चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वी लोक फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला अशा बढाया मारायचे, तशी आता OTT मूव्ही बघताना मारायला स्कोप नाही असं वाटलं होतं, पण मी फर्स्ट डे फर्स्ट अवर ची बढाई मारू शकते. Wink

पण एवढ्या उत्सुकतेने पाहिला तर कोणता? रुही ! B ग्रेड सिनेमा, टुकार कथानक, जान्हवीसारखी भावहीन नायिका, राजकुमार रावचा तर कंटाळा यायला लागला आहे. (त्याचे तेच ते UP / बिहारी माणसाचे रोल. ) विनोद अगदीच सुमार. अगदी जीवावर आल्यासारखा कसाबसा बनवलेला मूव्ही वाटतो. राजकुमार राव acting साठी फक्त पहायचा तर किती. अगदीच ordinary दिसतो. जान्हवी आहे सुंदर, पण यात नो मेकअप किंवा मग भुताचा मेकअप, पुर्ण सिनेमात एकच कळकट पंजाबी सुट अशा अवतारात असल्याने ती पण बघणेबल नाही. (नदियो पार गाणं सिनेमात नाही).

बॉलिवूड कमर्शिअल मुव्हिज अपवाद वगळता मी हँडसम हिरो, सुंदर सेक्सी हिरॉईन, निसर्गरम्य ठिकाणं, गाणी, फॅशन्स आणि नृत्याची आवड आहे म्हणुन कोरिओग्राफीसाठी आणि नृत्यांसाठी पहाते. या मुव्हीमध्ये यांपैकी काहीही नाही. तरी पहायचा तर पहा. पण मग मी सांगेन त्यापेक्षा ते प्रमोशन्ससाठी बनवलेलं नदियो पार सजनदा ठाना गाणं युट्युबवर पहा.

रुही आजच पाहिला.
सर्व रिलेट झालं.अतिशय म्हणजे अतिशय असंबद्ध आहे.राजकुमार राव आणि तो सेकसा त्यातल्या त्यात गोड अभिनय करत आहेत.
जान्हवी ला अभिनयाला फार स्कोपच नाही.घाबरलेला चेहरा(चालबाझ मधली पहिली श्रीदेवी) किंवा भुताचा मेकप असे दोनच मोड आहेत.
मला स्त्री पाहिल्यावर 'हे काय' झालं होतं.पण रुही पाहिल्यावर स्त्री बराच चांगला वाटला.थिएटरला पहिला चित्रपट रुही न बघता टॉम अँड जेरी पाहण्याच्या स्वतःच्या निर्णयाचं कौतुक वाटलं. Happy
टॉम अँड जेरी ला मोजून 10 प्रेक्षक होते.पण मजा आली होती.

धन्यवाद अनु आणि मीरा वेळ वाचवल्याबद्दल. रुही अगदी आज बघणारच होते. दुसरं काय आहे बघण्यासारखं शोधावं लागेल.

पगलैट बघितला. बायदवे त्यात सानिया मलहोत्राच्या नवर्‍याची जी प्रेयसी दाखवलीय ती मुलगी आणि सानियाच्या सासूचं काम केलेली अ‍ॅक्ट्रेस या रिअल लाईफमधल्या मायलेकी आहेत का? (दोघींचीही नावं माहित नाहीत) किती सारख्या दिसतात त्या.

द बिग बुल = बिग फ्लॉप.

बिचार्‍या हर्षद मेहताचा आत्मा तळमळला असेल. या सिनेमापेक्षा स्कॅम १९९२ वेबसिरीज सगळ्याच बाबतीत उत्कृष्ट आहे. ती बघा वाटल्यास...

टेनेट पाहिला.नेहमी प्रमाणे स्वतःच्या मठ्ठपणावरचा विश्वास अजून घट्ट झाला.मी या अश्या पिक्चर्स च्या लायकीची नाही हे मला खूप वर्षांपूर्वी कळलंय Happy
आता इथे एखादा लेख आला, त्यावर 200-300 प्रतिसाद आले की ते वाचून मग परत बघेन.

'बिग बुल' बहुधा मुख्य योजना 1992 स्कॅम आधी यायची असेल.तसं झालं असतं तर लोकांना कदाचित थोडा आवडला असता.आता 1992 डोक्यात पक्का बसलाय.

चित्रपटाचा विषय काय हे कळाले की वेब सिरिज लगेच चोरी करतात. हा फटका बहुतेक बिग बुल ला बसला.

