Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कॅरेकट.. फिंगर प्रिंटिंग मॅच
कॅरेकट.. फिंगर प्रिंटिंग मॅच होण्यासाठी...
राज ब्युटी पार्लर आर्टिस्ट आणि टॅटू आर्टिस्ट फरक आहे.. आणि ताजा ताजा टॅटू रंगत नाही... बरेच दिवस जखम असते...
- विराट कोहली प्रमाणे मी देखील टॅटू बनवले आहेत म्हणून स्वानुभव...
मला हसीन दिलरुबा सस्पेन्स
मला हसीन दिलरुबा सस्पेन्स पार्ट सोडून खूप आवडला बघायला, शेवटची काही मिनिटे सोडून सिनेमा मस्तं आहे
तापसी, विक्रान्त, हर्षवर्धन राणे आणि तापसीचे सासु-सासरे सगळ्यांचं अॅक्टिंग भारी !
सस्पेन्स पार्ट अ आणि आ.आ ,इल्लॉजिकल, कै च्या कै होता !
स्पॉयलर
तो विक्रान्त मॅसीचा कझिन सुद्धा इतके वर्षं गायब आहे याची चौकशी कोणी नाही करत ?
गॅस सिलेंडर ब्लास्ट मधे बाकी सगळ्या बॉडीचा कोळसा झाला, हात का नाही जळला?
नुकत्याच कापलेल्या हातानी स्विमिंग करत नदी पार करणे कसं जमलं विक्रान्तला?
त्या बी ग्रेड पुस्तकाची चौकशी करायला इन्स्पेक्टरला सुचल नाही का? पुस्तक वाचायला ५ वर्षं का लागली ?
*** स्पॉयलर ***
*** स्पॉयलर ***
हल्लीच 'ओल्ड मॅन अॅंड द सी' वाचलं असल्याने आता त्या विक्रांतला मासे खा खा खाणार आणि तापसीला एक सांगाडा मिळणार असे फ्लॅशेश आलेले मला.
बाकी इल्लॉजिकल प्रश्नच विचारायचे तर खोर्याने प्रश्न पडलेले मला. चहाही न करता येणारी त्या कोण मावसभावाशी सेक्स करता यावं म्हणून दाणदाण पाककलानिपुणत्त्वाची पदवी कशाला घेत बसते? कशात काही नसताना शेवटी खाटकाकडे जाऊन कुत्र्याना घालायला मासाचे तुकडे घालायची तयारी म्हणून मावस भावाबरोबर बेड शेअर करायला वासही सहन न होऊ शकणारी बाई मटण करी करायला वेगळं कीचन तयार करुन निस्ती रेस्पी फॉलो करुन काय काय करते, ते ही त्या भाभीला नुसतं विचारुन..... म्हणजे त्या भाभीला गेम करायच्या आधी काही तरी स्मॉल टॉक करुन सांगता येईल आणि अलाबाय मिळेल. आणि खाटिक आणि रिक्षावाला आणखी दोन अलाबाय मिळतील याची तयारी म्हणून मटण करी??? ... आवरा आता.
तापसीची सासू बाकी एकदम आवडली.
तापसीची सासू बाकी एकदम आवडली. आधी शीबा छड्डा (मिर्झापूरमधली बबलूची आई) किंवा सीमा पहावा हव्या होत्या वाटलं पण हीने मस्त काम केलं आहे.
कुठे कुठे फार स्लो होतो मूव्ही. एडिट करुन अजुन कमी करायला हवा होता.
### स्पॉयलर अलर्ट ###
### स्पॉयलर अलर्ट ###
>>फिंगर प्रिंटिंग मॅच होण्यासाठी...<<
चार्र्ड बॉडिचे फिंगर्प्रिंट्स शाबूत रहातात? हात बर्यापैकि जळालेला दखवला आहे. एक वेळ डेंटल रेकॉर्ड, डिएनए वगैरे ठिक आहे, पण फिंगरप्रिंट्स?..
