Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अरे मग तो चेन्नई मधे जाईल नि
अरे मग तो चेन्नई मधे जाईल नि ... वगैरे वगैरे Wink>>>>
द्रविडच्या मार्गदर्शनाखाली
द्रविडच्या मार्गदर्शनाखाली ज्युनिअर खेळाडू तयार होतात असे आपण एकीकडे बोलतो.
पण तेच धोनीबाबत म्हटले तर असे काही नसते म्हणत टोमणे सुरू होतात.
डबल स्टॅंडर्ड?
द्रविडच्या मार्गदर्शनाखाली
द्रविडच्या मार्गदर्शनाखाली ज्युनिअर खेळाडू तयार होतात असे आपण एकीकडे बोलतो.
पण तेच धोनीबाबत म्हटले तर असे काही नसते म्हणत टोमणे सुरू होतात.
>>>
द्रविड प्रॉपर हेड कोच च्या पोझिशन वर होता तेंव्हा त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू तयार झाले. So, the credit goes to him...
चेन्नई सुपर किंग्ज चा कोचिंग स्टाफ :
हेड कोच : स्टीफन फ्लेमिंग
बॅटिंग कोच : मायकल हसी
बोलिंग कोच : ड्वेन ब्रावो
फिल्डिंग कोच : राजीव कुमार
यांच्या मार्गदरशनाखाली ज्युनिअर खेळाडू तयार झाले. क्रेडिट यांना जायला पाहिजे.
ते व्यक्तिपूजा कारणास्तव कॅप्टन ला देणं म्हणजे यांच्यावर अन्याय...
सपोर्ट स्टाफ बदलत राहतो
सपोर्ट स्टाफ बदलत राहतो
धोनी कॉन्स्टंट !
बाकी द्रविडही काही रजनीकांत नसावा जे एकटा प्रत्येकाची पर्सनल ट्यूशन घ्यावी. तिथेही कोचिंगचे टीमवर्क असेलच.
बाकी कोणीही धोनीला ईथे संपुर्ण श्रेय दिले नाहीच आहे. द्रविड केसमध्ये जितके दिले जाते तेवढेच पकडा हवे तत
व्यक्तीपूजा अन्याय वगैरे हे आपल्याच मनाने काढलेले अर्थ आहेत
जसे रहाणेला अगदी टाकाऊ म्हटलेय असा विपर्यास करण्यात आला..
ओह!! "द्रविडचे कौतुक" सलतय तर
ओह!! "द्रविडचे कौतुक" सलतय तर!!
तर मग असोच !!
अच्छा म्हणजे हे धोनीचे कौतुक
अच्छा म्हणजे हे धोनीचे कौतुक सलत होते तर
पुन्हा फिरून तेच.. वेगळे निकष..
बाकी मी कधी द्रविडला टोमणे मारायला गेलो नाही. त्यामुळे त्याचे कौतुक सलण्याचा प्रश्नच नाही..
ते तर आता धोनीवरून टोमणे मारले जात आहेत तर डबल standard दाखवायला द्रविडचे उदाहरण दिले..
उलट टोमणे मारणाऱ्यांना कौतुक सलते हा छान मुद्दा आपण घेतलात. याबद्दल धन्यवाद
धोनी शर्माचे कौतुक केले तर ती भक्ती झाली. व्यक्तीपूजा झाली. पण तेच सचिन द्रविडचे कौतुक केले तर ते आहेतच पूज्यनीय हा देखील डबल standard च नाही का झाला
धोनी शर्माचे कौतुक केले तर ती
धोनी शर्माचे कौतुक केले तर ती भक्ती झाली. व्यक्तीपूजा झाली.
>>
धोनी शर्माच्या actual involvement बद्दल ठोस माहिती नसताना, स्वतः च्या कायासांवरून त्यांना क्रेडिट देताना ज्यांची actual involvement आहे त्यांचा उल्लेख ही न करणं हे व्यक्तिपूजा नाहीतर काय आहे?
