Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता The Time Traveler's Wife,
आता The Time Traveler's Wife, The Astronaut's Wife, My Client's Wife बघायच्या यादीत आहेत.
The Time Traveler's Wife >>
The Time Traveler's Wife >>
मी पाहिलायं ,वेगळाच आहे. आवडला की नाही कळलं नाही.
एवढ्या wives आहेत माहिती नव्हतं. Wife वरून आठवलं मी साहेब बिवी और गँगस्टर दोन्ही पाहिले. आवडले.
हो अस्मिता. साहिब, बिबी और
हो अस्मिता. साहिब, बिबी और गॅंगस्टरचे दोन्ही भाग चांगले आहेत. जिमी शेरगिलचा प्रश्नच नाही. पण माही गिल आणि सोहा अली खानचं पण चांगलं काम आहे.
एवढ्या wives आहेत माहिती
एवढ्या wives आहेत माहिती नव्हतं. >>> अजून बऱ्याच आहेत. Wife आणि wives अश्या दोन प्रकारात चित्रपट आहेत.
नेटफ्लिक्सवर हळदीकुंकू
नेटफ्लिक्सवर हळदीकुंकू कार्यक्रम पाहिल्यासारखं वाटतयं .... कोण कोण आलं होतं याचे उत्तर होऊ शकते ही यादी ....!!
हो माझेमन आणि इरफान खान !!
<<साहिब, बिबी और गॅंगस्टरचे
<<साहिब, बिबी और गॅंगस्टरचे दोन्ही भाग चांगले आहेत. जिमी शेरगिलचा प्रश्नच नाही. पण माही गिल आणि सोहा अली खानचं पण चांगलं काम आहे.>>
हो. तिसरा भाग पण चांगला आहे. .
माय क्लाएंटस वाईफ भयंकर
माय क्लाएंटस वाईफ भयंकर बकवास आहे.
बघून नवर्याला आणि मला " का का का" असे झालेय!
एकतर फारसं बघायला वेळ मिळत नाही, आणि आम्ही हा पिक्चर कसा आ णि का सुरू केला देव जाणे!
आता कानाला खडा - ट्राईड आ णि टेस्टेडच (रिव्युज बघून) बघायचे!
A fall from grace आजच पाहिला.
A fall from grace आजच पाहिला. आवडला. चांगला suspense आहे, थोडीशी कल्पना येते पण तरी must watch. इथे त्याबद्दल वाचलं नसतं तर कधी पाहायचा विचार नसता केला. या धाग्यामुळे वेगवेगळ्या चित्रपटाबद्दल माहिती कळते. Otherwise इतके प्लॅटफॉर्म आणि इतकं ott content आहे की नेमकं काय पाहावं हेच कळत नाही.
नानबा, आम्ही पण रिव्ह्यू
नानबा, आम्ही पण रिव्ह्यू वाचूनच पाहिला
लोकांनी 8/10 वगैरे दिलेत
नंतर घरातले लोक म्हणाले की ते चांगले रिव्ह्यू हा ' मारुतीच्या बेंबीत बोट घालुन बघ, गार गार वाटतं' वाला प्रकार आहे.
मी पण लोकांना चांगलेच रिव्ह्यू देते काय माहीत एखाद्याला खरोखर आवडला तर..तो मुकायला नको.
लोकांनी बारोत हाऊस नावाच्या त्या भंगार विकृत सिनेमाला चांगले imdb रिव्ह्यूज देऊन माझ्या आयुष्यातलया दीड तासाचं नुकसान केलंय.
My client स wife चांगला तर
My client स wife चांगला तर आहे, छान सस्पेन्स मेंटेन आहे.. आणि मस्त clue आहेत, दुसऱ्यांदा बघितला तर कळते ( उदाहरण - तुम्हारे माथे की पट्टी कहा गइ? वो मुझे याद नही रहा...)
त्या वोचमन ची रियाक्षण.. भरपूर मस्त क्लू आहेत...
वेगळ्या प्रकारचा पिक्चर आहे
वेगळ्या प्रकारचा पिक्चर आहे तो.
कथेतलं नावीन्य याबद्दल नक्की बघावा.
बारोत हाऊस मात्र अजिबात बघू नये.कोणीच.
करेक्ट अनु, एकदम ओरिजिनल
करेक्ट अनु, एकदम ओरिजिनल स्क्रिप्ट आहे...
