आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बुवा रावळगाव काय ? Lol

ही मॅच फिक्स होती का ? Wink म्हणजे आपल्या दोन्ही टीम्स दुआरी टीम जिंकावी म्हणून एव्हढा अटीतटीचा प्रयत्न करत होत्या. नोकिये ला मेमो मिळाला नव्हता बहुधा Wink

मुंबईने उशिरा व टेन्शन देत भवानी तर केली !! सूर्या ढगाआडून बाहेर येईपर्यंत आयपीएलचं हे सत्रच संपलं नाही मग मिळवलं. सिरीयसली, सूर्याला चांगला सल्लागार लगेचच मिळणं अत्यावश्यक आहे.
*ही मॅच फिक्स होती का ?* -
अरे, कोणाविरुद्धही अपील करण्यापूर्वी त्याच्यावर किती कोटींची बोली लागली होती, हे तरी बघत जा ना !!20190626_144731.jpg

सगळ्यांच्या बॅट आश्विन स्पॉन्सर करतो का जे त्याला सारखे पुढे पाठवतात..
ज्याची बॅट त्याची बॅटींग सारखे..
बटलर आहे.. हेटमायर आणि जुरेल त्या दिवशी खेळलेले बाकी आहेत.. तरी आश्विन १४ बॉल १० वर खेळतोय

CSK v RR, 17th Match
RR 110-3 (13)
Jos Buttler*: 44 (28)
Ravichandran Ashwin: 10 (14)
Sisanda Magala 2-0-14-0
Chennai Super Kings opt to bowl

आज संगाची मुलाखत ऐकायला आवडेल - अश्विन प्रोमोशन चे उत्तर मिळेल बहुधा.

अरे, कोणाविरुद्धही अपील करण्यापूर्वी त्याच्यावर किती कोटींची बोली लागली होती, हे तरी बघत जा ना !! >> भाऊ 'लेकी बोले सुने लागे' प्रयत्न होता. फुकट गेला बहुधा Sad

आज स्वरूप कोकणातून आणलेल्य फणसाचे गरे, आंब्याच्या पोळ्या, सुके बोंबिल वगैरेचं गिफ्ट हँपर तयार करून संगाला पाठवणार आहे - परागला बाहेर बसवल्याबद्दल. Happy

मला आश्विन का आधी पाठवला याऐवजी हेटमायरला का मागे ठेवला याचे उत्तर ऐकायला आवडेल
१८ बॉल ३० खेंळून नाबाद गेला. त्याला जास्त बॉल मिळायला हवे होते.

पहिल्या ओवरला १८ धावा दिलेल्या मोईन अली या एका स्पिनरला धोनी सतराव्या ओवरला आणतो.
लोकांचे लक्ष हेटमायरवर आणि तो केवळ ३ धावा देत बटलरची विकेट काढून देतो.
माही है तो मुमकीन है Happy

फेफ Lol
बसवला एकदाचा!
टफ लक जुरेल. आज नाही चालला.

आज स्वरूप कोकणातून आणलेल्य फणसाचे गरे, आंब्याच्या पोळ्या, सुके >> Lol

टफ लक जुरेल. आज नाही चालला. >> अश्विन ला खाली ठेवून नेहमीची ऑर्डर फॉलो करायला हवी होती म्हणजे ह्या दोघांनाही थोडा वेळ मिळाला असता. स्पिन नि स्किड होत असल्यामूळे अश्विन ने जाऊन धूम धडाका करायचा - गाजराची पुंगी वाजली तर वाजली हा प्रयोग असेल तर होल्डरला वापरायला हवे होते असे वाटते. त्याची रीच जास्त आहे नि तो थ्रू लाईन मारतो.

पहिल्या ओवरला २ धावा दिलेल्या कुलदीप सेन या एका फास्ट बॉलरला संजू अकराव्या ओव्हरला आणतो.
लोकांचे लक्ष सेनवर आणि अश्विन केवळ ७ धावा देत दुबेची विकेट काढून देतो.
संजू है तो मुमकीन है Happy

" कुलदीप सेन चे काय झाले ?" - मला कुलदीप १९ वी ओव्हर टाकेल असं वाटलं होतं. नंतर विचार केला कि होल्डरला अनुभवासाठी प्राधान्य मिळालं असेल. पण शेवटची ओव्हर संदीपला दिल्यावर 'का' असा प्रश्न पडला.

