Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छे हो
छे हो
ते माझे वैयक्तिक अंदाज होते.
रूनमेश तुमचे अंदाज योग्य ठरत होते. परवा मुंबईचं जिंकणार हे आधीच मीटिंग मध्ये ठरल होत. अशा मीटिंग ला चहा पुरवणारा माझ्या ओळखीचा आहे. पण झालं काय MI जिंकणार म्हणून बारा हजार कोटीची बोली लागली होती तर GT साठी फ्कत 750ची. मग अंबनितला व्यावसायिक जागा झाला. आणि पहिली इनिंग संपली की खेळाडूंना सूचना गेल्या. रोहित ला 10 कोटी तर बकिना 1-2 क्रोड जास्तीचे देण्याचं कबूल केलं. पण रोहित काही खुश नव्हता. त्याने spsht शब्दात नकार दिला आणि गेल्या गेल्या एक सणसणीत चौकार ठोकून आपण फक्त दहा कोटी ला विकणार नाही असा संदेश त्याने दिला. मग अंबनिनी अजून 10 ची ऑफर कानात बसवलेल्या मायक्रोफोन द्वारे दिली. मग झाला तो ही आऊट. आत्ता शर्माचं विकला गेला म्हंटल्यावर वढेरा, विनोद, ग्रीन सारख्यांनीही घेतले हात धुवून.
पण ह्यात फक्त टिळक मात्र प्रामाणिक निघाला, तो बिचारा एकटाच टीम साठी खेळत होता. अंबानिनी त्यालाही काही करोड वाढवून देण्याचं कबूल केलं तरीही त्याने नकार दिला. मॅच जिंकवून आपले नुकसान करतो का काय ह्या tention मध्ये अंबानी होते. शेवटी त्यांनी जुन्या हिंदी सिनेमातली युक्ती वापरली अशी गुप्त बातमी आहे. म्हंजे त्याच्या आई वडिलांना kidnaap करून त्याचे चित्रीकरण करून umpire chya whatapp वर पाठवून दिलं आणि ओवर्स chya दरम्यान त्याला काय द्यायचा तो संदेश दिला. ही गुप्त माहिती आकाश अंबानींच्या ड्रायव्हर ने दिली. त्यामुळे रूंमेश, मायबोलीवर fkt तुम्ही म्हणजे तुम्हीच क्रिकेटचे जाणकार आहात हा माझा समझ अजून मजबूत झाला.
री
वर देवांना वाटतंय खाली त्यांच्या इच्छेनुसार सगळं चाललंय ! कसं समजावणार त्यांना, स्वर्गात काय व्हायचं तेच उलट आता खालून फिक्सिंग होतंय !! नारायण...नारायण.
भाउ छान व्यंगचित्रं
भाउ छान व्यंगचित्रं
Submitted by रात्रीचे चांदणे
Submitted by रात्रीचे चांदणे on 28 May, 2023 - 09:23
छान पोस्ट आहे.
पण प्लेऑफपासून पुढे काही स्क्रिप्ट लिहायची गरज नसावी. त्यांना टीआरपी तसाही असतो. आधीच्या सामन्यात स्पर्धा रोचक करायला काही सामन्यांचे क्लायमॅक्स क्लोज फिनिशला जातील हे बघतात. ते स्कूल लेव्हल क्रिकेट ओळखता येते. तसेच शेवटी पॉईंट टेबल रोचक बनवायला काही तळाचे संघ वरच्या संघाना हरवून स्पर्धा रोचक करतात. यापलीकडे जिथे नॉर्मल सामने होतात तिथली उदाहरणे घेऊन मग लोकं आयपीएलचे समर्थन करतात. हे बघा यात कुठे स्क्रिप्टींग दिसली म्हणत अंगावर येतात. याने मी व्यथित होत नाही. याची मला सवय आहे, कारण हे स्वाभाविक आहे
भाऊ व्यंगचित्र
बाकी ज्यांना क्रिकेटमध्ये
बाकी ज्यांना क्रिकेटमध्ये फिक्सिंग नसते असे वाटते त्यांनी अझर जडेजा क्रोनिए पाकिस्तानचा अख्खा संघ ईत्यादी गूगल करा....
हे उघड यायच्या आधीही असे काही नसते असे म्हणणारे भाबडे क्रिकेटप्रेमी होतेच. पण अझर जडेजा पकडले जायच्या आधीही त्यांना आमच्याकडे फिक्सर संबोधले जायचे. ईनफॅक्ट तेव्हा मी सुद्धा असे काही नसते म्हणून डोळे मिटून दूध प्यायचो जेणेकरून माझा आनंद शाबूत राहील. त्यानंतर मात्र जी फसवणूक झाल्याची भावना झाली ते आजही मला त्या फिक्सर खेळाडूंचे चेहरे बघवत नाही. आता नाही जमत तसे डोळे मिटून दूध पिणे..
मंडळी तुम्हालाही तीच म्हण
मंडळी तुम्हालाही तीच म्हण आठवली का जी मला आठवली पटकन.
