Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोई जाने ना
कोई जाने ना
इथली चर्चा वाचून prime वर
इथली चर्चा वाचून prime वर पिकासो बघितला. Art film वाटला . पावसातले ओलेचिंब , हिरवेगार कोकण छान चित्रित केलेय .
रे नावाची सिरीज नेटफ्लिक्स वर
रे नावाची सिरीज नेटफ्लिक्स वर आहे. सत्यजित रे यांच्या कथा सध्याच्या काळास (अडॅप्ट) अनुसरून चित्रीत केल्या आहेत. मस्त कामे केली आहेत सर्वांनी. कथा माहिती असल्यातरी ह्या संचात बघायला छानच वाटल्या.
आम्ही दोघी बघितला. आवडला.
आम्ही दोघी बघितला. आवडला. मस्त आहे. सगळ्यांच्या रेको साठी धन्यवाद!
प्रिबा आवडत नाही यातही तिचं ते सारखं शाळेत असतानाचं ओठ काढून लाडात बोलणं वगैरे कंटाळवाणं वाटलं. बादवे, ही गोष्ट गौरी देशपांडेंच्या पुस्तकात पण वाचली आहे. त्यावरूनच घेतला दिसतोय सिनेमा.
ही गोष्ट गौरी देशपांडेंच्या
ही गोष्ट गौरी देशपांडेंच्या पुस्तकात पण वाचली आहे. त्यावरूनच घेतला दिसतोय सिनेमा. > होय, पाउस आला मोठा, ह्या कथेवर आधरित आहे. आणि हि कथा त्यान्च्या 'आहे हे अस आहे' ह्य कथा सन्ग्रहामधील आहे.
Actually दोन गोष्टी घेतल्या
Actually दोन गोष्टी घेतल्या आहेत गौरी देशपांड्यांच्या. दोन्ही त्याच पुस्तकातल्या आहेत. मुख्य कथेत (मुळातल्या) राम हे पात्र नाहीये. ते दुसऱ्या कथेत आहे. विमला आणि राजा हे दोघं नायिकेकडे येतात आणि रामने लग्न केल्याचं सांगतात ही ती पूर्ण वेगळी दुसरी कथा आहे. नाव लक्षात नाही मला. ज्या प्रकारे ती कथा यात गुंफली आहे ते मला आवडलं.
वेलकम होमची स्टोरी जाणून
वेलकम होमची स्टोरी जाणून घ्यायची इच्छा होती म्हणून youtubeवर ऐकली. बापरे हि खरी घडलेली कथा असेल तर कसली टेरिफिक आहे. मी नाही बघू शकणार पिक्चर.
युट्यूबवर अशा डिटेल कथा समजत असतील तर बघत, ऐकत जाईन. पूर्ण पिक्चर बघण्यापेक्षा बरं. तसंही आमच्याकडे amazon prime, hotstar वगैरे आहे. नेफ्ली, sony liv नाहीये.
>>प्रिबा आवडत नाही यातही तिचं
>>प्रिबा आवडत नाही यातही तिचं ते सारखं शाळेत असतानाचं ओठ काढून लाडात बोलणं वगैरे कंटाळवाणं वाटलं.
मलाही. तरीही यात तिने काम बरंच चआंगलं केलंय त्यामुळे सुसह्य वाटते. खरच चांगला मूव्ही आहे. पुन्हा पाहू शकेन.
नेफि वर नवीन कुठल्या बेगमचा
नेफि वर नवीन कुठल्या बेगमचा चित्रपट आलाय तो पाहिलाय का ?
रे मालिकेतली मनोज वाजपेयीचीच कथा आवडली. बहुरूपी फँटसी आणि संदेश यामुळे ढासळली. केव्हगर्लची कथा कदाचित वाचायला छान असू शकेल.
बहुरूपी ची कन्सेप्ट फार सॉलिड
बहुरूपी ची कन्सेप्ट फार सॉलिड आहे.
पण खूप अंधाऱ्या शूटिंग मुळे नीट कळायला वेळ लागतो.
चेहरे बदलणे हे ज्या कथेचं मूळ आहे त्यात जरा नॉर्मल प्रकाश चालला असता.
'रे' मलाही आवडली. 'हंगामा है
'रे' मलाही आवडली. 'हंगामा है क्युं बर्पा' सर्वात उत्तम होती. मनोज वाजपेयीने मस्त काम केलेयं. शिवाय सगळे सहकलाकारही कसलेले व आवडीचे होते. धमाल वाटली. शिवाय ते लखनवी-शायराना पार्श्वभूमीने मजा आली. नंतरची दीदीवालीही आवडली. हर्षवर्धन वाईट नाही, बरं काम करतो.
बहुरूपी प्रिडेक्टेबल व संथ वाटली. केके मेनन अतिशय गुणी व अंडररेटेड आहे. अली फजल मिर्झापुर पासून आवडतो, यातही छान वाटला. कथा विशेष वाटली नाही.
रात अकेली है (नेफीवर) कंटाळवाणा वाटला.
हो
हो
आम्ही पण रात अकेली है फार उत्साहात पाहिला होता.पण जरा कंटाळवाणा झाला.
