आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>विशेषतः पहिल्या ४ ओव्हर्स. तिथे मुसक्या बांधल्या
अगदीच!! तिथे सुटले असते तर मग नंतर अवघड झाले असते!!
स्पिनर्सचा विषयच नाही पण संदीप शर्मा आणि त्या नवीन कुलदीप यादवने पण चांगली टाकली बॉलिंग आज Happy

धोनी आज का वर आला नाहि जाडेजाच्या जागी ?
>>
जड्डू ला परिस स्पर्श केला होता
पण जड्डू नी मास्टर स्त्रोक वाया घालवला

“ धोनी आज का वर आला नाहि जाडेजाच्या जागी ?” - मास्टरस्ट्रोक्सविषयी प्रश्न विचारतोस? कुठे फेडशील ही पापं? Happy

“ संदीप शर्मा आणि त्या नवीन कुलदीप यादवने पण चांगली टाकली बॉलिंग आज” - संदीप कमाल बॉलिंग करतोय ह्या सीझनला. फिल्डिंगपण जबरदस्त झाली (पराग होता आऊटफिल्डमधे, त्यामुळे प्रश्नच नव्हता Wink ) रॉयल्स नी चांगलं प्रेशर मेंटेन केलं.

हायलाईट्स बघितले आत्ता. काय चोपलं बॉस सिंघ, देशपांडे आणि पाथीराणाला!! जैस्वाल ऑन फायर!
मी पहिल्यांदाच पाहिलं त्याला असं खेळताना. तो गेल्यावर थोडा खाली गेला रनरेट पण लगेच पडिक्कल आणि जुरेल सुटले!
टेक्स्ट बूक इनिंग्स होती रोयल्सची.
पुढे बॉलिंग मध्ये धुव्वा होऊ शकला असता पण अश्विन, झँपा आणि यादव नी सॉलिड ओढून धरले लगाम. तिथेही टेक्स्ट बूक परत!
फेअर अ‍ॅन्ड स्क्वेअर जिंकले.
ह्याअवेळी टायटन्सला जब्री टक्कर आहे रॉयल्सची.

स्पेशल मेन्शन दुबे! सॉलिड लंबे लंबे सिक्स! साथ नाही मिळाली त्याला नाहीतर चांगला चान्स होता जिंकायचा.

हे शुद्ध ट्रोलिंग आहे!! Wink

On a serious note, या ऋन्मेषच्या नादाला लागून आपल्याच महान खेळाडूंची टर उडवू नका!!
धोनी एक चांगला गेम रीडर, स्ट्रीट स्मार्ट खेळाडू आणि कप्तान, एक चांगला मेंटॉर आहे..... अनेक नवोदित खेळाडू त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात ही गोष्ट कोणीही नाकारु शकत नाही.
अगदी त्याने अनेक मास्टरस्ट्रोक मारलेलेही आहेत पण विरोध त्याच्या प्रत्येक कृतीत मास्टरस्ट्रोक शोधण्याला आहे; कुठलाही ठोस आधार नसलेले तर्कट वापरुन उठसुठ सगळ्या गोष्टींचे क्रेडिट त्याला देण्याला आहे..... प्रॉब्लेम चाय से ज्यादा गरम किटल्यांचा आहे Wink

धोनी ट्रोलर्सचे हसायला येते हल्ली. काहीतरी शोधणे त्यांची गरज झालीय असे वाटते.
तो गेल्या आयपीएलपासून दर सामन्यात फलंदाजीला मागेच येतो. मग फलंदाजी पहिली असो वा दुसरी. असे करून तो आपली उर्जा राखून कारकिर्द लंबी खेचत आहे. कारण चेन्नईला त्याच्या कप्तानीची जास्त गरज आहे. सोबत त्याची ब्रॅंड बॅल्यू चेन्नईच नाही तर आयपीएलसाठीही गरजेची आहे.

बाकी आयपीएलमध्ये एखादा अनाकलनीय किंबहुना सरळ सरळ चुकीचा डावपेच दिसला तर त्याला सिरीअसली क्रिटीसाईज करणाऱ्यांचीही गंमत वाटते. आयपीएलमध्ये सारेच सिरीअसली घ्यायचे नाही हे समजायला हवे एव्हाना. पण आम्हाला ते मान्यच करायचे नाहीये Happy

जे सिरियसली आय पि एल बघतायत किंवा इथे येउन कुठल्या थियरीज पाजळण्यापेक्षा सिमिलर इंट्रेस्ट अस्स्लेल्या लोकांबरोबर गप्पा मारायला, निखळ आनंद घ्यायला येत आहेत त्यांनी कृपया एंगेज करुन टि आर पि देऊ नये. It basically keeps more bullshit coming. please try and ignore conversation and communication. There’s more fun to have than engaging in this rhetoric.

कोणाला आयपीएल बघून आनंद मिळतो म्हणून मी त्यातील गैरप्रकारांकडे कानाडोळा तर नाही ना करू शकत?

बाकी आयलीएलच्या एखाद्या सामन्याला स्क्रिप्टेड म्हटले की खेळाडूंची डिग्निटी आठवते पण तेच धोनीला ट्रोल केले वा शर्माला वडापाव म्हटले तर चालते.

