चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता फक्त 'दिग्दर्शक भूत आहे' हाच तर्क बाकी होता. >>> Lol

यावरून आठवले, मोहब्बतें मधे शाखाही भूत आहे असा एक पर्स्पेक्टिव्ह माबोकर नंदिनी ने मांडला होता. तो ही एकदा नीट चेक करायला पाहिजे.

असुरन हा धनुषचा चित्रपट तमिळ सबटायटल्स सहीत पाहिला होता. आता प्राईम वर हिंदीत आहे. युट्यूबवर त्याचे संवादच बदलून ठेवलेले आहेत.

कर्णन नावाचा चित्रपट खूप बोलबाला झाल्याने पाहिला. प्राईमवर आहे पण तमिळ आहे. आधी सबटायटल्स वाचले. ते खूप भराभर जात असल्याने आधी वाचून घेतले. मग चित्रपटाच्या फ्रेम्स पाहिल्या. सिम्बॉलिझम कसलं जबरदस्त आहे. ज्यांना चित्रपटाचे रिव्ह्यू लिहायला आवडते, त्यांना चॅलेंज आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक मारी सेल्व्हाराज आहे. आसुरनचा ही तोच असावा. भारतातले जातवास्तव मांडताना त्याची आर्टफिल्म होऊ दिलेली नाही. मनोरंजन पण पाहिले आहे. त्याच वेळी शेवट सकारात्मक केला आहे. जरी भाबडा असला तरी तो आवश्यक वाटला.

MCW मधे एक प्रसंग आहे ज्यात ती आणि वकील एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीत भेटतात. माझ्या नीट लक्षात नाही. पण ती गोळीबार पण करते त्याच्यावर.
स्पॉयलर अ‍ॅलर्ट
जर ते दोघे एकमेकांना ओळखतात तर अशा निर्मनुष्य जागी येऊन हा ड्रामा करण्याची गरज काय ? त्याचं जे काही स्वप्नरंजन आहे ते त्याच्या विकृतीशी (मानसिक) संबंधित आहे. त्या वेळेलाच त्याची ती गरज आहे. इतर सर्व वेळी तो ड्रामा का करेल ? अनोळखी लोकांशी तो वेगळ्या नावाने भेटेल पण आपल्या बायकोला कशासाठी वेगळ्या ठिकाणी बोलावून वेगळ्या ओळखीने भेटेल ? हा प्रसंग प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी आहे. असंही घडू शकतं या शक्यतेतला शेवट आहे. त्यात नावीन्य नाही राहीलेलं. गेल्या काही वर्षात रहस्यमय चित्रपट म्हणजे अशी विचित्र मनःस्थिती समोर येणे हे समीकरण रूढ झालेलं आहे. असे लोक सर्रास आपल्या आजूबाजूला वावरतात कि काय असे वाटावे इतक्या संख्येने असे सिनेमे आहेत.

मोठा धक्का द्यायचाच या ध्येयाने पछाडल्याने शेवट असा केला जातो कि काय ही शंका येते. समजा धक्का नाही बसला, शेवट प्रेडीक्टेबल असला तरी काय बिघडतं ? चित्रपट सुंदर असायला हवा इतकीच माफक अपेक्षा आहे.

मी पाहिला तेव्हा भारतीय प्राईम वर होता.
आता का नाहीय काय माहीत.
तेव्हा आमच्या कुटुंब ग्रुपवर 'हा पाहायचा का' विचारल्याने स्क्रीनशॉट आहे.
Screenshot_2021-05-08-14-21-20-647_com.amazon.avod_.thirdpartyclient.jpg

अवांतर: या चित्रपटात केलेली हिंसा ही विकृती असेल.पण बाकी गोष्टी परदेशात जोडपी सर्रास करत असावी.बिग बँग थिअरी मध्ये डॉक्टर एलिझाबेथ चा एपिसोड आहे त्यात दाखवलंय.

Joji (मल्याळम)
प्राइम

विषय डार्क आहे. म्हटलं तर फॅमिली ड्रामा आहे. पण आम्ही बघा कसा डार्क विषय मांडतोय, असा जराही आविर्भाव न आणता सादर केलाय.