आणि मी वर टॅटू म्हटलंय म्हणजे अगदि टॅटू पेनने प्रोफेशनल काम केलं पाहिजे असं नाहि, शार्पी पण चालला असता. नांव दिसल्याशी कारण... जे काम शार्पीने झालं असतं तिथे त्या मुर्खाने हात गमावला. आणखीन एक गंमतीचा भाग म्हणजे, नीलचा हात तो आइस बकेट मधे ठेवतो. कशाला? स्वतःवर रिप्लँट करायचा विचार होता?
***स्पॉयलर ***
***स्पॉयलर ***
शार्पी पोलिसांना नीलचा कापलेला हात हाच त्या रिशीचा हात वाटला असता. आणि त्यावर शार्पीने काढलेला टॅटू हा तर नक्कीच ओरिजिनल रिशीचा टॅटू वाटला असता. हो ना?
बाकी तो नीलचा नाही स्वत:चा हात ठेवतो. बधीर होण्यासाठी.
खाटिक आणि रिक्षावाला आणखी दोन
***स्पॉयलर ***
खाटिक आणि रिक्षावाला आणखी दोन अलाबाय मिळतील याची तयारी म्हणून मटण करी??? .>>>> तिने बोकडाची मोठी तंगडी फ्रिझर मधून काढून त्याने वार केला. मग ते मर्डर वेपन नष्ट करायला बाहेर पडते. एका खाटीकाकडून नवीन तंगडी घेते आणि दुसऱ्याकडे जाऊन दोन्ही कापून घेते. घरा जवळ आली तरी स्फोट झालेला नसतो म्हणून कुत्र्यांना तुकडे खायला देत वेळ काढते.
गॅस सिलेंडर ब्लास्ट मधे बाकी सगळ्या बॉडीचा कोळसा झाला, हात का नाही जळला?>>> कारण हात जळायच्या आधीच तुटून दुसरीकडे पडला.
नाही नाही. मटण करी शिकली त्या
नाही नाही. मटण करी शिकली त्या भाभीकडून. त्यानिमित्ताने भाभीशी ओळख झाली. मग मर्डर करुन बाहेर जाताना भाभीला खीर देते असं स्मॉल टॉक करता आलं... ते स्मॉल टॉक करायला ती मटण करी शिकली म्हणत होतो. म्हणजे मी घरी होते. आत्ता बाहेर जात आहे. खीर करणार आहे. सगळं नॉर्मल आहे. असं सांगायला भाभी एक अलाबाय.
मर्डर व्हेपन.. म्हणजे रादर इंपॅक्ट व्हेपन म्हणून ती तंगडी होती. ती जर घरात होती तर ती तोडता येतच असेल ना तिला. घरात चांगले सुरे होतेच की. त्या सुर्यांनी घरीच त्या मर्डर व्हेपनचा सत्यानाश करुन कुत्र्यांना दिलं असतं तर काय बिघडलं असतं? ती तंगडी घेऊन जाताना बाहेर दिसणार नाही आणि वासही येणार नाही.. आणि काय काय. हे कशाला करायचं इतकं?
बाकी त्या होम्योपदी ज्ञानाचा त्याला काहीही उपयोग करता येत नाही. तस्मात होम्योपदी थोतांड आहे असं नक्की दिग्दर्शकाला सांगायचं असणार याची मला खात्री आहे.
>>स्पॉयलर
>>स्पॉयलर
नॉनवेज खात नाही म्हणून मला पडलेला एक भाबडा प्रश्न
ती बोकडाच्या तंगडीने वार करते असं दाखवलय. ती तंगडी मांसासकट आहे ना (नुसते बोन नाहीये). त्या मांसाच्या कुशनमुळे जोरात वार केला तरी त्या वाराने माणूस डायरेक्ट मरु शकेल का? फक्त बोन असले तर समजू शकते.
### स्पॉयलर अलर्ट ###
### स्पॉयलर अलर्ट ###
>>पोलिसांना नीलचा कापलेला हात हाच त्या रिशीचा हात वाटला असता. <<
अरेच्च्या! सुकड्या मेसीचा हात , नीलच्या टोन्ड बॉडिचाच हिस्सा (हात) आहे हे पोलिसांनी मान्य केलं, कारण सगळे बॉडि पार्ट्स साफ जळालेले आहेत या समजावर. असं असताना काहिहि (कुणाचीहि) कापाकापी न करता केवळ शार्पीने काम झालं असत; संपुर्ण बॉडि नंतर साफ जळणार आहे या ग्रहितकावर. मग शार्पी काय किंवा टॅटू इंक काय, होणार आहे कोळसाच. पांचवी फ चं लॉजीक आहे, तेहि झेपलं नाहि? आवरा...