Chrapsa, amhala madhe madhech
Chrapsa, amhala madhe madhech hukalela vatala.. Suspense rakhala ahe, pan ajibatach nahi bhavala, esp. Shevatamule.
Tumhee rahasya mhanalat te picture baghatana kalal ki.. Mag watchman "maine voh nokri chod diyi hai" ka mhanato? That is misleading.
Nidan nusate "nokari chod di hai"mhanala asata tari chalale asate.
फॉरींन च्या मर्डर मुवीपेक्षा
फॉरींन च्या मर्डर मुवीपेक्षा साऊथ मर्डर मुवि जरा पटणार्या असतात
दोज हु विश मी डेड - पोलिटिकल
दोज हु विश मी डेड - पोलिटिकल थ्रिलर म्हणु शकतो, कारण पटकथेची सुरुवात एका पोलिटिकल इवेंटमुळे होते, ज्याचं स्पष्टिकरण विस्ताराने चित्रपटात कुठेच येत नाहि. त्याची गरज हि वाटत नाहि इतका हा चित्रपट धावता/एंगेजिंग ठेवला आहे. यातंच दिग्दर्शकाचं यश आहे, नाहितर हल्ली पाहिलेले टाकाउ मराठि चित्रपट...
एंजलिना जोली, एडन गिलन (लिटलफिंगर) प्रमुख भूमिकेत आहेत. लहान मुलाने (फिन लिटल) हि काम चाबुक केलं आहे. वेळ काढुन बघा; एचबिओवर आहे...
काही पटणाऱ्या चित्रपट
काही पटणाऱ्या चित्रपट समीक्षकांचे ऐकून दोन तमिळ चित्रपट पाहिले - असुरण आणि कर्नाण. दोन्ही चित्रपट धनुष ह्या अभिनेत्याचे आणि खूप चांगले IMDB रेटिंग मिळालेले. मला हे दोन्ही चित्रपट फारच हिंसक वाटले. तमिळ चित्रपटातली हिंसा अंगावर येते. कर्नाण चित्रपटात एका प्रसूत होणाऱ्या बाळंतिणीच्या विव्हलण्याच्या पार्श्व संगीतात गावकऱ्यांना होणाऱ्या मारहाणीचे दृश्य बघवत नाही. असुरण चित्रपटात लहान मुलांच्या हातून घडणारे हत्येसारखे गुन्हे पण तसेच. एकूणच तमिळ लोकांची मनोरंजनाबद्दलची कल्पना वेगळी असेल असे वाटते. त्या मनाने मल्याळम आणि तेलगू चित्रपटांचा दर्जा बराच उच्च वाटतो.
झदा, ते दोन्ही मूव्ही
झदा, ते दोन्ही मूव्ही भारतातल्या जात वास्तवाच्या नजरेने पाहा फरक कळेल.
इथली चर्चावाचुन 'माय
इथली चर्चावाचुन 'माय (क्लायंट्स) वाईफ' बघितला. रहस्य कळल्यावर हाय रे कर्मा फील आलं. पण नंतर बॉलिवुडस्टाईल चमच्याने भरवल्यावर परत मागचे तपशील आठवावे लागले आणि चांगला आहे. किमान वेळ फुकट दवडल्याचा आलेला फील निघुन गेला.
च्प्र्स म्हणतात तसे क्लू पेरलेले आहेत. ते बेडवर पुलिस, वकिल इ. अनेकांना निजवणे इ. अपील झाले. पण आधी शेवट ठरवुन मग पेरायचे म्हणून क्लू पेरलेलं रिव्हर्स इंजिनिअरिंग फारच उघड उघड दिसतं. कुठल्याही सस्पेन्स कहाणीत हेच जरी करत असले तरी ते गोष्टीशी अजुन जरा मिळुन आलेलं असतं. असं वेगळं जाणवत नाही. कन्सेप्ट चांगला आहे. अजुन सफाईदार पणा हवा होता. अंजली पाटील नेहेमीच आवडते., तशीच इथेही आवडलीच.
आता अनुच्या आग्रहाखातर बारोत हाउस शोधायला हवा
प्लिज प्लिज प्लिज तो बघू नका.
प्लिज प्लिज प्लिज तो बघू नका.
