चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजू, युट्युबवर एआयबी ऑनेस्ट इंडियन वेडिंग्स किंवा एआयबी ऑनेस्ट एंजिनीयरींग पार्ट ३ म्हणून सर्च कर. एआयबी आता प्राईम वर पण आहे बहुतेक.

ओह हा आहे होय नविन पॉलिसेट्टी! हा आवडतो मला Happy मीही एआयबीच्या स्किट्स मधेच बघितले होते. ते ऑनेस्ट इंडियन वेडिन्ग फार भारी आहे Happy

राभु, तोच जुना वाला आहे जेव्हा तो फेमस नव्हता आणि नुसताच आरजे होता Happy
आता फेमस झाल्यावर नविन झालाय.

नेटफ्लिक्सवरचा The Whole Truth (२०१६) मस्त आहे. कोर्टरुम ड्रामा-सस्पेन्स-थ्रिलर.

सगळ्यांनीच भारी काम केलंय. नक्की काय घडलं हे पाउणएक मूव्हीनंतर लक्षात येतं पण तरीही आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.

अनु, एजंट साई मूव्ही आवडला. धन्यवाद इथे लिहिल्याबद्दल. मला पण आधी नवीन / जुना वाटलेलं , मग दुसरी पोस्ट वाचताना वाटलं त्याच नाव नवीन असावं ( हे म्हणजे त्या अँजेलीना प्रभू सारखं झालं ) . नावच आहे ना त्याच नवीन हे. आधी आर जे असताना नुसता च पोलिशेट्टी होता का?
मला आवडला ह्या मुव्हीत.

नेटफ्लिक्सवर दिसत नाहीये The Whole Truth.
कधी पाहिला होतास मामी? >> ओके ओके. मी व्हिपीएन वापरून पाहिला - युएसए मधला. काल रात्रीच पाहिला.

नेटफ्लिक्सवरचा The Whole Truth (२०१६) मस्त आहे. कोर्टरुम ड्रामा-सस्पेन्स-थ्रिलर.>>> पाहिला, आवडला. सुचवल्याबद्दल धन्यवाद.

केविन हार्ट आणि ब्रायन क्रॅनस्टनचा 'द अपसाईड' बघितला. फ्रेंच 'द अन्टचेबल्स' चा रिमेक आहे.
न्यूयॉर्कच्या रस्त्यावरुन केविन हार्ट (डेल) रांपाट फेरारी चालवतोय, ब्रायन क्रॅन्स्टन (फिलिप) बाजुच्या सीटवर बसला आहे आणि मागुन पोलिसांचा पाठलाग सुरू होतो. शेवटी पोलिस पकडतात, तर डेल सांगतो की फिलिप क्वॉड्राप्लेजिक आहे आणि फिट आल्याने तो हॉस्पिटच्या इमर्जंसी मध्ये जात आहे, फिलिपही तोंडातुन फेस काढून दाखवतो आणि ते पोलिसांच्या तावडीतून सुटतात. आणि मग फ्लॅशबॅक मधुन कहाणी चालू होते.
डेल परोलवर सुटलेला आहे आणि काम... रादर काम शोधण्याच्या प्रूफवर पुरेशा सह्या शोधतो आहे. एका अपार्टमेंट मध्ये जॅनिटरच्या पोझिशनसाठी जाताना तो चुकुन फिलिपच्या पेंटहाऊस मध्ये शिरतो जिकडे फिलिप पूर्णवेळ सहाय्यक शोधतो आहे. फिलिप डेलला ते काम ऑफर करतो, त्याची सहय्यक युव्हॉन (निकोल किडमन) नको म्हणत असतानाही. डेल अर्थातच या पूर्णवेळ सहाय्यकाच्या कामासाठी बिलकुल तयार नाही... आणि मग पुढे काय प्रसंग येत जातात याची गोष्ट.
स्टोरी अत्यंत चाकोरीबद्ध वळणे घेत शेवटाकडे जाते. अशा स्टोरीत जे नेहेमी होतं त्या अनुशंगाने म्हणजे आपल्या बॉलिवुडातले पेहेले इन्कार, मग इकरार, मग इझहार, मग परत दुर्कार.. आपलं दुरावा आणि शेवटी साकार असे सगळे चेक मार्क घेत घेत स्टोरी पुढे सरकत रहाते, पण केविन हार्ट आणि वॉल्टर व्हाईट मधली केमिस्ट्री बघत वेळ छान जातो.

