आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी पण मुंबई नवीन प्रयोग करणार नाही आणि पराभवची परंपरा कायम राखणार. दोन्ही ओपनेर powerplay च्या आधी परत जातात. निदान तेंडुलकरला तरी चान्स द्या.
कोणाला सपोर्ट करायचा मोठा प्रश्न आहे.

बॅटिंग ऑर्डर कागदावर तरी खूप स्ट्रॉंग आहे.

रोहित, किशन, तिलक/ग्रीन/ब्रेव्हिस, सूर्या, तिलक/ग्रीन/ब्रेव्हिस, तिलक/ग्रीन/ब्रेव्हिस, डेविड

बॉलिंग चे मात्र खरंच वांधे आहेत. जोफ्रा, पियुष चावला आणि बेरेनडोर्फ सोडल्यास कोणालाच अनुभवी म्हणता येणार नाही.

प्लेऑफ ला पोचायचं असेल तर रमणदीप, शम्स, शौकीन, कार्तिकेय, अर्जुन, अर्शद खान सारख्या खेळाडूंना सॉलिड परफॉर्म करावं लागणार आहे.

अमेरिकेत विलो टीव्ही वर लाइव्ह कव्हरेज आहे. अजून कोणत्या सर्विस वर आहे का? >> इएसपीएन वर पन आहे असे वाटले. विलो वर त्या भयंकर अ‍ॅड्स बघायला लागत नाहीत हि सुखाची बाब असते.

जोफ्रा, पियुष चावला आणि बेरेनडोर्फ सोडल्यास कोणालाच अनुभवी म्हणता येणार नाही. >> आयपीएल चावला खेळल्याला दोन वर्षे गॅप आहे नि बेरेनडोर्फ हा आयपीएल बॅकप असतो त्यामूळे बॉलिंग ची बोंब आहे. गेल्या वर्षी किमान बुमरा फॉर्म मधे होता , जॉफ्रा मोठ्या ब्रेक नंतर येतो आहे त्यामूले एकखांबी तंबू दिसतोय सगळा. ग्रीन विल हॅव तॉ पंच अबॉव्ह हिज हेड. नुसत्या बॅटींग वर सगळी व्यूहरचना ठरेल असे दिसतेय.

शॉर्ट , लिव्हिंग्स्टोन , कुरान लागले तर पंजाब स्ट्राँग कंटेंडर ठरेल ,विशेषतः पंजाब मधे यंदा पिचेस बॉलिंङ धार्जिणी असल्यामूळे. त्यांची पंचाईत स्पिन फ्रेंडली ट्रॅक वर लागणार आहे. एक चहर वगळता सगळेच कामचलाऊ वाटले.

असामी
मोहाली च्या पीच वर जर गवत नसले तर फलंदाजांसाठी नंदनवन / गोलंदाजांची मौत आहे.
गेल्या वर्षी आपण तिथे 210+ हि डिफेन्ड करू शकलो नव्हतो.

उन्हाळा वाढू लागल्यावर कितपत फ्रेश गवत राहील हा पण प्रश्न आहेच.

पंजाब चा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्यांचा धरसोड अप्रोच आहे.

दर वर्षी कॅप्टन आणि कोच बदलतात. महागडे प्लेयर घेऊन त्यांना खेळवत नाहीत किंवा एका वर्षाने हाकलतात.

कंटिन्यूटी कशी येणार मग ?

गेल्या वर्षी आपण तिथे 210+ हि डिफेन्ड करू शकलो नव्हतो. >> हो फक्त यंदा बदलले आहे एव्हढेच. कदाचित हाही स्ट्रॅटेजीचाच भाग असावा. रबाडा, अर्शदीप, कुरान हे तिघे नि रिशी धवन ग्रीन पिचेस वर धमाल उडवू शकतात. त्यांच्या " धरसोड अप्रोच" मधे बहुधा फस्ट्रेशन चा भाग अधिक असावा. कागदावर स्ट्राँग दिसणारे खेळाडू ऐन वेळी कच खातात.

कलकत्त्याची सॉलिड लागली आहे, अय्यर आणि आता फर्ग्युसन इंज्युर्ड झाल्यावर.

चंदू पंडितांच्या कोचिंग स्किल्स चा पूर्णपणे कस लागणार आहे.

इम्पॅक्ट प्लेयर च्या नव्या नियमाने काही इंरेस्टिंग मॅच नक्की बघायला मिळतील.

ह्या रुलमुळे माझ्या मते राजस्थान साठी झम्पाचा बाय हा एक मास्टरस्ट्रोक ठरू शकतो (खास करून स्पर्धेच्या दुसऱ्या भागात).

