आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मुंबई पांड्याचे विमान जमिनीवर आणेल. कारण त्याने मुंबईबद्दल काहीतरी डायलॉग मारला आहे.>>>>>
हे काय आहे
मुंबई मधून च आलाय तो पण
मुंबई चे 2 माजी खेळाडू दोन वेगळ्या टीम चे कर्णधार बनलेत

तो पथीरणा कसला फेकी बॉलर आहे.
पळत येण्यापेक्षा जागेवर उभा राहून थ्रो करेल तरी सेम action. ह्याच्यावर काही objection नाही का घेतले?

गुजरात आज ढेपाळले हे मात्र खरंय

ह्याच्यावर काही objection नाही का घेतले? >> क्लीयर केला त्याला आय सी सी ने. ओव्हर द आर्म चा काही तरी अजून बरा नॉर्म असायला हवा.

मला टायटन्स ची दया येतेय. रविवारी टफ गेम, मग लगेच दुसर्‍या जागेवर जाऊन आजचा गेम, गुरूवारी परत पुढचा ट्फ गेम ट्रॅवल नंतर. नि तिथे जिंकले तर रवीवारी फायनल. शेवटचे किमान होम ग्राऊंड वर आहेत हि त्यातल्या त्यात आनंदाची बाब.

पांड्याने चालणारी ऑर्डर बदलायला नको होती असे मला वाटले. शंकर वरती एकदमच प्रभावी होत होता - वार आल्याने त्याला सेटल व्हायला थोडा वेळही मिळत होता. शनाका ला पेस कठीण पडेल म्हणून केलेली अ‍ॅडजस्ट्मेंट पुरेपूर नडली.

>>सगळ्या मॅचेस न्यूट्रल ठिकाणी हव्यात.

धंदा! न्यूट्रल म्हणजे रांची, पटणा, इंदूर, गोवा, तिरुअनंतपुरम, विशाखापट्टणम, कोची अशा ठिकाणी तिकिट विक्री मधून येणारं उत्पन्न कमी असेल.

धोनीनी लावली होती म्हणे स्पेशली. मेक्स सेन्स. इतर ही करतात म्हणा पण धोनीचा क्रिकेटिंग ब्रेन खुप जास्त मचुअर आहे.

हे काय आहे
मुंबई मधून च आलाय तो पण
>>>

मलाही माहीत नाही नेमके. मुंबई सपोर्टर खवळलेत त्यावर. मुंबईबद्दल काहीतरी बोलला. कोण म्हणतेय कुठल्यातरी शो मध्ये सचिनचाही अपमान केला. टीआरपी साठी स्टंटबाजी करत आहेत का कल्पना नाही. पण झालाय काहीतरी सीन.

असो. आजचा पहिला अंदाज खरा ठरला. उद्याही मुंबई जिंकायला हरकत नसावी Happy

टायटन'स च्या पॉडकास्टमधे पांड्याला विचारलेले कि कप्तान म्हणून डेब्यू सीझन करताना आय पी ल जिंकणारा तो दुसरा आहे, पहिला कोण माहित आहे का ? - त्यावर त्याने ह्म्म्म , माहित नाही, रोहित असेल कदाचित अशा स्वरुपाचे उत्तर दिले. त्यामूळे मुंबई सपोर्टर खवळलेत. हे खवळलेले महाभाग कोण ? नि त्यांनी ह्यात खवळण्यासारखे काय आहे ते मला माहित नाही. ह्या प्रश्नाचे उत्तर मलाही माहित नव्हते नि फ्रँकली माहित असण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. रोहित लाही माहित असेल कि नाही ह्याबद्दल माझ्या मनात शंका आहे.

मुंबई सपोर्टर खवळलेत त्यावर. मुंबईबद्दल काहीतरी बोलला. >>>
हे खवळलेले महाभाग कोण ? नि त्यांनी ह्यात खवळण्यासारखे काय आहे ते मला माहित नाही >>>

मुंबई सपोर्टर उखडल्याचं महत्वाचं कारण दुसरं स्टेटमेंट आहे.
हार्दिक ने मुंबई मोठे प्लेयर विकत घेतात आणि त्यांच्या जीवावर जिंकतात, या उलट चेन्नई प्लेयर बनवतात आणि म्हणून सक्सेसफुल आहेत अशा स्वरूपाची काहीतरी कमेंट मारली होती.

हार्दिक ने मुंबई मोठे प्लेयर विकत घेतात आणि त्यांच्या जीवावर जिंकतात
>>>
हो कर्रेक्ट.. स्टार प्लेअर घेतात आणि जिंकतात असे काहीगरी खोडसाळ वाक्य मी सुद्धा वाचलेले.

काल चेन्नई ने प्लान केला आणि प्रॉपर execute केला.
वेल डन. पिच स्लो होती त्यामुळे दणादण मारामारी होत नव्हती. धोनी गेम रिडींग आणि त्यानुसार प्लान करणे ह्यात मास्टर आहे. हार्दिक त्यात मागे पडला.
गुजरात ह्या सिजन मध्ये जे खेळलेत त्यामुळे जरा वाईट वाटले.
त्यांच्या जागी लखनऊ असते तर इतके नसते वाटले.
असो गुजरात ला अजून एक चान्स आहेच.
फायनल CSK vs मुंबई झाली तरच CSK सोडून इतर कोणी जिंकण्याचे चान्स.
अन्यथा चेन्नई प्रबळ असे आता तरी वाटतंय.

राशीद खान एक जबरदस्त प्लेयर आहे.
बॉलिंग बॅटिंग दोन्हीत समोरच्या टीमला टेन्शन देतो.

