Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संदीप पिंकी फरार बघितला.. हसी
संदीप पिंकी फरार बघितला.. हसी तो फसीची आठवण झाली.. अर्जुन परिनितीने मस्त काम केलंय.
प्राइमवर 'आय इन द स्काय'
प्राइमवर 'आय इन द स्काय' पाहिला. मला आवडला.
मिलिटरी थ्रिलर आहे, तरी स्टोरीला एक वेगळा अँगल दिलाय, त्यामुळे अगदी गर्क होऊन पाहिला.
अॅरॉन पॉलचं काम आवडलं. त्याला छोटीशीच भूमिका आहे, पण तो नजरेतून भावना खूप छान दाखवतो.
त्याची सहकारी (Phoebe Fox) जराशी स्पृहा जोशीसारखी वाटते.
सरदर सन का काय बघायचा प्रयत्न
सरदर सन का काय बघायचा प्रयत्न केला , हो म्हणजे क्षीण प्रयत्नच होता मोजून २० ंइनिटे.
अर्जुन कपूर सारखा मठ्ठ माणूस कलाकार म्हणून पाहणे शिक्षाच आहे.
खुप थंड आहे अभिनयात.
Agent साई बघितला, चांगला आहे,
Agent साई बघितला, चांगला आहे, सुरवातीला थोडा कंटाळवाणा आहे पण नंतर वेगवान आहे
संदीप पिंकी फरार आवडला.
संदीप पिंकी फरार आवडला.
वेगळ्या धाटणीचा आहे, मस्त आहे.
मागच्या वीकांताला घरच्या काही
मागच्या वीकांताला घरच्या काही सदस्यांमुळे राधे बघावा लागला...तरी मी पुर्ण वेळ भाच्यासोबत खेळत , शक्य तितके स्क्रीन कडे दुर्लक्ष करत पाहिला
मग दुसर्याच दिवसी रात्री मुलीच्या आग्रहाखातर सरदार का ग्रँडसन पाहिला....अर्जुन चा अभिनय कानाडोळा करत पाहिला तर......
राधे पेक्षा फारच उच्च आहे ....
संदीप पिंकी फरार आवडला>>>
संदीप पिंकी फरार आवडला>>>
मलापण.
मुख्य म्हणजे शेवट सरळधोपट केलेला नाही ते आवडले.
संदीप पिंकी फरार आवडला.>> मला
संदीप पिंकी फरार आवडला.>> मला बरा वाटला म्हणजे वर बर्याच जणानी लिहल्याप्रमाणे दोघाना सुट होतिल अशा भुमिका मिळाल्यात पण सुरवातिला एकदम ग्रिपिन्ग वाटणारी स्टोरीलाइन पुढे स्लो आणि एकदम प्रिडेक्टबल होत जाते... सुरवातिच धक्कातन्त्र पुढेही चालु ठेवल असत तर वेगळा इम्पॅक्ट जाणवला असता... तरी दोन गोश्टी खुप आवडल्या, अनावश्यक सेक्स- बोल्ड द्रुश्य, रक्त्पात हे टाळलय.
ओटीटी वर वेबसिरिज बनवण्यारानी धडा घ्यावा...वाक्या वाक्याला घाण घाण शिव्या आणी किळसवाण्या द्रुश्याशिवाय चान्गल काहि बनवता येवु शकत.
अनावश्यक सेक्स- बोल्ड द्रुश्य
अनावश्यक सेक्स- बोल्ड द्रुश्य, रक्त्पात हे टाळलय.
ओटीटी वर वेबसिरिज बनवण्यारानी धडा घ्यावा...वाक्या वाक्याला घाण घाण शिव्या आणी किळसवाण्या द्रुश्याशिवाय चान्गल काहि बनवता येवु शकत. >>> मग बघायलाच हवी. मी या गोष्टी पावलोपावली असतात म्हणून बघायचं टाळते.
आत्मानंद थेटरात धरमपाजींचा
आत्मानंद थेटरात धरमपाजींचा चित्रपट आलाय. जायचा विचार करतोय. कसा आहे ?
Bhesal aahe. Sharmila
Bhesal aahe. Sharmila aasnmanse , Amitabh sholay madhla... Pan chupke chupke dhamal aahe...
आमच्याकडे असेच पोस्टर्स असतात
आमच्याकडे असेच पोस्टर्स असतात.
सुपरमॅन तर हवा मे झटका मार दिया फटका या नावाने रिलीज झाला होता.
