Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यु टर्न नव्हतं नाव, मिस्ट्री
यु टर्न नव्हतं नाव, मिस्ट्री आणि हायवे हे दोन्ही पिक्चरच्या नावात होतं. डाव्या बाजूला वर नाव येतं ना तिथे तरी तसं काहीतरी होतं.
नवीन Submitted by अन्जू on 20 April, 2021 - 18:16
>>>>>
त्याच पिक्चरचे दोन versions आहेत यु टर्न आणि
Flyover ek mystery.
U turn बघायला सुसह्य आहे.(बजेट जास्त असावे)
U turn बघणेबल होता. थोडा अ
U turn बघणेबल होता. थोडा अ आणि अ.
समंथा आवडते म्हणून नेटाने बघितला
अमेझॉन प्राइमवर..
अमेझॉन प्राइमवर..
मी सलमा हाएक व ओवन विल्सनचा ब्लिस पाहिला. अतिशय टुकार. मला वाटलं सायफाय आहे पण नाहीये. गांजेड्या लोकांचं डोकं कसं चालतं हे थोडं कळालं.
नेटफ्लिक्सवर..
थेअरी ऑफ एव्हरिथिंग पाहिला, आवडला. स्टिफन हॉकिंग यांच्या संशोधनाबद्दल कमी दाखवलयं असं वाटलं तरीही आवडला. सर्वांनी कामं उत्तम केली आहेत.
Prime वर The long walk home
Prime वर The long walk home पाहिला. आवडला.
मॅांटगमरी, आलाबामा मधे १९५५ साली केलेल्या बस बहिष्काराच्या वेळी एक गोरी बाई आणि त्या बहिष्कारात सामिल झालेली तिची मेड या दोघींची गोष्ट आहे.
मी सलमा हाएक व ओवन विल्सनचा
मी सलमा हाएक व ओवन विल्सनचा ब्लिस पाहिला. अतिशय टुकार. मला वाटलं सायफाय आहे पण नाहीये. >>> अगदी अगदी . सुरुवातीला थोडा interesting वाटला , पण नंतर कशाचा कशाला पत्ता नाही .
हिंदी डबचं नाव मै हू
हिंदी डबचं नाव मै हू दंडाधिकारी आहे >>> चहा-कीबोर्ड सिच्युएशन होता होता वाचली. काय काय नावे काढतात हे लोक.
अजीब दास्तान्स मधली गिली पुची
अजीब दास्तान्स मधली गिली पुची कथा सुपर्ब आहे. स्टोरी, अॅक्टिंग, क्लायमॅक्स सगळंच.
हनीलँड
हनीलँड
मॅसेडोनिया मधल्या डोंगराळ भागात राहणाऱ्या, पारंपारिक पद्धतीने मध गोळा करून विकणाऱ्या एका स्त्रीबद्दलची टर्किश भाषेतील डॉक्युमेंटरी. डॉक्युमेंटरी असूनही मागे निवेदन नाही. या स्त्रीचं निसर्गाशी असलेलं घट्ट नातं संवादांमधून उलगडणारी ही कहाणी आहे. अप्रतिम छायाचित्रण आणि हृदयाला भिडणारा अनुभव. फिल्मला अनेक नामांकनं, बक्षिसं मिळाली आहेत.
इंग्लिश सबटायटल्स आहेत. (मुलं किंवा ज्ये ना सोबत बघणार असाल तर इशारा - सबटायटल्स मध्ये 'फ' शब्द आहेत, आणि एका वासराचा जन्म प्रसंग दाखवला आहे.) ही फिल्म मी एका ग्रूपच्या कार्यक्रमात पाहिली, पण ऑनलाईन उपलब्ध असावी.
Flyover ek mystery. >>> thank
Flyover ek mystery. >>> thank u. हेच नाव.
काय काय नावे काढतात हे लोक. >>> अगदी अगदी
ज्यान्नी त्या साउथ इन्डियन्स
ज्यान्नी त्या साउथ इन्डियन्स चित्रपटान्ची नावे सान्गितली त्यान्ना धन्स.
काय काय नावे काढतात हे लोक. >>> ++++++++११११११११
Honeyland सुंदर फिल्म आहे.
Honeyland सुंदर फिल्म आहे. मला काही महिन्यांपूर्वी टेलवग्राम वर मिळाली होती. त्या स्त्रीच्या निसर्गाबद्दलच्या संवेदना , प्रेम आणि बदलत चाललेली परिस्थिती च छान चित्रण केलं आहे
साऊथ फिल्म्स मध्ये थोडा
साऊथ फिल्म्स मध्ये थोडा अतिरेक असला तरी त्यांच्या कथा हिंदी चित्रपटांपेक्षा चांगल्या असतात. हे.मा.वै.म.
Saina Nehwal movie....
Saina Nehwal movie. Typical hindi movie. ... predictable and over over dramatic... Saina ki mom is shows playing badminton when shes in womb... couldn't tolerate the movie even for 10 mins...
