आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लंबे लंबे सिक्सं टाकून र्हायलेत मिलर आणि अभिनव. बरय!
पावर प्ले थोडा वाया गेला पण गिल सुटला होता नंतर.

Glad to see Rahane back. Hope he makes it count. >> +१

ग्रीनला का बाबा रोहित ?

मुंबई मुद्दाम मारायला देत आहेत.. फुलटॉस.. आपटून.. कॅच सोडून...
बघायलाही बोअर होतेय ते
फलंदाजीला बघूया आता

अर्जुन तेंडुलकरचा मागच्या मॅच मध्ये बिघडलेला अ‍ॅवरेज व्यवस्थित करण्यासाठी त्याला उरलेल्या दोन ओव्हर्स दिल्या नाहीत का?

गडगडगडगडगड Lol
रोहित शर्मा आऊट झाला आणि चालत निघाला तेव्हा मला त्याचा एकंदर अवतार आणि चालायची स्टाईल बघून एकदम आनंद इंगळे आठवला. थोडं पोट सुटलय ....

आयला चावला जास्त कॉन्फिडंट वाटतोय मारताना. बसतात पण आहेत शॉट्स मुख्य म्हणजे. मेबी नथिंग टु लूज अ‍ॅटिट्युड घेऊन आला माणूस की असा मोकळा सुटतो. आधीच २०८ बघून शर्मा वगैरे टॉप ऑर्डर टोळीची पाकपुक झाली वाटतं.

अरे अर्जुन तेंडूलकरला मुद्दाम सिक्स मारायला दिलेला फुल टॉस पाहिला का? आता सचिन काय करेल, सुमडीत मोहित ला मस्त प्रायवेट डिनर ला बोलवेल घरी. सगळं सगळं प्लॅण्ड होतं बाबा!!!
Lol
आणि ही आयडिया धोनीची होती हे ही लक्षत घ्या तुम्ही!

बुवा सुटले. Lol फिक्सिंग पण अशी दणकून मॅच हरण्याचे केले कि बस्स रे !

अर्जुन ला सुरूवातीला तीन ओव्हर्स द्यायला हव्या होत्या का ?ठरलेल्या प्लॅनला फटके पडायला लागल्यावर काय करायचे हे रोहित ला झेपत नाही असे म्हणायला हरकत नाही. नुसते उसासे सोडत सॅड चेहरा करून वावरतो.

राहाणे , मोहित शर्मा, चावला , संदीप शर्मा - सो फार सगळे टीम बाहेर गेलेलेच गाजवत आहेत. तिलक , गिल वगैरे आधीच ईयर मार्क केले ले वगळता ध्रुव जुरेल (नि कदाचित सुयश ) हा एकमेव फ्रेश चेहरा दिसतोय.

तो अर्जून २३ वर्षांचा आहे. तसा लहान आहे पण तरी मला जास्त इम्मचुअर वाटतो. कदाचित प्रेशर असावं किंवा मुळातच बुजरा असावा. तेंडल्यापण तसाच होता पण अंगचं टॅलेंट/बॅट अक्षरशः तळपत होती त्याकाळी. त्यामुळे बुजरेपणावर फोकस करुच नाही शकलं कोणी.

“अमेझिंग! ! >> फेफ नोंद घे रे” - नोटेड >>>> अरे हा काही तुमचा इंटरनल जोक आहे का भौ? मी पहिल्या पासून तेवाटिया फॅन आहे. आधीच्या पोस्टी पाहून घे पाहिजे तर ह्याच धाग्यावर. Happy

कोहलीने १४०+ स्ट्राईक रेटने ६ गेम्समध्ये ४ अर्धशतकं मारली तरी त्याचं नाव नाही गाजवणाऱ्यांमध्ये? काय करावं तरी काय बिचाऱ्यानं...

