चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठकुमार हा ठ असल्याने रोल मधे फिट झाला हे अचाट आहे.
>>>>>
हे अ‍ॅक्चुअली वर्क करते. दिग्दर्शक तसा विचार करतो. कारण जे नॅचरली असते त्याला अभिनयही बरेचदा मात देऊ शकत नाही.
सैराटसाठी जेव्हा नागराज मंजुळे यांनी दोन नवे चेहरे घेतले तेव्हा त्यांच्या अभिनयाच्या आधी त्यांची नैसर्गिक शैलीच त्या रोलला सूट होईल का हे बघितले असेल ना.
तसेच एखाद्या एस्टॅब्लिशड हिरोकडे पाहूनच जर पब्लिकच्या डोळ्यासमोर त्याचे कॅरेक्टर येत असेल तर डायरेक्टरला ते डेव्हलप करायला फार मेहनतही करावी लागत नाही.

अर्थात हे सारे कपूर खान कुमार वगैरे स्टार किड्स असतात. त्यांना चित्रपट ओळखी आणि रिलेशनवरही मिळत असतील. त्या केसमध्ये हा वादही व्यर्थ आहे. त्यांचे पिक्चर, त्यांचा पैसा, कोणाला द्यायचा, कोणावर लावायचा, ते ठरवतील. आपल्याला रुचले तर बघायचे, नाही तर सोडायचे Happy

पण एखाद्या गोलमालमध्ये तुषार कपूरही धमाल उडवू शकतो वा धूममध्ये उदय चोप्राही छान वाटू शकतो. त्यामुळे अभिनय म्हणजेच सर्व काही नाही. अन्यथा किंग खान शाहरूख खान बॉलिवूडचा सुपर्रस्टार नसता Happy

पण एखाद्या गोलमालमध्ये तुषार कपूरही धमाल उडवू शकतो वा धूममध्ये उदय चोप्राही छान वाटू शकतो. त्यामुळे अभिनय म्हणजेच सर्व काही नाही. >>>>>- स ह म त

ओके Happy

सरदार का ग्रँडसन कोणी सुचवला होता? धन्यवाद.. खूप सुंदर चित्रपट..
पुन्हा एकदा... हा उपरोध आहे का?
>> चांगला आहे चित्रपट...

मी गुंडा पाहिला नाही. पण अतर्क्य आणि अचाट आहे असे ऐकलेय. पण टू बॅड ईझ एक्वल टू गूड असे काहीतरी ईंग्लिशमध्ये म्हणत गुंडा खरोखर आवडणारी लोकं पाहिली आहेत मी. त्यामुळे चित्रपटाचा दर्जा आपल्याला कसा वाटतो यावरून तो कोणाला चांगला वाटेल वा वाईट हे आपण ठरवू शकत नाही.

गुंडाबद्दल काही बोलत नाही नाहीतर लोकं मारायला येतात मग. पण पाआ, जल्लाद म्हणजे ज्यात तो गुलाम किंवा तत्स्वरुप असतो आणि पायरी पायरी चढत जाऊन मालकाच्याच डोईजड वगैरे होतो असेच काहीतरी आहे तोच का? बरीच युगे लोटली आहेत आता मिथुनचे चित्रपट पाहून Wink

अमावस.
ज्यांना इतरांना न आवडलेले चित्रपट आवडतात त्यांनाही तो अचाट वाटतो. आता शाहरूखला मिथुनचा झब्बू.

पिंकी फरार काहि झेपला नाही फारसा आवडलाही नाही.

अहान मात्र फार सुंदर मुव्ही आहे (नेफ्लिवर) बहुतेक अमितव यांनी सुचवला होता. एकदम आवडला. गोड आहे तो मुलगा अहान.

डेथ इन अ गंज पाहिला. फार बोर वाटला मला. अर्ध्यात सोडणार होते. पण दिडच तासाचा होता म्हणून पूर्ण पाहिला. नाही आवडला.

