चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युनिकोड मरुद्या. साधा आस्की सर्च देतोय. रोकूच्या किबोर्डला इंग्रजी भाषा सिलेक्ट केली की मला वाटतं आस्कीच जात असेल. आता माय क्लायंट्स वाईफ... ह्यात तर मराठी इंग्रजी स्पेलिंगांची ही चुक व्ह्यायचा प्रश्न नाही. पिक्चरचा विषय, कलाकार काही काही सर्च ला न देता शुद्ध स्वच्छ नाव लिहिलं तरी येत नाही यासाठी स्पेशल टॅलेंट लागतो.

खरंच
कोणतं डबडा सर्च वापरलंय काय माहित
प्राईम आणि नेटफ्लिक्स दोन्हीकदे हव्या त्या गोष्टी लवकर कधीच मिळत नाहीत.

नेटफ्लिक्सला कधी प्रॉब्लेम नाही आला शोधताना.
त्यांच्याकडे नसलं तरी कम्प्लिट करायला सज्जेशन येतात त्यात ओव्हरस्मार्टगिरी करत आपल्याला हवा तो पिक्चर सज्जेशन मध्ये दिसतो. पण सर्च मध्ये नसतोच. बहुतेक त्यांच्या डीबी मध्ये असेल, आणि नंतर फिल्टर लागुन (देश, स्ट्रीमिंग करणारा आयपी लोकेशन, लायसन्स एक्सपायरी इ.) पुढे येत नसेल. ऑटो कम्प्लीट सज्जेशन पण फिल्टर लावुन दिली तर प्रश्न सुटेल. पण त्याने मंदासारखं सगळाच्या सगळा सर्च एकेक की करत रिमोट वरुन टाईप करावा लागेल. तो ओव्हरहेड बघता आहे ते बरं आहे वाटतं मला.
बाकी नेफ्लिवर सर्चची काही तक्रार नाही. हल्ली सर्प्राईज-मी टाईप फीचर काढलंय ते पण कपडे घडी करताना टाईप चित्रपट शोधायला बरं वाटतं. हल्ली बिकॉज यु वॉच धिस यु मे लाईक धिस ... हा यडचापपणा कमी झालाय. किंवा मी दुर्लक्ष करायला शिकलोय.

हो नेफिचे सर्च चांगले आहे. पण रेकमेन्डेशन दोन्हीकडे कायच्या काय आहे. मुळात एक झॉम्बी वाला पिक्चर किंवा सिरीज पाहिली तर पुढे अनेक दिवस मला तसलेच प्रकार पाहायला आवडतील हे गृहीतक बिनडोक आहे.

फेबु, यूट्यूब, नेफि सर्वांनी एक प्लेन सेटिंग देण्याची गरज आहे. त्यातून मी आधी काय पाहिले, माझ्य आवडीनिवडी काय आहेत, मी कधीतरी बिनडोकपणा करून त्यांच्या डेटामधे काय माहिती भरली आहे - याचा कसलाही वापर न करता एक रॅण्डम लिस्ट मला दाखवावी. फार फार तर ट्रेण्डिंग सारखे प्रकार दाखवायला हरकत नाही. आता यात पहिल्या दोन कंपन्यांच्या पोटावर पाय आहे पण यूजर म्हणून मला तो पर्याय हवा. प्राइम ला रॅण्डम लिस्ट दाखवायला वेगळे परिश्रम घेण्याची गरज नाही Wink नेफिच्या धंद्यावर प्लेन सेटिंग ने काही परिणाम व्हायला नको. तेथे बघणेबल मटेरियल आहे हे आहेच, पण त्याचबरोबर त्यांचे अ‍ॅप वापरायला सोपे आहे म्हणून लोक जातात. त्यांच्या रेको करता जात असतील असे वाटत नाही. आणि मी एखाद्या शहराबद्दल माहिती शोधली, तर तेथे जाउन आल्यावर सुद्धा पुढे दोन तीन आठवडे त्या शहराचे मार्केटिंग करण्याची त्यांना गरज नसते Happy

अमेझॉन म्युझिकवर मात्र मला आपण ऐकलेल्या गाण्यांच्या माहितीचा चांगला उपयोग केल्यासारखं दिसलं.
मी जनरली जुनी गाणी ऐकते त्यावर. अनफरगेटेबल या नावाने महम्मद रफी, किशोर कुमार, गुलजार वगैरे प्लेलिस्ट्स ऐकून ऐकून आता मला एक my soundtrack म्हणून सजेशन येतं, ज्यात विविध गायक, संगीतकार, गीतकार यांची एकत्र रँडम गाणी लागतात. ते जास्त छान वाटतं ऐकायला.

>>>>अमेझॉन म्युझिकवर मात्र मला आपण ऐकलेल्या गाण्यांच्या माहितीचा चांगला उपयोग केल्यासारखं दिसलं.
खरंतर मला रँडम गाणी ऐकायला आवडतात ... विविधभारती रॉक्स

जिओ सावन वर सरप्राईज मी सारखे फीचर आहे ते बरे आहे पण कधी कधी काहीच्या काही गाणी असतात आणि ठराविक संख्येतच असतात.

