आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ऍक्चुअली सर्फराज आज अजिबात अशुर्ड वाटत नाहीये. पेस समोर टाईमिंग जराही येत नाहीये. >> मलाही असच वाटलं आज पण आपला म्हणून एक सहानुभूती वाटत राहते. तो वन डे किंवा टेस्ट मोल्ड मधला अधिक वाटतो.

“ ऍक्चुअली सर्फराज आज अजिबात अशुर्ड वाटत नाहीये.” - Lol आज त्याने मला तोंडघशी पाडलं खरं. पण सहसा त्याचा क्रीझवरचा प्रेसेन्स मला अ‍ॅश्युअर्ड वाटतो. अंडर-१९ वर्ल्डकप फायनल ला खेळताना पाहिलं होतं. पंत, किशन वगैरे विकेट्स गेल्यावर त्याने टिच्चून हाफ सेन्च्युरी केली होती (इंडिया मॅच हारली होती), पण तेव्हापासून त्याची ती इमेज डोक्यात आहे.

नुसत्या स्विंग पेक्षा पेस नि स्विंग ची गरज आहे असे वाटले टायटन्स च्या बॉलिंग वरून. टायटन'स चा साहाचा उपयोग एकदम कुतूहलाचा आहे. हिटर म्हणून काम करतो. इतर संघ नवा किपर हवा म्हणून प्रयत्न करतात पण टायटन्स मात्र साहच्या लिमिटेड रोल वर खूश आहेत.

सहा अत्यंत अंडररेटेड पावरप्ले हिटर आहे. पावरप्लेतला स्ट्राईक रेट धरला तर भारतीय फलंदाजां मध्ये फक्त सेहवाग आणि शॉ त्याच्या पेक्षा पुढे आहेत.

“ सहा अत्यंत अंडररेटेड पावरप्ले हिटर आहे” - तो केकेआरकडून आणि हैद्राबादकडून सुद्धा ओपनर म्हणून मस्त खेळला होता. साहा एकंदरीतच अंडररेटेड राहिला असं वाटतं.

अय अरे येन्न्यायनैनिन्य्याये! इंग्लिश फीड बंद पडते म्हणून मला हिंदीफीड लावून मांजर्‍याचे हिंदी एकावं लागतय.

तेवाटिया आणि रशिद जोडगोळी म्हणजे शेवटी काहीनाही तर ३५-४० रन (मिनिमम) ची सोय आहे. ते पण फाष्ट मध्ये एकदम. आत्ताच खरं मिलर सुटला तर काम तमाम होईल.

बाबो! हे लोकं तर किरकोळीत काढून र्हायलेत सगळ्यांना. सुपर किंग्सची जागा घेणार असं दिसतय टायटन्स. भट्टी जमतेय चांगली.

टायटन्स ची बॅटींग कागदावर तरी तोकडी वाटते. त्यांच्या सुपिरियर बॉलिंग मूळे , विशेषत: खान च्या मधल्या चार ओव्हर्स मूळे बॅटीग ला फारसे हेव्ही पुलिंग करावे लागत नाही - से २०० च्या वर चेस करणे सारखे . जर बॅटींग हेव्ही टीम्स - राजस्थान सारखी सुटली तर टायट्न्स बीटेबल आहेत.

अग्रीड असामी. हे सगळं मागच्या वर्षी सुद्धा लागू होत होतं. रॉयल्स मध्ये बटलर सुटला तर काही खरं नाही. पण शेवटी त्यावेळी मॅच मध्ये काय होतं ह्यावरुनच ठरेल. मला वाटतं समहाऊ ही टायटनची पोरं एन वेळी बाजी पलटवतात. तो तेवाटिया तर डेंजर आहे खरच. रशिद सुद्धा. आणि बाकी लोकांमध्ये पण दम आहे. साहा,पंड्या, मिलर, गिल. बॉलिंग मध्ये परत रशिद हा हुकमी एक्का आहेच. शमी पण जोरात आहे सध्या.

असामी
सहमत. टायटन चा हि असा वेळ येईल कि जेव्हा चेस करतांना उन्नीस -बीस च्या मोमेन्ट त्यांच्या विरोधात जातील.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाकीच्या टीम च्या तुलनेत गुजरात कुठलेच मॅच विनर दुखापती मुले मिस करत नाहीयेत.

"आज खेळेल का रियान पराग त्याच्या होम ग्राउंडवर?" - Lol - त्याच्यावर बॅटींगची वेळच न येता राजस्थान जिंकले तर जास्त मजा येईल. Wink

फेरफटका
गुवाहाटीचं पीच म्हणजे हायवे आहे. इथे 200 हि डिफेन्ड करणं कठीण आहे.

"आज खेळेल का रियान पराग" - केवळ फिल्डींगवर त्याने आत्तापर्यंत किमान १५-२० रन्स वाचवल्या आहेत बघ. Happy

"गुवाहाटीचं पीच म्हणजे हायवे आहे. इथे 200 हि डिफेन्ड करणं कठीण आहे." - ते खरंय. पीचमधे दम नाहीये. बाऊंड्रीज पण लहान आहेत. फक्त रॉयल्सनी दडपणाखाली विकेट्स घालवायला नको.

अश्विनला पाठवलं!
सध्या तरी फेल गेलं. बॉलिंग चांगली केली पण त्यानी.

बटलर जर फिंगर इंज्युरी वर उपचार करत होता तर पडिकल हा ओपनर असताना अश्विन ला ओपन करायला पाठवायचा निर्णय कळला नाही.

तसाही पडिकल ला 5 किंवा 6 नंबर वर पाठवून वेस्टच करताय.

"अश्विन ला ओपन करायला पाठवायचा निर्णय कळला नाही." - बोल्ड आणि कॅपिटलमधे 'अनाकलनीय'!! पडिक्कल ला च पाठवायला हवं होतं.

पंजाब ने आत्तापर्यंत तरी चांगली बॉलिंग केलीय.

असामी, तू तेवाटियासाठी पिटिशन सुरू कर. मी संजू साठी करतो. Happy

Pages