आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

5 षटकार मारल्यानंतर शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्यासोबत त्याची काय चर्चा झाली होती? यावर रिंकूने समालोचकांना उत्तर देत म्हटले की, “शाहरुख खान सरांनी मला त्या खेळीनंतर फोन केला होता. ते माझ्या लग्नाविषयी बोलत होते. ‘लोक मला त्यांच्या लग्नात बोलवतात. मात्र, मी जात नाही. तुझ्या लग्नात नाचायला येईल,’ असे ते मला म्हणाले.” यावर उपस्थित समालोचकांमध्ये एकच हशा पिकला. यादरम्यानचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

LSG's totals this season
When KL Rahul scored more than 20 runs
127/5 (16 overs)
159/8
154/7
128/7

When KL Rahul scored 20 or less
193/6
205/7
213/9
257/5

5 षटकार मारल्यानंतर शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्यासोबत त्याची काय चर्चा झाली होती? यावर रिंकूने समालोचकांना उत्तर देत म्हटले की, “शाहरुख खान सरांनी मला त्या खेळीनंतर फोन केला होता.
>>
SRK ला माहिती नव्हतं का की ते 5 षटकार ठरवून टाकलेल्या फुलटॉस अन् बाऊंसर्स वर मारले होते, त्यात काही विशेष नव्हतं...
का आता SRK नी रिंकू चं कौतुक केल्यावर ते जेनुईन झाले???

#डबलस्टँडर्ड्स्

डबल स्टॅंडर्ड हा शब्द Happy

शाहरूखने कौतुक केले म्हणून ते जेन्युईन झाले असे मला म्हणायचेय असा अर्थ कश्याला काढत आहात?
ती मुद्दाम केलेली बंडल गोलंदाजीच होती हे सरळ सरळ दिसत असताना मी का वेगळे मत मांडेन..

शाहरूख कसा त्याच्या लग्नात नाचणार आहे ही क्रिकेटसंदर्भात पेज थ्री न्यूज मला शेअर करायची होती दॅटस ईट Happy

चांगले दाबून धरले रायडर्सना. आता शेवटी रसल नसता मोकळा सुटला तर फारच कमी झाला असता स्कोअर.
फायटिंग टोटल आहे.

मस्त जिंकले. खुपच कॉन्फिडंट! विजय शंकर सॉलिड!!

मला वाटतं डायरेक मोदींनीच फोन केला असेल शहारुखला. इडन गार्ड्न्स ला मॅच असली तरी टायटन्स जिंकले पाहिजेत.
फालतू बॉल फेका!
Lol

मयांक ने खूपच निराश केलाय. मला वाटलं होतं कि भारतीय संघातून / पंजाब ने ड्रॉप केल्यावर ह्या वर्षी इर्षेने खेळेल पण एकदम आऊट ऑफ सॉर्ट खेळत आहे.

श्या! केकेआर अगदीच बिनडोक क्रिकेट खेळून रैले ना बाप्पा.

परवा परवा शॉ सारखा प्लेयर ‘दुनियामें क्वचितही मिलेगा‘ असं पाँटिंग म्हणत होता आणि आज शॉ दिल्लीच्या सब्स्टिट्यूट्समधे पण नाही.

मयांक ने खूपच निराश केलाय >> राहुल नि मयांक एकत्र असले कि एकदमच वेगळे खेळतात नि वेगळे झाले कि कमी पडतात. गेला सीजन किमान राहुल तरी खेळत होता. ह्या सीझन मधे दोघेही धडपडत आहेत. मयांक ओपन केल कि नीट खेळतो हे लक्षात ठेवून सगळे प्रयोग टाळायला हवे होते हैद्राबादने. अभिशेक शर्मा पण परत ओपन करून बघितल्यावर खेळायला लागला.

विजय शंकर ची सेकंड इनिंङ सुरू झालीये.

बापरे! शर्मा एकटा खिंड लढवत आहे.

असामी, मी अजून हसतोय तुझ्या " के एल ला लवकर आउट केलं ते भोवलं पंजाबला" कॉमेंटवर. Lol किती इज्जत काढावी त्याला काही लिमिट? Lol

आज केकेआर मध्ये रिंकू पण थोडा चाचपडत होता. ठाकूर पण लवकर गेला आणि राणा पण. मला वाटलं एक तर होम ग्राऊंड आणि जरा पंप्ड असतील. पण ट्रुली चांगली टाकली गुजरात नी बॉलिंग. हाताबाहेर नाही जाऊ दिली परिस्थिती.