अ‍ॅमेझॉन वर अजुन एक फीचर आहे ते मला आवडले म्हणजे स्टार्ट स्टेशन. आपल्याला आवडते ते नवे जुने गाणे लावा आणि त्याआल्बम मध्ये गेल्यावर त्या गाण्या पुढे ३ उभे डॉटस क्लिक केल्यावर "Start Station" ऑप्शन दिसेल. तो क्लिक केल्यावर त्या गाण्याशी रिलेटेड आर्टीस्ट घेउन गाणी लागतात आणि एकातून दुसरी अशी गाणी लागतात ती मला रेडीमेड्/सजेस्टेड प्लेलिस्ट पेक्षा बरी वाटतात Happy

प्राइम सर्च फिचर गन्डलेल आहे. >>> + १००००००० .
अगदी बरोब्बर नाव देउन जरी सर्च केलं तरीक१०० गोष्टी दिसतात आणि त्यात कुठेतरी अपल्याला हवा असलेला सिनेमा असतो .

जाई, ॲपमधे जाऊन find मधे जा. हवं ते गाणं टाईप कर. किंवा तिथेच खाली स्टेशन्स, प्लेलिस्ट्स असे पर्याय येतात तिथे क्लिक कर.

अ‍ॅमेझॉन म्युझिक चकटफू आहे का दमड्या मोजाव्या लागतात? पैसे असतील असं समजुन कधी वाट्याला गेलो नाही. तसंही अ‍ॅमेझॉन म्हटलं की चार हात लांबच बरं असा हल्ली अ‍ॅटिट्युड झालाय.

"अ‍ॅमेझॉन म्हटलं की चार हात लांबच बरं असा हल्ली अ‍ॅटिट्युड झालाय." - अ‍ॅमेझॉन हे थोडसं 'necessary evil category' त येतं माझ्यासाठी. त्यामुळे आवश्यक असेल तरच वापरतो. अ‍ॅमेझॉन रेडिओ / प्लेलिस्ट तर अगदीच विविधभारती वर पकाऊ गाणी चालू असतील (ह्या बाबतीत माझा टॉलरन्स आणि आवडीच्या गाण्यांची रेंज बरीच मोठी आहे - त्यामुळे अशी वेळ क्वचित येते) तर अ‍ॅलेक्सा लावते तितपतच येतो. बरेच वेळा अ‍ॅलेक्साला रेडिओ विविधभारती च लावायला सांगितलं जातं. (उगाचच आपलं एक बालिश समाधान Happy )

Amazon music वर उत्तम पाश्चात्त्य शास्त्रीय, कन्ट्री, सोल, जॅझ इत्यादी संगीत आहे. प्राईमबरोबर फुकट आहे. हे संगीतप्रकार आवडत असतील तर जरूर वापरून पाहा.

चित्रपटांशी संबंध नाही पण आता म्युझिक बद्दल चालूच आहे तर आणखी दोन आणे.
स्पॉटिफाय पेड सबस्किप्शन नाही घेतलं तर त्याला हवं तेच ऐकवत बसतो म्हणुन डोक्यात जातं. पँडोरा इकडे चालत नाही.
हिंदी साठी गाना इ. आहे. मला इंग्रजी पॉप / जॅझ इ. गाण्यांसाठी फुकट काही असेल तर हवं होतं. अ‍ॅमेझॉन ट्राय करतो. अधे मध्ये जाहिराती आणि मला हवी ती गाणी सोडून प्रमोशन करायला भलती गाणी नसली म्हणजे मिळवलं.

गाना आधी ऐकायचे मी. पण त्यात जाहिराती असायच्या. अ‍ॅमेझॉनवर जाहिराती नसतात. कलेक्शन चांगलं आहे गाण्यांचं.

वर अनेकांनी प्राईमच्या सर्चचा वाईट अनुभव लिहिलाय. पण गंमत म्हणजे मला कधीच असा अनुभव आला नाही. जर चित्रपट प्राईमवर असेल तर सहज सापडलाय आत्तापर्यंत प्रत्येक वेळी.

गानाच्या जाहिराती टोटल अतरंगी असतात. त्याचा बरेचदा त्रास होत नाही. गाडी हो धुलावाना या दाढी हो करावाना बजना चैये गाना Biggrin

हो नेफिचे सर्च चांगले आहे. पण रेकमेन्डेशन दोन्हीकडे कायच्या काय आहे. मुळात एक झॉम्बी वाला पिक्चर किंवा सिरीज पाहिली तर पुढे अनेक दिवस मला तसलेच प्रकार पाहायला आवडतील हे गृहीतक बिनडोक आहे.>>
फारेंड, शफल बटन नेटफ्लिक्स आणलय. तुम्ही लॉग इन केल्यावर प्रोफाईल सीलेक्ट करताना खाली दिसेल.
रँडम चॉईसेस दाखवितात.

ऍमेझॉन प्राईम म्युसिक फुकट आहे, प्राईम मेम्बरशिप बरोबर. पण त्याचा पेड version पण आहे, ऍमेझॉन म्युसिक प्रीमियम

प्रसाद ओक (स्पेलिंग ओ ए के) असा सर्च स्ट्रिंग दिला की येतो> आमच्या इथे ऑस्ट्रेलियात नाही दिसत आहे हा पिक्चर Sad

Pages