आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी फक्त ipl बद्दल बोलतोय
>>>
काही हरकत नाही. त्यातही मी दोघांतील फरक दाखवतो सहज Happy
ईण्टरनॅशनलमध्ये तो फरक प्रचंड आहे हे मान्य करून ते आकडे आणायचा माझा त्रास वाचवला याबद्दल धन्यवाद.

शर्मा ला इंटरनेटवर बरेचदा वडापाव म्हणून संबोधलं जातं. त्यात त्याचा राग करण्याचा हेतू नसतो (फिजिकल स्टेचर वरून ती कमेंट होते)
>>>>>
बरे झाले तुम्हीच कबूल केले हे बॉडीशेमिंग आहे Happy

नावडतीच मीठ अळणी अन् आवडती च करलं गोड टाईप कमेंट तू करतोस.
>>>>
विषय रहाणेचा असताना त्यात काही संबंध नसताना तुलनेला शर्मा आणायचा. ते देखील त्याचा वडापाव असा उल्लेख करून. यातून शर्मा कसा मीठ अळणीवाला नावडता आहे हेच कळते Happy

आणि तू तुझ्या ग्रूप वर काय कॉमेंट्स केल्या त्याचा इथे काय संबंध?
..>>>>
संबध हा की माझ्या कुठल्या पोस्टमध्ये मी रहाणेला अगदीच टाकाऊ म्हटलेय ते दाखवा.
उलट रहाणेचे शॉट बघायला मजा येते अश्या माझ्या मायबोलीवरील कॉमेंट मी शोधून आणू शकतो. उगाच का मला रहाणेचा दुश्मन करत आहात..

अरे हो.. बाकी आकडे जाऊ द्या..

आयपीएल मध्ये २५० सिक्स मारणारा पहिला आणि एकमेव भारतीय फलंदाज
रोहीत शर्मा...

तो वडापाव नाहीये तर हिटमॅन आहे Happy

विषय रहाणेचा असताना त्यात काही संबंध नसताना तुलनेला शर्मा आणायचा.
>>
दोघांचे आकडे कसे सारखे आहेत ते मी ऑलरेडी दाखवलं आहे. रहानेचा स्ट्रइक रेट कमी आहे हे तू म्हणालास (जी सत्य परिस्थिती नाही हे आकडे म्हणतात). त्या बद्दल न बोलता तू इथल्या कुणालाही access नसलेल्या ठिकाणी तूच केलेल्या कॉमेंट्स चा दाखला देत आहेस.

अन् आकड्यांच्या बेसिस वरच्या तुलानेला शर्मा ला आणलेलं तुला चालत नाही पण संबंध असल्याचा कुठलाही पुरावा / ठोस माहिती नसताना तू धोनी ला डोळे झाकून क्रेडिट देतोस.

राहानेचा स्त्राईक रेट खराब आहे या तुझ्या स्टेटमेंट ला आक्षेप आहे. शर्मा ही त्याच स्ट्राईक रेट नी खेळतो. मग एक चांगला अन् एक वाईट कसं. या विषयी आकडे आण अन् प्रूव्ह कर.

रोहीत शर्मा १३० स्ट्राईकरेट
रहाणे १२३ स्ट्राईकरेट (या आयपीएल आधी अजून कमी असेल)
फरक नाहीये का हा पुरेसा?

आणि रहाणेचे २०-२० फलंदाज म्हणून मूल्यमापन करताना ईंटरनॅशनल का घेऊ नये?