असो, all is well, that ends well असं RR म्हणू शकतील. RRR!!! (Rajasthan Royals Rock!!!) Happy

RR लीडरशिप ला (संजू आणि संगकारा) एक क्रेडिट देऊ शकतो.

मॅच मध्ये एक्सपेरिमेंट करायला कचरत नाहीत. अर्थात ते कधीकधी बॅकफायर होतात.

“ मॅच मध्ये एक्सपेरिमेंट करायला कचरत नाहीत.” - अश्विन अ‍ॅज अ बॅट्समन हा प्रयोग बरेचवेळा केलाय त्यांनी आणि बर्यापैकी यशस्वी पण झालाय.

हा धोन्या खरेच ४२ वर्षांचा आहे का?
अविश्वसनीय! _/\_
उगाच नाही या माणसाची ईतकी क्रेझ. सामना कुठल्याही शहरात असो, धोनीचा गजर ऐकू येतोच.

वॉल्कला गेल्याने चेन्नई ईनिंगचा सेकंड हाफ पाहिला नाही. पण स्कोअर चेक करत होतो अध्येमध्ये. कॉमेंटरी वाचली बॉल टू बॉल. शेवटी कितीही धावा हव्या असू द्या. धोनी समोर असला की प्रेशर बॉलरवरच असते हे मॅच न बघताही समजू शकतो.दोन सिक्स मारल्यावर धोनीने सिंगल का काढला यावेळी समजले नाही. धोनीच थांबला असता स्ट्राईकला पुढचा बॉल खेळायला तर बॉलर पसरला असता. कदाचित दोन सिक्स मारूनही आपण आता ४२ चे झालो हे कुठेतरी त्याच्या डोक्यात असावे. मजा येईल पण आता हायलाईटस बघायला. गड गेला पण सिंह गरजला Happy

हा हेट्या खरेच २६ वर्षांचा आहे का?
अविश्वसनीय! _/\_
उगाच नाही या माणसाची ईतकी क्रेझ. सामना कुठल्याही शहरात असो, हेटमायरचा गजर ऐकू येतोच.
बाथरूमला गेल्याने रॉयल्स ईनिंगची शेवटची ओव्हर पाहिली नाही. पण स्कोअर चेक करत होतो अध्येमध्ये. कॉमेंटरी वाचली बॉल टू बॉल. शेवटी कितीही बॉल्स असू द्या. हेटमायर समोर असला की प्रेशर बॉलरवरच असते हे मॅच न बघताही समजू शकतो. एक फोर मारल्यावर हेटमायरने सिंगल का काढला यावेळी समजले नाही. हेटमायरच थांबला असता स्ट्राईकला पुढचा बॉल खेळायला तर बॉलर पसरला असता. कदाचित एक फोर मारूनही आपण आता २६ चे झालो हे कुठेतरी त्याच्या डोक्यात असावे. मजा येईल पण आता हायलाईटस बघायला. गड पण आला आणि सिंह पण गरजला Happy

रिंकु सिंग च्या इनिंङ चे क्रेडीट बॉलरच्या ढिसाळ बॉलिंग ला होते म्हणे ..... Wink

धोनी ने हरण्याचा ठपका मधल्या ओव्हर्स मधे फास्ट न खेळण्यावर ठेवला. पिच एव्हढे काही कठीण नव्हते कि एव्हढा स्लो खेळ झाला असं त्याचे म्हणणे पडले. हे कोणाला उद्देशून होते नेमके ते कळले नाही. 3-92 (Shivam Dube, 11.4 ov असे दिसतय. त्यामूळे दुबे, मोईन नि रायुडू ह्यांना उद्देशून असेल बहुधा.

आपण आता ४२ चे झालो
>>
अजून नाही रे
जुलै मधे होईल

आता ४१ च आहे...