विद्यार्थ्याचे मार्क वाढले तर क्रेडिट शिक्षकांचं की क्लास मॉनिटर चं???
कप्तान म्हणजे क्लास मॉनिटर
कप्तान म्हणजे क्लास मॉनिटर असतो??
ओके. तसे असेल तर मग मी चुकलो. मान्य करतो
धोनी शर्माच्या actual
धोनी शर्माच्या actual involvement बद्दल ठोस माहिती नसताना, स्वतः च्या कयासांवरून किंवा मी अमक्या सोशल मिडियावर तमक्याला ढमक्याला सांगताना ऐकले ह्या महान माहितीवर फक्त धोनीला क्रेडिट देणे हे व्यक्तिपूजा नाहीतर काय आहे? अस म्हण रे अँकी.
दोन चार पाने मागे जाउन बघ....
>>अच्छा म्हणजे हे धोनीचे कौतुक सलत होते तर Happy
दोन चार पाने मागे जाउन बघ.... मी स्वताच केलय धोनीचे कौतुक पण ते योग्य कारणांसाठी..... पण इथे (आणि बाहेरही) काहीजण धोनीने भिंतीवर कुठेही बाण मारला की त्याच्याभोवती गोल काढतात आणि म्हणतात..... बघा बघा धोनीचा मास्टरस्ट्रोक
कौतुक आणि टीका अस्थानी, आततायी आणि अतर्क्य झाली की मग हसे होते
अँकी +१
अँकी +१
फ्लेमिंगचे विशेष कौतूक खरं तर. कारण तो धोनीलाही मार्गदर्शन करत असणार.
कौतुक आणि टीका अस्थानी,
कौतुक आणि टीका अस्थानी, आततायी आणि अतर्क्य झाली की मग हसे होते Happy
>>>>
तेच तर.. हे केवळ धोनीबाबत होते.
तेच सचिन, द्रविड गेला बाजार रहाणे यांच्याबद्दल बोलले गेलेले यात मोडत नाही. यालाच तर डबल स्टॅंडर्ड बोलतोय.
बरं आता मीच धोनीच भक्त समजूया थोडा वेळ .. पण मला एक सांगा..
तुम्ही लोकं आयपीएल म्यूट करून बघता का?
एवढे सारे कॉमेंटेटर्स, क्रिकेट एक्सपर्ट, विश्लेषक, आजी माजी क्रिकेटर्स धोनीच्या या गुणांचे कौतुक करून त्याची महानता मान्य करतात. ते तुमच्या कानावर येतच नाही का?
फ्लेमिंगचे विशेष कौतूक खरं तर
फ्लेमिंगचे विशेष कौतूक खरं तर. कारण तो धोनीलाही मार्गदर्शन करत असणार.
>>>>
असणार वगैरे शब्द प्रयोग करू नका ओ.. ईथली जनता प्रत्यक्ष तुम्ही पाहिलेय का असा पुरावा मागते
उप्स, माय मिस्टेक. हा नियम धोनीच्याच कौतुकाला लागू आहे. तुम्ही फ्लेमिंगचे बिनधास्त करू शकता
फ्लेमिंगचे विशेष कौतूक खरं तर
फ्लेमिंगचे विशेष कौतूक खरं तर. कारण तो धोनीलाही मार्गदर्शन करत असणार.>>>
व्यंकूची शिकवणी!!
>>तेच सचिन, द्रविड गेला बाजार
>>तेच सचिन, द्रविड गेला बाजार रहाणे
इथे कोण दर दोन पोस्टआड त्यांना डोक्यावर घेऊन नाचते?
तू बादरायण संबंध जोडून नको त्या गोष्टींचे क्रेडिट धोनीला द्यायचे बंद केलेस तर इथे कुणाला धोनीची उणीदुणी काढायची हौस असेल असे वाटत नाही!!
बघ थोडे दिवस प्रयोग करुन (जमले तर)!!