ते ईंग्रजीत डबल स्टॅंडर्ड म्हणतात ते हेच का Happy

चेन्नई टॉप ऑफ द टेबल.
भाई ये बंदा अलग है.
रिसोर्स कसे वापरावेत हे धोनीकडून शिकावे.
रहाणे आणि शिवम दुबे हे दोन नवे स्टार उदयाला आणले.
गोलंदाजी कमजोर आहे पण ती हाताळायला धोनी स्वत: आहे. गेमच्या मिडल फेजला तो बरोबर नाड्या आवळतो.

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 April, 2023 - 09:32

बाकी आयपीएलमध्ये एखादा अनाकलनीय किंबहुना सरळ सरळ चुकीचा डावपेच दिसला तर त्याला सिरीअसली क्रिटीसाईज करणाऱ्यांचीही गंमत वाटते. आयपीएलमध्ये सारेच सिरीअसली घ्यायचे नाही हे समजायला हवे एव्हाना. पण आम्हाला ते मान्यच करायचे नाहीये Happy

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 April, 2023 - 08:12

आता याला डबल स्टॅंडर्ड म्हणायचे, तारेवरची कसरत म्हणायचे, विचारांचा गोंधळलेपणा म्हणायचे का स्प्लिट पर्सनॅलिटि म्हणायचे?

बिलकुल डबल स्टॅंडर्ड नाहीये यात..

पुर्णच्या पुर्ण आयपीएल स्क्रिप्टेड नसते. तसे कोणाला जमणारही नाही आणि त्याची गरजही नसते.

जसे पाच बॉल पाच सिक्स मारायची शक्यता कायम राहावी म्हणून सलग तीन फुलटॉस आणि मग सलग दोन बॉल अर्धाच्यागी अर्ध्या पिचवर आपटून बहाल केले जातात. तसेच रन बहाल करायचे अजून काही प्रकार म्हणजे फिल्डींग एकीकडे बॉलिंग भलतीकडे. किंवा बॉलिण्ग चेंजचा गोंधळ घालणे. डेथला स्पेशालिस्ट बॉलर न वापरता लेंथ बॉल पट्ट्यात देणारा बॉलर वापरावा.

आणि पब्लिक अश्या चुका काढण्यात आणि तावातावाने चर्चा करण्यात धन्यता मानते Happy

#OnThisDay in 2018

MI's Last 6 matches - L L L W L L
Head to Head - MI 13, CSK 12

Must win match for MI to be in playoffs race & to maintain H2H Record against CSK

Rohit Sharma scored 56* (33)
MI Won by 8 wickets

When 22 runs need in 12 balls
Rohit in 19th Over (4 4 4 0 4)

ज्या माणसाचा धोनी मॅच फिक्स करतो ह्यवर विश्वास आहे त्याला धोनीच्या ट्रोलर्सवर हसायचा अधिकार नाही.

धोनीने मॅचेस फिक्स करून हरल्या असता तर तो आज जगातला सर्वात यशस्वी आणि सर्वोत्तम कर्णधार नसता Happy

धोनीने मॅचेस फिक्स करून हरल्या असता तर तो आज जगातला सर्वात यशस्वी आणि सर्वोत्तम कर्णधार नसता Happy

ते ईंग्रजीत डबल स्टॅंडर्ड म्हणतात ते हेच का >> क्लिक बेट !

संदीप कमाल बॉलिंग करतोय ह्या सीझनला. >> हो त्याची मी पाहिलेली सर्वात बेस्ट बॉलिंग आहे. जनरली स्विंग होत असला कि तू धुमाकूळ घालतोअच पण ह्या सीझन मधे तो लाईन, लेंग्थ, स्पीड चेंजेस ह्यावरून धमाल उडवतोय. मला हर्शलच्या मेकोव्हर ची आठव्ण येते आहे. अर्थात फक्त ह्या प्रकारांवर किती वेळ चालता येईल हे बघणे इंटरेस्टींग असेल. उमेश यादव च्या जागी ह्याला वर्ल्ड कप फायनलसाठी घेऊन जा Happy

धोनीने मॅचेस फिक्स करून हरल्या असता तर तो आज जगातला सर्वात यशस्वी आणि सर्वोत्तम कर्णधार नसता>>>
म्हंजे IPL फिक्सिंग मध्ये धोनी सहभागी नाही तर.

मिटिंग होती म्हणून अर्धा तास बघता नाही आली मॅच. येउन पहतो तर तौबा तौबा! अरे काय चाललय काय? फुल्ल टू धोपाटलय जायंट्स नी!

चहर सोडून सगळ्यांना धोपटलं आहे. मला पीचच्या बाबतीत आणि ड्यु फॅक्टर वगैरे फार समजत नाही. जाणकारांनी मत द्यावे. तसा काही प्राबलेम आहे का आज? की बॉलिंगच बेकार टाकत आहेत?

ह्यूज, ह्यूज, ह्यूज स्कोअर होणार आहे २० ओव्हर्स नंतर. कितीही बॅटींग विकेट असली तरी स्कोअरकार्ड प्रेशर असणार आहे.

पंजाब ला दोनशे तरी टाकावे लागतील नेट रन रेट ठेवायला. एकदम क्लीन हिटींग होती आरपार. पंजाब तलवार पाजळत येईल तर धमाल येईल.

“ पंजाब तलवार पाजळत येईल तर धमाल येईल.” - पंजाबला एक चान्स आहे. They can play on Rahul’s captaincy Happy जर पंजाबने हल्ला चढवला तर राहूल नेहमीप्रमाणे क्लूलेस होईल Happy

Pages