Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
च्रप्स मुद्दाम चार चौघांच्या
च्रप्स मुद्दाम चार चौघांच्या मते जे नॉरमल असेल त्याच्या विरुद्ध लिहितात असे जाणवले आहे.
म्हणजे च्रप्स हे चित्रपट विषयातले "बोकलत" आहेत असे म्हणा ना
काल Dulkar salman चा सिनेमा
काल Dulkar salman चा सिनेमा पहिला, तो एक technical चोर दाखवला आहे लॅपटॉप on line ऑर्डर करून त्याचे पार्टस बदलून ते डुप्लिकेट पार्टस वापरून विकायचे, सिनेमा चं नाव नाही कळलं पण twist अँड turns सॉलिड आहेत कोणी पहिला आहे का?
Kannum Kannum Kollaiyadithaal
नाही.. मी उपरोधाने नाही
नाही.. मी उपरोधाने नाही लिहिले... संदीप आणि पिंकी खरेच मस्त चित्रपट आहे... प्रत्येक चित्रपट मी बायस न ठेवता बघतो... अर्जुन चे जुने चित्रपट असतील फ्लॉप पण हा छान आहे...आता तर भरपूर जनता पण ट्विट आणि इंस्टा करतेय चित्रपट बद्धल...
मायबोलीवर मला बायस खूप आढळतो... लोकांना आवडत नाही म्हणून आपल्याला पण नाही आवडत असे ठरवून टाकतात... इथे लोकांना कपिल शर्मा आवडत नाही.. मला प्रचंड आवडतात त्याचे शो..इथे सचिन ला शिव्या घातल्या जातात, इथे जाहनवी सुंदर नाही म्हणतात( सिरियसली ??) , इथे श्रद्धा कपूर हॉट नसून मुडदूस बाळ असते, मुक्ता बर्वे रुद्रम मध्ये छान काम करते म्हणून प्रत्येक चित्रपटात बेस्ट एकटिंग करते असे ठरवून टाकतात.
मायबोली बायस बद्धल एक धागा यायला हवा खरे तर
मायबोलीवर मला बायस खूप आढळतो.
मायबोलीवर मला बायस खूप आढळतो... लोकांना आवडत नाही म्हणून आपल्याला पण नाही आवडत असे ठरवून टाकतात...
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
च्रप्स सहमत आहे
मलाही चिक्कार अनुभव आहेत याबाबत. सिनेमाच नाही तर क्रिकेट धाग्यावरही असे अनुभव घेतलेत.
मायबोली बायस बद्धल एक धागा यायला हवा खरे तर Happy
>>>>
तुम्हाला स्वतःला काढायचा नसेल तर आज रात्री मी काढू का या संदर्भाने?
गो अहेड... तुम्ही काढा...
गो अहेड... तुम्ही काढा...
च्र्प्स आणि माझे सहसा एकमत
च्र्प्स आणि माझे सहसा एकमत होत नाही पण ह्या सिनेमाबद्दल त्यांना प्रचंड अनुमोदन. मस्त सिनेमा आहे. आता मी मस्त म्हणलं म्हणजे थोडा नायिकाप्रधान आहे सिनेमा - म्हणजे गोष्ट परिणितीची आहे, अर्जुन बिचारा उगीच फसतो त्यात. हिंदी सिनेमात असले सिनेमे फार होत नाहीत. 'चलो दिल्ली' सारखी एक अतिडार्क व्हर्जन म्हणता येईल.
श्रद्धा कपूर हॉट नसून मुडदूस बाळ असते >> + १०० लॉकडाऊन मध्ये तरी जरा ऊन खायचं तर....
(कपिल शर्मा, सचिन आवडतात. मुक्ता बर्वे मुंबई-पुणे मध्ये कंटाळवाणी होती. अर्रर्र च्रप्स आणि माझे कधी कधी एकमत होते की.......)
माझेही खुप वेळा असं होतं
माझे बरेच वेळा असं होतं सगळ्यांना आवडलेले मला आवडलेले नसतं आणि सगळ्यांना न आवडलेले मला आवडलेले असते मग मी काहीच लिहित नाही इथे.
अंदाज अपना अपना, पसंद अपनी
अंदाज अपना अपना, पसंद अपनी अपनी
आपण आपले पाहून एण्जॉय करावेत.
सीमंतीनी... आता तुम्ही लिहिले
सीमंतीनी... आता तुम्ही लिहिले ना की संदीप आणि पिंकी चित्रपट चांगला आहे.. आता लोक पाहतील
मी लिहिले तर मला म्हणे, आवड आपली आपली..
हा हा...
मुक्ता बर्वे मुंबई-पुणे मध्ये कंटाळवाणी होती.
>>>अगदी बरोबर.. आणि बऱ्याच इतर चित्रपटात देखील
इतका पण काय आपला वट नाय.
इतका पण काय आपला वट नाय.