>>फक्त बोन असले तर समजू शकते<
>>फक्त बोन असले तर समजू शकते<<
फ्रोजन तंगडि असते ती, लाकडासारखी. डीप फ्रिजर मधुन काढते ती...
>>फ्रोजन तंगडि असते ती,
>>फ्रोजन तंगडि असते ती, लाकडासारखी. डीप फ्रिजर मधुन काढते ती...
अच्छा ओके ओके
मग शक्य आहे.
कुत्र्यांना ती नीलचा कापलेला
कुत्र्यांना ती नीलचा कापलेला हात खायला देते असं वाटलं मला.
रिषुचा हात फक्त न जळता राहतो
रिषुचा हात फक्त न जळता राहतो ते ही त्यावरचं नाव एकदम व्यवस्थित दिसेल असं राहतं आणि फिंगरप्रिंट्सही घेता येतात मात्र बाकी बॉडी चांगली खरपूस जळते .... महान आहे.
मला हसीन दिलरुबा सस्पेन्स पार्ट सोडून खूप आवडला बघायला, शेवटची काही मिनिटे सोडून सिनेमा मस्तं आहे Happy
तापसी, विक्रान्त, हर्षवर्धन राणे आणि तापसीचे सासु-सासरे सगळ्यांचं अॅक्टिंग भारी !
सस्पेन्स पार्ट अ आणि आ.आ ,इल्लॉजिकल, कै च्या कै होता ! >>>> अगदी अगदी. सेम.
आईसबकेटमध्ये कोणाचाच हात ठेवत
आईसबकेटमध्ये कोणाचाच हात ठेवत नाहीत. रिषु आपला हात कापण्याआधी आईसबकेटमध्ये बुडवतो आणि बधीर करतो.
इतक्या रक्ताच्या चिळकांड्या उडतात, तापसी जमिनीवर पडलेलं रक्त पुसते वगैरे पण तिचा पांढरा पोशाख व्यवस्थित पांढराच राहतो.
हसीना दिलरूबा चं सस्पेन्स इथे
हसीना दिलरूबा चं सस्पेन्स इथे फोडून टाकले की. आता काय बघायचे?
ब्रोकन तंगडी Roald Dahl च्या
ब्रोकन तंगडी Roald Dahl च्या कथेत आहे. मर्डर वेपन.
इथे मर्डर व्हेपन तंगडी होती
इथे मर्डर व्हेपन तंगडी होती का हातोडा का दांडुका का वरवंटा काही फरक पडला नसता. फारतर वरवंट्यावर चटणी वाटून त्या नीलला वाढली असती की घरात वरवंटा आहे आणि तो हिला वापरता येतो याचं एक प्रुफ दिलं असतं की काम झालं.
आख्खाच्या आख्खा माणूस बदलला तरी काही फरक पडला नाही! उगाच मर्डर व्हेपन असा जड शब्द कुठे ऐकला तो वापरायची हौस फिटवून घेतली झालं.
मर्डर व्हेपन तंगडी पायजेले अशी पीएम ने रिकवायरमेंट दिली असणार म्हणुन मग त्या नीलला मटण शिजवायचे उपाख्यान जोडलं. आणि घरात फ्रोजन तंगडी ठेवली.
रेग्युलर मटण खाणारेही अशी
रेग्युलर मटण खाणारेही अशी मोठी तंगडी आणत नाहीत कारण ती आख्खी मावेल असा (सिनेमात दाखवलाय तसा) फ्रीजरही नसतो घरी आणि जर घरात २ च माणसं मटण खाणारे असतील तर आख्खी तंगडी कशाला आणून ठेवली? ती ही न कापता? इतका जुना फ्रीजर लगेच सुरू बरा झाला. आमचे वापरातले फ्रीजही बिघडतात.
श्या! वेगळा धागा काढून त्यावर
श्या! वेगळा धागा काढून त्यावर चिडचिड करायला हवी.