मधुर भांडारकर ने मागे सोमी वर करण जोहरला सुनावले होते की माझ्या चित्रपटासारखी वेब सिरिज बनवू नको. bollywood superstar wives बद्दल होते. कारण विषय सारखा असला की जो आधी रिलिज करतो त्याला फायदा होतो.

मला आवडला रुही. स्टार्ट टु फिनिश पाहिला. जनरली माझा एवढा अटेन्शन स्पॅन नाही.
असंबद्ध वगैरे तर अजिबात वाटला नाही. हॉरर कॉमेडी + सस्पेन्स + फॅन्टसी + सटायर सगळ्याचं थोडं मिश्रण आहे. बट इट वर्क्स. बाय द वे, मला राजकुमार राव आणि जान्हवी दोघेही आवडत नाहीत नव्हते.
स्त्रीवादी लोक पिक्चरमुळे ट्रिगर होणार आहेत, पण मुलिंना लग्नासाठी पळवून नेण्याची डोक्युमेण्टरी नेटवर पाहिली आहे. काही देशांत हा आजही नॉर्म आहे. इन फॅक्ट, सुरवातीचा अक्खा सीन त्या डॉक्युवरून घेतल्यासारखा वाटतो. इन्क्लुडिंग किडनॅपिंग बघायला आलेला फॉरेनर. खरंतर त्या फॉरेनरचा रोल उगाच घातल्यासारखा वाटतो.
मेन थीम (मुलगा/मुलगा/मुलगी/भूत लव्ह ट्रँगल!) बर्‍यापैकी फ्रेश आहे(जर कुठून ढापली नसेल तर). काही काही डायलॉग चांगले होते. पलट..पलट.. च्या पॅरॉडीला जाम हसलो. रुही अफ्झा वगैरे पन्स पण ठीकठाक Happy

लोक जाहनवी ला हेट कसे करू शकतात...
शी इज अमझिंग...

मलाही आवडला रूही... काही ठिकाणी प्रचंड हसायला आले...
फक्त जान्हवी साठी बघू शकता... अप्रतिम अभिनय...

मेन थीम (मुलगा/मुलगा/मुलगी/भूत लव्ह ट्रँगल!) बर्‍यापैकी फ्रेश आहे
>>> येस.. खूप दिवसांनी फ्रेश युनिक थीम पाहीली...

>>'बिग बुल' बहुधा मुख्य योजना 1992 स्कॅम आधी यायची असेल.तसं झालं असतं तर लोकांना कदाचित थोडा आवडला असता.आता 1992 डोक्यात पक्का बसलाय.<<
नाहि. माझ्या मते, हर्षद मेहता आणि त्याची स्टोरी सगळ्यांना परिचित आहे. ती कशी पडद्यावर मांडता याला महत्व आहे. (उदा: क्रिस्तोफर नोलनची बॅटमॅन ट्रिलजी) वेबसिरीजने ते गणित बर्‍यापैकि साधलं, आणि सिनेमाने माती केली...

रुही बहुतेक नेट फ्लिकस वर पाहिला असावा.
मला त्या फॉरेनर चा रोल आवडला.
जान्हवी दिसायला गोड आहेच.अजून थोडे पिक्चर केले की अभिनयही करेल चांगला.
राजकुमार राव नॉर्थ कडचा गावातला मुलगा/गुजराती राजस्थानी अकसेंट स्टीरिओटाईप होतोय की काय असं वाटलं.पण तो मला पिक्चर मध्ये आवडतो.तो दुसरा छिछोरे मधला सेकसा पण चांगला अभिनय करतो.

पगलेट मध्ये सानिया ची सासू शिबा चढ्ढा आणि आस्तिक चं प्रेम असलेली मुलगी एकमेकांना रिलेटेड नाहीत.
त्या मुलीची शेमलेस नावाच्या शॉर्ट फिल्म मध्ये चांगली acting आहे.

रुही बघावा की नाही कन्फ्यूझ झालो ईथल्या कॉमेण्ट वाचून
मागे स्त्री बद्दल कौतुक वाचलेले. तसा वाईट नव्हता पण उगाच काहीतरी भारी अपेक्षा ठेऊन ठिकठाक चित्रपट बघावा लागल्याने पदरी निराशाच पडलेली. त्यानंतरही जेव्हा वर्षातल्या उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत स्त्री चे नाव वाचायचो तेव्हा थोडासा तळतळाट व्हायचा.

बघावा नक्की.
कारण दुसऱ्याचे रिव्ह्यू सापेक्ष असतात.स्वतः बघून स्वतःचे मत बनवलेले बरे.
(तळतळाट शब्द वर वाक्यात वापरला आहे तसा वापरत नाहीत.)