४ अर्धशतकं मारली तरी त्याचं नाव नाही गाजवणाऱ्यांमध्ये? > >अरे टीम मधून बाहेर गेलेले किंवा काठावर उभे असलेले लिहिलेत ना.

अरे हा काही तुमचा इंटरनल जोक आहे का भौ? >> तेवाटियाने शेल्ड्न ला ठोकला होता आठवतेय - त्या नंतर त्याच्यात काहि तरी एक्स फॅक्टर आहे नि म्हणून त्याला भारतीय टीम मधे एकदा तरी घ्यायला हवा असे मी (बरेचदा ) म्हटले होते. ह्यावर फेफ चे म्हणणे " हो पण तरीही त्याच्यात काहि तरी कमी आहे" जे फारसे चूक आहे असे नाही . ह्यावरून तो खेळला कि मी फेफ ला मस्करीमधे आठवण करून देतो. फेफ ला अशीच आठवण स्वरुप ला रियान बाबत करुन द्यायची आहे ह्याचीही मला कल्पना आहे Wink

पण सिरीयसली, त्याच्या सगळ्या लिमिटेशन मान्य करूनही मला त्याचा टशन देण्याचा अ‍ॅटीट्यूड आवडतो. कूल हेड ठेवून मॅचेस काढल्यात किंवा जिंकण्याची शक्यता वाढवली आहे असे त्याने एकापेक्षा अधिक वेळा केलय. असे स्ट्रीट फाईटर लोक गाजराची पुंगी स्वरुपात लिमिटेड रोलमधे अचूक वारले कि चालून जातात, म्हणून त्याला कमीत कमी फेल होण्याची तरी संधी द्यायला हवी असे वाटते.

ह्यावरून तो खेळला कि मी फेफ ला मस्करीमधे आठवण करून देतो. फेफ ला अशीच आठवण स्वरुप ला रियान बाबत करुन द्यायची आहे ह्याचीही मला कल्पना आहे Wink >>>>>> Lol

अरे तो सिरियस कंटेंडर आहेत. कूल डोकंठेवून तडकवायच्या हाच त्याचा गेम. it’s an extremely special skill with a lot of risk (of failure) involved. But if you look at the number of times he’s done that, it’s coming up on a staggering frequency I’d say.

“ ह्यावरून तो खेळला कि मी फेफ ला मस्करीमधे आठवण करून देतो. फेफ ला अशीच आठवण स्वरुप ला रियान बाबत करुन द्यायची आहे ह्याचीही मला कल्पना आहे” - Lol

मी तुझा एक्स फॅक्टरचा मुद्दा मागेच मान्य केलाय. पण तो भारतीय संघात येऊ शकेल ह्याविषयी मी साशंक आहे. I’d be happy to be proven wrong. तो अक्षर इतपत जरी बॉलर असता तर त्याला कदाचित संधी होती असं मला वाटतं.

पराग सारखे टॅलेंटेड खेळाडू चमकावे असं नेहमीच वाटतं. यंदाचा रणजी सीझन इतक्या मॅच्युरिटीने खेळल्यावर (बॅटींग आणि बॉलिंग) आयपीएलमधे सुद्धा तो चमकेल असं वाटलं होतं but he continues to disappoint. मुळात आसामसारख्या ठिकाणी खेळून मोठी उडी मारणं कठीण आहे. त्यात जर आयपीएलसारखी व्हिजिबिलिटी मिळण्याची संधी वाया घालवली तर अवघड आहे. तसं disappointed मला शॉ विषयी पण वाटतं.

