Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कालची स्काय ची बॅटिंग काय
कालची स्काय ची बॅटिंग काय भन्नाट होती! >> काल ? वर्षभर तो तसा खेळतोय मधला गोल्डन डक वाला काळ सोडला तर. अॅबे च्या दहा पावले पुढे. नुसती मनगटी नजाकत नि टायमिंग. जॉश लिटल काल केवळ रडायचा बाकी होता
बुवा मला वाटते दहा टीम झाल्यामूळे नि यंदा विशेषतः बाहेरचे काही प्लेयर्स इंजरीमूळे नसल्यामूळे टीम बर्यापैकी बॅलंस्ड झाल्या आहेत. परत इंपॅक्ट प्लेयर मूळे बॅटींग लाईन वाढली आहे. मी मधे मुंबई इंडियन्स च्या भारताबाहेरच्या टीं ला फॉलो करत होतो. तिथे जयवरधनेची मुलाखत होतॉ त्यात त्याने त्यांनी एका एका विशिष्ट स्किल्सेट साठी कसे स्पेशलाईस्ड ट्रेंनिंग डेव्हलप केले आहे ह्याबद्दल सांगितले होते. इथे बेसबॉल मधे पॉवर हिटीम्ग करण्यासाठी कसे करतात त्या प्रकारे. सर्वच टीम्स हे करत असणार. ह्याचा एकत्र परीणाम म्हणून मॅचेस क्लोज होत आहेत. (आता मिडास टच झालेल्या चेन्नई नि मुंबई सोडून बाकीच्या टीम्स फिक्सिंग करून जिंकतात असे काही जण सोशल मिडियावर बरळत असतात त्याकडे आपण दुर्लक्ष करूया)
इंपॅक्ट प्लेयर रूलमुळे
इंपॅक्ट प्लेयर रूलमुळे स्पेशलिस्ट बॉलर्सचा भाव नक्कीच वधारलाय. पूर्वी त्यांच्या लिमिटेड बॅटींग अॅबिलिटीमुळे जे लायेबिलिटी ठरायचे तेच आता मॅचविनर्स ठरतायत.
“ काकाजी त्या वरच्या ह्यांना
“ काकाजी त्या वरच्या ह्यांना भेटवा कधी.” - तसं झालं तर तो काकाजींचा गधेपणा होईल ना
बरी आठवण करुन दिलीत फा, असामी
बरी आठवण करुन दिलीत फा, असामी. आता हायलाईट्स बघतो.
सुर्या अत्यंत डेंजर माणूस! सगळे रूल मोडित काढतो तो.
एरवी एका साईडला फिल्ड सेट करुन मग बरोबर त्या साईडला कॅच जाईल अशी बॉलिंग करतात. भौ डायरेक आउट्साईड ऑफचे बॉल चक्क लेग्साईड ला सिक्स मारतो! कुछभी टॅलेंट!!!
असामी, ह्या स्पेशल ट्रेनिंग बद्दल नव्हतं माहित पण मला वाटतं सगळ्याच टीम गडगंज श्रीमंत आहेत आणि खास कोच लावून असे ट्रेनिंग सगळेच करत असतील असं वाटतं. मी टॅलेंट पूल खुप रिफाईन झालाय त्याबद्दल म्हणत होतो. बेसिकली ऑक्शनलाच मला वाटतं खुप तगडं टॅलेंट उपलब्ध आहे आजकाल आय पि एल च्या डिमान्ड मुळे.
गधेपणा
हे कुठल्या प्रांतातलं मराठी फेफ? पहिल्यांदाच एकलं.
मला वाटतं सगळ्याच टीम गडगंज
मला वाटतं सगळ्याच टीम गडगंज श्रीमंत आहेत आणि खास कोच लावून असे ट्रेनिंग सगळेच करत असतील असं वाटतं. >> अर्थात, मी फक्त एक उदाहरण देत होतो जे मी ऐक्ले होते ते. गेल्या वर्षी लिव्हिंग्स्टन ने सांगीतले होते कि त्याने गॉल्फ प्रॅक्टिस केली होती समोर हिट करता यावे म्हणून. त्यामूळे असे हॉर्सेस फॉर द कोर्सेस बरेच दिसत आहेत.