कुणी समांतर २ नाही पाहिले का
कुणी समांतर २ नाही पाहिले का अजून?
त्याचा वेगळा धागा आहे हो इथे
त्याचा वेगळा धागा आहे हो इथे
वेब सिरीज च्या धाग्यावर पण चर्चा आहे.
https://www.maayboli.com/node/73738
https://www.maayboli.com/node/79167
हसीन दिलरुबा... नेटकिक्स...
हसीन दिलरुबा... नेटकिक्स... मस्ट watch...
अप्रतिम सस्पेन्स... मला गाणी फार आवडली.. रिपीट मोड वर चालू आहेत...
समांतर 2 पाहतेय..
समांतर 2 पाहतेय..
हसीन दिलरुबा... नेटकिक्स...
हसीन दिलरुबा... नेटकिक्स... मस्ट watch...>>> येस, आजच पाहिला. तापसी आणि तो हिरो आवडतोच. आवडला मूव्ही.
नेटफ्लिक्स.
नेटफ्लिक्स.
हसीन दिलरुबा गंडलेला वाटला.
हसीन दिलरुबा गंडलेला वाटला. काय होणार याचा अंदाज येतो त्यामुळे धक्का बसत नाही. संत्र सोलताना लेखक दिग्दर्शक बदलतात बहुतेक. अचाट प्लॅनचं अचाट एक्झिक्युशन. शेवटी वेळ फुकट दवडला फीलिंग आलं. गाणी आवडलेली असं आठवतं, पण अजुन शोधुन लावलेली नाहीत. ती ऐकेन आज, बहुतेक आवडतील.
अचाट प्लॅनचं अचाट एक्झिक्युशन
अचाट प्लॅनचं अचाट एक्झिक्युशन. >>>+१
विक्रांत मेसी टाइप कास्ट
विक्रांत मेसी टाइप कास्ट होतोय, बावळट नवर्याच्या भूमिकेत. असो, चित्रपट ठिक आहे.
### स्पॉयलर अलर्ट ###
मेसीची गॅसलाइटिंग टॅक्टिक्स वर्क होतेय हे बघुन साधारण कल्पना येते पुढची. पण एक बाब मात्र प्रचंड खटकली. ते अॅम्प्युटेशन खरंच गरजेचं होतं का? ब्युटि पार्लरवालीला तस्साच टॅटू काढता येतो हे प्रेक्षकांच्या गळी उतरवायला थोडं सोप्प गेलं असतं...
मर्डर वेपनची आय्डिया इनोवेटिव आहे, हे आवर्जुन नमूद करतो...
चित्रपटात सस्पेंस कसा राखला
चित्रपटात सस्पेंस कसा राखला जावा, हे बघायचं असेल तर केविन स्पेसीचा "द लाइफ ऑफ डेविड गेल" बघा. नेफिवरंच आहे...
*** स्पॉयलर ***
*** स्पॉयलर ***
तसाच टॅटू काढला असता तर ढाई किलो का हात वि. सुक्कड हात यावर 'जाणकारांनी' आक्षेप घेतला असता.
तो सगळा भागच गंडलेला आहे. भुसभुशीत रहस्य असलं की रिव्हर्सइंजिनिअरिंग कितीही बरं केलं तरी ते पचनी पडत नाही.
हसीन दिलरुबा काल पाहिला. ते
हसीन दिलरुबा काल पाहिला. ते शहर भारी आहे. पाणी आणि शेजारची घरं बघताना फार मस्त वाटतं. बाकी सिनेमा चांगला वाटला पण शेवट डायरेक्शनमध्ये आणि एकूणच पार गंडलाय. इतकं सगळं कांड होतं पण तापसीच्या पांढर्या शुभ्र ड्रेसला काहीही होत नाही. बाकी काही लिहिलं तर स्पॉयलर होईल. पण तरीही बघा.
अमितव, राज +१११११
अमितव, राज +१११११
अ आणि अ सिनेमा आहे! तापसीमुळे अपेक्षेने बघितला गेला. टोटल वेस्ट ऑफ टाईम.
पण तरीही बघा. >>> मामी...
पण तरीही बघा. >>>
मामी... अशानेच लोकं गातात बरं 'अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का....'
मी पाहिला आहे. किती सारे पैसे मिळाले म्हणजे असल्या सिनेमात कॅमिओ करेन ह्याचा कालपासून विचार करते आहे.
मर्डर वेपनची आय्डिया इनोवेटिव
मर्डर वेपनची आय्डिया इनोवेटिव आहे, हे आवर्जुन नमूद करतो... >>>> अॅगथा ख्रिस्ती की कोणीतरी वापरलेली आहे.
Finger प्रिंट मुळे कोणाचा
Finger प्रिंट मुळे कोणाचा मृत्यू झाला आहे हे ठरवलं आहे. एक छोटासा संवाद आहे सुरवातीला.
पण सिनेमा फार आवडला नाही.
पण सिनेमा फार आवडला नाही.
वन टाइम वॉच आहे.
वन टाइम वॉच आहे.
Pages