चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस... जान्हवी इज द फ्युचर... जबरदस्त ऐक्ट्रेस आहे...
Submitted by च्रप्स on 29 March, 2021 - 02:11

लोक जाहनवी ला हेट कसे करू शकतात...
शी इज अमझिंग...
मलाही आवडला रूही... काही ठिकाणी प्रचंड हसायला आले...
फक्त जान्हवी साठी बघू शकता... अप्रतिम अभिनय...
खूप दिवसांनी फ्रेश युनिक थीम पाहीली...
Submitted by च्रप्स on 11 April, 2021 - 08:38

>>>>>>>>>

थोडक्यात च्रप्स जान्हवीचे दिवाणे आहेत Happy
एक फॅन क्लब सुरू करा च्रप्स, छान फोटो टाका, मी येतो हजेरी लावायला Happy

टेनेट पाहण्याचा काल प्रयत्न केला. अर्धा तास नेट(!) लावून पाहिला आम्ही दोघांनी. काहीच कळेना म्हणून विकीपीडिया वर वाचून समजतंय का ते पाहावं म्हणून विकीपीडिया वाचला. त्यावरची गोष्ट वाचून नाद सोडला. पुन्हा कधीतरी प्रयत्न करायची इच्छा आहे… पाहू या जमतंय का ते.

पार्वती वेलकम टू क्लब. (पण माझ्या बरोबर बघणार्‍या ३०% लोकांना तो नीट समजला असं ते म्हणाले.)
बहुतेक असे अगम्य हॉलीवूड पिक्चर सारखे बघून एक प्रकारची इम्युनिटी आणि बुद्धिमत्ता निर्माण होत असावी. Happy मी कधीतरीच बघत असल्याने मला कळला नाही.

टेनट मी पण झोपायच्या वेळेला लावला होता. पडद्यावर फक्त दृश्यच द्श्ये. संवाद असे नाहीतच. थेट रेल्वेच्या ट्रॅक मधेच. पुन्हा पाहीन.
अधून मधून फॉर्वर्ड करून पाहिला. पण एण्ट्रॉपी, टाईम ट्रॅव्हल असं काहीसं. माझं सायन्स भारी नाही. पण एण्ट्रॉपीचा उपयोग करून टाईम ट्रॅव्हल ? शक्यच नाही ते. तरी पूर्ण बघितल्यावर बोललेले बरे.

झोपताना बघायचा असेल तर वेल डन बेबी बघावा. मी पण झोपतानाच पाहीला. पाहता पाहता झोपले तरी चालेल असाच आहे Lol

पगलाईट बद्दल थोड्या अपेक्षा वाढलेल्या. पण तितका आवडला नाही. काही ट्रॅकस आवडले, काही अजिबात पटले नाहीत. प्रेयसीच्या नजरेतून अनोळखी नवऱ्याशी परिचय करून घेण्याचा प्रयत्न करणारी संध्या आवडली. पण तिचे लग्न ठरवणे वगैरे अगदीच अतार्किक वाटले. कुठल्याही हिंदू घरात मृत मुलाचे बारावे व्हायच्या आधीच विधवा सुनेचे लग्न ठरवायची घाई कोणी करणार नाही, मग भले ती पैश्यासाठी का असेना. शेवट पण पटला नाही. तिचा शहाणी व्हायचा प्रवास अजून ठळकपणे यायला हवा होता असे वाटले.

मराठी चित्रपट 'बस्ता' पाहिला. बरा आहे जुनीच कथा आहे. रमेश देव आणि सिमा देव च्या 'वरदक्षिणा ' जुन्या चित्रपटसारखी. आताच्या काळातील असला तरी तेच हुंडा प्रकरण.

साधना , पगलैट बाबत सहमत. पूर्ण दोन तास जवळ जवळ काहीच घडत नाही आणि शेवटच्या दोन चार मिनिटात काय तेवढा तिचा डीसीजन दिसतो फक्त जो पण अपेक्षितच होता. आशुतोष राणा हळव्या बापाच्या रोल मधे सरप्राइजिंग होता पण , त्याचे पूर्वीचे फक्त डेंजर रोल माहीत असल्यामुळे.