“ हे कुठल्या प्रांतातलं मराठी
“ हे कुठल्या प्रांतातलं मराठी फेफ?” - इंदौरी
“ हॉर्सेस फॉर द कोर्सेस बरेच दिसत आहेत.” - खरंय. नविन स्पेशलायझेशन्स झाले आहेत टी-२० मुळे. टेस्ट ओपनर म्हणून जसं पहिला तास खेळून काढण्याची प्रॅक्टीस करणारे आहेत/होते, तसे आता टी-२० मधे मॅचच्या ठराविक ओव्हर्समधे, एखाद्या सिच्युएशनमधे लागणार्या बॅटींग/बॉलिंगची स्किल्स घोटवणारे, व्हिजुअलाईझ करणारे प्लेयर्स आणि ते घोटवून घेणारे कोचेस आहेत असं वाचलंय/ऐकलंय.
क्लोज मॅचेसमध्येही मजेशीर
क्लोज मॅचेसमध्येही मजेशीर प्रकार दिसतात. कधी चार ओवर ६० मारले जातात तर कधी विकेट हातात असून ४ ओवर २५ शेवटच्या बॉलला जातात आणि चक्क हरतातही. गोलंदाजही अश्या सिच्युएशनला कशी गोलंदाजी टाकायची याचे प्रशिक्षण घेत असतील. १५ चा रनरेट हवा असेल तर दे फुलटॉस, दे हाफ पीच पण तेच बॉल टू बॉल असेल तर दे यॉर्कर ठिकाणेपे.. प्रॅक्टीस आणि स्ट्रॅटेजीशिवाय हे शक्यही नाही
जोक्स द अपार्ट
काही मॅचेस मात्र खरेच मस्त आणि जेन्युईन होतात. त्यांच्यामुळेच मजा कायम आहे आयपीएलची !
काही मॅचेस मात्र खरेच मस्त
काही मॅचेस मात्र खरेच मस्त आणि जेन्युईन होतात
>>
हे कुठे कळतं म्हणे???
>>हे कुठे कळतं म्हणे???
>>हे कुठे कळतं म्हणे???
मनाचे खेळ रे!!
धोनी आणि शर्माची भलामण करण्यासाठी काढून ठेवलेली पळवाट आहे ती!!
बाकी इतक्या प्रदीर्घ टूर्नामेंटमध्ये काही सामने क्लोज होणार, काही एकतर्फी होणार, काहीमध्ये बॅट्समन कुरघोडी करणार तर काहीत बॉलर ची सरशी होणार.... वरती कुणीतरी म्हंटलय त्याप्रमाणे इतक्या मोठ्या स्पर्धेत सातत्य टिकवणे अवघड त्यामुळे आज धुरळा उडवलेला प्लेयर उद्या माती खाऊच शकतो!!
त्याशिवाय आजकाल खेळात इतके ॲनालॅटिक्स आलय की आपल्याला एखाद्या परिस्थितीत यॉर्कर प्रभावी वाटत असेल पण एखाद्या मैदानावर एखाद्या खेळाडूविरुद्ध शॉर्टपीच काम करत असेल आणि तशी स्ट्रॅटेजी ठरली असेल तर आपल्याला प्रेक्षक म्हणून त्यात वावगे वाटू शकते पण ते तसे असेलच असे नाही.
प्रेक्षक म्हणून आपण जास्त प्रगल्भ होण्याची गरज आहे
धोनी आणि शर्माची भलामण
धोनी आणि शर्माची भलामण करण्यासाठी
>>>
छे त्यांच्या मॅचेसही असतात की स्क्रिप्टेड
गेल्याच्या गेल्यावेळी मुंबै जवळपास बाहेरच होती तेव्हा शेवटचे दोन सामने किती अचाट पद्धतीने आणि मोठ्या विक्रमी फरकाने जिंकले होते. आठवतेय ना मला तेव्हाही त्यावर ताशेरे ओढलेलेच
एक मजेशीर स्टॅटः
एक मजेशीर स्टॅटः
आयपीएल मध्ये भूवी ३४ चेसेस मध्ये बॅटींग ला आलाय; आणि ३४ही वेळा त्याची टीम हरलीये!