कोठे पाहिलास अमित, आणि केविन स्पेसी वाल्या अनटचेबल्सचा रिमेक आहे का?

The Whole Truth पाहिला. चांगला आहे. मला आधी प्रायमल फिअर सारखे काही आहे का अशी शंका आली होती पण ही कथा वेगळी आहे. कियानू रीव्हज अगदी म्हातारा नाही तरी इतका वयस्कर बघायला ऑड वाटतो. म्हणजे रोल करता तो म्हातारा झालेला नाही, प्रत्यक्षात झालेला दिसतोय Happy आणि ती त्या मायकेल ची आई रेने झेलवेगर आहे हे पाहून उडालोच! ती दिसते ग्रेसफुल पण आवर्जून कास्ट पाहिली नाही तर पटकन ओळखू येत नाही. तो मायकेलचा रोल करणारा म्हणजे हिल्बिली एलिजी मधलाच दिसतोय.

लुइजियाना मधले वातावरण, पॅरिश चा उल्लेख, तेथील स्थानिक वाटणारी नावे वगैरे सुरूवातीला चांगले घेतले आहे. नंतर फारसे येत नाही ते.

The Intouchables नाही केविन स्पेसी नाही. फ्रेंच उच्चार मी वाट्टेल तसा लिहिला असेल.
'द अपसाईड' नेटफ्लिक्सवर आहे.

The Intouchables नाही केविन स्पेसी नाही >>> ओह आले लक्षात. उच्चारही बरोबर असेल. अनटचेबल्स म्हंटल्यावर तो केविन स्पेसी वाला पहिला आठवतो म्हणून तेच आधी डोक्यात आले.

नेटफ्लिक्स वर शोनार पहार (सोन्याचा पर्वत) पाहिला.

बिटलू झालेल्या छोट्याने इतकं सहज सुंदर काम केलंय की त्यापुढे इतरांचा अभिनय फिका पडावा. सरधोपट गोष्ट आहे पण सगळ्यांचे अभिनय इतके चोख आहेत की जराही कंटाळा येत नाही. तनुजाला खूप दिवसांनी बघताना मस्त वाटलं.

मधेमधे सबटायटल्स वाचावी लागतात पण खुपदा त्यांच्याशिवायही काम होऊन जाते. नक्कीच बघणेबल आहे.

काल फा आणि अमितव च्या पोस्ट्स वाचून, The Whole Truth पाहिला. थोडा वेळ लावून बघू म्हणत संपूर्ण पाहिला गेला. पहिल्या पाच मिनिटात जे त्या सिनेमानं खिळवून ठेवलं ते सोडलंच नाही. According to Jim मधल्या जिम बेलुशीला इतक्या वेगळ्या रोलमधे पाहणं इंटरेस्टींग होतं. शेवटचे ट्विस्ट्स अँड टर्न्स मस्त आहेत. सुरूवातीला लुइझियाना चे उल्लेख (नावं, जागा) आहेत, पण बाकी (अ‍ॅक्सेंट, कॅच फ्रेजेस, ज्युरी च्या वेशभुषा ई.) मात्र लुइझियाना छाप अजिबात नव्हत्या.

काल Super Deluxe पाहीला.. तमिळमध्ये आहे पण हिंदी आणि इंग्लिश सबटायटल असल्यामूळे चालवून घेतलं..

थोडा वेळ इंग्लिश सबटायटलसोबत पाहीला पण शब्दश: भाषांतरामूळे तो रिजनल टच आणि फिलींग येत नव्हती.. परत कंसातलं (Old man asking, Old woman asking) हे असलं वाचून डोक आऊट होतं होतं..मग सरळ हिंदी सबटायटल स्विच करून पाहीला..

खुप कौतुक ऐकलेलं पण प्रत्यक्षात इतकाही फार ग्रेट मूव्ही नाहीये..

चार वेगवेगळ्या कथा आणि त्यांच कनेक्शन म्हणजे हा चित्रपट.