तो बर्फ आण म्हटल्यावर हिला हा
तो बर्फ आण म्हटल्यावर हिला हा sss टमरेलभर बर्फ सापडतो बघूनच टडोपा झालं मला. घरात कोणी आपटलं की आईस पॅक करून घरभर धावपळ होते दरवेळी आणि कोणी सुधारत नाही. गेल्यावेळी आइस पॅक वापरल्यावर तो फ्रीझर मध्ये गेलेला नसतो. आईस मेकर च्या जागेत बाकी गोष्टी ठेवायला जागा कमी पडली म्हणून फ्रोजन गोष्टींनी आक्रमण केलेले असते त्यामुळे बर्फ तयारच झालेला नसतो. ही नुसत्या त्या मोल्ड मधून एक ४० Qt चा कूलर भरेल इतका बर्फ काढते. रिस्पेक्ट!
सिरीयसली.
सिरीयसली.
आमच्याकडे फ्रिजर मध्ये रवा, ड्रायफ्रुट,केशर,फूड कलर,चारकोल फेस मास्क असं काहीही असतं बर्फ सोडून.
ज्या गोष्टी बाहेर ठेवता येत नाहीत त्या फ्रिजरमध्ये ठेवायच्या इतका रूल.
बीफ च्या फ्रोझन तुकड्याने खून वाली गोष्ट रॉएल्ड डाल ची आहे का?नाव काय गोष्टीचं?
इथे इतकी चर्चा पाहिली आता तर
इथे इतकी चर्चा पाहिली आता तर अजिबात पहाणार नाही हा सिनेमा.
कुणी नीलकंठ मास्तर हा मराठी
कुणी नीलकंठ मास्तर हा मराठी चित्रपट पाहिला आहे का? कसा आहे?
मला हसीन दिलरुबा सस्पेन्स
मला हसीन दिलरुबा सस्पेन्स पार्ट सोडून खूप आवडला बघायला, शेवटची काही मिनिटे सोडून सिनेमा मस्तं आहे >>>> हो ना. बाकी सिनेमा एंटरटेनिंग आहे चांगला. खुनाच्या प्लान पासून पुढे कै च्या कै.
फिंगरप्रिन्ट ची काय भानगड आहे ती? हात खरेच रिषू चा असला तरी तोच मेला हे ठरवायला पोलिस फिन्गरप्रिन्ट वापरतील? फिन्गरप्रिन्ट घेऊन ते मॅच कोणाशी करणार होते पोलिस?
बॉम्बने उडालेला हात आणि
बॉम्बने उडालेला हात आणि धारदार चाकूने कापून काढलेला हात , ह्यातला फरक हवालदारला आणि पोस्ट मोरटेम रूमच्या शिपायालाही समजतो
लैच स्पॉयलर देऊन राहीले तुमी.
लैच स्पॉयलर देऊन राहीले तुमी...
वेगळा धागा काढा मग
काय नाय हो
काय नाय हो
सिनेमाचे नाव explained in hindi
असे युट्युबवर टाइप करा , शेकड्याने व्हिडीओ मिळतील
सिनेमा थेटरात किंवा कुठेही रिलीज झाला आणि 3 तास झाले तरी तेवढ्यात सगळे रहस्य सांगणारे 10,20 व्हिडीओ येतात
मी मायबोली वाचून तिकडेच पुढील संशोधन करतो
बॉम्बने उडालेला हात आणि
बॉम्बने उडालेला हात आणि धारदार चाकूने कापून काढलेला हात , ह्यातला फरक हवालदारला आणि पोस्ट मोरटेम रूमच्या शिपायालाही समजतो>> हो, अगदी हाच विचार आला होता.
शरीर संपूर्ण जळत कारण त्यावर रॉकेल ओतलेले होते. तुटलेल्या हातावर रॉकेल ओतत नाही तसेच तो हात थोडा लांब टाकलेला आहे.
तसेच तो हात थोडा लांब टाकलेला
तसेच तो हात थोडा लांब टाकलेला आहे.>>> तो हातही जाळून टाकायला हवा होता. याने उगाच स्वत:चा हात कापला. तसेही तो पळूनच जाणार होता. सहात पळून गेला असता तरी चालले असते.
Pages