करारी, कर्तृत्ववान, दरारा असलेला बाप, मोठ्या प्लॅन्टेशनचा मालक आणि त्याची २ मुलं, एक मुलगी, जावई, नातू अशी फॅमिली,
Joji हा त्याचा सर्वात धाकटा मुलगा, इंजिनिअरिंग शिकत असतो, हुशार असतो, पण त्याचं अभ्यासात लक्ष नसतं. कारण त्याला इंजिनिअरिंग आवडत नसतं.
बापाला पॅरलॅसिसचा जोरदार झटका येतो, आता काही काळ तरी तो व्हील-चेअरवर राहणार हे उघड होतं. जोजीचं फ्रस्ट्रेशन आणि हुशारी या रसायनातून एक एक गोष्टी घडायला लागतात. ते बिल्ड-अप भारी आहे.
ज्या ज्या घटना घडत जातात त्या इतक्या खर्‍या वाटतात की अशा परिस्थितीत वेगळं काही घडूच शकलं नसतं याची प्रेक्षकांना खात्री वाटत जाते.

फाहिद फझलनं जोजीचं काम केलंय. त्याच्या साधाभोळ्या चेहर्‍याचा जबरदस्त वापर करून घेतलाय. बहिणीचं पात्रही तितकंच जबरी लिहिलंय. तिला अगदी कमी सीन्स, कमी संवाद आहेत, सिनेमाभर ती जवळपास कोर्‍या चेहर्‍याने वावरते, पण तिचे नेमक्या प्रसंगी घेतलेले नेमके दृष्टीक्षेप एक नंबर आहेत.

फोटोग्राफी आणि स्क्रिप्ट जबरी आहे.
एकेका पात्राचे क्लोज-अप्स नेमके घेतलेत. घराचा एक-एक कोपरा, जिना, खोल्यांमधले अँगल्स - प्रत्येक गोष्टीवर बारीक विचार केलेला वाटतो. त्या अर्थाने सिनेमा कॅमेराप्रधानही आहे. पण उगीच कै च्या कै कॅमेरा अँगल्स अजिबात नाहीत.
ट्रेलरमध्ये जोजी विहिरीत गळ टाकून बसलेला एक टीझर आहे. प्रत्यक्षात तो संपूर्ण सीन आणि त्याच्या आगेमागे असलेला सीक्वेन्स अफलातून आहे.

आणि सिनेमाचा शेवट ! डोळ्याची पापणी लवणे या कृतीचा असा वापर करून घेतलेला मी याआधी कुठेही पाहिलेला नव्हता !!

ज्यांना स्टोरीइतकंच मूव्ही-मेकिंगही अप्रिशिएट होतं, करायला आवडतं, त्यांनी मुळीच चुकवू नका.

Submitted by पारंबीचा आत्मा on 18 May, 2021 - 01:21>>>>>>>>
+100
कालच करनन पाहिला.लगेहाथ द्रुष्यम 2 पण पाहून घेतला.

ह्म्म
प्राईम ने काहीतरी मुदत ठेवली असेल. तोवरच पिक्चर असेल तिथे.
फ्रेंडस पण आधी प्राईम आणि नेटफ्लिक्स दोन्हीवर होते.आता फक्त नेटफ्लिक्स वर आहे.
असं करत असल्यास किमान काढण्या पूर्वी २ दिवस लोकांना सांगावे, म्हणजे लोक बघून घेतील.

The Woman in the Window (२०२१) पाहिला नेटफ्लिक्सवर. ओके वाटला - जरा टिपिकलच आहे. पण अ‍ॅमीची अ‍ॅक्टिंग आणि तिचं घर यासाठी पहा. त्या घराचा मस्त उपयोग करून घेतलाय. अशा मूव्हीजमध्ये सगळे सोशिओपाथ असल्यागत वावरतात - अगदी पोलिसांसकट. फक्त शेवटी सस्पेन्स संपला की व्हिलन सोडून सगळे अचानक नॉर्मल वागू लागतात.

The Handmaiden पाहिला... कोरियन आहे.. सबटायतल वाचत... ट्विस्टस छान आहेत...
अलर्ट - दोन लेस्बियन सिन आहेत, छान चित्रण केलेले...
थोडा प्रेडिक्टेबल वाटतो पण मध्ये एक छान ट्विस्ट आहे...