जान्हवी खूप सुन्दर आणि acting पण ऊत्तम वगैरे.. तेव्हा मला खरच वाटले कि ते उपहासानेच म्हणत आहेत .. खरच.
>> ती सुन्दर आहे आणि नाच पण उत्तम करते पण अभिनय मात्र जमत नाही! अर्थात रुही अजुन पाहिला नाही मग मत बदलु शकते!

पगलाईट खुप उत्साहाने बघायला घेतलेला. पण अज्जिब्बात आवडला नाही. संध्याच ते चिप्स खाणं वगैरे अगदीच चाईल्डीश वाटल. आणि नवरा मेल्यावर सात महिन्यामध्ये तिला नवर्‍याविषयी काहीही जाणुन घ्यावस वाटल नाही हे अगदीच आत्यर्तीक वाटलं. परत आणि शेवटी सगळ आई वडीलांच्या माथी फोडून रिकामी कि माझे डिसिजन तुम्ही घेतले म्हणुन अस झाल. मग उगाच बस मधन जाणं , पाणि पुरी वगैरे खाणं म्हणजे फ्रीडम हे असले क्लिशे. वैताग .
शेवटी दिराला जाताना तुला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली आहे असच सांगते ना ती?.

सात महिने कुठून आले?>>> तिच्या लग्नाला ७ महिने झालेले असतात.
नवरा मेल्यावर सात महिन्यामध्ये >>> मरायच्या आधी म्हणायचे असेल

येस.. जान्हवी प्रचंड सुंदर आहे.. डान्स देखील छान करते.. अभिनय मला आवडला तिचा..अभिनयात सारा अली, अनाया , तारा या नवोदित लोकांशी तुलना केली तर खूपच पुढे आहे...
दीपिका, आलिया, विद्या त्याच्या कारकिर्दीत चार पाच वर्षानंतर ज्या अभिनय लेव्हल ला होत्या तिथे जाहनवी आताच पोहचलेली आहे...
अनुभवाबरोबर आणखी चांगली ऍक्टरेस होत जाईल ती... मार्क माय वर्डस ...

पण माझ्या बरोबर बघणार्‍या ३०% लोकांना तो नीट समजला असं ते म्हणाले. >> बाप रे! ३०%!!!! किती जणांबरोबर बघितलात? की ही फक्त तिघातली एक व्यक्ती आहे?

टेनेट सोप्पे आहे. ब्लू म्हणजे परिस्थिती सरळ वेळेत चालली आहे. व रेड म्हणजे वेळ उलटा फिरवला आहे. प्रोटागोनिस्ट ह्याचेच ते टेनेट नामक ऑर्गनायझेशन आहे. डिंपल उगीचच ड्वायलाक मारते. उंच सुंदर गोरी इंग्लिश बाई पण उगीचच आहे. अँड माय सन हा जगातील युसलेस डायलॉग पैकी एक आहे. ती नसली तरी चालले असते.

अ‍ॅक्षन सीन्स अप्रतिम आहेत क्लायमॅक्स प्रोटागोनिस्ट व तो त्वाय्लाइट मधला व्हॅम्पायर जे काय प्लॅन करतात ते शेवटी फेल जातात चोर्‍या, विमानचा घडवून आणलेला अपघात ह्याव अन त्याव. क्लायमॅक्स भारी आहे. त्यात एक बिल्डिंग एकाच क्षणी रेड व ब्लू टीम उडवतात
एकाच क्षणी ती उभीपण राहते व उध्वसत पण होते हे भारी आहे.

सिनेमाच्या साउंड मिक्सिंग मध्ये जाम लोच्या आहे. त्यामुळे संवाद ऐकू येत नाहीत. पण निळे समुद्राचे पवन चक्कीचे शॉट मस्त आहेत.
स्क्रिप्ट जामच गंडले आहे. अर्धा वेळ आयडिया समजावून सांगण्यात जातो. हिरो च्या तोंडावरची माशी हलत नाही. सूट बरे आहेत. पण त्याचा काय उपवेग.

शेवटी दिराला जाताना तुला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली आहे असच सांगते ना ती?.>> शर्मा अंकाच्या मुलीने पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट आणि ती accept करायला सांगितली. शिवाय चॅटमधे टाईप करताना काळजी घ्यायला सांगितली कारण इंग्रजी खराब आहे.

