Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माधुरी शी तुलना ??
माधुरी शी तुलना ??
>>>
माधुरीशी तुलना करू शकतो, एके काळी माधुरी छान दिसायची की... आता वाईट दिसते पण तो वयाचा दोष आहे... माधुरीला नावे ठेवणार्यांनी तिचे जुने फोटो पाहावेत... यंग होती तेंव्हा तीदेखील सुंदर दिसायचीच जान्हवी सारखी..
ऋन्मेष ने बरोबर कॅटेगरी पकडली आहे....
वेगळा धागा हवा खरेतर...
श्रद्धा कपूर, अनन्या पांडे - क्युट कॅटेगरी
कॅटरिना, जकलीन - हॉट कॅटेगरी
जाहनवी, माधुरी, जुही,अनुष्का शेट्टी - सुंदर कॅटेगरी.
अर्र्र्रर्र .. आताची माधुरी
अर्र्र्रर्र .. आताची माधुरी देखील जाहनवी पेक्षा कायच्या काय सुन्दर दिसते.. पण ठीक आहे आवड आपली आपली . I agree to disagree
काल नेटफ्लिक्सवर Julie &
काल नेटफ्लिक्सवर Julie & Julia बघितला.. कुकिंग बेकिंग आवडणाऱयांना आवडेल असा एक फार हलका फुलका पण इन्पिरेशनल सिनेमा... तसा जुनाच आहे पण मी बघायला उशिर केला.
सोनम कपूर, जान्हवी कपूर ह्या
सोनम कपूर, जान्हवी कपूर ह्या मुलींच्या मागे त्यांची मोठी टीम आहे, मनीष मल्होत्रासारखा हुशार डिझायनर आहे. त्या सुंदर दिसल्या नाहीत तरच नवल. आणि जान्हवी तशी गोड आहेच.
आता गोड दिसते म्हणजे अभिनय येतो असे कुठेय... पण काहीजण त्या गोडव्यातच इतके अडकतात की त्यामुळे प्रत्येक प्रसंगात चेहरा तितकाच कोरा राहतो हे लक्षात येत नसावे.
साधना प्रतिसाद +1234
साधना प्रतिसाद +1234
खरंच आहे. आजच्या जगात दिसणंच
खरंच आहे. आजच्या जगात दिसणंच सगळं काही आहे. तुम्ही टवका दिसा, काम आणि पैसा तुमचा. अभिनयाचा काही संबंध नाही. उत्तम अभिनय आणि सौंदर्य दोन्ही असणे रेअर झालेय. मला तर आठवायला लागतेय अशी हीरोइन पण पटकन आठवत नाही.
उत्तम अभिनय पण दिसायला वरील
उत्तम अभिनय पण दिसायला वरील सर्वांचे सौंदर्याचे वेगवेगळे निकष लाऊनही कुरुप म्हणावे अशी मुलगी कोणी हिरोईन म्हणून स्विकारेल का?
जर उत्तर प्रामाणिक दिले तर बिलकुल नाही हेच येईल.
भुमिका मध्यमवर्गीय मुलीची असली तरी ती साकारायला आपल्याला पडद्यावर छान दिसणारी मुलगीच लागते हि आपली गरज आहे.
मग ज्या मुली ती गरज पुर्ण करत आहेत त्यांना अभिनयाचे मापदंड लावत कमी लेखण्यात काय अर्थ आहे?
अजीब दास्तान्स : धर्मा
अजीब दास्तान्स : धर्मा प्रॉडक्शन्सच्या ४ शॉर्ट स्टोरीज, यातली तिसरी नीरज घैवान चे डिरेक्शन असलेली कोंकणा सेनशर्माची गोष्ट जबरी आहे, फार मस्तं अॅक्टिंग केलय कोंकणानी , आदिती रावहैदरीचेही अॅक्टिंग चांगलय, नक्की बघा.
बाकीच्या गोष्टी वन टाइम वॉचेवल आहेत पण काही खास नाही वाटल्या, दुसर्या गोष्टीचा शेवट फार विकृत आहे
@दीपांजली....तुमच्याशी सहमत..