रीमा लागू, मोहन जोशी,ह्रिषीकेश जोशी ह्यांचा होम स्वीट होम हा मराठी सिनेमा बघितला. रीमा लागू ह्यांचा हा शेवटचा चित्रपट आहे (मराठी )
चित्रपट आवडला.
सुरवातीला रीमा लागू आणि मोहन जोशी ह्यांचे त्यांचे जुने घर विकण्यावरून होणारे वाद बघता काहीतरी टिपिकल सिनेमा आहे असं वाटतं होतं. पण कथा वेगवेगळे वळण घेते आणि चित्रपट संपताना आपल्या राहत्या घराबद्दल आपण एक वेगळा विचार करायला लागतो.
स्पृहा जोशी हिचे पात्र अनाठा यी वाटले. ती नसते तरी चित्रपट छानच वाटला असता.
ह्रिषीकेश जोशी नेहमी प्रमाणेच मस्त. तो ह्या चित्रपटचा दिग्दर्शकही आहे.
चित्रपट डेसनी हॉटस्टार वर आहे.
वरील मत ही माझी वयक्तिक मत आहेत.
ज्यांना हा चित्रपट आवडला नाही किंवा वरील लिहिलेल्या मताशी ते सहमत नसतील तर उगाच वाद घालू नये.

इथे वाचून संदीप और पिंकी फरार बघितला. आवडला. परिणीती चोप्राने छान केलंय काम. शेवटी मात्र अचाट आणि अतर्क्यपणा वाटला. (वरातीतला प्रकार)

Witches आणि संदीप-पिंकी पाहिले या विकांताला.
दोन्ही आवडले.
Anna Hathaway कधी-कधी आवडते, इथैही आवडली.
परिणीती , खूप छान दिसतेय. अर्जुन फिट्ट वाटला.

अभिनय म्हणजेच सर्व काही नाही.>>माझ्या सारख्या काहिन साठी अभिनय हा एकमेव मापदण्ड आहे.
शाखा ला अभिनय येतो, त्याची तुलना उदय चो आणि ठ कुमार शी करायची काहि गरज नाही. उगाच इथे धुरळा उडवण्यासाठी फालतू प्रतिसाद देउ नका.

अननोन (Unknown) बघितला.
एक बायोकेमिस्ट डॉ. मार्टिन हॅरिस (लीअम नीसन) आणि त्याची बायको जर्मनीत बर्लिनला एका कॉन्फरन्ससाठी आलेत. या कॉन्फरन्स मध्ये डॉ. हॅरिसचा जर्मनीतील एक शास्त्रज्ञ मित्र एका अरब प्रिंसच्या आर्थिक पाठबळातून एक ग्राऊंड ब्रेकिंग रिसर्च पब्लिश करणार आहेत. डॉ. हॅरिसची बायको कॉन्फरन्स असलेल्या हॉटेलात चेक-इन करते पण हॉटेलच्या दारातुन सामान घेऊन शिरता शिरता डॉ. हॅरिसच्या आपण आपली ब्रिफकेस एअरपोर्टवर विसरल्याचे लक्षात येते, आणि म्हणून ते ताबडतोब दुसरी टॅक्सी करुन परत एअरपोर्टवर जायला निघतात. टॅक्सी ड्रायव्हरला पटकन पोहोचायचं आहे याचे जाणिव करुन देतात आणि एक अघटीत अपघात घडतो आणि टॅक्सी नदीत पडते. चार दिवसाच्या बेशुद्धीतुन जागे झाल्यावर थोड्या प्रयत्नाने आपण कोण आहोत हे डॉ. हॅरिसना आठवते, पण परत हॉटेल मध्ये गेल्यावर आपल्या जागी दुसराच डॉ. हॅरिस आलेला बघुन अचंबा, राग आणि काही तरी काळंबेरं असल्याचा संशय येतो. त्या दुसर्‍या व्यक्तीकडे सगळे पुरावे असतात, बायकोही ओळख दाखवत नाही.. आणि आपल्या आणि हॅरिसच्या मनात गोंधळ वाढत जातो.
या प्रकरणाचा छडा लावताना काय काय गोष्टी घडतात याचा श्वासरोखून अनुभव म्हणजे अननोन. शेवट अर्थातच संपूर्ण अतर्क्य आणि आपण कल्पिलेल्या शक्यतांच्या विपरीत घडतो. शेवटा पर्यंतचा प्रवास आणि प्रत्यक्ष शेवट दोन्ही उत्कंठावर्धक असल्याने दीड तास मजेत जातो.
मला आवडला चित्रपट.
नेटफ्लिक्सवर आहे.

Wrath of Man
आज दोन महिन्यांनंतर नवीन सिनेमा पाहिला. जेसन स्ट्याथमचा असल्याने धडामधूम करमणुक झाली.