फोटो प्रेम मस्त आहे. शॉर्ट फिल्म पाहिल्याचा पुरेपूर आनंद.
प्लस गोष्टी
१) नीनाकुलकर्णी नेहमीप्रमाणेच सर्वोच्च. सवत माझी लाडकी मधला सहजपणा (अभिनयातला) जपलेला. भुमिका वेगळी आहे पण अ‍ॅक्टिंग स्कूल आहे ती.
२) म्युझिक : कौशल इनामदार. शाल्मलीचे एक गाणे सुपर्ब.
३) कथा: साधी सोपी सरळ पण गुम्तवून ठेवते. थोडक्यात सांगतो. एका ओळखीच्या मयताचे वेळी मयताचा फोटोच नसतो उपलब्ध. आपण गेल्यावर आपला कसा फोटो येईल हि बोच घेऊन जगणारी नीना कुलकर्णी. धडाधड सेल्फ्याच्या जगात नीना मात्र फोटोला घाबरतेय पहिल्यापासून. त्या फोटोची हि कथा.
४) पात्रे आवश्यक तेवढीच. सगळी सुपर्ब. मोहन जोशी असले असते तर सवत माझी मधला निम्मा कोरम भरला असता कारण अमिता खोपकर पण आहे. Wink

जोजी, असुरन दोन्ही थोडे पाहिले आहेत. पूर्ण पाहिले नाहीत अजून. अगदी आवर्जून पुन्हा लावावा इतका भारी वाटला नाही जोजी, पाहिला तोपर्यंत तरी. बहुधा नेटाने बसावे लागेल.

असुरन मधे पुढे काय होते याबद्दल कुतूहल आहे. आता कर्णन बद्दलही वाचले. तो ही पाहायचा आहे.

समजणारी भाषा + भिकार चित्रपट यापेक्षा न समजणारी भाषा + सबटायटल्स + चांगला चित्रपट हा सध्या प्रेफरन्स आहे Happy

अला वैकुठपुरमुलू व सरकार - दोन्ही तेलुगू- पाहिले. सरकार मूळचा तमिळ असावा. पण एकूण ही वेगळीच प्रकरणे आहेत Happy

माय क्लाएंट्स वाईफ प्राईमवर मिळाला नाही. बहुतेक भारतात हा दाखवत नसावेत.

Submitted by योगी९०० on 18 May, 2021 - 10:4>>>>>

आहे प्राईमवर..आजच पाहिला..चांगला वाटला.
पाहताना मधेच मला शटर आयलंड हॉलिवूड सिनेमा आठवला.

"न समजणारी भाषा + सबटायटल्स + चांगला चित्रपट हा सध्या प्रेफरन्स आहे " - आयडिया चांगली आहे फा, पण सिनेमा हे दृक-श्राव्य माध्यम असून सुद्धा, सतत टीव्ही च्या खालच्या भागाकडे पहात, सिनेमा 'वाचायची' कल्पना अजून प्रत्यक्षात आणता आलेली नाहीये. एकदा कधीतरी ट्राय करून बघायला हवी. तसेही सुरूवातीला अनेक इंग्रजी सिनेमे (अजूनही कधीतरी) तसेच 'बघितले' होते. तेव्हा तमिळ / तेलगू फार अवघड जाऊ नये.

इतके चांगले चित्रपट येतायत. पण सबटायटल्स सकट बघायचे त्यामुळे सुरुंग लागतोय.
फोटो प्रेम कुठे बघता येईल?

इंग्रजी, फ्रेंच, कोरियन इ. सिनेमे वाचून बघताना तारांबळ उडत नाही पण साऊथ इंडियन चित्रपटात इतकं फास्ट बोलतात की फक्त आणि फक्त वाचत रहावं लागतं. चित्र बघायचा प्रयत्न जरी केला तरी संवाद हुकलाच.