@दीपांजली....तुमच्याशी सहमत...मलाही फक्त कोंकणा ची स्टोरी आवडली.
बाकी कुठल्याच अजिबात नाही.
उडान पाहिला आताच. आवडला.
उडान पाहिला आताच. आवडला.
द प्रीस्ट पाहिला. प्रोमोज /
द प्रीस्ट पाहिला. प्रोमोज / ट्रेलर पाहून जसा वाटला तसा नाही. तो मसाला आहेच.
पण या प्रकारात वेगळा सिनेमा आहे. भूत आहे पण हॉरर / थ्रिलर नाही.
एका खूनाचं एक वेगळं इन्वेस्टीगेशन असं काहीसं.
भयंकर संथ आहे. कलाकारांचे अभिनय आवडले.
विशेषतः मामुट्टी. कसला संयत अभिनय आहे त्याचा.
@रुन्मेश - हिरोईन ने सुंदर
@रुन्मेश - हिरोईन ने सुंदर दिसावे का नाही ह्यावर चर्चा नाहिये. जान्हवी सुंदर वाटते का ह्यावर चर्चा आहे.
द ग्रेट इ न्डियन किचन ची हिरोईन रु ढार्थाने सुंदर नाही, पण त्यात चपख ल बसते. फार आवडली ती हिरोईन म्हणून.
सो प्लीज दोन गोष्टी मिक्स करू न का..
नानबांचा देवनागरीत प्रतिसाद
नानबांचा देवनागरीत प्रतिसाद पाहून भारी वाटले
(कृ.ह. घ्या)
In case u missed.
In case u missed.
I think u r not following maayboli from a year or more.. (Halakech ghetale)
लेडीज इन लॅव्हेंडर पाहिला. (१
लेडीज इन लॅव्हेंडर पाहिला. (१.५ स्पीडवरही हा अनेकांना संथ सिनेमा वाटू शकतो). ज्यूडी डेन्च ज्या नेहमी बाँड चित्रपटांमध्ये करारी "एम" म्हणूनच जास्त माहिती होत्या, त्यांना असं भावनाप्रधान किंवा असुरक्षित (व्हल्न्रेबल) पात्र रंगवताना बघायचं म्हणजे आधीच उगाच डोळे पाणावतात. वृद्ध पुरूषाला तरूण स्त्रीविषयी आकर्षण वाटणे समाजमान्य आहे पण वृद्ध स्त्रिच्या आकर्षण भावनांना कुणी समजून घेणे तसे कठीणच असते. असा रोल हास्यास्पद न होऊ देता रंगवायचा म्हणजे मोठे कौशल्य आहे. पण चांगला जमला आहे सिनेमा. ह्या सिनेमाला बक्षीसे वगैरे मिळाल्याचे ऐकीवात नाही. पण एकदा जरूर बघण्याजोगा आहे. यूट्यूब वर फुकट उपलब्ध आहे.
अजीब दास्तान्स : धर्मा
अजीब दास्तान्स : धर्मा प्रॉडक्शन्सच्या ४ शॉर्ट स्टोरीज, यातली तिसरी नीरज घैवान चे डिरेक्शन असलेली कोंकणा सेनशर्माची गोष्ट जबरी आहे, फार मस्तं अॅक्टिंग केलय कोंकणानी , आदिती रावहैदरीचेही अॅक्टिंग चांगलय, नक्की बघा. +१११
कोंकणाची गोष्ट मस्त आहे. आदिती राव हैदरीनेही मस्त केलय काम.
नवऱ्याने द्रोणा लाऊन ठेवलेला,
नवऱ्याने द्रोणा लाऊन ठेवलेला, अर्धा अर्धा करत दोन तीन दिवसांच्या gapने बघितला. कसला स्लो, बोअर पिक्चर आहे. मी येता जाता बघितला पण जाम वैतागले.