5 लहान मुलांचे खून अत्यंत कॅज्युअली दाखवणारा, प्रमोट करणारा पिक्चर माझ्यामुळे व्ह्यूज वाढवू नये.कोणी लहान मूल बघत असल्यास त्यातून विपरीत आयडीयाज मिळू शकतात(लहान मुलांनी कोणता कंटेंट बघावा हे 100% कडकपणे नियंत्रित करता येत नाही.)
ओह्ह असा आहे का! मग नको.
ओह्ह असा आहे का! मग नको.
ण आधी शेवट ठरवुन मग पेरायचे
ण आधी शेवट ठरवुन मग पेरायचे म्हणून क्लू पेरलेलं रिव्हर्स इंजिनिअरिंग फारच उघड उघड दिसतं. >>> सेम हिअर. शेवट आवडला नाही. रेअरेस्ट विकृतीवर रहस्य अवलंबून असेल तर मला ते आवडत नाहीत.
पण माय क्लायंट्स वाईफ मजेशीर
पण माय क्लायंट्स वाईफ मजेशीर आहे.एकदा नक्की बघावा त्या शरीब हाशमी आणि अंजली साठी तरी.
आम्ही पिक्चर भर इतके तर्हेतर्हेचे तर्क केले की आता फक्त 'दिग्दर्शक भूत आहे' हाच तर्क बाकी होता.
सध्याच्या काळात बघून, बरेच चांगले कलाकार असूनही न आवडलेला म्हणजे रूम नं ७०६.
दिग्दर्शक भूत आहे
दिग्दर्शक भूत आहे
माय क्लाएंटस वाईफ हा चित्रपट
माय क्लाएंटस वाईफ हा चित्रपट कुठे पहायला मिळेल? प्राईमवर आहे का?
माय क्लाएंटस वाईफ हा चित्रपट
माय क्लाएंटस वाईफ हा चित्रपट कुठे पहायला मिळेल? प्राईमवर आहे का?
प्राईम वर
प्राईम वर
त्यात काही विकृती वगैरे वाटलं
***********स्पॉयलर ************ माय क्लाएंट्स वाईफ ************************************
त्यात काही विकृती वगैरे वाटलं नाही. हिट्रोसेक्शुअल नवरा बायकोत होतो त्या सेक्स मध्येही काही सत्कृती वगैरे वाटत नाही. इट इज व्हॉट इट इज. कंसेंट मात्र हवा. सायकॉलॉजीकल अवस्था. त्याच्याकडे फिफ्टी शेडस ऑफ ग्रे पुस्तक दाखवल्यावर मात्र काहीतरी निराळं असणार अशी कुणकुण लागलेली. आम्ही पण चिक्कार तर्क लढवले. इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया वाचुन घोडं चौखुर उघळून तर्क लढवले. पण रहस्याची उकल बरोबर जमली नाही. सो मजा आलीच.
सुरुवातीपासून त्या लॉयरचा झगरी मगरी काळा डगला बघुन मी हज्जारदा कमेंट केली की हौशी दिसतोय. परत त्या वरच्या ट्रंकांत मेलेल्या प्रेतांची तोंडं किमान हातापायाची बोटं वगैरे तरी मिळतील याची मला खात्री होती. मेलेली तोंडं, किंवा फक्त तोंडाची स्किन कातरुन घेतलेली दिसली असती तर आमच्या आर्याची आठवण काढून मी हळहळायचं पण ठरवलेलं. पण कसचं काय!
*****************\एन्ड
मला विकृत वाटलं ते.
मला विकृत वाटलं ते. सायकॉलॉजिकल डिसऑर्डर. जी खूप कमी प्रमाणात दिसते. अशा गोष्टींचा वापर रहस्याचा अंदाज होऊ नये हे ठरवून वापरले जाणे हे मला तरी आवडलं नाही. ज्याची त्याची आवड. खूप महिन्यांपूर्वी पाहिलेला आहे. त्यामुळे आता नीटसा लक्षात नाही.
शब्बीर हाश्मी इतका फेमस आहे
शब्बीर हाश्मी इतका फेमस आहे माहित न्हवतं. बाकी अंजली पाटील +१. ती बेस्ट आहे. आपटे बाईंचे/ अमृता सुभाषचे सगळे रोल हिला द्या असं नेहेमी वाटतं.
स्पॉयलर देऊ नकारे(
स्पॉयलर देऊ नकारे(#सगळ्यांनीसारखेचसफरव्हावे )
Pages