इंपॅक्ट प्लेअर अन् पूर्वीचा सुपर सब मधे फरक काय?
(इंपॅक्ट प्लेअर निवडण्या साठी 4 ऑप्शन असतील, तर सुपर सब आधीच निवडून ठेवलेला असे. या व्यतिरिक्त मोठा फरक काय आहे?)

मी असे ऐकलेय की दोन टीम तयार करायच्या आणि टॉसनंतर एक निवडायची. बॉलिंग वा बॅटींग काय आहे त्यानुसार. ईम्पॅक्ट प्लेअर वा सुपरसबबाबत हे समजणे गरजेचे आहे म्हणून असेल.

आर्चर ब्रेकनंतर परत येतोय पण ईंटरनॅशनल खेळून आणि चांगली कामगिरी करून येतोय. मध्ये एकदोन सामन्यात त्याचे चांगले आकडे पाहिलेले. पण नेमका आता जोडीला बुमराह नाही. दोघांना एकत्र बघायला मजा आली असती. बाकी नवी पोरे यंदा अधिक ग्रूम झाली असतील असे वाटते. त्यामुळे अपेक्षा आहेत यंदा मुंबईकडून..

यावेळी अजुन तितकेसे फॉलो करायला सुरुवात केलेली नाही पण इंपेक्ट प्लेयर प्रकरण इंटेरेस्टींग दिसतेय..... याच्यामुळे कामचलाऊ ऑलराउंडर्सचे महत्व कमी होईल का?
फिल्डर (आणि कीपरसुद्धा) वाजवीपेक्षा जास्त हलला तर ५ रन्सचा दंड होणार आहे म्हणे..... अंपायर लोकांचे काम अजुन वाढले त्यामुळे!!
याच्यावरुन राडे होण्याचीही शक्यता दिसतेय

काही संघांचे preview बघितले youtube वर.... दर्जा खालावतोय!!
बऱ्याच youtubers ना इंपेक्ट प्लेयर वगैरे काही आहे हे माहितीच नसावे अशी शंका येतीय कारण नेहमीप्रमाणे starting 11 वगैरे देणे चालू आहे!! इंज्युअर्ड/उशिरा येणारे खेळाडूपण यांच्या starting 11 मध्ये आहेत Wink
काही लोकांना तर नवीन परदेशी खेळाडूंची नावे पण घेता येत नाहियेत!!

अँकी
सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे तुला सुपर सब एक इंनिंग संपल्यावरच वापरता यायचा.

फुटबॉल मधल्या सब्स्टीट्युट प्रमाणे इम्पॅक्ट प्लेअर तु कधीही वापरू शकतोस, अगदी पहिल्या किंवा दुसऱ्या इंनिंग्स च्या मधोमधही.

उदा:
चेन्नई ची मॅच सुरु आहे आणि त्यांची सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग आहे,
ते दीपक चाहर कडून पावरप्ले मध्ये 2-3 ओव्हर टाकून मग त्याला एका भारतीय स्पिनर किंवा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट इम्पॅक्ट प्लेयर ने रिप्लेस करू शकतात.

इंपेक्ट प्लेयर प्रकरण इंटेरेस्टींग दिसतेय >> तो कसा वापरणार ह्याचे कुतूहल आहे. त्यात बरेह घोळ होणार असे मला वाटतेय. टॉस नंतर टीम जाहीर्‍ करणे हा इंटरेस्टींग प्रकार आहे हे मात्र नक्की.

आर्चरचे ह्या वर्षीचे टी २० मधले आकडे
https://stats.espncricinfo.com/ci/engine/player/669855.html?class=3;span...

>>टॉस नंतर टीम जाहीर्‍ करणे
एक टीम जाहिर करताना नावे विसरतात आणि आता दोन दोन टीम लक्षात ठेवणे म्हणजे त्याचेच जास्त टेन्शन यायचे कॅप्टन्सना Wink

टॉस नंतर टीम जाहीर्‍ करणे हा इंटरेस्टींग प्रकार आहे हे मात्र नक्की. >>>
माझ्या मते हा चांगला चेंज आहे. आंतर्राष्ट्रीय क्रिकेट मध्ये / इतर फॉरमॅट मध्ये ही अवलंबला पाहिजे.
ह्याने 2021 T20 वर्ल्ड कप सारखे - विन टॉस, विन मॅच रिझल्ट निकालात निघतील.