अरे मस्त रिकवर झाले की सनराईजर्स! चान्स घालवला कॅपिटल्सनी. समाद गेला आत्ताच पण क्लासेन मस्त ठोकतोय. बॉल थांबून येतोय टप्पा पडल्यावर असं वाटतय मला तरी. बॅट्समनला टाईम मिळतोय शॉट मारायला. मला वाटतं कॅपिटल्स ला पण हा फायदा होईल आणि सनराईजर्सच्या स्पिनर लोकांनी काही कमाल केली तरच शक्य आहे. किंवा कॅपिटल्स नी फास्ट बॉलिंगला मारताना चुका केल्या तर ते वेगळं.

“ बॉल थांबून येतोय टप्पा पडल्यावर” - शॉट्स मारणं सोपं नाही बॉल थांबत असेल तर. ड्यू पडलं तर बॉल स्किड होईल आणि बॅटवर येईल. सोपं जाईल शॉट्स खेळणं.

क्रेक्ट आहे फेफ अंदाज चुकतो पण मी पाहिलं तसं प्रॉपर बघून मारत होते बॅट्समन. पुष्कळ पेस ऑफ होतोय आणि त्यामुळे कदाचित सोपं जात असावं असं वाटलं.

दिल्लीच्या डगआऊट मध्ये इतके हुशार लोग असूनही ते त्यांच्या सगळ्यात फॉर्मात असलेल्या फलंदाजाला (अक्षर) इतक्या खाली का पाठवतात ?

मला दर मॅच नंतर हाच प्रश्न पडतो.

दिल्लीच्या डगआऊट मध्ये इतके हुशार लोग असूनही ते त्यांच्या सगळ्यात फॉर्मात असलेल्या फलंदाजाला (अक्षर) इतक्या खाली का पाठवतात ? >> धोनीची सूचना असणार नक्कीच Wink मला आठवतय त्याप्रमाणे मधे एक दोन मॅचेस ला वर पाठवले नि तो फेल गेला होता. त्या नंतर प्रयोग थांबवले बहुधा. बाकी सुरूवातीला वॉर्नरच्या जोरावर दिडशे च्या आसपास पोहोचत होते तेंव्हा तो स्लो खेळतो म्हणून बोंब होत होती. आता तो सुरूवातीपासून अग्ग्रेसीव्ह खेळतोय नि लवकर उडतोय. Happy

किती इज्जत काढावी त्याला काही लिमिट? Lol >> बुवा मि विनोदाने म्हटल तरी तुम्ही त्यांचे नि राहुलचे स्कोअर बघा. त्याचा अ‍ॅप्रोअच नक्की काय असावा ह्याबद्दल कोणालाच काहीछ क्लरिटी नाहिये हे दिसतेय. पंआबमधून खेळताना तो थेट पहिल्या गीयरमधून तिसर्‍यात जायचा नि मग चौथ्या - मग फार तर दुसर्‍यात खाली यायचा. तिथे खोर्‍याने धावा निघाल्या आहेत. इथे पूर्ण सपोर्ट आहे.क्डी कॉक बाहेर बसलाय नि मग हे सगळे उफराटे प्रकार का ?

मला आठवतय त्याप्रमाणे मधे एक दोन मॅचेस ला वर पाठवले नि तो फेल गेला होता. त्या नंतर प्रयोग थांबवले बहुधा. >>>

या वर्षी तरी एकदाही वर पाठवलेलं नाही. ऑन ऍव्हरेज त्याला सात नंबर वर बॅटिंग ला आणला आला आहे आणि सर्फराज, पावेल, मनीष, ललित या सगळ्यांपेक्षा चांगला विकल्प असतानाही.

IMG-20230430-WA0164.jpg

Happy Birthday
Hitman !

Happy Birthday
Hitman !
खूप लकी आहे हा इसम!
म्हणजे मी पण शाळेत असताना गणितात कसाबसा पास/ नापास होत असे. पण माझे मास्तर कधीही असे म्हणाले नाहीत कि ह्या केकू मध्ये अफाट potential आहे. एकेकाचे नशीब!

आज मुंबईकरांना सगळीकडेच मेगाब्लॉक , वानखेडेवरही. !!20190921_230216_6.jpg

What a game!

एखाद्या बॉक्सिंग मॅच सारखं दोन्ही टिम्स पंचेस आणि काऊंटर पंचेस मारत होत्या... फायनली पंजाब ने नॉक आऊट पंच मारला!

Pages