“मंडळी तुम्हालाही तीच म्हण
“मंडळी तुम्हालाही तीच म्हण आठवली का जी मला आठवली पटकन.” - धागा क्रिकेटचा आहे, पण त्यातून अभ्यास भाषेचा होतो
रात्रीचे चांदणे -
मंडळी तुम्हालाही तीच म्हण
मंडळी तुम्हालाही तीच म्हण आठवली का जी मला आठवली पटकन. >>>
जोरदार पाऊस पडतोय
जोरदार पाऊस पडतोय
आज शुभमन गिलला रोखायला धोनीकडे काय डावपेच आहेत का याचीच सर्वत्र चर्चा रंगलीय
कारण गिलने आधी कोहलीच्या संघाला, मग शर्माच्या संघाला एकहाती बाहेर काढलेय.
आज धोनीसमोर हे तो करू शकला तर त्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय आयपीएल ठरेल ही...
*गिलला रोखायला धोनीकडे काय
*गिलला रोखायला धोनीकडे काय डावपेच आहेत का याचीच सर्वत्र चर्चा रंगलीय* - कितीही अनुभवी, पट्टीचा फलंदाज असला तरी तो कधीही बाद होवू शकतो. तसं गिलच्या बाबतीत आज झालंच, तर धोनीच्या डावपेचांनाच त्याचं सर्व श्रेय द्यायला तज्ञांची चढाओढच लागेल !
मॅच 20 षटकांचीच होणार असं म्हणताहेत. रंगतदार होईल ही रास्त अपेक्षा.
मॅच 20 षटकांचीच होणार असं
मॅच 20 षटकांचीच होणार असं म्हणताहेत. >> १८ पेक्षा कमी षटके होणार असतील तर ते दोन्ही संघांसाठी अन्यायाचे ठरेल.
धोनीच्या डावपेचांनाच त्याचं सर्व श्रेय द्यायला तज्ञांची चढाओढच लागेल ! >> सो सोनार कि एक लोहार कि ! शास्त्रीच्या मते चहर वि गिल असा सामना असेल. चहर सुरूवातीच्या ओव्हर्स मधे प्रीसाईज नि धोकादायक असतो . त्याच बरोबर गिल फुल फ्लो मधे आहे. साहा रेडार खाली राहून इनिंग खेळण्यामधे तरबेज आहे नि गिल कसा खेळेल हे बरेचसे साहा काय करेल ह्यावर ठरेल असे मला वाटते . गिल वर फोकस करताना बाकीची टायटन्स टीम पण अगदीच कच्चा लिंबू नाही ह्याकडे दुर्लक्ष होय नये.
चेन्नई गुजरात मागच्या
चेन्नई गुजरात मागच्या सामन्यात धोनीची फिल्डप्लेसिंगचे एकूण एक जण कौतुक करत होता.
मी सामना पाहिला नाही पण ऑफिसमध्ये चर्चा ऐकली कॉमेंटरी वाचली.
सगळेच कसे धोनीला विकले गेलेत समजत नाही
गावस्कर काय त्याचा ऑटोग्राफ घेतो. अरिजित सिंग काय पाया पडतो.
सामना कुठेही असो सारे स्टेडियम पिवळ्या रंगात रंगलेले दिसते.
जसे एकेकाळी सचिन सचिनचा गजर व्हायचा तसे धोनी धोनीचा होतो.
धोनी एक चौकार षटकार मारतो काय आणि पब्लिक निसते चेकाळते..
हा आदर हे प्रेम केवळ मार्केटींगने कमावता येत नाही. त्यासाठी तसेच कर्तुत्व लागते जे धोनीने आयुष्यभराच्या क्रिकेट कारकिर्दीत कमावलेय.
आता जसे भारतीयांच्या क्रिकेट प्रेमामुळे ईतर खेळांवर काहीसा अन्याय होतो तसेच क्रिकेटप्रेमींच्या धोनीप्रेमामुळे ईतर खेळाडूंवर काहीसा अन्याय होणे स्वाभाविक आहे. त्याला माझा नाईलाज आहे. पण त्यामुळे जसे क्रिकेटप्रेम कमी होत नाही तसे धोनीप्रेमही का कमी करावे
भाउ, धन्यवाद. तिन्ही चित्रे
भाउ, धन्यवाद. तिन्ही चित्रे आवडली.
जागतिक अर्थकारण - टी २० नि जी २०! नारदमुनि! गलाला मासा लागत नाही!
“मी सामना पाहिला नाही पण
“मी सामना पाहिला नाही पण ऑफिसमध्ये चर्चा ऐकली कॉमेंटरी वाचली.” - “लेखक असावा तर शेक्सपियरसारखा. मी काही त्याची नाटकं पाहिली नाहीत. अमेरिकेच्या मातीच्या कणाकणात शेक्सपियर आहे“
अख्खे आयुष्य धोनी बघण्यात
अख्खे आयुष्य धोनी बघण्यात गेलेय
असो, ज्या आयपीएलमध्ये फेअर रिझल्ट लागायला पहिल्या दुसर्या नंबरच्या संघांना प्लेऑफमध्ये एक्स्ट्रा चान्स दिला जातो तिथे फायनलला रिझर्व्ह डे नाही हे पचायला जड आहे.