तू बादरायण संबंध जोडून नको
तू बादरायण संबंध जोडून नको त्या गोष्टींचे क्रेडिट धोनीला द्यायचे बंद केलेस तर >> किती वर्षे झाली तुला स्वरुप इथे ?
के के आर सुरूवातीच्या मॅचेस नंतर एकदम मोजो हरवल्यासारखे वाटतेय .
रहाणे स्वत: धोनीला धन्यवाद
रहाणे स्वत: धोनीला धन्यवाद देतोय
आणि म्हणे बादरायन संबंध
डीआरएसला धोनी रिव्यू सिस्टीम म्हणतात.
काही लोकांना याचा त्रास होतो आणि ते धोनीचा एखादा रिव्यू चुकताच आनंदाने बागडत येतात असे अनुभवले आहे.
पण हे नाव मी ठेवले नाही धोनीला.
चेन्नईचा सामना कुठेही असो प्रेक्षकांमध्ये धोनी धोनीचा गजर असतो.
धोनीवर प्रेम करणारा मी एकटाच नाहीये.
कोणाला त्या प्रेमाचा त्रास होत असेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम नाही का?
जर त्या लोकांच्या आवडत्या खेळाडूबर ईतकी जनता प्रेम करत नसेल तर मी माझ्या आवडत्या खेळाडूवर प्रेम करणे सोडावे का?
>>किती वर्षे झाली तुला स्वरुप
>>किती वर्षे झाली तुला स्वरुप इथे ? Wink
अरे वर बघितलेस का? "मी चुकलो" वगैरेची पोस्ट आलीय .... त्यामुळे लगे हाथ एखादी रिक्वेस्ट करुन बघावे म्हंटले
अस म्हण रे अँकी >> Lol
अस म्हण रे अँकी
>>
Lol
तेच तर.. हे केवळ धोनीबाबत
तेच तर.. हे केवळ धोनीबाबत होते.
तेच सचिन, द्रविड गेला बाजार रहाणे यांच्याबद्दल बोलले गेलेले यात मोडत नाही. यालाच तर डबल स्टॅंडर्ड बोलतोय
>>
इथे कुणी अर्जुन तेंडुलकर च्या परफॉर्मन्स चं क्रेडिट ही सचिन ला दिलं नाहीये. किंवा राजस्थान च्या परफॉर्मन्स चं द्रविड ला.
ज्या बॅच ला द्रविड कोच होता फक्त त्यांच्या सक्सेस चं क्रेडिट त्या वेळी द्रविड ला दिलं होतं.
उठ सूट प्रत्येक गोष्टीत मास्टर स्ट्रोक शोधायचा नसतो...
“ डीआरएसला धोनी रिव्यू
“ डीआरएसला धोनी रिव्यू सिस्टीम म्हणतात.” - इंडियन मिडीया, धोनी खेळत असलेल्या मॅचेसमधे ह्या असल्या कॅचफ्रेजेस वापरते. अॅशेसच्या एखाद्या मॅचमधे किंवा गेला बाजार बांग्लादेश-आयर्लंड मॅचमधे कुणी असलं काही म्हणत नाही. थोडक्यात असलं काही स्टँडर्डायझेशन नाही.
“ लगे हाथ एखादी रिक्वेस्ट करुन बघावे म्हंटले” -:हाहा:
“ के के आर सुरूवातीच्या मॅचेस
“ के के आर सुरूवातीच्या मॅचेस नंतर एकदम मोजो हरवल्यासारखे वाटतेय” - batting let them down today. नेहमीचा सुयश शर्माला इंपॅक्ट प्लेयर म्हणून आत आणायचा प्लॅन गंडला त्यांचा. होपफुली ते शार्दूलला रिलीज करून त्या पैशात दोन चांगले प्लेयर्स घेतील सीझन नंतर (पंडितला ठाकूरचं प्रेम असेल तर माहित नाही).