पण हो, हिरो म्हणजे मारधाड-डॅशिंग इ धारणा असणार्या प्रत्येकाने हा सिनेमा बघावा. परिणितीवर हल्ला होतो, मग त्यापुढचे दोन सीन तर 'हिंदी सिनेमातील हिरो' या प्रबंधात एक मैलाचा दगड ठरावा असे आहेत. असा हिरो बघूनच मला इतकं भडभडून आलं. त्या दोघांना यापुढे पाच सिनेमे माफ आहेत माझ्यातर्फे.
परिणीती ला जास्त स्कोप आहे...
परिणीती ला जास्त स्कोप आहे... भरपूर शेड्स दाखवता आल्या आहेत... जसा मीना कुमारीचा पाकिजा, नर्गिस चा मदर इंडिया, कंगना चा क्वीन, बिपाशा चा जिस्म, आलिया चा राझी, तसा हा परिणीती चा संदीप और पिंकी चित्रपट कोणत्याही हिरोईन साठी एक ड्रीम रोल असू शकतो ...
काल पाहिला संदिप पिंकी फरार
काल पाहिला संदिप पिंकी फरार
मला शेवट पण आवडला. परिणीती पण आवडली.
सिनेमा बघताना राहून राहून वाटत होतं..अर्जुन कपूर ने जरा वजन कमी करायला हवं होतं..स्पेशली स्टेजवर नाचताना जास्तच जाणवलं. इशकजादे मधे छान होता तो.
मला परिणती आवडते
मला परिणती आवडते
अर्जुन कपूर २ स्टेटस मध्ये आवडला होता.
बघते.
मला तर अर्जुन कपूरचे नाचणे पण
मला तर अर्जुन कपूरचे नाचणे पण एकदम रियलिस्टीक वाटले. तसे पण कितीतरी पोलिस गुबगुबीत असतात, त्यात परत सस्पेंड झालेले असेल तर व्यायाम वगैरे बोंब होतेच.
ह्या सिनेमावर खरं तर एक वेगळा धागा हवा. पण चित्रपटगृहात फ्लॉप गेल्याने फार लोकं बघणार नाहीत.
माय क्लाएंट्स वाईफ शेवटी
माय क्लाएंट्स वाईफ शेवटी एकदाचा प्राईमवर मिळाला. आधी शोधून का सापडत नव्हता कोणास ठाऊक. याच वेळी एका मित्राने पण हाच मुव्ही शेअर केला.
चित्रपट आवडला. वेगळेच रहस्य आहे. कलाकारांचा अभिनय एकदम चांगला आहे.
कधी कधी prime वर शोधला तर
कधी कधी prime वर शोधला तर सापडत नाही चित्रपट पण गुगल वरून शोधला तर prime वर मिळतो, असे का होते कळत नाही.
हो खुपदा असे झालेय.
हो खुपदा असे झालेय.
प्राईमवर शोधला कि सापडत नाही पण शोधलेला सिनेमा दुसर्या वेळी फ्रंट पेजवर येतो.
प्राईम चा सर्च विचित्रच आहे.
प्राईम चा सर्च विचित्रच आहे. संदिप पिंकी फरार हे नाव सर्च मधे टाकलं तर येतो मुव्ही पण लेटेस्ट हिंदी असं काही टाकलं तर येत नाही.
संदीप और पिंकी फरार... काल
संदीप और पिंकी फरार... काल पाहीला..
स्टोरी चा़ंगली होती पण चित्रपट खुप स्लो आहे.. बोअर व्हायला झालं.. तसंही दिबाकर बैनर्जी चांगल्या कथेची अशीच वाट लावतो..
परिणीतीचा अभिनय आवडला...बाकी अर्जुन कपूर नेहमीप्रमाणे असतो तसाच मख्ख वाटला..
बाकी अर्जुन कपूर नेहमीप्रमाणे
बाकी अर्जुन कपूर नेहमीप्रमाणे असतो तसाच मख्ख वाटला..
>>>>
त्याचे मी सुरुवातीला एकदोन चित्रपट पाहिलेले.. ईशकजादे आणि टू स्टेटस.. त्यात मला चांगला वाटला. म्हणजे तसा मख्खच म्हणून शकतो. पण त्यात ते त्याचे मला बेअरींग वाटले.
नंतर अजून एक दोन चित्रपट पाहण्यात आले. हाल्फ गर्लफ्रेण्ड आणि अजून कुठलासा.. मग कळले की याने हे बेअरींग आय्युष्यभरासाठी होलसेलमध्ये घेऊन ठेवले आहे..
फारसा अभिनय न करणे म्हणजे नॅचरल अभिनय वाटेल या कॅटेगरीतला आहे तो. पण वाईट नाहीये वा अगदीच ठोकळा नाहीये.
त्याचे मी सुरुवातीला एकदोन
त्याचे मी सुरुवातीला एकदोन चित्रपट पाहिलेले.. ईशकजादे आणि टू स्टेटस.. त्यात मला चांगला वाटला. म्हणजे तसा मख्खच म्हणून शकतो. पण त्यात ते त्याचे मला बेअरींग वाटले.