उद्या रिझर्व्ह डे आहे रे. आज
उद्या रिझर्व्ह डे आहे रे. आज मॅच झाली नाही तर उद्या खेळणार.
ओके आहे, आता पुन्हा चेक केले
ओके आहे, आता पुन्हा चेक केले
नालायकांनी आधी नाहीये आणि गुजरातला ट्रॉफी देणार लिहिलेले
जीवात जीव आला
आता पाच दहा ओवर होण्यापेक्षा उद्याच फुल्ल होऊ द्या
*आता पाच दहा ओवर होण्यापेक्षा
*आता पाच दहा ओवर होण्यापेक्षा उद्याच फुल्ल होऊ द्या* +१
नालायकांनी आधी नाहीये आणि
नालायकांनी आधी नाहीये आणि गुजरातला ट्रॉफी देणार लिहिलेले >>>>>> द फॅक्ट की हे खरं वाटलं हेच मुळात विनोदी आहे.
पण ठीक आहे, माणूस शिकत असतो, त्याला सगळीच माहिती असेल असं नाही.
पण जरा तोंड गप्प करुन इतर लोकं काय म्हणत आहेत ते वाचायला काय हरकत आहे? सारखं आपलं मनात जे काही उलट सुलट येतं ते स्वगत इथे मांडत राहायचं, कशाला?
You don’t have to know everything and don’t have to react to everything.
सारखं आपलं मनात जे काही उलट
सारखं आपलं मनात जे काही उलट सुलट येतं ते स्वगत इथे मांडत राहायचं, कशाला?
>>
बुवा, पूर्णवेळ हेच तर चालू असतं, बाफ कुठलाही असो (आणि नसालाच तर नवीन उघडायचा)
Womp womp
Womp womp
*त्यामुळे जसे क्रिकेटप्रेम
*त्यामुळे जसे क्रिकेटप्रेम कमी होत नाही तसे धोनीप्रेमही का कमी करावे* - धोनिबद्दल आत्यंतिक आदर व प्रेम असुनही इतका ' हाईप ' अयोग्य आहे, इतकंच ! बघा गावसकरही काय म्हणतात ते -
* गावसकर यांनी इंडिया टुडेला सांगितले, “रोहितला त्याच्या हुशारीचे व डावपेचांचे पुरेसे श्रेय मिळत नाही. .....
गावसकर पुढे म्हणाले की, हेच चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने केले असते तर लोकांनी त्याला डोक्यावर घेतले असते. जर हा सीएसकेचा संघ असता आणि धोनी कर्णधार असता तर प्रत्येकाने ‘धोनीने निकोलस पूरनला बाद करण्याचा कट रचला’ असे म्हटले असते. मोठ्या प्रमाणात हेच घडते. थोडासा हाईप देखील आहे, काही वेळा गोष्टी कामी येतात.”
“मधवालच नाही तर नेहल वढेराला त्यांच्या डावात एक प्रभावशाली खेळाडू म्हणून सिद्ध करण्यातही रोहितचा वाटा आहे. *
मुंग्यां मेरुपर्वत तर नाही ना
मुंग्यां मेरुपर्वत तर नाही ना गिळलानं, समुद्रानं वडवानल तर नाही ना गिळलानं . आज चक्क भाऊ पण ?
अगदी खरे आहे भाऊ
अगदी खरे आहे भाऊ
जसे धोनीला त्याच्या कप्तानी डावपेचांचे श्रेय मिळते तसे ते रोहीत शर्माला मिळत नाही.
दोघांनी मिंळून नऊ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत ते काही ऊगाच नाही.
मी सुद्धा गावस्करप्रमाणे या दोघांचा पंखा आहे
गिल चा हलवा कॅच सोडला चहार ने
गिल चा हलवा कॅच सोडला चहार ने.
मी सुद्धा गावस्करप्रमाणे या
मी सुद्धा गावस्करप्रमाणे या दोघांचा पंखा आहे
>>
हे तर आम्हाला माहितीच नव्हतं...
(No subject)
काय कूल स्टंपिंग होते ते.
काय कूल स्टंपिंग होते ते. बॉल वळतोय का जडेजा इफेक्ट होता ?
गिलचं टायमिंग, प्लेसमेंट कसलं
गिलचं टायमिंग, प्लेसमेंट कसलं ‘मॅजेस्टिक’ आहे!! कमाल!!
धोनीचं ग्लोव्हवर्क (गिल स्टंपिंग) - लाइटनिंग क्विक!
“ बॉल वळतोय का जडेजा इफेक्ट
“ बॉल वळतोय का जडेजा इफेक्ट होता ?” - बॉल ग्रिप पण होतोय आणि वळतोय. दोन्ही टीम्सकडे चांगले स्पिनर्स आहेत. ड्यू नसेल तर इंटरेस्टिंग होईल मॅच.
Pages