>>३४ही वेळा त्याची टीम हरलीये
>>३४ही वेळा त्याची टीम हरलीये!
बॅटींगच्या वेळी त्याला आता डोळे झाकून सब करुन टाकावे हैद्राबादने
>>३४ही वेळा त्याची टीम हरलीये
डबल पोस्ट
प्रेक्षक म्हणून आपण जास्त
प्रेक्षक म्हणून आपण जास्त प्रगल्भ होण्याची गरज आहे Happy
>>>
+७८६
पट्ट्यात मारायला दिलेले शॉर्टपिच बॉल आणि बॅटसमनला फॉलो करत अडचणीत आणायला टाकलेले शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, उसळणारे बाऊन्सर यातला फरक समजायला हवा. तो बहुतेकांना समजत नाही वा काहींना समजूनही लक्षात घ्यायचा नसतो म्हणून यांचे दुकान चालते
फुलटॉसचे तर एक मस्त मिळालेय.यॉर्कर चुकला फुलटॉस झाला
तो ही ईतका चुकवायचा की कंबरेवर जाऊन नो बॉल झाला...
जाऊ दे ना, सर! ना समझे वो...
जाऊ दे ना, सर!
ना समझे वो...
केकू, परवा तुम्ही कोहली च्या
केकू, परवा तुम्ही कोहली च्या फाईनबद्दल लिहिले होते. तुम्ही लिहिलेली माहिती हा नवा प्रकार नसून जनरल ट्रेंड आहे की खेळाडू त्यांछ्या खिसातून पैसे देत नाहित. फाईन - प्लेयर नि संघांचा दोन्ही टूर्नामेंट ऑर्गनाईझर्स ना शेवटी फ्रँचाईजी ओनर्सकडून मिळतो. फ्रँचाईजी ओनर्स मग हे ठरवू शकतात खेळाडूंकडे तो पास करायचा कि नाहि ते बहुतेक वेळा तो केला जात नाही किंवा नॉमिनल पास होतो.
तो बहुतेकांना समजत नाही वा काहींना समजूनही लक्षात घ्यायचा नसतो म्हणून यांचे दुकान चालते >> तुला कळलय नीट, मग झालं. नि इतरांना कळून घेण्याची इच्छा नाही हे कळलय ना ? (म्हणजे इतक्या वर्षांच्या पिपाणीनंतर कळण्याएव्हढी अक्कल त्यांच्यामधे नाही हे तुझ्यासारख्या प्रभुतीच्या तरी किमान लक्षात यायला हवे होते) मग दर वेळी तेच ते तुणतुणे वाजवून कशाला विरजण लावत असतोस ? मग काय आनंद मिळतो तुला अशा प्रकारांतून देव जाणे.
अरे काय! माझ्यामते सॅमसनची
अरे काय! माझ्यामते सॅमसनची चूक होती. जैस्वाल पोहोचला असता पण सॅमसनचा अंदाज टोटली चुकला. पुढे येऊन नंतर त्याला थांब म्हणाला. रन शक्यच नव्हता.
जैस्वाल रन आउट.
जैस्वाल रन आउट.
संजू ची चूक होती असं दिसतंय.
आज होल्डर नाही... भारी पडणार
आज होल्डर नाही... भारी पडणार राजस्थान ला.
इथल्या सर्वाञ्चा लाडका रियान
इथल्या सर्वाञ्चा लाडका रियान पराग इम्पेक्ट न करता तंबूत परत!
पराग - का????
पराग - का????
स्वरूप, I see your point. एखाद्या गुणी खेळाडूने इतक्या संधी सातत्याने वाया घालवणं फ्रस्ट्रेटिंग आहे.
पराग वशिल्याचा तट्टू आहे
पराग वशिल्याचा तट्टू आहे
रॉयल्स १०० तरी क्रॉस करणार का
रॉयल्स १०० तरी क्रॉस करणार का?