प्राईमवर शेरनी पाहिला. नायक, नायिका असे काही केंद्रस्थानी नसलेला, पटकथा हीच नायिका असलेला अतिशय वेगळा चित्रपट आहे. तितकाच उत्कंठावर्धक आहे. चार पाच वर्षांपूर्वी एका वाघिणीची शिकार (महाराष्ट्रात) केल्याच्या घटनेची पार्श्वभूमी आहे. या घटनेच्या वेळी तापलेले वातावरण आणि नंतरही झालेले खुलासे याचे सर्व कंगोरे याचा परामर्श चित्रपटात आहे.

फॉरेस्ट ऑफीसर्सना कशा पद्धतीने काम करावे लागते, स्थानिक राजकारण, स्थानिकांच्या अडचणी, वरीष्ठ पातळीवरचे राजकारण हे प्रभावी हाताळले आहे. विद्या बालन कुठेच तिच्या नेहमीच्या सुपरवूमन इमेज मधे नाही. सर्वांची कामे उत्तम.

अभिनय म्हणजेच सर्व काही नाही.>>माझ्या सारख्या काहिन साठी अभिनय हा एकमेव मापदण्ड आहे.
>>>>>>
ती तुमची पर्सनल चॉईस आहे. माझी पोस्ट पुन्हा वाचा, यशस्वी होण्यासाठी अभिनय हाच एक मापदंड नाही. अन्यथा सलमान खान बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक पैसे खेचणारा कलाकार नसता Happy तो नक्कीच बॉलीवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता नाही, म्हणजे त्यात अभिनयापलीकडे काहीतरी आहे जे लोकांना भावते Happy
असो, जमल्यास स्वतंत्र धागा काढतो, तिथे नक्की यावर बोलूया Happy

Sandip and pinky farar पाहीला...
टिपिकल मसाला मूवी पेक्षा वेगळी....
आवडली....

जुना सिंहासन सिनेमा यु ट्युब वर सजे शन मध्ये आला तो पाहिला. १९७९ मध्ये आला तेव्हा इतका समजला नव्हता पण काहीतरी फार भारी आहे असे घरातील व विशेषतः आमच्या माना ने मॉडर्न संसार असलेल्या काकांच्या वगैरे प्रतिक्रियांमधून वाटले होते. नंतर सिंहासन पुस्तक वाचले आता सध्या तर रिपीट मोड मध्ये आहे हे बुक्क. पण फार मोठी नावे असून ही सिनेमा चक्क सुमार आहे. सर धोपट मां ड्णी, वाइट म्हणजे इतके चांगले गोळी बंद व मर्यादित पण ग्रेट कथा वस्तू अस्लेले ह्या अर्थाने मर्यादित की प्रत्येक पात्राची कथा - आर्क सुरू करून व्य्वस्थित बंद केली आहे. व मुंबई वर्चे भाष्य आता इतक्या वर्शानंतरही अगदी अ‍ॅप्ट आहे. ( मराठी शब्द सापडला नाही) मला इथे राहताना काय ज्या बाबी खटकतात समजत नाहीत त्या पुस्तकात बरोबर सांगितल्या आहेत.

इतके चांगले पुस्तक पटकथा करताना तेंडुल करांनी अक्षरशः कथा मोडून तोडून इथ्ते तिथे जोडली आहे. नवी पात्रे घुसडली आहेत. काही पात्रे मर्ज केली आहेत उदा विनीता व नीला ह्या डिकास्टाच्य अनुक्रमे गर्ल फ्रेंड व सिक्रेट क्रश अगदी वेगळ्या बॅक ग्राउंड मधल्या मुली पण इथे त्यांचे एकच पात्र केले आहे. ते ही धेड गुजरी. ना धड अपर क्लास ना धड गरीब मध्यम वर्गीय. व रघू नावाचे पात्र त्याला सुनावून जाते ते संवाद ह्या सेक्रेटरीच्या पात्राला दिले आहेत.

अशी फार उदाहरणे आहेत नावाला सिंहासन चे चित्रपट रुपांतर आहे. पण बाकी सगळा आनंदच. दिग्दर्शन पण काही फार चमकदार विशेष असे नाही. निराशाच झाली. पुस्तकच वाचा लोक्स मुव्ही बेकार बनली आहे. नाही म्हणायला एका सीन मध्ये तीन लोक मीच मुख्य मंत्री
व्हायला कसा लायक आहे ते सांगतात ते सद्य परिस्थितीशी साम्य दाखवते. मजेशीर वाट्ते सध्याच्या संदर्भात.