उडान खूप सुंदर आहे. एअर
उडान खूप सुंदर आहे. एअर डेक्कन एअरलाईन्स ची कहाणी.
The father सिनेमा सुरू होतो
The father सिनेमा सुरू होतो एक घरामध्ये जिथे एक मध्यमवयीन मुलगी (जी घटस्फोटित आहे ती) आपल्या वयस्कर वडिलांना त्यांच्या घरी भेटायला येते. नवीन नर्स लावत आहे तिच्याशी व्यवस्थित वागा अस सांगत आहे. त्यांचं बोलणं होत , वडील चहा करायला स्वयंपाक घरात जातात, हॉल मध्ये येतात तर त्यांना एक त्रयस्थ व्यक्ती बसलेली दिसते . कोण कुठचा विचारल्यावर तो सांगतो की हे त्याचेच घर आहे , मी तुमचा जावई आहे व तुम्ही इथे राहत आहात. इथून सुरू होत असलेला विसमरणाचा खेळ आपल्याला त्या वडिलांच्या सोबत गुंगवुन ठेवतो.
त्यांची वयस्कर होणं आणि विसंबून राहणं ही स्थिती अक्षरशः मन कुरतुडून काढते. अडकून पडलेल्या त्या जीवाची सरळ सुटका झाली पाहिजे असं वाटतं. विस्मरणात छोट्या छोट्या गोष्टींचा क्रम न लागणं , आयुष्यातला एक एक क्षण हरवून जण अस होत रहातं.
Anthony hopkins (वय 85 वर्षे) अक्षरशः पात्रं एवढं जिवंत करतो की कधी त्याच्यासोबत डोळ्यात आसवं येतात समजताच नाही.
Olivia colman जिने मुलीचा रोल केला ती तर अप्रतिमच आहे.
हा सिनेमा चुकवू नये
इंटरेस्टिंग वाटतोय. आता बघेन.
इंटरेस्टिंग वाटतोय. आता बघेन. कुठे आहे ?
अरे वा! कुठे आहे रंगीला?
अरे वा! कुठे आहे रंगीला?
Saina Nehwal movie. Typical
Saina Nehwal movie. Typical hindi movie. ... predictable and over over dramatic... Saina ki mom is shows playing badminton when shes in womb... couldn't tolerate the movie even for 10 mins...>>>>
+१
मला telegram वर मिळाला.
मला telegram वर मिळाला. नेटफ्लिक्स किंवा pr!ime वर नाही आहे .
कधी कधी रस्त्याच्या कडेने
कधी कधी रस्त्याच्या कडेने जाताना आपल्याला भीक मागणारी छोटी मुलं, निराधार अपंग किंवा उघड्यावर पडलेली म्हातारी कोतारी दिसतात. मनाला वाईट वाटतं. त्यांच्यासाठी काहीतरी करावं , त्यांचं बरं व्हावं अस वाटतं. थोडक्यात आपली त्यांच्याबद्दलची संवेदना जागते. पण त्याच पुढे काय होत ? वेळ नाही , असेल तर तेवढी तीव्र इच्छा नाही, जरी झालीच इच्छा तर काहीतरी मदत करू एवढी हिम्मत होत नाही.
मग कोणीतरी अपल्यामधूनच उठतो. चांगलं , वाईट, दारिद्य, उपासमारी जवळून पाहतो आणि त्याच्यातला माणूस जागा होतो. मग सर्व सोडून समाजसेवेला लागतो.
हे त्याचं परिवर्तन उलगडून दाखवतो तो The motorcycle diaries .
तरल, मनाला भिडणारी आणि संवेदना जागी करणारी फ़िल्म.
खूप लोकांनी खूप काही लिहिलं आहे याबाबद्दल.
Prime वर होती.
प्राईमवर दिसतोय पण रेंट करावा
द फादर! >>>>>>>>>>प्राईमवर दिसतोय पण रेंट करावा लागेल.
हो रेंटल ऑप्शन दिसतोय.
हो रेंटल ऑप्शन दिसतोय.
'रामप्रसाद की तेराहवी' बघितला. स्टारकास्ट बघुनच दमायला होईल अशी आहे. सुप्रिया पाठक, नासिर (गेस्ट), विक्रांत मेसी, कोंकणा (यात आणि त्या अजीब दास्तान मध्ये एकच व्यक्ती काय कमाल दिसू आणि काम करू शकतो!!!), विनय पाठक, मनोज पहावा आणि बरेच जण आहेत. रामप्रसाद (नासिर) संगीत शिक्षक आहे तो मरतो आणि म्हणून त्याची चार मुलं, दोन मुली त्यांची कुटुंबं, नातवंडं असा सगळा परिवार त्यांच्या लखनौच्या घरी अंत्यविधी आणि तेरावं करायला म्हणून (नाईलाजाने) एकत्र येतो. एकाच कुटुंबातील लोकं आहेत, पण खूप मोठ्या काळानंतर एकत्र येत आहेत. खलनायल असा कुणीच नाही. प्रत्येक नात्याला एक भूतकाळ आहे. त्यात कुणी नकळत कुणी परंपरेने दुखावलं गेलं आहे.