सेम साउथ डबड पिक्चर्स, एका highway वर दगड बाजूला करून two wheelers वळवून shortcut प्रवास करणाऱ्या लोकांचे खून, उगाच नाहक ते भुत सगळ्यांना मारते. शेवटी स्वत:चा नवराच निघतो ज्यामुळे तिचा आणि मुलीचा जीव गेलेला असतो. बरं कुठला तो साउथचा हायवे की मध्ये दगड ठेवतात, wall पण नाही बांधत. संपता संपत नाही हा पिक्चर. आत्ता संपेल, अजून थोडा बघूया. छे डोक्याला शॉट नुसता.
अजून एक एका जादुगार बाईचा मुलगा, (अमिताभ एका मुवीत होता तसा दिसायला म्हणजे अभिषेक बाबा असतो त्याचा, तो पिक्चर) लहान वयात म्हातारा दिसतो म्हणून त्याला चिडवत असतात आणि तो जादू शिकतो आईकडून आणि बदला घेत राहतो जे त्रास देतात त्या सर्वांचा आणि तेही आईचं रूप घेऊन. तोही संपता संपत नाही, कित्ती बोअर. फार रक्तरंजितही वाटला.
कानाला खडा, नवरा मुवी बघत बसला की tv कडे बघायचंही नाही
@रुन्मेश - हिरोईन ने सुंदर
@रुन्मेश - हिरोईन ने सुंदर दिसावे का नाही ह्यावर चर्चा नाहिये. जान्हवी सुंदर वाटते का ह्यावर चर्चा आहे.
>>>>>
अहो माझ्या पोस्टच्या वरची पोस्ट वाचा. माझी पोस्ट त्यावर आलेली
मला पर्सनली जान्हवी सुंदर आहे की नाही याबाबत चर्चा करण्यात जराही रस नाही कारण तिचे सौंदर्य माझ्या टाईपचे नाही
तो द ग्रेट ईंडियन किचन ज्यावर
तो द ग्रेट ईंडियन किचन ज्यावर बरीच चर्चा चालू आहे, तो निव्वळ चित्रपट या निकषावर कसा आहे? बोअर आहे की बघणेबल आहे?
चर्चा वाचून बघायची ईच्छा होतेय पण माझ्या टाईपचाही वाटत नाही की काही रिलेट होईलसेही वाटत नाही
मला ते चित्रपट बघून दोन अडीच तास फुकट गेले की फार दुख होते..
सेम साउथ डबड पिक्चर्स, एक
सेम साउथ डबड पिक्चर्स, एक highway वर दगड बाजूला करून two wheelers वळवून shortcut प्रवास करणाऱ्या लोकांचे खून, उगाच नाहक ते भुत सगळ्यांना मारते. शेवटी स्वत:चा नवराच निघतो ज्यामुळे तिचा आणि मुलीचा जीव गेलेला असतो. बरं कुठला तो साउथचा हायवे की मध्ये दगड ठेवतात, wall पण नाही बांधत. संपता संपत नाही हा पिक्चर. आत्ता संपेल, अजून थोडा बघूया. छे डोक्याला शॉट नुसता.
अजून एक एका जादुगार बाईचा मुलगा, (अमिताभ एका मुवीत होता तसा दिसायला म्हणजे अभिषेक बाबा असतो त्याचा, तो पिक्चर) लहान वयात म्हातारा दिसतो म्हणून त्याला चिडवत असतात आणि तो जादू शिकतो आईकडून आणि बदला घेत राहतो जे त्रास देतात त्या सर्वांचा आणि तेही आईचं रूप घेऊन. तोही संपता संपत नाही, कित्ती बोअर. फार रक्तरंजितही वाटला. >>>>>>>> स्टोर्या इण्टरेस्टिण्ग वाटतायत. नावे काय होती त्या पिक्चर्सची अन्जू?
अमिताभ एका मुवीत होता तसा दिसायला म्हणजे अभिषेक बाबा असतो त्याचा, तो पिक्चर >>>>>> 'पा' नाव आहे त्या पिक्चरच.