१. शिल्पाची कथा : कधीकाळी पुरूष म्हणून जन्माला आलेला माणिक आपल्या बायका पोराला घरीच सोडून पळून जातो आणि सहा वर्षानी येतो तेच एक ट्रान्सजेडर बनून..अगदी साडी, विग वैगेरे घालून.. त्याच्या सहा सात वर्षाच्या मुलाला बाप येणार म्हणून खुप कुतूहूल असतं..
नंतर काय होतं हे सांगणार नाही पण विजय सेतूपतीने मस्त अभिनय केला आहे आणि विजयच्या मुलाचा रोल केलेला मुलगा तर खुप क्युट आहे आणि त्याने पण भारी अभिनय केलाय..

टी.व्ही स्टोरी : ही कथा मला फार आवडली. पाच किशोरवयीन मित्र एकाच्या घरी कुणी नसताना कुठुनतरी जुगाड करुन पॉर्न सी.डी. आणतात..मग त्यांना त्यात असं काहीतरी बघायला मिळतं की, एकजण सरळ टी.व्हीच फोडून पळत सुटतो.. आणि ज्याचा घरचा टी.व्ही असतो तो टे्शनमध्ये येतो..बाप घरी येईपर्यत सेम टी.व्ही आणलाच पाहीजे म्हणून बाकीच्या मित्रांना घेऊन तो जुगाड करायला बाहेर पडतो... ह्या कथेची शेवटी जो जुगाड केलाय तो कायच्या काय दाखवलाय..अचानक भलतचं काहीतरी घुसडल्यासारखं वाटतं..

लिलाची गोष्ट : ही कथा वरच्याच कथेशी कनेक्टेड आहे पण ह्याा कथेला अजून एक उपकथा आहे. टी.व्ही फोडून पळालेल्या मुलाची आई म्हणचेच लीला.. तिच्या मुलाचा पळता पळता अपघात होतो आणि त्याला हास्पिटलमध्ये नेते..पण तिचा नवरा हा देवभोळा असतो..त्याला वाटतं जसं त्याला सुनामीत देवाने वाचवल़़ तसचं त्याच्या मुलालाही वाचवेल..त्याला डॉक्टराची नाही तर देवाची गरज आहे..
शेवटी त्याला चूक कळते पण लीलाचा शेवटच्या प्रश्नाने आपण पण चकीत आणि निरूत्तर होतो..

मुगिल आणि वेम्बुची कथा :
वेम्बू (समंथा) आपल्या एक्स लव्हरबरोबर सेक्स करत असते आणि त्यानंतर तिचा लव्हर अचानक मरतो.. नवरा घरी यायची वेळ झालेली असते मग काय होतं‌..नवर्याला ती सांगते का?
हे सगळं प्रत्यक्ष सिनेमात बघितलेल़च बरं..

मुगिलच करेक्टर मला आवडलं कारण त्याला जे प्रश्न पडतात ते मलाही पडतात..आणि त्याचा सिस्टीम विषयीचा जो त्रागा आहे तसाच मलाही आहे..

काही त्रुटी आहेत..

आयफोनच्या जमान्यात सी्डी. घेऊन पाहणं हे पटतं नाही..

एका सिनमध्ये शिल्पाला खुप राग येतो..पण मारण्याऐवजी शाप देणं झेपत नाही..

एकदा पाहायला हरकत नाही आणि संदेशपण चांगला दिलाय..स्पेशली लीलाच्या कथेत..

मामी, व्हीपीएन कसं वापरतात ? मला दोन तीन चित्रपट बघायचे आहेत. ते इथे उपलब्ध नाही असे प्राईम सांगतंय. एक प्रश्न आहे व्हीपीएन वापरले तर प्राईमचे भारतातले खातेच चालू शकते का ? की तिकडचे वेगळे अकाऊंट लागते ?

क्रोम एक्स्टेंशन मध्ये व्हिपिएन विकत घेऊन अ‍ॅड करता येतं. काहीतरी रु. २०० की ३०० दर महिना अशी किंमत आहे. भारतातलाच अकाउंट वापरायचा. अ‍ॅड केल्यावर URL च्या पट्ट्यात उजवीकडे आयकॉन दिसू लागतो. तो क्लिक करून देश निवडता येतो. खूप डिटेल्स माहीत नाहीत. माझ्या लेकीनं केलं हे सर्व.

The Whole Truth मस्त आहे. कालच पाहिला. जबरदस्त पकड घेत जातो पिक्चर.

आताच जस्ट A Fall from Grace (२०२०) पाहिला - युएसए नेटफ्लिक्सवर. भारतात आहे का माहित नाही.

हा पण भारी थ्रिलर आहे.

Pages