हो मान्य - म्हणूनच मी ही एक्स फॅक्टर आहे असे म्हणत होतो. फक्त फेफ म्हणतो तसे त्याचे बाकि क्रिकेटींग स्किल्स सायलो मधे बघितले तर सध्य असलेल्या प्लेयर न बाजूला करू शकतील असे नाहीत. आपल्याकडे ऑल राऊंडर्स असते तर त्याला एका जागी आणणे सोपे झाले असते पण एक ऑल राऊंडर लेगी बॉलर म्हणून तो पुरेसा नाही. अ‍ॅटिंङ ऑल राऊंडर म्हणून खेळवण्याएव्हढा तो चांगला बॅटसमन नाही - फिनिशर नक्की आहे. जाडेजा किंवा अक्षर पटेल ला बाजूला करू शकेल ईतका नाही. मला वाटते गोच सगळी अशी आहे. पण ह्याच बरोबर तसेही आहे त्या संघाने असे काय दिवे लावले आहेत असे म्हणून त्याला प्रयोग म्हणून आणता येईल असेही म्हणू शकतो.

२०१२ ते २०१९ मध्ये दर आयपीएल सीझन ला त्याने किमान ३७० धावा केल्यात.
>>>

स्ट्राईकरेट>>>
123, avg. 31.5

वडापाव शर्मा
SR: 130, avg. 30

मि. फिनिशर
SR: 135, avg. 39

कोहली
SR: 130, avg. 36.5

हे stat लक्षात घेता, रहाणे चा SR फार वाईट वगैरे कधीच नव्हता अन् avg पण बरं होतं हे मान्य करायला हरकत नसावी...

गेले काही सीझन तो वन डे कमबॅक चं प्रेशर घेऊन खेळत होता अन् त्यात परफॉर्मन्स गंडला अन् टीम मधून टोलावा टोलवी झाल्यानी अजूनच गळपटला. आता फ्री माईंड नी खेळतो आहे तर परफॉर्मन्स पण सुधारला आहे...

१२३ स्ट्राईकरेट कमीच आहे.
आणि त्याहीपेक्षा त्याच्या खेळी मोमेंटम घालवणाऱ्या असायच्या. स्पेशली पॉवरप्ले संपल्यावर त्याला काय करायचे सुचायचे नाही Happy

रहाणे आधीचा आणि आताचा हे अगदीच बदलला आहे हे मान्य करायला काय हरकत आहे.. हवे तर धोनीला नका देऊ याचे श्रेय Happy

बाई दवे
तुशार देशपांडेचाही पुनर्जन्म झालाय धोनीच्या परीसस्पर्शाने Happy

हे एकच नाही बरीच उदाहरणे आहेत. त्या माणसात काहीतरी स्पेशल आहे हे जगभरातले क्रिकेट एक्स्पर्ट आणि कॉमेंटेटर मान्य करतात Happy

रहाणे आधीचा आणि आताचा हे अगदीच बदलला आहे हे मान्य करायला काय हरकत आहे
>>
आम्हाला हे मान्य आहेच, पण तो तुला वाटतो तसा अगदीच टाकाऊ होता असं नाहीये इतकंच.

रहाणे च्या 163 मॅच मधे 123 SR नी 3482 चेंडू मधे 4283 रन आहेत
म्हणजे प्रत्येक मॅच मधे avg 31.5 रन 21 चेंडूत

वडापाव च्या 234 मॅच मधे 130 SR नी 4662 चेंडू मधे 6060 रन आहेत
म्हणजे प्रत्येक मॅच मधे avg 30 रन 20 चेंडूत

आता मला सांग की तू वडापाव ला काय बेसिस वर रहाणे पेक्षा extra ordinary batter ठरावशील

>>त्या माणसात काहीतरी स्पेशल आहे
हे कुणी नाकारलय?