रोहीत शर्मा १३९
रहाणे ११३
ईतका फरक आहे म्हणून का? Happy

ईथे कोणाला अश्या वडापाव उल्लेखात आक्षेपार्ह वाटत नाही का? की ऋन्मेषने आयपीएल स्क्रिप्टेड आहे असे म्हटले की तेव्हाच खेळाडूंचे अपमान होतात >> परत क्लिक बेट Wink वडापाव मला भयंकर आवडतो. रोहितलाही सॉलिड आवडतो असे रितीकाने मित्राच्या बायकोबरोबर असलेल्या व्हॉ.अ‍ॅ. फोरम मधे सांगितलेय. तेंव्हा "वडापाव शर्मा" हि कौतुकाने बोलायची गोष्ट आहे. ह्यात आक्षेपार्ह काय आहे ? उलट वडापाव उल्लेख आक्षेपार्ह आहे असे म्हटल्याने तू वडापाव नि पर्यायाने त्यावर अवलंबून रोजीरोटी कमावणार्‍या हजारो लोकांचे नि तो खाऊन पोटाची भूक भागव्णार्‍या लाखो लोकांचे अवमूल्यन करत आहेस ह्याबद्दल तुझा निषेध !

हो हो. खत्रा बॉल होता.
लोल असामी. Lol

चांगले केले. थोडा पेस कमी झाला शेवटी पण रिंकू अणि विसा नी भरुन काढले. २०० च्या पुढे जाऊ शकले असते पण काळजी नाहीये तशी.
आर सि बि नी बर्‍याच संधी हुकवल्या. महागात जाऊ शकतं. टॉप ऑर्डर पुर्ण फायर झाली तरी मध्यंतरी गाडी गडगडतेय त्यांची. बघू आता.

@ असामी
रोहीत शर्मा आणि वडापाव
आपल्याकडून अश्याच पोस्टची अपेक्षा होती Happy
धन्यवाद Happy

असामी हे तुमच्यासाठी
>>>>>
शर्मा ला इंटरनेटवर बरेचदा वडापाव म्हणून संबोधलं जातं. त्यात त्याचा राग करण्याचा हेतू नसतो (फिजिकल स्टेचर वरून ती कमेंट होते)
Submitted by अँकी नं.१ on 26 April, 2023 - 16:21
>>>>>

असो Happy

संबंध असल्याचा कुठलाही पुरावा / ठोस माहिती नसताना तू धोनी ला डोळे झाकून क्रेडिट देतोस.
>>>>>

धोनीने रहाणेचे नशीब पलटवले आणि रहाणेनेही त्याचे आभार मानले अश्या हजार बातम्या सापडतील.

एमएस धोनी ने पलट दी अजिंक्य रहाणे की किस्मत, IPL में मचाई ऐसी आंधी, टीम इंडिया में काटेंगे चांदी
__________

15 महीने बाद BCCI में वापसी करने वाले अजिंक्य रहाणे ने धोनी को कहा Thanks, कहा- उन्होंने भरोसा जताया

__________

गेम ओवर ! Happy

असामी हे तुमच्यासाठी >> परत क्लिक बेट. माझे वडापावबद्दलचे मत ठाम आहे. वरचे पोस्ट वाचावे. तूवडापावाला हीन दृष्टीने बघितल्याबद्दल परत एकदा निषेध !

गेम ओवर ! >> अरे पण तू मागे म्हणाला होतास कि तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तरच विश्वास ठेवतोस. वाचलेल्या गोष्टींवर - खुद्द ज्याच्याबाबत झाल्या त्यांनी लिहिलेल्या सुद्धा प्रमाण धरायच्या नाहित असा तुझा आग्रह असतो नि तू कुठल्या तरी बातम्या चिकटवतोस ? तुझ्यासमोर उप्परनिर्दिष्ट राहाणे धोनी संवाद झाला का ? Lol (आता हो म्हणू नकोस - तसे असते तर तू त्यावर एक बाफ उघडला असतास आत्तापर्यंत हे नक्की Wink )

टॉप ऑर्डर पुर्ण फायर झाली तरी मध्यंतरी गाडी गडगडतेय त्यांची. बघू आता. >> कोहली उरलाय फक्त - नुसता सैरा वैरा धावतोय.

अरे हो ! आता पाहिलं मी. डेंजर. अव्घड आहे आता. ४च लोकं उरले. कोहलीला चान्स आहे काहीतरी जबरी करायला. हि कॅन डु इट. पण अवघड आहे.
लोमरोर पण फाय्र व्हायला हवा. फेल जात आहे लेटली.