पा वाटत होतं, पण नक्की तेच ना
पा वाटत होतं, पण नक्की तेच ना ह्या विचारात लिहिलं नाही. Thank u सुलू.
पहिल्या पिक्चरचे नाव हायवे मिस्ट्री असावं बहुतेक. दुसरं अजिबात आठवत नाहीये.
अंजू ने लिहिलेल्या पहिल्या
अंजू ने लिहिलेल्या पहिल्या पिक्चरचे नाव यु टर्न आहे . मला ही पाहताना सेम झालेलं, धड संपेना धड बंद करवेना.
दुसरा ही बघितलाय, तो ही उगीच बघितला असं झालेलं.
बारोट हाऊस हा अत्यंत भिकार
बारोट हाऊस हा अत्यंत भिकार चित्रपट आहे.
शक्यतो बघू नये.
ऋन्मेष, द ग्रेट इंडियन किचन
ऋन्मेष, द ग्रेट इंडियन किचन हा चित्रपट म्हणून चांगला आहे (असं मला तरी वाटलं). आता त्याच्यावर एवढी उलटसुलट चर्चा झाली आहे की पूर्वग्रह न ठेवता पाहणं कठीण आहे पण वेळ नक्कीच वाया जाणार नाही!
जून एक एका जादुगार बाईचा
जून एक एका जादुगार बाईचा मुलगा, (अमिताभ एका मुवीत होता तसा दिसायला म्हणजे अभिषेक बाबा असतो त्याचा, तो पिक्चर) लहान वयात म्हातारा दिसतो म्हणून त्याला चिडवत असतात आणि तो जादू शिकतो आईकडून आणि बदला घेत राहतो जे त्रास देतात त्या सर्वांचा आणि तेही आईचं रूप घेऊन. तोही संपता संपत नाही, कित्ती बोअर. फार रक्तरंजितही वाटला>>रतसासन असे काही तरी नाव आहे
पण वेळ नक्कीच वाया जाणार नाही
पण वेळ नक्कीच वाया जाणार नाही! >> ओके वावे धन्यवाद
रतसासन असे काही तरी नाव आहे
रतसासन असे काही तरी नाव आहे >>>>> कि रातसासन !
यु ट्युबवर पण आहे. पण अधेमधे कट केल्यासारखं वाटत कि एडिटिंगचा दोष आहे माहीत नाही.
एकवेळ पाहण्यासारखा वाटला मला तरी
जून एक एका जादुगार बाईचा
जून एक एका जादुगार बाईचा मुलगा, (अमिताभ एका मुवीत होता तसा दिसायला म्हणजे अभिषेक बाबा असतो त्याचा, तो पिक्चर) लहान वयात म्हातारा दिसतो म्हणून त्याला चिडवत असतात आणि तो जादू शिकतो आईकडून आणि बदला घेत राहतो जे त्रास देतात त्या सर्वांचा आणि तेही आईचं रूप घेऊन.>>> हिंदी डबचं नाव मै हू दंडाधिकारी आहे
हो रातसासन आहे तो... वन टाईम
हो रातसासन आहे तो... वन टाईम वोच आहे...
हिंदी डबचं नाव मै हू
हिंदी डबचं नाव मै हू दंडाधिकारी आहे >>> हेच नाव. बरं कित्ती अतिरेक तो, ती लेडी ऑफिसर आपल्या मुलीशी बोलत असताना, दुसऱ्या ऑफिसरच्या मुलीचा जीव धोक्यात आहे, तिला वाचवायला त्याला सोडावं हे अजिबात वाटत नाही आणि शेवटी क्रेडीट घेते. ती ही एक प्रकारची दुष्टच.
वर्णिता यु टर्न नव्हतं नाव, मिस्ट्री आणि हायवे हे दोन्ही पिक्चरच्या नावात होतं. डाव्या बाजूला वर नाव येतं ना तिथे तरी तसं काहीतरी होतं.
Pages