.. अश्या लास्ट ओवर सामन्यात धोनीची आठवण येणे हे स्वाभाविक आहे. ती मी काढली. कोणाच्या भावना दुखवायचा हेतू नव्हता _/\_

तसे नव्हते ओ ते.
मिसफिल्ड नाही होत तर त्या दोन धावा नव्हत्याच मुळात हे हेटमायरलाही ठाऊक होते.
पण हेटमायरला स्ट्राईक हवा होता. >>> हे बरोबर असू शकतं.

त्यामुळे जुरेलने एखाद्या टेलेंडरसारखे पर्वा न करता धावत सुटावे अशी त्याची अपेक्षा होती.>>>>>> हा खयाली पुलाव आहे. कारण हेटमायरला पण स्वतः आउट व्हायचे नव्हते अन जुरेलचा बळी द्यायचं पण काही कारण नव्हतं. अजून बर्‍यापैकी बॉल बाकी होते.
त्याला जर दिसले असते की रन पुर्ण करणे शक्य नाहीये तर तो पळाला नसता. जुरेल ला बाजूला करुन स्वतः स्ट्राईक घ्यायच्या लायकीचा जुरेलचा गेम नक्कीच नव्हता आज. He was holding his own and more.

ईथे धोनी यासाठी आला कारण अश्या सिच्युएशनला........... >>>>>> कुछ भी चल रा बॉस .... Lol

ईथे धोनी यासाठी आला कारण अश्या सिच्युएशनला धोनी शॉट खेळताच दोन बोलला असता तर जुरेलने मागचा पुढचा विचार न करता दुसरी धाव घेऊन बलिदान दिले असते आणि धोनीला पुन्हा स्ट्राईक मिळवून दिला असता. असा त्याचा ऑरा आहे. >> ऑरा आहे. हो पण जुरेल जसा खेळत होता ते बघता त्याने स्ट्राईक धोनीला दिला असता असे चुकूनही वाटत नाही. बुवा म्हणतात तसे He was holding his own and more.

हो पण जुरेल जसा खेळत होता ते बघता
>>>>
हो, ते मी सुद्धा नमूद केले आहे. जुरेल आपल्या जागी बरोबर होता. पण हेटमायरची तशी अपेक्षा वाटली की त्याने आपल्याला स्ट्राईकला आणावे.
त्यानंतर त्याने जी ॲक्शन केली ती अशी की आता स्ट्राईक ठेवला आहेस स्वत:कडे तर आता तू मारून गेम फिनिश करून ये.

त्यानंतर त्याने जी ॲक्शन केली ती अशी की आता स्ट्राईक ठेवला आहेस स्वत:कडे तर आता तू मारून गेम फिनिश करून ये. >>>>>>> +1 अँकी म्हणजे इथेही Mind reader Lol

Mindreader... हो धन्यवाद. धोनीचा चाहता आहे ना. समोरच्याच्या डोक्यात शिरायची सवय आहे. त्याने आपण गेममध्ये नेहमी एक पाऊल पुढे राहतो.

>>प्री-टूर्नामेंट प्रेडिक्शन करणे सोडून देणार आहे
प्रेडिक्शन करायचे सोडायचे नाही!!! सीझन संपता संपता आपल्याच सुरुवातीच्या पोस्ट वाचायला मजा येते Happy

परागने आज सुवर्णसंधी दवडली. very disappointing! पराग आणि पडिक्कलचं अपयश रॉयल्सना सतावणार आहे. संजूला रन्स करायला हवे. जैस्वाल, बटलर, हेटमायर आणि जुरैल मस्त खेळले.

दिल्लीकडून कुलदीप आणि मुकेशकुमारने जबरदस्त बॉलिंग केलीय. मुकेश तसाही इंटरनॅशनल टीमच्या परिघावर आहे. त्याला संधी मिळावी असं वाटतंय.

बोल्ट ची जबरदस्त बॉलिंग
DC चे २ बोल्ट ढिले केले पहिल्याच ओव्हर मध्ये
पहिल्या ओव्हर मध्ये १९ विकेट काढलेत म्हणे बोल्ट ने आज चे २ धरून

आजतरी मुंबई जिंकणार का ?? सध्याचा फॉर्म पाहता कुठलीही गल्ली ११ त्यांच्यावर भारी पडेल.
रोहित आणि इशन टेस्ट मॅच सुरुवात देतील आणि powerplay फुकट घालवतील आणि बाकी साठी बॉलर्स आहेतच.
तेंडुलकर आज खेळणार का ??? की रोहित शर्मा आज पण त्याला बेंचवर ठेवणार.
ऋतुराज आज पण धावांचा डोंगर करून orange कॅप स्वतःकडे ठेवेल, असे वाटते.

कठीण वाटतंय MI चं प्रकरण. >>>>
जे खेळत आहेत त्यांनी च कठीण काम करून ठेवलेय
सूर्या कधी तळपणार काय माहित
रन रेट तरी ठीक आहे आतापर्यंत

रहाणे डोळ्यांचे पारणे फेडत आहे.
१९ बॉल अर्धशतक.. क्लासिकल शॉट्स्स्.. काय तो टायमिंग. लाजवाब

एखादा प्लेअर ईतर संघात पाट्या खात असतो. पण चेन्नईत जाताच तो हिरो होतो हे आजवर बरेचदा पाहिले आहे.

कैच्या कै फॉर्म आज रहाणेचा. सब्लाईम एक्दम क्रेक्ट शब्द आहे सुनिल.
फारच भारी!
मुंबईचं काही खरं नाही. शर्माला ह्या वर्षी कॅप्टन कसा ठेवला काय माहित. I think he is done.

Pages