धोनी कोणाला फेवर करतो ह्यावर सगळे अवलंबून आहे बुवा Lol कोहलीचे त्याचे थोडफार वाजले होते - निमेश राणा सेफ बेट वाटतो बाबा.

तुझ्यासमोर उप्परनिर्दिष्ट राहाणे धोनी संवाद झाला का
>>>>
हो. रहाणेचा ईंटरव्यू पाहिला आहे.
शोधू का आता युट्यूबवर कुठे सापडतो का? अर्थात मग मान्य करणार असाल तरच शोधतो.
बाकी रहाणेने स्वता धोनीला श्रेय दिलेय तरीही मान्य करायचे नसेल तर ज्याची त्याची मर्जी. रहाणे बोलला हे पुरेसे आहे Happy

हो. रहाणेचा ईंटरव्यू पाहिला आहे. >> प्रश्न असा होता "तुझ्यासमोर उप्परनिर्दिष्ट राहाणे धोनी संवाद झाला का ?" आणी प्रश्न माझा विश्वास बसण्याबद्दल नव्हता, तुझा कसा काय बसला तू प्रत्यक्ष न बघता असा होता ? ईंटरव्ह्यू काय फेक असू शकतो एआय वापरून बनवलेला. Lol

हौ! जबरी कॅच बॉस! टर्निंग पॉईंट. तो सुयश प्रभुदेसाई पण चमकदार वाटतो पण बिचारा थोडा फेल जातोय. पोटेन्शियल आहे त्यात पण फायर व्हायला हवा. पराग सारखी केस नको व्हायला. रिंकू इज स्टेपिंग अप बिग टाईम!
त्याच्या आणि वाईजी च्या फटक्यांनी + आर सि बि नी दिलेल्या जीवदानांमुळे मॅच जिंकले ते आज. कुडोस टु रॉय आणि राणा टू!

त्याच्या आणि वाईजी च्या फटक्यांनी + आर सि बि नी दिलेल्या जीवदानांमुळे मॅच जिंकले ते आज. कुडोस टु रॉय आणि राणा टू! >> मह्त्वाचा घटक राहिला ना बुवा ! धोनी !!! Lol

मह्त्वाचा घटक राहिला ना बुवा ! धोनी !!! Lol
>>
Lol

धोनी ला रहाणेचं transformation करता येणार होतं तर इंडिया चा कॅप्टन असताना का नाही केलं? तेंव्हा त्याला स्लो म्हणून बाहेर का काढलं??

हे बघ, सेहवाग काय म्हणाला (रोहन गावस्कर नी धोनी ला क्रेडिट दिल्यावर)
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.times...

"तेंव्हा त्याला स्लो म्हणून बाहेर का काढलं??" - तेव्हा तो रॉयल्सकडून खेळायचा आणि रायडू सीएसके कडून. तसंही रहाणे सुरूवातीच्या प्लेयिनंग-११ मधे नव्हताच. तो इंज्युरी रिप्लेसमेंट म्हणून आला आणि त्या पहिल्याच ५० नंतर त्याला बाहेर काढणं मुश्किल झालंय.

तेव्हा तो रॉयल्सकडून खेळायचा आणि रायडू सीएसके कडून. >> तोच उल्लेख सेहवागच्या मुलाखतीमधेही आहे बहुधा - राहणेची जागा रायुडूला दिली गेली टाईप्स.

मजेची गोष्ट म्हणजे, राहणे ने टेस्ट टीम मधली जागा टी २० च्या जोरावर मिळवली आहे. त्याचा रणाजी सीझन यंदा असा काही दैदिप्यमान नव्हता Happy

"राहणे ने टेस्ट टीम मधली जागा टी २० च्या जोरावर मिळवली आहे. " - अय्यर आणि पंतच्य अनुपस्थितीत, इंग्लंड मधे, ऑस्ट्रेलियाविरूद्ध, WTC final अश्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही एक शॉर्ट टर्म अरेंजमेंट असावी असं वाटतं. रहाणे ला ह्या वर्षी बीसीसीआय ने काँट्रॅक्ट पण नाही दिलंय. त्यामुळे जर काही जबरदस्त परफॉर्मन्स करून रहाणे ने जोरदार पुनरागमन नाही केलं तर ही त्याची फेअरवेल टेस्ट ठरू शकते.