रीमा लागू, नाना पाटेकर अगदी तरूण दिसतात . रीमा खूप छान दिसते. पण तितकेच . काही काही पात्रांना एक एक सीन दिले आहेत.

पानीट कर बायकोला डोक्याला तेल लावुन दे सांगतो ते हिलेरिअस वाटले मराठी लोकांचा रोमान्स. असाच होता पूर्वी.

अरूण सरनाईक सीएम म्हणून शोभतात. काही काही संवाद छान आहेत. उषःकाल होता होता हे गाणे आव्डते पण सिनेमात ते उगीच इथे तिथे मारले आहे. किशोर वझे चे पात्रच नाही. सिल्व्हिया वगैरे अनुल्लेखने मारले आहेत. व मूळ कथा वस्तूत पण मनमाने बदल केले आहेत. माझे पुस्तक असते तर मी नक्की खटला भरला असता. असो.

अमा, अगदी १००% अनुमोदन. सिंहासन हे पुस्तक मराठीतील वाचलेच पाहिजे अशा प्रकारचे पुस्तक आहे. एकदा वाचून समाधान होत नाही. त्यामानाने सिनेमा अगदीच बाळबोध व सुमार झाला आहे.

सिंहासन चित्रपट आता फारसा आठवत नाही पण नाव सिंहासन असले तरी तो "सिंहासन" पेक्षा "मुंबई दिनांक" वर जास्त आधारित आहे असे वाचले आहे.

सामान्यतः पुस्तक आधी वाचलेलं असेल तर चित्रपट आपल्याला तेवढा प्रभावी वाटत नाही असं बऱ्याच वेळा होतं. यावरून एक गंमत आठवली. माझ्या मुलाने हल्लीच हॅरी पॉटरची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आधी पुस्तक वाचून मग तोच सिनेमा बघायचा असं करतोय. तर एक सिनेमा सुरू झाला आणि हा म्हणाला, आपण चुकून ट्रेलर नाही ना लावला? Lol

अमा, शंभर टक्के अनुमोदन...

'सिंहासन' माझ्या आवडत्या पुस्तकातील एक पुस्तक आहे.. तुम्ही जसं सांगितलतं तसचं माझ्या एका मैत्रणीने मला सिनेमा न बघण्याचा सल्ला दिला होता आणि आजपावतो मोह होत असूनही कटाक्षाने हा सिनेमा पाहण्याचं मी टाळत आलो आहे.. तुमचा वरचा प्रतिसाद वाचून आता पाहण्याचा मोहच होणार नाही आणि हे बरचं झालं म्हणायच नाहीतर अपेक्षाभंग आणि पश्चाताप वाटेला आला असता..

तसंही पुस्तक वाचलेलं असताना मनात पात्रांची कल्पना आपण केलेली असते आणि सिनेमा आपल्या कल्पनेच्या आसपास नसला तर अपेक्षाभंग होतो..

चेतन भगतचं Two States वाचताना सुशांत आणि असिन ह्या कलाकारांच्या जवळ जाणारा चेहरा डोळ्यासमोर येत होता पण सिनेमा आला तेव्हा संपूर्ण कास्टींगच (रेवती सोडून) गंडलेली वाटली..

सिंहासन फार पूर्वी बघितलेला, आवडला होता, तसं फार समजलं नव्हतं. अरुण सरनाईक जबरदस्त, निळू फुलेंसाठी वाईट वाटलं, म्हणजे कॅरॅक्टरसाठी. सर्वात रडू आलं, जयराम हर्डीकर मरतो तेव्हा. तो सीन अजुनही आठवतो.

मी शक्यतो सिनेमा आधी बघितला तर मूळ पुस्तक वाचत नाही, कारण मग सिनेमाला न्याय दिला नाही नीट, असं वाटत राहतं. पुस्तक वाचलं असेल तर सिनेमा टाळते, उगाच रसभंग व्हायचा. नॉट विदाऊट माय डॉटर हा पिक्चर आधी बघितला त्यामुळे पुस्तक मिळत असून वाचलं नाही. प्रकाशवाटा वाचलंय, उत्तम वाटलं मला. त्यावरचा सिनेमा मात्र बघितला नाही ( टीव्हीवर एकदा थोडा भाग बघितला असं अंधुक आठवतंय ).

Pages