चुपके चुपके केव्हाही कितीही
चुपके चुपके केव्हाही कितीही वेळा
स्पेशली त्यातल्या अमिताभचे बेअरींग एकदम चुम्मा आहे. आणि काय टायमिंग आहेत त्याच्या डायलॉगला, दरवेळी हसायला येते
स्पॉइलर : इथली चर्चा वाचून
स्पॉइलर : इथली चर्चा वाचून संदीप और.. पाहिला, आवडला पण मला शेवट नाही कळला. कोणी ईस्कटून सांगेल काय? पिंकीचं काय होतं शेवटी?
आज टायगर्स नावाचा इमरान
आज टायगर्स नावाचा इमरान हाश्मी चा पिक्चर पाहिला.लहान आहे 1.5 तासाचा. आवडला.
क्लोजर नाहीये कारण सत्यकथा आहे.
पिंकीचं काय होतं शेवटी?>>>
पिंकीचं काय होतं शेवटी?>>> पिन्की बॉर्डर क्रोस करुन जातो नेपाळला जाण्यात यश्स्वी होतो.
सॅंडीला जे पत्र मिळते त्यात
सॅंडीला जे पत्र मिळते त्यात मास्टर पिंकी बॅालीवूड डान्स ॲकॅडमीचे फोटो असतात. ते बघून ती समजून जाते कि तिकडे तो सेटल झाला आहे.
A Death In The Gunj (Amazon
A Death In The Gunj (Amazon Prime)
(Gunj as in लापतागंज)
विक्रांत मॅसी (उच्चार?) आणि लोकेशनसाठी हा सिनेमा नक्की बघा.
एका फॅमिलीच्या आठवड्याभराच्या सुट्टीतली कथा आहे. म्हातारे अंकल-आंटी ते ६-७ वर्षांची मुलगी असे सगळे अंकल-आंटीच्या घरी जमलेले असतात. (प.बंगालमधलं कुठलंतरी 'गंज' गाव दाखवलंय, मला त्याचा उच्चार अजूनही कळलेला नाही. ) पानगळीचा मोसम, मस्त थंड हवा, आसपास गर्द झाडी, शहरीपणाचा मागमूस नाही, सर्वांचा धमाल करण्याचा मूड. त्यात कुटुंबातल्या एका सदस्याच्या मनात काय चाललेलं असतं हे कुणाच्या गावीही नसतं.
छोट्या छोट्या प्रसंगांतून ज्या प्रकारे कथानक उलगडत जातं ते खूप छान आहे. 'डेथ' नक्की कुणाची, हे आपण सतत गेस करत राहतो. सिनेमाचा ओपनिंग सीन त्याला खतपाणी घालतो. (नेटवर काही ठिकाणी ते नाव सांगून टाकलेलं आहे. त्यामुळे बघणार असाल तर नेटवर इतरत्र काहीही न वाचता बघा. )
शेवट येतो तेव्हा प्रेक्षक बेसावधपणे त्यात सापडतात.
मला हा सिनेमा खूप आवडला. लोकेशन अप्रतिम आहे. कॅमेरावर्कमुळे जास्तच लक्षात राहतं.
सगळ्यांची कामं झकास आहेत. भारतीय इंग्लिश, बंगाली, थोडीशी हिंदी अशी मिश्र भाषा आहे.
कोंकणा सेन शर्माचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा आहे म्हणे. कथानक १९७८ सालातलं घेतलंय, बहुतेक सत्यघटनेवर आधारित आहे आणि ती घटना त्या काळातली असावी म्हणून असेल.
वेगळं काही बघायचं असेल तर नक्की बघा.
Prime वर आहे का ?? धन्यवाद
Prime वर आहे का ?? धन्यवाद
कधीपासून बघायचा होता . बघते वेळ मिळाला की
अंतरजालावर मल्याळम चित्रपट
अंतरजालावर मल्याळम चित्रपट "बिर्याणी " बघितला फारच बोल्ड आहे . दिग्दर्शकला सलाम त्याने
नुसताच रियालिस्टिक टच दिला नाही तर पुर्ण चित्रपट एकदम रिअल बनवला आहे त्यामुळे तो जास्त अंगावर येतो व विचार करायला लावतो.
वेगळं काही बघायचं असेल तर
वेगळं काही बघायचं असेल तर नक्की बघा>>>नक्की बघायला आवडेल
मला एजन्ट साई गोविंदा types मूवी सारखा वाटतो आहे (उगाच पोरखेळ) म्हणजे मी ३० मिनिटे पहिला पण ग्रीप येत नाहीये
माबोवरचे लेख वाचून दोन सिनेमे
माबोवरचे लेख वाचून दोन सिनेमे पाहिले.