भूतकाळातील काही फुंकर न घातल्याने कधीच खपल्या न धरलेल्या जखमा कुणी मुद्दाम उघड्या करतं. मध्यमवर्गीय घरात काही कारण नसताना घातलेल्या मर्यादा, किवा कदाचित त्या ओलांडायची कुवत नसल्याने स्वतःवरच घातलेलं मर्यांदांचं कवच धारण करणारी लोकं त्या ओलांडलेल्या इतर नातेवाईकांकडे काहीश्या असुयेने तर काही सूप्त आकर्षणाने बघतात बोलतात. आपल्याकडे केवळ पूर्वी करत म्हणून आजही असणार्या काही निरर्थक परंपरा पाळत, काही मोडत, काही,डोळसपणे बघत तेरा दिवस जात रहातात. कुठेही कसलंही फार जोरकस भाष्य नाही, त्यादिवसात काही विनोदी घडलं तर जसं आपल्याला ही थोडं हसू फुटेलंच ते त्यांना ही फुटतं. सगळी हाडामाणसाची माणसं आहेत. तेरावं आटपतं आणि मुलं मुली आपापल्या घरी जातात. कदाचित.... हो कदाचित काही तरी बारिक दृष्टीकोनात बदल होऊन जातात. काही बहुतेक काहीच फरक न होता जातात. साधा सरळ चित्रपट आहे..
कदाचित म्हणूनच संपल्यावर आपल्याला फार काही 'ग्यान' न मिळाल्याने फार काही 'एनलायटन' वाटत नाही. पण थोडंस अंतर्मुख होऊन नकळत विचार चक्र चालू होतं. जे कदाचित दीर्घकाळ परिणाम करेल. काही मोठा ऐवज मिळाला असता तर तो तेवढ्यापुरता मिळून नंतर स्मरणातून निघुन गेला असता का?
चित्रपटात अनेक पात्र आहेत आणि प्रत्येक छोटी छोटी व्यक्तिरेखा तिचे कंगोरे अगदी ठाशशीपणे मनावर बिंबत जातात. सुरुवातीला कोण कुणाचं कोण असा थोडा गोंधळ उडतो, पण व्यक्तिरेखांची बांधणी फारच अफलातुन आहे.
काल बघितला तेव्हा ठीक वाटलेला, हे आत्ता लिहिताना आणखी आवडला
(नेटफ्लिक्सवर आहे)
वंदना गुप्ते यांनी सेलेब्रेशन
वंदना गुप्ते यांनी सेलेब्रेशन नाटकावर आधारित चित्रपट काढला होता तोही काहीसा असाच आहे. एवढे सगळे कसलेले कलाकार म्हणजे मेजवानीच असणार.
हेलो चार्ली बघितला.. डोकं
हेलो चार्ली बघितला.. डोकं बाजूला ठेऊन बघायचा.. फुलटू धमाल आहे.
हो मलाही आवडला. काहीही आहे
हो मलाही आवडला. काहीही आहे पिक्चर. मजा आली.
रामप्रसाद की तेरवी बघितला .
रामप्रसाद की तेरवी बघितला . अमितव यांच्या परीक्षण विषयी सहमत . आम्ही jiocinema वर पाहिला .
वंदना गुप्ते यांच्या ' फॅमिली कट्टा ' पेक्षा जास्त चांगला वाटला .
हेलो चार्ली बघितला.. डोकं
हेलो चार्ली बघितला.. डोकं बाजूला ठेऊन बघायचा.. फुलटू धमाल आहे. >>> अगदी अगदी . आजिबातच डोक चालवायच नाही .
जॅकी दादा हल्ली भलतेच रोल करायला लागलेत .
तो ओके कंप्युटर पाहीला का कोणी ?
त्यात तसाही जॅकीच्या शरीराला
त्यात तसाही जॅकीच्या शरीराला मोजून १५-२० मिनिट काम असेल. बाकी रोल चेहरा दाखवणे हाच आहे. त्याने तो घरात बसून व्ही कॉन्फ वर दिला असेल
तेलही...चं लेखन दिग्दर्शन
तेरहवी...चं लेखन दिग्दर्शन सीमा पाहवा ने केल़य. हमलोग मधली बडकी
सर्च करताना बाँबे टॉकी नावाचा
सर्च करताना बाँबे टॉकी नावाचा १९७० सालचा इंग्रजी चित्रपट सापडला. कुणी पाहिला आहे का ? कसा आहे ?
शशी कपूर जेनीफर प्र भू आहेत. गंमत वाटली म्हणून पाच मिनिटे पाहिला.
Pages