इंपॅक्ट प्लेयर एक नवीन प्लेयर म्हणून आत येतो. म्हणजे त्याने एखाद्या बॉलरला रिप्लेस केलं तरी तो पूर्ण कोटा टाकू शकतो. आऊट झालेल्या बॅट्समन ऐवजी आला तर बॅटींग करू शकतो - अशी माझी समजूत आहे.

"ह्या रुलमुळे माझ्या मते राजस्थान साठी झम्पाचा बाय हा एक मास्टरस्ट्रोक ठरू शकतो" - इंपॅक्ट प्लेयर इंडियन च असू शकतो, अनलेस, रॉयल्सनी सुरूवातीला ४ पेक्षा कमी ओव्हरसीज प्लेयर्स खेळवले.

"जेसन होल्डर आल्यामुळे रियान परागचे लाड कमी होतील का?" - Lol तुझं परागशी काय वाकडं आहे हे मला एक न उलगडलेलं कोडं आहे. Happy पण मला वाटतं कि पराग रॉयल्सची लाँग टर्म इनव्हेस्टमेंट आहे. तो ह्या वर्षी आसाम कडून खूप मॅच्युरिटीने खेळलाय आणि रॉयल्सची त्याच्याकडून तश्याच परफॉर्मन्सची अपेक्षा असेल.

"ह्या रुलमुळे माझ्या मते राजस्थान साठी झम्पाचा बाय हा एक मास्टरस्ट्रोक ठरू शकतो" - इंपॅक्ट प्लेयर इंडियन च असू शकतो, अनलेस, रॉयल्सनी सुरूवातीला ४ पेक्षा कमी ओव्हरसीज प्लेयर्स खेळवले. >>>

माझा रोख पीच ची परिस्थिती पाहता चहल ला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवू शकतो याकडे होता.
होल्डर किंवा संदीप शर्मा ला पावरप्ले मध्ये आटपून घ्या आणि मग चहल ला आत आणा. तसेही होल्डर / शर्मा चे आकडे जुन्या बॉल ने वाईट आहेत.
मिडल ओव्हर झाम्पा, चहल आणि अश्विन ने चोक करून टाका.

"माझा रोख पीच ची परिस्थिती पाहता चहल ला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवू शकतो याकडे होता." - ओह ओके.. पहिली बॅटींग असेल, तर ही मूव्ह इफेक्टीव्ह ठरू शकेल.

>>तुझं परागशी काय वाकडं आहे हे मला एक न उलगडलेलं कोडं आहे.
अरे असे काही नाही रे पण १६ च्या आसपासचे ॲव्हरेज १२५ च्या आसपास घुटमळणारा स्ट्राईकरेट आणि आयपीएल मध्ये आत्तापर्यंत १० च्या वर इकोनॉमीने फक्त ४ विकेट्स मिळवणाऱ्या खेळाडूला इतक्या कन्सिस्टंटली जर संधी मिळत असेल तर त्याला लाडच म्हणणार की रे Happy

असो! तो चांगला खेळलेला बघायला मलापण आवडेल कारण RR आपली टीम आहे Happy

इंपॅक्ट प्लेअर बद्दल मी वाचलेली माहिती:

टॉस नंतर शेअर केलेल्या टीम लिस्ट मधे 4 इंपॅक्ट प्लेअर असतील. ज्यातून एकाला 11 मधे रीप्लेस करता येईल. ही रीप्लेसमेंट बोलिंग टीम ला बॉल संपल्यावर तर बॅटिंग टीम ला विकेट गेल्यावर / बॅटर रिटयर झाल्यावर करता येईल. हा फायदा मॅच मधे एकदाच वापरता येईल अन् तो इरीवरसिबल असेल. बोलिंग इंपॅक्ट प्लेअर चालू ओव्हर च्या बोलर ला रीप्लेस करून ओव्हर पूर्ण करू शकणार नाही, त्याला ती ओव्हर संपेपर्यंत फिल्डर म्हणून च थांबावं लागेल.

सूपर सब ही माझ्यामते एकदाच वापरता यायचा अन् तो ही पूर्ण इनिंग वापरावा लागायचा. टीम टॉस आधी जाहीर केल्याने मनासारखा टॉस रिझल्ट न आल्यास पहिल्या बॉल पासूनच सब
खेळवायला लागायचा.
आपण एकदा टॉस आधी टीम मधे लक्ष्मण ला घेतलं होतं पण पहिली बोलिंग आल्याने नेहरा ला आत आणावं लागलं, अन् लक्ष्मण पूर्ण मॅच बाहेर राहिला.

माझे प्री - टूर्नमेण्ट प्रेडिक्शन असे आहेत. तुमचे प्रेडिक्शन हि कळवा.