आता रिप्ले बघितला तर असं
आता रिप्ले बघितला तर असं वाटतय फिल्डरनी जबरी आडवला आणि तेव्हा सॅमसनला कळलं की रन शक्य नाही. सो हार्ड लक म्हणेन, चूक नाही म्हणता यायची.
बाकी कैच्या कै हाल चालवले आहेत. खत्तरनाक बॉलिग रशिद आणि नूर. महाडेंजर माणूस आहे रशिद आणि आता नूर पण त्याच वळणाला जात आहे. परागचा शेवटचा सीजन ठरेल बहुतेक हा. कोणी बायर पण मिळेल की नाही माहित नाही.
अश्विनला टाकलेला रशिदचा बॉल काय जबरी होता! स्लो मोशन मध्ये सुद्धा काय फिरत होता राव.
अर्थात, मी फक्त एक उदाहरण देत होतो जे मी ऐक्ले होते ते. >>>>>> बरोबर आहे असामी. मुळचे टॅलेंट आणि ह्या फ्रँचाईजेस कडे असलेल्या प्रचंड पैश्यामुळे ते लोकं एकदम टेलर्ड ट्रेनिंङ ऑफर करत आहेत त्यामुळे लेवल खुपच अप झाली आहे. त्या उपर फाईन लागला की खेळाडूंचे पैसे भरणे, दुखापत झाली तरी त्यांची सॅलरी त्यांना देणे. परवा ड्रे रसलची मुलाखत बघत होतो. तो म्हणाला त्याला नी इश्युज झाले तेव्हा के के आर नी स्वतः पैसे खर्च करुन त्यावर उपचार केले. तो म्हणाला माझ्या देशानी सुद्धा येवढा कनसर्न दाखवला नाही कधी. अर्थात त्यात के के आरचा फायदा आहेच तरी कौतूकास्पद आहे.
एकदम नवशिक्यांसारखे खेळले
एकदम नवशिक्यांसारखे खेळले आहेत रॉयल्स. बटलर एकदमच गंडलाय. एका अर्थाने हि चांगली गोष्ट आहे. प्लेऑफ्स मधे पेटला कि संपले सगळे
तो म्हणाला माझ्या देशानी
तो म्हणाला माझ्या देशानी सुद्धा येवढा कनसर्न दाखवला नाही कधी. अर्थात त्यात के के आरचा फायदा आहेच तरी कौतूकास्पद आहे. >> ते लक्षात ठेवून सध्या काही सेना प्लेयर्स बरोबर आय्पील फ्रँचाईजी ओनर्स ची बोलणी चालू आहेत एकून वर्षभरासाठी साईन करण्याबद्दल. फ्रिंग प्लेयर्स साठी जबरदस्त बोनस आहे हा नि आयसीसी वर टेंशन येणार आहे. एकूणच सॉकर लीग सारखा प्रकार होईल काहि वर्षांमधे असे दिसतेय.
सेना प्लेयर? मला कळलं नाही.
सेना प्लेयर? मला कळलं नाही.
आय सि सि वर टेन्शन बद्दल +१. खरं तर इंडिविजुअल देशांच्या क्रिकेट बॉडीजला पण टेन्शन यायला पाहिजे. तुम्ही रुल टाकू शकता की देशासाठी खेळायला प्राधान्य दिलं पाहिजे पण त्यांनी स्वतःच्या सुविधा वगैरे सुधरवल्या पाहिजेत. प्लेयरांची काळजी, भत्ते ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
>>सेना प्लेयर? मला कळलं नाही.
>>सेना प्लेयर? मला कळलं नाही.
SENA: South Africa, England, New Zealand, Australia
ओह ओके. थँक्स मयुफोर्यु.
ओह ओके. थँक्स मयुफोर्यु.
"एकदम नवशिक्यांसारखे खेळले
"एकदम नवशिक्यांसारखे खेळले आहेत रॉयल्स." - टोटली! काहीच्या काही बॅटिंग होती. बॉलर्सनी निदान एकतर्फी होणार नाही इतपत बॉलिंग करावी अशी अपेक्षा आहे. पण गुजराथ सॉलिड तगडी टीम आहे आणि स्कोअरबोर्डचं काहीच प्रेशर नाहीये.
Pages