Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उभट हसरा चेहरा, पूर्वी शालेय
उभट हसरा चेहरा, पूर्वी शालेय विद्यार्थ्यांचे कापायला लावत तसे कानाला न लागता वरती कट मारलेले केस - असा राजेश खन्ना दिसला की रोल व पिक्चर चांगला असण्याची गॅरंटी. आडवा व थोडा माज असलेला चेहरा व अर्धा कान झाकलेले स्टायलिश केस - असा दिसला की बहुधा उतरत्या काळातील पिक्चर Happy >>> अगदी अगदी.
आडवा व थोडा माज असलेला चेहरा
आडवा व थोडा माज असलेला चेहरा व अर्धा कान झाकलेले स्टायलिश केस >>> आम्ही ४/५ वर्षांचे असताना मोठ्या मुलांच्यात अशी फॅशन असायची. त्याला राजेश खन्ना वाला बॉबकट म्हणायचे. काही मुलांना आम्ही हिरो समजायचो. तर काही जण त्या हेअर स्टाईल मधे खूप विचित्र दिसायचे. आमच्या घरापासून काही अंतरावर चाळी होत्या. तिथे या फॅशन्स चालायच्या. काही बच्चनसारखे केस ठेवायचे तर काही बॉबकट. त्याच्यावरून गडी कुणाचा फ्यान आहे ते समजायचे.
नंतर मिठुनची फॅशन आली. कानावर केस ठेवायची आणि त्यानेच कल्ले उडवायची फॅशन पण आणली. त्याबरोबर चाळीतले कटींगवाल्याकडे जाऊन सॉफ्टवेअर अपडेट करून घेत असत. आमच्या कॉलनीतली मुलं मात्र वडलांच्या धाकाने स्क्रू कट, फौजी कट , सोल्जर कट असले कट मारत. तसली हेअर स्टाईल हिंदी चित्रपटात एक्स्ट्रा पण ठेवत नसत. त्यामुळे आम्हाला ती मुलं चम्या वाटायची.
सॉफ्टवेअर अपडेट करून घेत असत
सॉफ्टवेअर अपडेट करून घेत असत >>> टोटली.
नेफ्लिवर कोणी डेडली इल्युशन्स
नेफ्लिवर कोणी डेडली इल्युशन्स बघितला का? पाहिला असेल तर शेवट विस्कटून हवाय कळला नाही.
हो अंजली, मी पाहिला.
हो अंजली, मी पाहिला.
: स्पॉयलर अलर्ट :
जेव्हा मेरी मॉरिसन ग्रेसच्या नातेवाईक स्त्रीला भेटते, तेव्हा आपल्याला कळतं की जे काही घडलं, जे काही मेरीने पाहिलं ते आभास नव्हते तर ग्रेसला स्प्लिट पर्सनॅलिटी असते. फक्त मेरी वेळोवेळी जे म्हणते की मी पुस्तक लिहायला बसले की मी, मी नसते. मी वेगळीच कोणी होते, त्यामुळे प्रेक्षक फसतात आणि ग्रेसही त्याच गोष्टीचा गैरफायदा घेते. पण अखेरीस टॉमवर केलेल्या हल्ल्यामुळे ग्रेस पकडली जाते आणि मेंटल असायलम मध्ये दाखल केली जाते. आता मेरीच्या चौकोनी सुखी कुटुंबाची ग्लिम्पस मिळते आणि शेवट झाला असं वाटत असतानाच मेरी ग्रेसला असायलममध्ये भेटायला गेलेली दाखवली आहे. पण शेवटच्या शॉटमध्ये तेच कपडे, तेच गेटअप केलेली स्त्री मेंटल असायलममधुन बाहेर येते, जी स्त्री मेरीची मैत्रीण एलनच्या खुनाच्या वेळेस दाखवली आहे. आता प्रेक्षकांना परत एक प्रश्नचिन्ह टाकुन शेवट केला आहे की ती मेरी की ग्रेस हे त्यांनीच ठरवायचं. ओघानेच एलनचा खुन ग्रेसने केला की लिखाणाच्या धुनमध्ये असलेल्या मेरीने हे प्रेक्षकांवर सोडलं आहे.'
मस्त सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे. पण eeri आहे.
नेफ्लिवर कोणी डेडली इल्युशन्स
नेफ्लिवर कोणी डेडली इल्युशन्स बघितला का? पाहिला असेल तर शेवट विस्कटून हवाय , कळला नाही.
<<<
Same here
धन्यवाद मीरा.. तेच कळलं नाही.
धन्यवाद मीरा.. तेच कळलं नाही.
स्पॉयलर अॅलर्टः
मला वाटलं की ग्रेस शेवटी मरते तिच्या डोक्याचा तुकडा पडला असतो ना? आणि फुलदाणी पण डोक्यात मारते मेरी., आणि नंतर असायलम मधे परत कशी दिसली ? आणि शेवटी जी स्त्री कोट गॉगल घालून दिसते ती नक्की कोण कारण ग्रेस मेरीचे कपडे वापरताना दाखवली आहे सो कन्फ्युजन झाले. ती मैत्रीण बिचारी उगीच मेली या दोघींच्या स्प्लिट पर्सनालिटीच्या भानगडीत.
मस्त सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे. पण eeri आहे.>>>>+++१११
आज द रूम पाहिला prime वर.
आज द रूम पाहिला prime वर. वेगळा प्लॉट आहे आणि फँटसी च्या वळणाने जाणारी कथा आहे. एकदा पाहायला हरकत नाही.
नेटफ्लिक्स वर पगलैट पाहिला.
नेटफ्लिक्स वर पगलैट पाहिला. आवडला.