चेन्नई ची १६ सीझन मधे दहावी फायनल... अन् पुणे सुपर जायंट्स ची पकडून अकरावी...

Take a bow सुपर किंग्ज कोअर टीम...

जली ना तेरी...
नवीन Submitted by अँकी नं.१ on 24 May, 2023 - 09:39
>>

माझी?
पांड्याचे स्टेटमेंट ऐकून?
छे. मला तर माहीतही नाही नेमके काय सीन आहे. टीआरपी स्टंट असतात. टशन तयार करायला असे मी समजतो.

माझ्या वाचनात आलेली पोस्ट..
>>>>>

फोटोतले ४ पैकी ३ जण MI ला रिप्रेजेंट केलेले आहेत.
हार्दिक आणि क्रुणाल कितीही मोठे क्रिकेटर झाले आणि देवाने येऊन मला सांगितल की यांचा रिस्पेक्ट कर तरी ते आपल्याच्याने व्हायच नाही.
क्रिकेट मध्ये माज करणारे लोक मला अजिबात आवडत नाही, आणि या दोघांईतका माज संपूर्ण क्रिकेट विश्वात कोणाला नाहीये.
करण जौहरच्या शो मध्ये विराट की सचिन ह्या प्रश्नावर हार्दिक ने दिलेल उत्तर त्याच्यादृष्टिने योग्य असेल पण त्याचा लहेजा सचिनचा अपमान करनारा होता आणि हा त्याच्याच IPL फ्रैंचाइज़ मध्ये करियर करत होता.
आता MI स्टार प्लेयर घेऊन जिंकते असा हा बोलला पण याला आणि याच्या भावाला स्टार बनवनारे कोण होते?
हार्दिकच समजा ठिके टैलेंटेड आहे पण क्रुणालला कसला माज? त्याच्या पेक्षा किती तरी पट भारी प्लेयर आहे देशात!
मला हा गेम आवडतो कारण याला जेंटलमेंस गेम बोलतात, आणि हे असले लोक हा गेम छपरी बनवत आहेत.

फायनल CSK vs मुंबई झाली तरच CSK सोडून इतर कोणी जिंकण्याचे चान्स.>>>>>>
मी मुंबई चा फॅन आहे
काल चेन्नई ने गुजरात ला एकदम मस्त clinical पद्धतीने हरवलंय
कुतूहल वाटतंय की मुंबई च्या टीम मध्ये असं काय वाटतंय तुम्हाला की चेन्नई ला टफ देतील जर काल सारखे पिच असेल तर

बॅटिंग बलस्थान आहे मान्य पण मुख्य करून ते वानखेडे वर पाटा पिच वर
रोहित पॉवरप्ले मध्ये छान खेळत असला कधी कधी तरी चांगले स्पिनर आले 6 ओव्हर नंतर की लगेच आऊट होतोय

ईशान आणि सूर्या मात्र छान खेळताय
ग्रीन ला 3 नंबर वर आणला तर तो पण छान खेळेल अस वाटतंय
टीम डेविड पण थोडे फार फिनिशर चे काम करतोय
निहाल किंवा विष्णू ने आज eliminator स्टेज ला काहीतरी भारी केले तर लक्षात राहील लांबपर्यंत
तिलक अजून पण injured वाटतोय

पण बॉलर्स ची बोंब आहे
एक पियुष चावला सोडला तर

बघू आज काय होतंय
लखनऊ कडे तर पॉवर हिटर्स भरलेत
मायर्स, डी कॉक, स्टोईनीस, पूरन
चालला तर बडोनी

*पण बॉलर्स ची बोंब आहे* खरंच मुंबई ह्या गोलंदाजीच्या बळावर (किंवा, कमतरतेवर) विसंबून प्ले ऑफ पर्यंत आली हेच आश्चर्य ! हा चमत्कार पुढेही चालूच राहू शकतो, हेंही आहेच !!! Wink

कुतूहल वाटतंय की मुंबई च्या टीम मध्ये असं काय वाटतंय तुम्हाला की चेन्नई ला टफ देतील जर काल सारखे पिच असेल तर
>>>>

रेप्युटेशन Happy

आणि फायनल अहमदाबादच्या पाटावर आहे.

मुंबईची गोलंदाजी कमजोर असली तरी पुर्ण वीस ओवर तुडवले जात नाहीत. गेमच्या एका फेजला शक्यतो सुररुवातीला तरी ते स्लो डाऊन करतात समोरच्यांना

*मुंबई च्या टीम मध्ये असं काय वाटतंय तुम्हाला * -

*रेप्युटेशन Wink *. ...... व प्रचंड गुडविल. !! Wink
पण सिरीयसली,
१) टी 20 हा मुख्यत्वे फलंदाजीचा फॉरमॅट आहे व मजबूत फलंदाजी असलेल्या संघाचं प्रतिस्पर्धी म्हणून पारडं जडच असतं:
2) मुंबईच्या कांहीं गोलंदाजांनी स्पर्धेत किमान अपेक्षेपेक्षाही खराब गोलंदाजी केली असली, तरीही प्ले ऑफ सामन्यांत त्यात सुधारणाच होणं निश्चितपणे अपेक्षित आहे;
3) सचिनची प्रत्याक्ष हजेरी, मार्गदर्शन व प्रेरणा याचा मुंबईला असलेला अमूल्य आधार;

4) कर्णधार म्हणून रोहितला खेळाडूंकडून मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद .

बरं वाटलं मुंबई चे इतके positive पॉईंट्स वाचून Bw
ह्या वेळेला जिंकले ट्रॉफी तर खरंच मजा येईल खूप Lol Lol

Pages