“ रिंकु सिंग च्या इनिंङ चे क्रेडीट बॉलरच्या ढिसाळ बॉलिंग ला होते म्हणे” - आपला तो धोन्या, दुसर्याचा तो दयाळ! Happy

“ धोनी ने हरण्याचा ठपका मधल्या ओव्हर्स मधे फास्ट न खेळण्यावर ठेवला” - सिंगल्सवर भर द्यायला हवा होता असं म्हटलंय धोनीने. अश्विन, सेन आणि चहल ने त्या टप्प्यात चांगली बॉलिंग केली. ते तिघं (दुबे, अली, रायडू) आणि कॉनवे मिळून त्या फेजमधे २८ बॉल्सपैकी ८ डॉट्स आहेत. बाऊंड्रीज आटल्यामुळे प्रेशर बिल्ड होत गेलं. जडेजा - धोनी ने पुष्कळ खेचली होती मॅच, पण संदिपने शेवटी चांगलं composure ठेवलं.

५ बॉल २८ पाहिजे असताना हवे तिथे सिक्सच मारता यावेत असे ते पाच चेंडू आणि सहा बॉल ५ हवे असताना nortje ने पायात टाकलेले सहा चेंडू ज्यात सामना ग्रीन आणि डेविससारखे हिटर असून एक बॉल दोनला गेला.
धिस ईज "ब्यूटी ऑफ आयपीएल". भावनेच्या भरात फालतूगिरी म्हटले जाते. माफ करा Wink

सलग लास्ट बॉल फिनिश होऊ लागलेत सामने. टीआरपी वाढायला सुरुवात Happy

मॅच डीप नेऊन काढण्याचा प्रकार काल परत एकदा धोनी आणि कंपनीच्या अंगलट आला...... पेसर आल्यावर मारुया म्हणून खेळून काढलेल्या १६ आणि १७ व्या ओव्हरचे काय?
१५ व्या ओव्हरच्या शेवटी असणारे ३० बॉलमध्ये ६३ चे टारगेट १७ व्या ओव्हरच्या शेवटी १८ बॉलमध्ये ५४ झालेले!!
शेवटची बॅटींग पेअर होती, चहल आणि अश्विन चांगली टाकत होते वगैरे सगळे जरी मान्य केले तरी तेंव्हा थोडीजरी रिस्क घेतली असती तर पुढचे टेन्शन थोडे कमी झाले असते!!
आणि धोनीच्या पोस्ट मॅच बोलण्यावरुन तर जाणवले की ते जिंकण्यापेक्षा NRR चाच जास्त विचार करत होते!!
पुढच्या 3 ओव्हरमध्ये चांगली ओढली मॅच त्यांनी त्याबद्दल त्यांचे कौतुकच पण झंपा, होल्डर, संदीप शर्मा वगैरे बॉलर अज्जिबातच टिपिकल डेथ ओव्हर बॉलर्स नाहियेत..... बोल्ट, प्रसिध कृष्णा वगैरे मंडळी असती तर इतकी खेचता आली असती का मॅच हा पण प्रश्न आहे!!
अर्थात क्रिकेटमध्ये जर तर ला अर्थ नसतो!!
लोक संदीप शर्माला शेवटची ओव्हर दिल्याबद्दल संजूचे कौतुक करतायत पण त्याच्यासमोर फारसे पर्याय नव्हते..... संदीप शर्मा हा सध्याच्या फॉर्मवरुन आणि एकंदरीतच डेथ बॉलर नाही आहे..... पण सेन फारच अननुभवी होता जडेजा आणि धोनीसमोर या परिस्थितीत बॉलिंग करायला हेही तितकेच खरे आहे!!
संजूने काल किपींग मध्येही चुका केल्या.... चहलच्या बॉलिंगवर एक कॅच सोडला आणि एकूणच काल त्याची किपींग जरा ढिसाळच वाटत होती!