जान्हवीचे म्हणाल तर सौंदर्य असो वा अभिनय मला तरी अजून तिच्यातले काहीच अपील झाले नाही. त्या परीणीती चोप्रा वा सारा अली खान अश्यांच्या पठडीतीलच वाटली अजूनपर्यंत तरी. त्यातही त्या सारा अलीखान सारखी एक नवीन मुलगी आमच्या ऑफिसला आल्याने मला सारा सुद्धा थोडी आवडू लागली. पण जान्हवीला मी अनुष्काईतकेही रेटींग अजून देऊ शकत नाही. दिपिका प्रियांका वगैरे तर फारच दूर झाल्या. श्रीदेवीची मुलगी नसती तर चर्चाही नसती असे वाटते.

तळतळाट शब्द वर वाक्यात वापरला आहे तसा वापरत नाहीत.
>>>
हो मला ते वापरतानाच समजले. मराठी कच्चेय. नेमका शब्द सुचला नाही. पण मायबोली वाचकांवर विश्वास आहे. फुल्या टाकल्या असत्या तरी त्यांनी भावना समजल्या असत्या. फक्त अपशब्द वाटायला नको म्हणून फुल्या टाकल्या नाहीत Happy

कारण दुसऱ्याचे रिव्ह्यू सापेक्ष असतात.स्वतः बघून स्वतःचे मत बनवलेले बरे.
>>>>>
हो नक्कीच सापेक्ष असतात. म्हणून तर आपण जास्तीत जास्त कल काय आहे हे बघतो आणि तरीही तो गंडतो तेव्हा त्रास होतोच.

जान्हवीचे म्हणाल तर सौंदर्य असो वा अभिनय मला तरी अजून तिच्यातले काहीच अपील झाले नाही. ">>>>> (चक्क) ऋन्मेषशी सहमत आहे.

जान्हवी 10 जणीत सुंदर म्हणता येईल, पण बॉलिवुड हिरॉईन मापदंडात ती मला तरी सुंदर वाटत नाही (अपवाद - नदियो पार सजनदा ठाना) acting तर धन्यवाद. एकच भाव सगळ्या सीनमध्ये आणि सगळ्या सिनेमामध्ये. डायलॉग डिलिव्हरी - आईची कॉपी.

आता हॅलो चार्ली बघतो आहे आम्ही. जरा बालबुद्धी आहे धमाल सिरीज कॅटेगरी सारखा. डोकं बाजूला ठेवून पाहिला आणि खूप हसलो
(एकंदर वीकेंड ला बरेच सिनेमे पाहिले.फ्रीज पुसण्याचं काम बॅकसीट ला गेलंय ते पुढच्या वीकेंड ला.)

काल इथे चर्चा वाचून बावर्ची पाहिला खुपच छान सहज सुंदर अभिनय सगळ्यांचा. गाणी पण छान आहेत एकेक. हीरो नं वन बराचसा बेतलाय यावर पण हा जास्त आवडला. एकदम refreshing अनुभव. कोणी अजून माझ्या सारखं बघायचं राहीले असेल तर नक्की बघा.

रूही पाहिला. स्त्री इतका नेटका नाही पण दोन घटका करमणूक करतो. राजकुमार राव आणि वरूण शर्मा दोघेही खूप नैसर्गिक आहेत.
स्त्री मध्ये आणलेला हॉरर कॉमेडीपेक्षा ही वेगळी आहे. दचकण्यासारखा एखादाच सीन आहे. नंतर भूतनीची कथा इतकी ओळखीची होते कि हॉरर न वाटता ती एक साधारण चमत्कार कथा बनते. भूतनीचं कॅरेक्टर अधून मधून आणलं असतं तर वेगळा इफेक्ट आला असता.

हँडसम हिरो, सुंदर सेक्सी हिरॉईन, निसर्गरम्य ठिकाणं, गाणी, फॅशन्स आणि नृत्याची आवड आहे म्हणुन कोरिओग्राफीसाठी आणि नृत्यांसाठी पहाते. या मुव्हीमध्ये यांपैकी काहीही नाही.
>>>मीरा...म्हणून तुम्हाला रूही आवडला नाही आणि फक्त नदियो पार गाणे आवडले... तुम्हाला चित्रपटात जाहनवी आवडली नाही.. पण या गाण्यात आवडली.. थोडक्यात तुम्ही तिची एकटिंग नाही पाहिली, डान्स पाहिला फक्त गाण्यातला...
तुमचा प्रतिसाद प्रचंड बायस्ड आहे.. आणि unconscious बायस्ड... तुमची त्यात चूक नाही...