1. टु लेट -तमिळ- भाड्याने घर मिळवण्यासाठी एका कुटुंबाची वणवण.इमोशनल सिनेमा. संपता संपता कसे डोळे पाणावतात कळत नाही.
2. ऐन्ड्रॉइड कुंज्जप्पन 5.25- मल्याळम- आवडला. हलकेफुलके विनोद, केरळच्या गावातील हिरवेगार चित्रीकरण आणि मोजकेच पात्र असुनही अप्रतिम अभिनय गुंतवून ठेवतात. मि.भास्करन ची (म्हातारे वडील) भुमिका द ग्रेट इंडियन किचनमधल्या नायिकेच्या नवर्याने केली आहे. छान अभिनय केला आहे.
दोन्ही सिनेमे प्राईमवर आहेत.
एजंट साई सुरुवातीला खूप स्लो
एजंट साई सुरुवातीला खूप स्लो आहे. मलाही बंद करावासा वाटला होता.
पण नंतर १ डेड बॉडी आल्यावर स्पीड येतो.
संदीप और.. फारच सरधोपट घेतला
संदीप और.. फारच सरधोपट घेतला आहे. अजुन उत्कन्ठावर्धक करायला पाहिजे होता.
संदीप और.. फारच सरधोपट घेतला
संदीप और.. फारच सरधोपट घेतला आहे. अजुन उत्कन्ठावर्धक करायला पाहिजे होता. -- +12345
पण त्या office manager च्या प्रसंगाला फारच भिती आणि राग आला.. अर्जुन कपूर फारच अनफिट वाटला.
Death In The Gunj -- येस बरोबर लिहिले आहे.. फार मस्त टेकिंग.. डिस्टर्ब करतो सिनेमा.. विक्रांत चा अभिनय एकदम भारी.. आणि बाकी सगळे लोक पण चपखल घेतले आहेत..मी १ १.५ वर्षांपूर्वी पाहिला होता.
डेथ इन गंझ बघतो.
डेथ इन गंझ बघतो.
डेथ इन अ गंज च्या आधी
डेथ इन अ गंज च्या आधी लापतागंज नावाची मालिका आली होती का ?
पिंकी फरार मधे ज्यांना ठ कपूर आवडला आहे त्यांची मतं त्यांना बाळगण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यांना आवडला त्यांचा प्रश्न. पण ठकुमार हा ठ असल्याने रोल मधे फिट झाला हे अचाट आहे. अशा प्रकारचे रोल्स अनेक कसलेले अभिनेते करू शकतात. या रोलमधे नवाजुद्दीन, दिवंगत अभिनेता इर्फान यांनी जान ओतली असती. त्या भूमिकेचे बेअरिंग सांभाळूनही आवश्यक त्या ठिकाणी उत्तम अभिनयाची आवश्यकता होती. ठ हा प्रत्येक सीन मधे ठो राहिला आहे.
राजकुमार राव, फुकरे आणि रुही मधला विनोदी अभिनेता (नाव लक्षात नाही) हे सुद्धा चालले असते. बरेच आहेत. पंकज त्रिवेदी वयाने जास्त वाटला असता इतकेच.
Kamali From Nadukkaveri हा
Kamali From Nadukkaveri हा चित्रपट amazon prime वर पाहिला. First Half मस्त जमलाय. सहसा ग्रामीण भागातील चित्रपट मी रिलेट करू शकत नाही, त्यामुळे फारसे आवडत नाहीत. (अपवाद सैराट ) पण या चित्रपटातील छोट्याशा खेड्यामधील वातावरण आवडले. कमली, तिचे कुटुंबीय, तिची शाळा, तिची खास मैत्रीण आणि तिचे mentor/ tutor सगळीच भट्टी मस्त जमलीय.
second half मात्र अगदीच गंडलाय... विशेषतः IIT मधले प्रसंग, तरीही one time watch movie आहे.
सरदार का ग्रँडसन कोणी सुचवला
सरदार का ग्रँडसन कोणी सुचवला होता? धन्यवाद.. खूप सुंदर चित्रपट... नीना गुप्ता आणि अर्जुन कपूर दोघेही मस्त...
अर्जुन च्या acting च्या मर्यादा आहेत पण स्क्रिप्ट सुंदर...
फॅमिली बरोबर बसून बघू शकतो असा चित्रपट आहे..
सरदार का ग्रँडसन कोणी सुचवला
सरदार का ग्रँडसन कोणी सुचवला होता? धन्यवाद.. खूप सुंदर चित्रपट..
पुन्हा एकदा... हा उपरोध आहे का?
Pages