आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>अर्जुन तेंडूलकर डेब्यु!

त्याच्यावर ४ ओव्हर टाकायला देण्याइतपत विश्वास दाखवणार नसतील तर कशाला घ्यायचा संघात? त्याने टाकलेल्या १२ मधील २ चेंडू वर एक चौका आणि एक छक्का बसला. उरलेल्या २ ओव्हर न देण्यासाठी इतकं पाप नक्कीच पुरेसं नव्ह्तं

हो सूर्याची कप्तानशिप थोडी कंफ्युसिंग होती. तो परत फॉर्म मधे आलाय हि कमेची बाजू. सिहान ला एव्हढी विड्थ दिली कि बस्स्स रे !

Wow! What a game! Hard fought!

पराग बहूदा ह्या गतीने रॉयल्स मधून बाहेर पडेल, मग सीएसके त्याला घेतील आणि मग तो एक सीझन गाजवून सोडेल. Happy

कालच्या मॅचेस बघायला काही कारणास्तव जमले नाही..... म्हणजे अधुनमधून बघत होतो पण सलग नाही!!
गुजरातच्या इनिंगच्या शेवटच्या काही ओव्हर्स बघितल्या..... तेवाटियाला अजुन वर पाठवायला हवे होते..... १५-२० रन्स नक्कीच वाढल्या असत्या गुजरातच्या आणि त्याने फरकही पडला असता
बाकी पॉवरप्लेनंतर राजस्थानची बॅटींग बघितलीच नाही...... मग बघितली ते डायरेक्ट ३० बॉल ६० च्या आसपास टारगेट आणून ठेवल्यानंतर!!
थोडक्यात संजूची बॅटींग बघितली नाही पण हॅटमायरने काय ओढलीय मॅच..... तो, जुरैल, अश्विन सगळेच आश्वासक वाटत होते.
जुरैलच्या येण्याने राजस्थानच्या शेपटाला बळकटी आलीय.
पॉवरप्लेमधला शमी आणि डेथओव्हरमधला शमी अगदीच वेगळे बॉलर आहेत..... शेवटी जरी शमीने विकेटस काढल्या तरी सुरुवातीच्या स्पेलची भेदकता नंतर नव्हती.
कॉमेंट्रीबॉक्स मध्ये कैफ म्हणाला आता हॅट्मायर सिक्स मारणार आणि त्याने मारला तेंव्हा कैफ, इरफान वगैरे मंडळींनी कॉमेंट्री बॉक्स डोक्यावर घेतले होते!!

राजस्थानला इतक्या सातत्याने जिंकताना बघून भारी वाटतय!!

>> राजस्थानला इतक्या सातत्याने जिंकताना बघून भारी वाटतय!!
+1

सेम वेन्यू वर गेल्या वेळेस रिंकू ने अशक्य वाटणारा विजय खेचून आणलेला. काल संजू - शिम्रोन च्या जोडीने... गुजरात ला डेथ ओवर बॉलिंग वर लक्ष द्यायला लागणार!

राजस्थानला इतक्या सातत्याने जिंकताना बघून भारी वाटतय!! >> +१ रशिद खानला कसला फोडला राव. एकदम हाय क्वालिटी. मोहित शर्मा ला शेवटची ओव्हर न देण्याचे कारण कळालेच नाही. विकेट हवी होती म्हणून लेगी ला बॉलिंग द्यायला ७ रन्स ची मार्जिन होती हा टँजंट होता ना.

मग सीएसके त्याला घेतील आणि मग तो एक सीझन गाजवून सोडेल. >> Happy

"मोहित शर्मा ला शेवटची ओव्हर न देण्याचे कारण कळालेच नाही." - मलाही मोहित ने शेवटची ओव्हर टाकावी असं वाटत होतं, पण ते रॉयल्स चा फॅन म्हणून Wink (बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी ह्या एका बॉलवर आक्खं करियर झालं त्याचं. Happy )

हर्शलच्या कॉनवेच्या बॉल ची डीप काय महान होती. कशी काय अशी डीप मिळाली असेल ? पार्नेल काय टाकतोय देवालाच माहित. चिन्नास्वामी बेल्टर आहे ठीक आहे पण दोनशेच्या वर चेस करणे खायचे काम आहे का ?

काल आधी कोलकता आणि नंतर टायटन्सना शेवटी अ‍ॅक्सलरेट करता नाही आलं आणि रन कमी पडले. अश्विन, जुरेल आणी मुख्य म्हणजे हेटमायरनी सॉलिड जिगर दाखवली. अश्विन तसा लवकर गेला पण कडक मारले शॉट. ते पण शमी ला.

इकडे चेन्नईतर पार कचरा करतय आरसिबि बॉलिंगचा!

दोन ओव्हर्स बाकी असताना एकिकडे लेफ्टी मोईन असताना दुसरीकडे धोनी ऐवजी परत लेफ्टी जाडेजा का ? जाडेजा मारू शकतो पण धोनी पण.

फाफ आणि मॅक्सवेल ने आत्तापर्यंत तरी मॅच आरसीबीच्या कंट्रोलमधे ठेवलीय. पण तरिही अजून १००+ रन्स करायचे आहेत.

एक बॅटसमन कमी पडला आरसीबी ला. तो थिकसना किती लॅटरल बॉलिंग करतो ? मलिंगा सुद्धा हाय आर्म वाटतो त्याच्यापुढे.

“ एक बॅटसमन कमी पडला आरसीबी ला.” -प्रभुदेसाई ऐवजी कदाचित रावत चांगला ऑप्शन होता असं नंतर वाटलं. hindsight is always 20-20 Happy

मला फार बोअर होते राव तसली फेकी बॉलिंग. पण ठीक आहे. अलाऊड आहे तर डोंट वॉंट टू टेक एनिथिंग अवे फ्रॉम द यंगस्टर.
कडक झाली पण मॅच. मॅक्सी किंवा फा टिकला असता तर काम खतम होतं चेन्नईचं.

“ मला फार बोअर होते राव तसली फेकी बॉलिंग” - मलाही नाही आवडत (नियमांत बसते, तरिही).

“ शाहबाज किंवा लोमरार ऐवजी” - ओह ओके. बरोबर आहे. दोघांनी बॉलिंग पण नाही केली. मला हे कळत नाही के जे बॉलिंग करू शकणारे ऑलराऊंडर्स किंवा बॉलिंग ऑलराऊंडर्स आहेत (पराग, तेवाटिया, व्यंकटेश अय्यर, शाहबाझ, शार्दूल) ते इतके अनयूटीलाईझ्ड / अंडरयूटीलाईझ्ड का आहेत.

जे बॉलिंग करू शकणारे ऑलराऊंडर्स किंवा बॉलिंग ऑलराऊंडर्स आहेत >> हे बहुतेक बीट्स अँड पिसेस ऑलराऊंडर्स आहेत. इंपॅक्ट रुल मूळे त्यांचा वापर कमी होतोय असे वाटते. तुम्हाला जर प्रॉपर बॅट्समन किंवा बॉलर आत आणता येत असेल तर बीट्स अँड पिसेस प्लेयर ला पूर्ण कोटा किंवा अधिक बॅटींग ओव्हर्स देण्याची रिस्क का घ्या. (अय्यर अजून फूट इंजरी मधून रीक्व्हर व्हायचाय त्यामूळे बॉलिंङ करत नाही)

Pages