होपफुली ते शार्दूलला रिलीज
होपफुली ते शार्दूलला रिलीज करून त्या पैशात दोन चांगले प्लेयर्स घेतील सीझन नंतर >> त्यांनी दिलेले पैसे जास्त वाटतात पण ठाकूर मोक्याच्या वेळी विकेट्स घेतो हा प्लस पॉईंट आहे. आज पण क्लासेन ला अचूक उचलला त्याने मोक्याच्या वेळी.
राहाणे ने धोनी ला क्रेडीट देताना त्याच्या आधी नि नंतर काय म्हटलय हे वाचले कि उगाचच मला गांगुलीने २००४ मधे ऑस्ट्रेलिया च्या सिरीज आधी ग्रेग चॅपेलकडून टीप्स घेतल्या होत्या ते आठवले.
आज केकेआरने जबरदस्त मॅच
आज केकेआरने जबरदस्त मॅच फिरवली. मला १९ वी ओव्हर नरिन टाकेल असं वाटलं होतं. पण शेवट गोड झाला केकेआरसाठी (हैद्राबाद चा तितकाच मोठा हार्टब्रेक).
“ ठाकूर मोक्याच्या वेळी
“ ठाकूर मोक्याच्या वेळी विकेट्स घेतो हा प्लस पॉईंट आहे. ” - ते खरंय. पण मला समहाऊ ११ करोड देऊन (आणि इतरत्र काँप्रमाईझ करून) घेण्याइतका कन्सिस्टंट मॅच विनर तो अजून तरी वाटला नाहीये. अर्थात त्याने परफॉर्म केलं तर मी माझं मत बदलायला तयार आहे. (काकाजी मोडः आपला गधेपणा मान्य करावा, मझा असतो यार त्याच्यातही )
काकाजी त्या वरच्या ह्यांना
काकाजी त्या वरच्या ह्यांना भेटवा कधी.
पण मला समहाऊ ११ करोड देऊन
पण मला समहाऊ ११ करोड देऊन (आणि इतरत्र काँप्रमाईझ करून) घेण्याइतका कन्सिस्टंट मॅच विनर तो अजून तरी वाटला नाहीये. >> प्रत्येक टीम मधे कोणी ना कोणी तरी असा व्हाईट एलीफंट आहेच ना. भारतीय ऑल राऊंडर हे अजून तरी अॅसेट ठरले आहेत. इंपॅ़क्ट प्लेयर मूळे त्यांछे मह्त्व कमी झाले आहे तेंव्हा पुढच्या ऑप्शन मधे परत नॉर्मलाईज होईल.
एकंदरितच कन्सिस्टंटली परफॉर्म
एकंदरितच कन्सिस्टंटली परफॉर्म करणे फार अवघड वाटते ह्या फॉर्मॅट मध्ये. अजून एक म्हणजे टॅलेंटचा अक्षरशः सुपरपूल तयार झालाय सग्ळ्या टीम्स मिळून माझ्यामते. म्हणूनच की काय बर्याच मॅचेसचे निकाल अपेक्षेपेक्षा वेगळे लागत आहेत. कोणीतरी १-२ मंडळी चमकदार कामगिरी दाखवून मॅच पुर्ण फिरवत आहेत. टेबल मध्ये बर्यापैकी खाली असलेल्या टीम नी टॉप मधल्या टीमला हरवलं आहे. परवाची पंजाब वर्सेस चेन्नईची मॅच एक रिसेंट उदाहरण. मला वाटतं हायद्राबाद नी सुद्धा कुठल्यातरी टॉप टीमला हरवलं आहे.
आयपीएल शेवटाकडे जाताना काही
आयपीएल शेवटाकडे जाताना काही उलटफेर दिसून येतात आणि अखेरपर्यंत लोकांचा ईंटरेस्ट कायम राहतो . दरवर्षीचे आहे हे. गॉडगिफ्टेड आहे आयपीएल
कालची स्काय ची बॅटिंग काय
कालची स्काय ची बॅटिंग काय भन्नाट होती! हर्षा म्हणत होता तसे कोणता बॉल कोणत्या कॉर्नरला मारेल काही नेम नव्हता.
Pages