प्लेऑफ मध्ये नक्की पोचणार - चेन्नई, हैदराबाद, राजस्थान

चौथ्या प्लेऑफ स्पॉट साठी स्पर्धेत - गुजरात, लखनौ, दिल्ली, पंजाब

बॉटम 3 साठी चे दावेदार - कलकत्ता, मुंबई, बंगलोर

"तो चांगला खेळलेला बघायला मलापण आवडेल कारण RR आपली टीम आहे" - Happy खेळेल रे. पोटेन्शियल आहे त्याच्याकडे.

"इएसपीएन वर पन आहे असे वाटले." - आहे इएसपीएन प्लस वर.

बॉटम 3 साठी चे दावेदार - कलकत्ता, मुंबई, बंगलोर >> बंगलोर ह्या वेळी वर सरकेल असे मला वाटते. बाकीचे दोन नि दिल्ली ह्यांच्यामधे खालच्या स्थानासाठी चुरस असेल.

इंपॅक्ट प्लेअर नि टॉस नंतर दोन याद्यांमधली एक यादी वापरून संघ जाहीर करणे ह्यामूळे टॉस नि पिच हे दोन फॅक्टर एकदम कमी मह्त्वाचे ठरणार. कुठलीही टीम दोन याद्या एक बॅटींग धार्जिणी नि दुसरी बॉलिंग धार्जिणी तयार ठेवेल. पहिली बॅटींग असेल तर बॅटींङ धार्जिणी यादी वापरायची नि नंतर दुसर्‍या इनिंग मधे इंपॅक्ट प्लेयर वापरून एक मह्त्वाचा बॉलर आणून खेळवायचा. दुसरी बॅटिंग असेल तर ह्या विरुद्ध करायचे. चेन्नई पिच वर भयंकर अवलंबून असल्यामूळे त्यांच्या निकालातून उघड होईल.

मुंबई चा कोच मार्क बॉचर आहे. जयवर्धने चे काय झाले ?

बंगलोर ह्या वेळी वर सरकेल असे मला वाटते. >>>
बंगलोर ला बॉटम 3 मध्ये ठेवायचे माझं महत्वाचं कारण हेझलवूड आणि पाटीदार ला झालेल्या दुखापती आहेत.
डीके ने गेल्या वर्षी स्लोग ओव्हर मध्ये तुफान हाणामारी करून अनेक सामने त्याच्यासाठी वाचवले होते. या वर्षीही तो असा इम्पॅक्ट पाडू शकेल का या बाबतीत माझ्या मनात तरी मोठा डाऊट आहे.

मुंबई चा कोच मार्क बॉचर आहे. जयवर्धने चे काय झाले ? >>>>
जयवर्धने ला प्रमोशन मिळाले आहे. आता तो MI सगळ्या च्या ग्लोबल फ्रॅंचाईस टीम चा डायरेक्टर बनला आहे (झहीर च्या सोबत).
एका अर्थाने बाऊचर चा आता तो बॉस आहे.

पुणेकर मुकेश चौधरी दुखापतीमुळे पूर्ण सिझन बाहेर.

चेन्नई ने नागालँड कडून खेळणाऱ्या आकाश सिंग ला रिप्लेसमेंट म्हणून घेतला आहे.

>>सुपर सब एक इंनिंग संपल्यावरच वापरता यायचा

नाही.

एकदा (बहुदा लंके विरुद्ध) आपल्या बॅटर्स नी हाराकिरी केल्याने आपण पहिल्या डावातच सुपर सब वापर्ल्याचं आठवतंय

>>प्रसिध कृष्णाच्या जागी रॉयल्सनी संदीप शर्मा ला घेतलंय.

संदीप शर्मा एकेकाळी स्टार होता पण सध्यातरी त्याच्यापेक्षा कुलदीप सेन आणि सैनीला प्रेफरन्स दिला जाईल असे वाटतेय!!

माझा अंदाज:
तसेही प्रत्येक संघाच्या दोन तीन मॅच झाल्याशिवाय बांधलेले अंदाज अगदीच अंदाजपंचे असतात पण कागदावरचे संघ आणि खेळाडूंचा सध्याचा फॉर्म बघता मांडलेले अंदाज असे:

टॉप ऑफ द टेबल: राजस्थान, हैद्राबाद आणि गुजरात
मिडल ऑफ द टेबल: दिल्ली, बंगलोर, चेन्नई, लखनौ, मुंबई
बॉटम ऑफ द टेबल: पंजाब, कोलकत्ता

Pages