सिरीयस मेन पाहिला... हॅट्स ऑफ
सिरीयस मेन पाहिला... हॅट्स ऑफ स्क्रिप्ट साठी...
जबरदस्त...
नवाज 1 नंबर...
लहान मुलाने छान काम केले आहे...
प्रत्येक पालकाने नक्की बघावा...
नेटफ्लिक्स वर पगलैट पाहिला.
नेटफ्लिक्स वर पगलैट पाहिला. आवडला
+१
नेटफ्लिक्स वर पगलैट पाहिला.>>
नेटफ्लिक्स वर पगलैट पाहिला.>> मला काही काही गोष्टी अर्धवट राहिल्यासारख्या वाटल्या पण एकंदर बरा होता..हलका फुलका.. सानया मल्होत्रा आवडली
पगलैट आणि deadly illusion
पगलैट आणि deadly illusion दोन्ही आवडले नेटफ्लिक्सवरचे
प्राईमवरचा illegal ही चांगला आहे.
जिन्दगी इन शॉर्ट आवडला
जिन्दगी इन शॉर्ट आवडला
आम्ही नेटफ्लिक्सवर गुंजन
आम्ही नेटफ्लिक्सवर गुंजन सक्सेना बघितला. फारच छान आहे. पंकज त्रिपाठीचा अभिनय उच्च आहे. श्रीदेवीच्या मुलीचा मी हा पहिलाच चित्रपट बघितला. तिचं काम उत्तम आहे.
माझ्या मुलीला हिंदी फार येत नाही तरी तिने सबटायटल्स वाचत, अडलेलं विचारत बघितला. विद्यार्थिनींना तर अगदी आवर्जून दाखवावा असा आहे.
सेक्स न्यूडीटी LGBT असा मसाला नसलेला चित्रपट धर्मा प्रोडक्शन बनवू शकले हा धक्काच आहे.
मला असा धक्का लंच बॉक्सच्या
मला असा धक्का लंच बॉक्सच्या वेळेला बसला होता. त्या सिनेमाला पण धर्माने निर्मितीसहाय्य केले होते.
येस... जान्हवी इज द फ्युचर...
येस... जान्हवी इज द फ्युचर... जबरदस्त ऐक्ट्रेस आहे...
काल अॅमेझॉन प्राईमवर " 3
काल अॅमेझॉन प्राईमवर " 3 days of the condor" बघितला. रॉबर्ट रेड्फोर्डचा अभिनय आणि सिडनी पॉलकचं direction ह्या २ गोष्टींसाठी एकदा तरी नक्की पाहा हा सिनेमा. Jason Bourne सिरीजवर ह्या सिनेमाची बरीच छाप आहे असं जाणवलं.
Justice league Snyder cut
Justice league Snyder cut पहिला का कोणी . मला 2017 पेक्षा हे 4 तासाच पुराण आवडलं . Snyder cut खरंच चांगला होता
>> Snyder cut खरंच चांगला
>> Snyder cut खरंच चांगला होता<< +१
४:३ फॉर्मॅट मुळे थोडि निराशा झाली...
मला 2017 पेक्षा हे 4 तासाच
मला 2017 पेक्षा हे 4 तासाच पुराण आवडलं. >> +१
द ग्रेट इंडियन किचन हा
द ग्रेट इंडियन किचन हा मल्याळी चित्रपट आता अमेझॉन प्राईमवर आला आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा.
सायलेन्स .. मनोज वाजपेयी...
सायलेन्स .. मनोज वाजपेयी... मर्डर मिस्ट्री... छान आहे...
च्रप्स कुठे पाहिला ते लिहा न
च्रप्स कुठे पाहिला ते लिहा न म्हणजे शोधायला सोपं जातं
Zee 5 मंजुताई...
Zee 5 मंजुताई...
बावर्ची छान्च आहे Happy
बावर्ची छान्च आहे Happy
मला तो रेखाचा खुबसूरत सुध्हा आवड तो
>>>>
+७८६
हलके फुलके टेंशन फ्री बघायला आणि तसेच जगायला शिकवणारे .. मी सुद्धा पुन्हा पुन्हा बघितले आहेत हे चित्रपट..
बावर्ची न पाहिलेली व्यक्ती वर बघून मलाही पीएसपीओ नही जानता असेच वाटले.
छोटी सी बात अमोल पालेकरचा देखील याच पठडीतील..
ईंटरव्हल नंतर बावर्चीवरूनच उचललेला हिरो नंबर वन देखील आवडतो आणि चार सहा वेळा पाहिला आहे.
बावर्ची माहिती नसलेल्यांनी
बावर्ची माहिती नसलेल्यांनी 'अंगूर' पाहिला आहे का..?
नसेल तर जरुर पहा..
आणि 'चुपके चुपके' सुध्दा..
अंगुर मध्ये ती गोष्ट नाही जी
अंगुर मध्ये ती गोष्ट नाही जी चुपके चुपके आणि गोलमाल मध्ये आहे...
हॉटस्टार वर 1232 kms नावाची
हॉटस्टार वर 1232 kms नावाची डॉक्युमेण्टरी आहे. या बाफवर त्याबद्दल सिम्बाने माहिती दिली आहे.
आवर्जून पाहण्यासारखी आहे. लॉकडाउन झाल्यावर काम मिळणे बंद झाल्यामुळे गाझियाबादहून बिहार मधल्या सहर्सा/सहर्षा या आपल्या गावी सायकलवरून निघालेले ५-६ जण, त्यांच्या प्रवासाबद्दल आहे.
इज लव इनफ सर ... तिलोत्तमा
इज लव इनफ सर ... तिलोत्तमा शोम ला बेस्ट ऐक्ट्रेस फिल्मफेयर अवॉर्ड क्रिटिक्स जाहीर झाले...
अभिनंदन...
Pages