तरीही हॅपी फॉर राजस्थान रॉयल्स Happy

५ बॉल २८ पाहिजे असताना हवे तिथे सिक्सच मारता यावेत असे ते पाच चेंडू >> बॉटमलाईन ही कि त्याने पाच सिक्स मारले नि (तुझ्या मते) जगातल्या सर्व श्रेष्ठ फिनिशर ला एक (किमान फोर तरी ) मारता आला नाहित. फिक्सिंग असेल तर दोन्ही मॅचेस मधे आहे किंवा कुठेही नाही. फडतूस बॉलिंङ चा परीणाम असेल तर दोन्हीकडे आहे - चांअग्ली डेथ बॉलिंग असेल तर दोन्हीकडे आहे. टेक युअर पिक ड्युड. अँड स्टिक तू इट. सारखे सारखे एका बोटावरची थुंकी दुसर्‍या बोटांवर करण्याने फक्त तुझी क्रेडीबिलिटी (???) जाते, बाकी काही नाही.

मॅच डीप नेऊन काढण्याचा प्रकार काल परत एकदा धोनी आणि कंपनीच्या अंगलट आला... >> मलाही असेच वाटले पण ती एकंदर त्याची मोडस ऑपरेंडी आहे नि परत हुकूमी डेथ बॉलर नाही ह्याचा फायदा घ्यायचा डावपेच असेल. ड्यू, बॉल चेंज चांगले पिच , समोर रायुडू दुबे, कॉनवे नि अली हे चांगला स्पिन खेळणारे बॉलर्स हे सर्व बघता स्पिनर्स नी जबरदस्त बॉलिंग केली ह्यात शंकाच नाही - विशेषतः अश्विन खतरा बॉलिंग करत होता. राहाणे विरुद्ध त्याचा माईंड गेम क्लास होता.

साहा ने परत दाखवून दिलंय कि अजून हि तो ऍज अ विकेटकिपर म्हणून डॉन आहे.

मला खरंच वाटतं कि द्रविड नि त्याला कसोटी संघातून डिस्कार्ड करण्यात घाई केली.

डिस्कार्ड नव्हते केले पण इंडिकेशन दिले होते..... पण त्यानंतर साहाने जो आततायीपणा केला त्यामुळे आता जर चांगले खेळूनही त्याला संधी मिळाली नाही तर त्याचा दोष पूर्णपणे साहाकडेच जातो!!

डिस्कार्ड केलेले प्लेयर्स दमदार परफॉर्मन्स देऊन आणि संघाची गरज म्हणून काही काळासाठी परत आलेली अनेक उदाहरणे आहेत!!
पण आता इतका हाय व्हॉल्टेज ड्रामा झाल्यावर साहाच्या बाबतीत ते जरा अवघड दिसतेय!!

काल संध्याकाळी झोपल्याने सेकंड इनिंग पाहिली नाही. स्कोअरकार्ड चेक केला.

विकेट हातात असून सेट झालेला गिल अणि मिलरसारखा फिनिशर खेळत असून सामना लास्ट ओवरला २ बॉल ४ पर्यंत गेला.
त्यातही मिलर १८ बॉल खेळून १७ ला नाबाद असे खेळत होता जे त्याच्यासारख्या फिनिशरला या सिच्युएशनला शोभत नाही.

गेले काही सामने सातत्याने लास्ट बॉलला जात आहेत जणू तसा आदेश निघाला आहे असे वाटते.

सुरुवातीच्या सामन्यात हे मिसिंग होते
पण आता मात्र अश्या सामन्यांमुळे ऑफिसमध्ये रस्त्याने जिथे तिथे चर्चा कानावर पडू लागली आहे.

काल संध्याकाळी झोपल्याने सेकंड इनिंग पाहिली नाही. >> ह्या नंतर पुढच्या पोस्टची काय गरज ? Wink

तो ऍज अ विकेटकिपर म्हणून डॉन आहे. >> क्रिकेट मधले थोडेफार खेळणार्‍यांना त्याच्या " ऍज अ विकेटकिपर " क्षमतेबद्दल कधीच शंका नसावी अस आपण सेफली धरू शकतो. दमदार बॅटींग करू शकणारे सक्षम पर्याय उपलब्ध होणे हे त्याचे दुर्दैव. " हाय व्हॉल्टेज ड्रामा " बद्दल स्वरुप ला अनुमोदन. मला तरी द्रविड नि गांगुली असेतो त्याचे पुनरागमन कठीण वाटतेय.

Pages