नंतर अजून एक दोन चित्रपट पाहण्यात आले. हाल्फ गर्लफ्रेण्ड आणि अजून कुठलासा.. मग कळले की याने हे बेअरींग आय्युष्यभरासाठी होलसेलमध्ये घेऊन ठेवले आहे..
फारसा अभिनय न करणे म्हणजे नॅचरल अभिनय वाटेल या कॅटेगरीतला आहे तो. पण वाईट नाहीये वा अगदीच ठोकळा नाहीये.>>> सहमत
मग कळले की याने हे बेअरींग
मग कळले की याने हे बेअरींग आय्युष्यभरासाठी होलसेलमध्ये घेऊन ठेवले आहे
हाल्फ गर्लफ्रेंड मध्ये भयाण
हाल्फ गर्लफ्रेंड मध्ये भयाण पकाऊ acting आहे अर्जुन कपूर ची... मी त्याचा तेवर नावाचा चित्रपट देखील पाहायचा प्रयत्न केला होता.. तोंडावरची माशी उडत नव्हती त्यात तर....
औरंगझेब मध्ये छान काम केले आहे त्याने बादवे...
पिंकी फरार चांगला आहे सिनेमा.
पिंकी फरार चांगला आहे सिनेमा. ठ या अक्षराचा उच्चार सारखा केला की मला हसायला येतं. बरेच दिवस विचार करत होतो. मग लक्षात आलं शाळेत मला ठोंब्या म्हणायचे. त्यामुळे ठ हे गोल गोल अक्षर आणि वर दांडी म्हणजे तुळईला शेंडीने टांगलेलं भादरलेलं मस्तिष्कं वाटतं. अर्जुन कपूरला जेव्हां जेव्हां बघतो तेव्हां तेव्हां ठ अक्षर डोळ्यासमोर येतं. इतकं ठ अक्षर अनिल कपूरच्या घरात जन्माला आलं ही कौतुकाची गोष्ट आहे. काकाचा चेहरा इतका बोलका म्हटल्यावर बॅलन्स करण्यासाठी ठ घरात ठिय्या देण्यासाठी ठुमकून बसलाय.
ठकुमार तरी म्हणा सुकुमार
ठकुमार तरी म्हणा सुकुमार सारखं.
पिंकी फरार आवडला. खास करून परिणितीचं काम व तिचं पात्र. "I have a gold medal in mathematics, I am not your local छमिया, मुझे उसे बतानेकी जरूरत नही की मै प्रेग्नंट हुं" हे संवाद मस्तच...
'परिचय' म्हणून जो कुणी आहे तो ठ कुमार पेक्षाही बेकार आहे. अगम्य हातवारे ,मान हलवणे आणि शून्य भाव काहीच न बोलणे काय करतो माहिती नाही... श्रूड बिझनेसमन , बुद्धिमान , धूर्त यापैकी काहीही वाटत नाही , त्याच्यामुळे मंद सिनेमा महामंद होतो.
प्राईमवर द इल्लीगल (The
प्राईमवर द इल्लीगल (The Illigal) पहिला.
चित्रपट पाहताना अनेकदा डोळे पाणावले.
शेवट बघून तर मन फारच दुःखी झाले.
बऱ्याच जणांना डिप्रेसिंग वाटू शकतो.
पण जीवन हे नेहमीच आनंददायी असते असे नाही.
आणि तुम्हाला जे हवं आहे ते मिळतच असं नाही.
असो.
टीप : वरील मते ही माझी वैयक्तिक मते आहेत.
त्यावर मतमतांतर असू शकतात त्यामुळे उगाच विनाकारण वाद घालत बसू नये.
संदीप पिंकी फरार एकदम आवडला.
संदीप पिंकी फरार एकदम आवडला. शेवट तर खूपच आवडला.
परिणीतीच काम भूमिका संवाद सगळंच आवडलं. अर्जुन कपूर ही खटकला नाही, म्हणजे त्या भूमिकेसाठी मठ्ठ्या बेरिंगची गरज असल्याने त्याला अभिनयाला काहीच वाव न्हवता. वर म्हटलंय तसं हिंदी मध्ये असे चित्रपट आले पाहिजेत.
स्टोरी टेलिंग आवडलं.
संदीप पिंकी फरार पाहिला..
.
इथे वाचून मी पण पिंकी अँड
इथे वाचून मी पण पिंकी अँड संदीप पहिला, आवडला मला पण, तो जो scene आहे जेव्हा त्या मुलांना शूट करतात आणि अर्जुन कपूर गाडी मागे घायला लागतो गाडी फुल्ल्ल्ल्ल रिव्हर्स मध्ये आणि आपण १ मिन ब्लॅक एक्साक्टली काय झालं आहे, मग तो तिला खाणकारुन २ वाजवतो टिपिकल हिंदी मूवी च्या बाहेर वाटलं मला हे सगळं असे सिनेमा अजून बनले पाहिजेत बाकी acting मला दोघांची आवडली
Netflix वर पेंग्विन ब्लूम
Netflix वर पेंग्विन ब्लूम पाहिला. छान आहे.
Pages