तुमचा प्रतिसाद प्रचंड बायस्ड आहे.. >>> बरं

थोडक्यात तुम्ही तिची एकटिंग नाही पाहिली >>>> दिसलीच नाही कधी. तुमची दृष्टी एक दिवसाकरता मला मिळो. मी तिचे 4 मुव्हिज पाहिले एक इंटरव्ह्यू पाहिला, मला सगळ्या ठिकाणी मख्ख चेहराच दिसला.

एकदम सिरीज बघितल्यासारखे जेसन स्टॅथम चे काही पिक्चर पाहिले. त्यातील होम फ्रण्ट आधी पाहिला होता पण पुन्हा पाहतानाही आवडला. सगळे लक्षात नव्हते म्हणूनही असेल. हे सगळे नेफिवर.

होम फ्रंट - हा सर्वात ग्रिपिंग आहे. पण सर्वात सिरीयसही
पार्कर - हा टोटल अ‍ॅक्शनपट.
द बँंक जॉब - एका सत्य घटनेवर आधारित आहे. ब्रिटिश सेटिंग आहे, लंडन चे. इण्टरेस्टिंग कथा आहे. किरकोळ क्रिमिनल्स ते माउण्टबॅटन व रॉयल प्रिन्सेस - इतकी रेंज आहे कॅरेक्टर्सची Happy
रिडेम्प्शन - मूळ नाव हमिंगबर्ड. हा ही ब्रिटिश आहे.

याचे लॉक, स्टॉक अ‍ॅण्ड टू स्मोकिंग बॅरल्स, इटालियन जॉब (नवीन) व इतर काही पूर्वी पाहिलेले आहेत. फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस मधले अजून पाहिलेले नाहीत (त्या सिरीज मधले पहिले दोनच पाहिलेत). जनरली चांगले असतात.

मेलिसा मॅकार्थी असलेल्या "स्पाय" मधे याचा छोटा, पण धमाल रोल होता.

Prime वरचे चांगले हॉलिवूड पट सुचवा. चांगलं कथानक आणि वेगवान स्टोरी असलेले. नेफ्लि परवडत नाय ! ☺️

मी पण रुही आणि पगलाईट बघितले.
स्पॉयलर अर्लट
रुही : ठिक ठिक आहे. स्त्री जास्त चांगला होता. यात म्हणजे केहना क्या चाहते हो भाई वाट्ला. एक तर ती अशी का होते ते बर्‍याच वेळापर्यंत कळत नाही. शेवटी त्या म्हातारीचं आणि तिचं गायब होणं काय झेपलं नाही. मी माझ्यापरीने अर्थ लावला की चुडैलचं फायनली लग्न तिच्याशीच का होईना झालं आणि तिला मुक्ती मिळाली पण ती म्हातारी पण तिच्यासाखीच असते ना उलटे पैर वाली ? ती का गायब झाली ऑर मे बी सेम जमात असल्याने का. Proud जाऊदे फारसं डोकं लावण्यासारखा पिक्चर नाहीचे.

राजकुमार राव चे बरेचसे डायलॉग कळलेच नाहीत. कुठली भाषा बोलतो देव जाणे हरियाणवी आहे का? पण ज्या प्रकारे बोलतो त्याच्या एक्स्प्रेशन्सला खूप हसले. तो रुहीला म्हणत असतो वो दुसरी मॅडमसे थोडा डर लगता है बहोत चिल्लाती है Lol

पगलाईटः ओके आहे. सानिया छान दिसते. कुरळे केस सुट होतात तिला एकदम. आशुतोष राणाने चांगले काम केलंय.

रूही + आफ्जा ला मी खूप हसले होते. वरूण शर्मा असाही हसवतो आणि यात तर अगदीच क्रेझी आहे.

मेलिना (इटालियन - २०००) कुठे पाहता येईल संपूर्ण ? ( सबटायटल्स असतील तर उत्तम)

च्र्प्स यान्नी मागे लिहिले होते जान्हवी खूप सुन्दर आणि acting पण ऊत्तम वगैरे.. तेव्हा मला खरच वाटले कि ते उपहासानेच म्हणत आहेत .. खरच... Happy

मी तिचे 4 मुव्हिज पाहिले एक इंटरव्ह्यू पाहिला, मला सगळ्या ठिकाणी मख्ख चेहराच दिसला.
>>>> + १

आबाजात नाय जमत तिला अभिनय !

Pages