माय क्लायंट्स वाईफ बघितला. काहीतरी विचित्र आहे सिनेमा. म्हणजे काही गोष्टी इतक्या सुमार घेतल्या आहेत कि त्या मुद्दाम सुमार किंवा सर्कॅस्टीकली दाखविण्यासाठी घेतल्या आहेत कि काय अस वाटतय. त्यामुळ माझा गोंधळ झाला आहे.
उदा. अ‍ॅडल्ट सिन साठी कामसुत्रा डिव्हीडी वर कॅमेरा, भयंकर काही दाखविण्यासाठी क्रुर स्टॅच्यु
म्हणजे ज्या काही प्रतिमा वापरल्या आहेत त्या इतक्या बालीश आहेत कि ते मुद्दाम केल आहे का अस वाटत आहे.
दारासमोर ठेवलेल्या पामच्या कुंड्या , माळ्याच घर, टिपिकल म्हातारा माळी हे सगळ ७०-८० च्या चित्रपटात दाखवितात तस दाखविल आहे.

स्पॉईलर अलर्ट *********************
मुळ लॉजीकच पटत नाही कारण ते खुपच ओढून ताणुन वापरल आहे. हा जर आजार असेल तर तो ते दुसर्‍या बायांना का फशी पाडत नाही ?

सीमा +1
बाळबोध थ्रीलर वाटला, कंटाळून मी तर फोरवर्ड करत पाहिले. नंतर उद्विग्नता आल्याने रिमोटला खटखट करत वॉचलिस्टमध्ये पासष्ट सिनेमे टाकले , संध्याकाळी वेडिंगचा शिनेमा हा मराठी चित्रपट पाहिला , बरा आहे , हलकाफुलका !

एकदा कधीतरी ट्राय करून बघायला हवी. >>> हो मीही असंच ट्राय केलं एक दोनदा. स्क्रीनप्ले खूप फास्ट नसेल - म्हणजे खालचा संवाद वाचेपर्यंत काहीतरी हुकले असे होत नसेल तर चालते. मी वरती लिहीलेल्या चित्रपटांमधेतरी तसा प्रॉब्लेम आला नाही.

७०ज मधे हीरो लोक ५-६ लोकांशी लढत. दीवार मधल्या गोडाउन सीन मधे दहा एक होते बहुधा. तेलुगू चित्रपटांत ते प्रमाण १:४० इतके झालेले आहे. आणि पूर्वी लोक नुसते खाली पडत. आता हवेत समर सॉल्ट मारतात किंवा आडवे गिरक्या घेतात, १५-२० फूट फेकले जातात. वार्‍यांची दिशा बदलते. जमिनीतून धुळीची वादळे येतात. शेवटचे १-२ मात्र हमखास पळून जाउन कॉमिक रिलीफ देतात. as-if a separate one is needed.

"as-if a separate one is needed" - Rofl टिपीकल फा टच!! Happy

Lol

कालच फेसबूकवर शॉर्टे विडिओत असाच एक सीन पाहिला. फरक ईतकाच की त्यात हिरो आधीच डिक्लेअर करतो की तो १३ पैकी ५ जणांना मारणार आणि ८ जण पळणार. म्हणजे सस्पेन्सच फोडले म्हणा ना... म्हणजे आपल्याला तेव्हाच कळते की आता हा एकदोन फटक्यातच तीन जणांना १५ फूट हवेत उडवणार आणि दोन जणांना सहा फूट जमिनीत गाडणार. आणि हे बघून खरेच आठ जण पळून जाणार.. पण तरीही मी तो सीन पुर्ण बघितला. कारण त्यांचा स्वॅगच भारी असतो. म्हणजे आपल्यालाही अ‍ॅक्चुअली असे वाटते की आपण पोरगी असतो तर अश्या हिरोला डायरेक्ट पटलोच असतो.

एकदोन फटक्यातच तीन जणांना १५ फूट हवेत उडवणार >>> ही नेक्स्ट स्टेप असेल तेलुगू पिक्चर्स मधे. हीरो आधीच सांगेल की या फाइटने तू १५ फूट उडणार आहेस. पूल खेळताना आधीच सांगतात तसे.

https://youtu.be/TNnqobZlPbk
लोकहो.. हा सिन बघा.. हिरो असा मल्टिटास्किंग हवा.. मारामारी करता करता गुंडांकडून बहिणीची ओढणी धुऊन, वाळवून, घडी घालूनही घेतली

Pages