पुढे अर्ग्युमेंट करता येत नसेल तर लोक असे काहीतरी सर्वमान्य होईल असे गुळमुळीत वाक्य पेरतात आणि मुद्द्यांना बगल देतात असे ऑब्सर्वेशन परत एकदा नोंदवून पुढच्या दळणाला पास देतो Happy

>>आम्हाला हे मान्य आहेच, पण तो तुला वाटतो तसा अगदीच टाकाऊ होता असं नाहीये इतकंच.
अगदीच!! पण एखादा खेळाडू यशस्वी व्हायला लागल्यावर त्याचे श्रेय तिसऱ्याच कुणाला तरी देणे आणि तो खेळाडू बॅड पॅचमधून जात असताना त्याच्या गुणवत्तेवर विश्वास ठेऊन त्याची पाठराखण करणे या दोन भुमिकांमधला गुणात्मक फरक ती भुमिका घेणाऱ्यांबद्दलही बरेच काही सांगून जातो!!

>>तेवाटियाने शेल्ड्न ला ठोकला होता आठवतेय
त्यावेळी आणि त्यानंतरही काही दिवस तेवाटिया हा हिट ॲंड मिस टाइपचा प्लेयर आहे असेच माझे मत होते पण मागच्या वर्षी आणि यावर्षीच्या त्याच्या खेळी बघून ते साफ बदलून आता He is a dependable finisher असे झालेले आहे
(तळटीप: पण त्याचे क्रेडिट मी हार्दिक पांड्याला वगैरे देणार नाही Wink )

पण तो तुला वाटतो तसा अगदीच टाकाऊ होता असं नाहीये इतकंच.
>>>>

माझ्या कुठल्या पोस्टमध्ये मी रहाणेला अगदीच टाकाऊ म्हटलेय? उगाच का रहाणे आणि माझ्यामध्ये भांडण लावत आहात? कालच रहाणे टेस्ट चॅम्पियनशिपला फायनलला हवाच म्हणून मी आमच्या ग्रूपवर त्याच्या बाजूने वाद घालून आलोय.

बाकी रोहीत शर्माचा वडापाव उल्लेख करणे यावरून आपण त्याचा राग करता हे दिसले.

ईथे कोणाला अश्या वडापाव उल्लेखात आक्षेपार्ह वाटत नाही का?

की ऋन्मेषने आयपीएल स्क्रिप्टेड आहे असे म्हटले की तेव्हाच खेळाडूंचे अपमान होतात Happy

असो.
रहाणे आणि शर्मा यांची लिमिटेड वा २०-२० फॉर्मेटमधील तुलना हास्यास्पद आहे.
नंतर फुरसतमध्ये हे सिद्ध करणारे आकडे आणेन Happy

रहाणे आणि शर्मा यांची लिमिटेड वा २०-२० फॉर्मेटमधील तुलना हास्यास्पद आहे.
>>>
मी फक्त ipl बद्दल बोलतोय आणि त्याबद्दल आकडे मी दिले आहेत. लिमिटेड अन् टी 20 ची तुलना नाहीये.
आता तू रहाणे जर हळू खेळतो म्हणतोस तर शर्मा ही तसाच खेळतो हे मी आकड्या निशी सिद्ध केले आहे.
तुला शर्माचा खेळ चालतो, पण रहाणे चा तसाच खेळ मान्य नाही ते का ते तू सांग. बाकी इतर फाटे नकोत.

शर्मा ला इंटरनेटवर बरेचदा वडापाव म्हणून संबोधलं जातं. त्यात त्याचा राग करण्याचा हेतू नसतो (फिजिकल स्टेचर वरून ती कमेंट होते)
नावडतीच मीठ अळणी अन् आवडती च करलं गोड टाईप कमेंट तू करतोस.
आणि तू तुझ्या ग्रूप वर काय कॉमेंट्स केल्या त्याचा इथे काय संबंध?

>>पराग सारखे टॅलेंटेड खेळाडू चमकावे असं नेहमीच वाटतं

हे मलापण वाटते पण दहा सामन्यात एखादी मॅचविनिंग खेळी करायची आणि त्या जोरावर कॉलर वर करुन फिरायचे, आपल्याच संघातल्या खेळाडूंना ॲटीट्यूड दाखवायचा असले प्रकार केले की मग मनातून उतरतात असले खेळाडू!!

Pages