मजेची गोष्ट म्हणजे, राहणे ने टेस्ट टीम मधली जागा टी २० च्या जोरावर मिळवली आहे. त्याचा रणाजी सीझन यंडा असा काही दैदिप्यमान नव्हता
>>
वडापाव शर्मा अन् धोनीचा मास्टर स्ट्रोक आहे तो
गेल्या फायनल ला भारताकडून सर्वात जास्त स्कोअर रहाणेचा होता हे आपण विसरलो असू, पण हे दोघं बरोब्बर लक्षात ठेऊन आहेत. ऑसी बॉलर्स ना ऐन वेळी आऊट ऑफ सिलॅबस सराप्राईज मिळावं म्हणून त्याला मधे खेळवला नाही.

अय्यर आणि पंतच्य अनुपस्थितीत, इंग्लंड मधे, ऑस्ट्रेलियाविरूद्ध, WTC final अश्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही एक शॉर्ट टर्म अरेंजमेंट असावी असं वाटतं. >> अर्थातच. राहुल किपिंग करेल भरथ च्या जागी नि हे सहा जण खेळातील असे वाटते.

वडापाव शर्मा अन् धोनीचा मास्टर स्ट्रोक आहे तो >> Happy

मास्टर स्ट्रोक Lol

"राहुल किपिंग करेल भरथ च्या जागी नि हे सहा जण खेळातील असे वाटते" - हे मत मी आणखी काही लोकांकडूनही ऐकलंय (इन्क्ल्युडिंग टॉम मूडी Happy ). अय्यर-पंत नसल्यामुळे (आणि पंड्या टेस्ट खेळत नसल्यामुळे) राहूलला कीपर म्हणून खेळवावसं वाटणं स्वाभाविक आहे पण मला वाटतं की टेस्ट ला प्रॉपर कीपर खेळवावा. वन-डेमधे एखादा कॅच मिस होणं आणि टेस्ट मधे होणं ह्यात ० ते ३०० इतका फरक आहे (मॅक्कलम, गूच ई.) त्यातून जर इंग्लंडमधे बॉल स्विंग होत असेल तर ही रिस्क अजूनच वाढते.

येस्स रायडू
तो देखील चेन्नईत गेला आणि वेगळा प्लेअर बनला
भाई कुछ तो बात है बंदे मे Happy
चेन्नईची मॅच कुठेही सगळी पब्लिक धोनी धोनीच करत असते.

बाकी रोहीत शर्माचा उल्लेख सातत्याने वडापाव करणे खेदजनक आहे.

इतर टीमबरोबर चांगला चाललेला पियुष चावला CSK मध्ये गेल्यावर का फेल झाला? केदार जाधव चे करीअर त्याला CSK मध्ये घेऊन धोनी का वाचवू शकला नाही ??
इरफान पठाणसारख्या गुणी खेळाडूचे काय झाले CSK मध्ये जाऊन?

मित्रा, धोनीमध्ये गुणग्राहकता आहे याबद्दल वाद नसावा पण त्याच्या संघातून खेळलेल्या प्रत्येक चांगल्या खेळाडूंचे श्रेय त्याला देणे हे फक्त त्याचा भक्तच करु शकतो; मग त्याने स्वताला क्रिकेटचा फॅन वगैरे म्हणवून घेऊ नये!!

CSk मध्ये जाऊन चमकलेले खेळाडू आहेत तसेच तिथे जाऊन ढेपाळलेले पण आहेत आणि अशी चमकलेल्या आणि ढेपाळलेल्या खेळाडूंची उदाहरणे प्रत्येक संघाच्या बाबतीत देता येतील!!
प्रत्येक वेळी त्याचा कर्णधाराशी सबंध असतोच असे नाही आणि तो जर कुणी ओढूनताणून लावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कमालीचे हास्यास्पद ठरते Happy

Pages