30% म्हणजे, 6 लोकांनी पाहिला.त्यातल्या 2 ना कळला.
मला ते भविष्य भूतकाळाचे सीन्स पाहताना खूप गोंधळ झाला.
ती उंच नायिका 6 फूट 3 उंच उंच आहे..गुगल केलं.

एण्ट्रॉपी चा वापर करून टाईम ट्रॅव्हल असंच आहे ना चित्रपटात ? की उदाहरण आहे ?
एण्ट्रॉपीचा वापर करून कुणी कसे टाईम ट्रॅव्हल करू शकेल ? ही कल्पना गंडलेली नाही का ?
तसे असेल तर पुढची कथा सायन्स फिक्शन न राहता निव्वळ फिक्शन नाही का ?

लग्नाला 5 महिने झालेले आहेत आणि चित्रपट सुरू होतो मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी बहुतेक. कारण सुरवातीच्या प्रसंगात आलोक, ज्याने अंत्यसंस्कार केलेले असतात त्याला जमिनीवर झोपायची आज्ञा ताउजी करतात ...

दुसरा दिवस ते 13 वा दिवस या कालावधीत संध्या कमीत कमी 4-5 दा तरी बाहेर गेलीय. त्यात एकदा पाणीपुरी खायला , एकदा नवऱ्याच्या ऑफिसात आणि नंतर त्या प्रेयसीबरोबर भटकायला, फाईव्ह स्टार हाटेलात जाऊन फ्रुट पंच प्यायला Happy हे सगळे अतार्किक वाटले.

त्या प्रेयसीला भेटल्यानंतर तिला प्रेम वगैरे गोष्टींची जाणीव होते, आजूबाजूच्या प्रेमळ जोडप्यांकडे ती लगेच वेगळ्या दृष्टीने पाहू लागते असे दिग्दर्शकाला बहुतेक सांगायचे असेल. पण सोशल मीडियावर वावरत असलेली व्यक्ती ह्या बाबतीत इतकी अंधारात असेल असे वाटत नाही.

ते शर्माआंटीकी लडकी मला टायपो वाटला Happy तिला पांडेआंटी की लडकी म्हणायचे असणार. (चॉईस वाईट आहे पण बाहेरच्या जगात ऑप्शन्स मिळाले की ह्याला डच्चू देईलही.) 5 महिन्यात ती घरच्या इंडियन टॉयलेटशी जुळवून घेऊ शकली नाही ती शेजारच्या शर्मा आंटीच्या मुलीशी कुठे फ्रेंडशिप करणार... तिच्याशी फ्रेंडशिप असल्याशिवाय असले गुप्तग्यान कुठून मिळणार...

मला पग्लैट आवडला. कमिंग ऑफ एज १३ दिवसांत म्हणजे भलतंच फास्ट झालं, Proud तरी कमिंग ऑफ एज स्टोरीचा असा सेट-अप आवडला. स्क्रिप्ट, आर्ट डिरेक्शन आवडलं.

नवरा मेल्यावर सात महिन्यामध्ये तिला नवर्‍याविषयी काहीही जाणुन घ्यावस वाटल नाही>>>
नवरा मेल्यावर त्या आधी सात महिन्यामध्ये तिला नवर्‍याविषयी काहीही जाणुन घ्यावस वाटल नाही

Roohi baakwas watla. stree ne khup apeksha wadhlya hotya. aso.
Janhavi la 100 sandhi milalya tari bhava sarkha ti tyacha panipat ch karnar.
tarihi sandhi milat ch rahnar tila.

Janhavi kapoor>> Sundar?
वेगवेगळ्या लोकांना वेगवेग ळ्या व्यक्ती सुंदर वाटतात... त्यामुळे समजू शकते.

तिच्या अभिनयाबद्दल शंका उपस्थित करा रे, सौंदर्याबद्दल नको. छान सुंदर आहे की. आणखी किती सुंदर असावी लागते एखादी स्त्री किंवा हिरोईन तिला सुंदर म्हणायला Happy

अर्थात मला अपील होणारा टाईप वेगळा आहे. दिपिका, प्रियांका, मराठीत सई वगैरे... Happy
तिचे सौंदर्य श्रीदेवी, माधुरी, जुही चावला छाप आहे.

Pages