चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल मी रुही बघत होतो टेलिग्रामवर. पायरेटेड असल्यामुळे एकतर आवाज आणि क्लिअरिटी चांगली न्हवती. एका सीनमध्ये तर जान्हवी कपूर चक्क अनिळजी यांच्या धाग्यातल्या भूताप्रमाणे छताला लटकलेली दिसली. मग मी बघायचा बंद केला.

बा.का. - हो प्रहार आधी पाहिला पण तो ट्रेनर पाहिल्यावर त्याचीच आठवण झाली. त्यावरच बेतला असावा प्रहार मधला रोल.

"मी शिवाजी पार्क" - अ‍ॅमेझॉन प्राइम. बर्‍यापैकी जमला आहे. आधी मुळात नवीन मराठी पिक्चर पहिल्या दहा मिनीटात बंद करावासा वाटत नाही हे पहिले यश. कलाकार चांगले आहेत - अशोक सराफ, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, शिवाजी साटम आणि सतीश आळेकर. कायदा हातात घेणारे सिनीयर्स ही कल्पना.

पिंपळ नावाचा नवीन मराठी चित्रपट आला आहे प्राईमवर. प्रिया बापट आहे आणि तिच्याबरोबर म्हातारा माणूस कोण आहे काही कळलं नाही. कोणी बघितलाय का.

मी पाहिलायं... कंटाळवाणा आहे. दिलीप प्रभावळकर आहेत ते. एकट्या ज्येष्ठ व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे.

I care a lot- Netflix

Rosamund Pike आणि Peter Dinklage अशी स्टारकास्ट असल्यामुळे बघितला. पण जरा बोअरच आहे. सुरुवात दमदार आहे पण नंतर खूप कंटाळा आला, पळवत पळवत कसाबसा पूर्ण केला. It is supposed to be a comedy thriller so it is neither much comic nor much thrilling.

आधी मुळात नवीन मराठी पिक्चर पहिल्या दहा मिनीटात बंद करावासा वाटत नाही हे पहिले यश. 》ये बात कुछ हजम नही हुई फारेंड. इतक्यातच तुम्ही "लाल इश्क" पाहून अनेकांना तो बघण्यासही भाग पाडले आहे.

संदुक सुमीत राघवन चा असल्याने बघायचा 10 मिनिट प्रयत्न केला.पण त्यात काही विशेष घडत नाहैये असं वाटलं.बंद केला.नवरा म्हणाला की कोकण पार्श्वभूमी असलेल्याना बराच रिलेट होईल आणि आवडेल.
मला तो मला आवडावा असं वाटतं कारण त्यात सुमीत राघवन आहे.

संदूक हलकाफुलका म्हणून बघायला हरकत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळ, क्रांतिकारक भूमिगत होणं आणि एक साधं कुटुंब त्यात कसं प्रत्यक्ष/ अप्रत्यक्षरीत्या धैर्याने सामोरं जातं अशी मिक्स गोष्ट आहे. सुमीत राघवन आणि भार्गवी चिरमुले गोड वाटले आहेत त्यात.

अमेझॉन प्राईमवर "क्रॉसिंग ब्रिजेस" हा नॉर्थ इस्ट भागात घडणारा सिनेमा बघितला. हा नेहमीचा मसालापट नाही, प्रत्येकचवेळी त्या भागातल्या सौंदर्याचे दर्शन सिनेमा घडवत नाही. सिनेमा आपल्याला तिथला निसर्ग आणि माणूस जसा आहे तसा दाखवतो पण तरीही यात निव्वळ रडगाणे नाही, किंवा बेगडी उदात्तीकरण नाही. अधेमधे थोडा संथ आहे सिनेमा पण मला तरिही हा सिनेमा आवडला. क्रॉसिंग ब्रिजेस हे नाव देण्यामागे लेखक दिग्दर्शकाकडे एक काव्यात्म दृष्टी असेल नक्कीच असे आपले उगाच वाटून गेले (तसे काय इतर कोणी असे नाव कल्पू शकत नाही जणू) ब्रीज दोन भागांना जोडण्याचे काम करतो. हा ब्रिजही सिनेमातले एक पात्र आहे असे मला वाटले.
यातला हिरो हा तिथला मुळ रहिवासी शिक्षण नोकरी निमित्त तिथून बाहेर पडलेला असा. पण नोकरी गेल्यावर काही काळासाठी मूळ गावी परत आलेला. बालपण जरी तिथे गेले असले तरी परत त्या विश्वात अ‍ॅडजस्ट होताना त्याचे सुरवातीचे अडखळणे हे त्या ब्रिजवरुन दबकत सावध पडायची भिती बाळगत पावले टाकण्यातून समजतेच आपल्याला. मग त्याला मदतीचा हात मिळतो हिरॉईनच्या रुपाने. पण हि टिपीकल हिरो हिरॉईन कथा नाही. आणि तसही हि कथा त्या दोघांच्या नात्याची नाही. जितके त्याचे त्याच्या घरच्यांशी मित्राशी असलेले नाते कथेसाठी आवश्यक आणि महत्वाचे आहे तितकेच त्यांचे नाते महत्वाचे आहे. कथा त्याच्या ब्रिज पार करुन जाण्याची आहे. कथा त्याचे पुन्हा त्याच्या जगाशी कनेक्ट होण्याची आहे. आणि सगळ्यात शेवटी आत्मविश्वासाने एकट्याने तोच ब्रिज त्याने क्रॉस करणे हे एक प्रकारे त्याने त्या जागेचा मनापासून स्विकार केल्याचे नुसते द्योतक नाही तर आता तो स्वतः आपल्यासाठी दोन जगांना जोडणारा ब्रिज झाल्याचे सांगणे आहे दिग्दर्शक आणि लेखकाचे असे मला वाटले म्हणून कदाचित मला ते काव्यात्मक वाटले.

मला माहिती नाही की हा विषय इथे निघालाय की नाही... पण तरी एकदा विचारुनच टाकटो,
'कोर्ट'कार चैतन्य ताम्हाणे याचा
"The Disciple" तुमच्यापैकी किती जणानी पाहिलाय ? त्याला टोरान्टो फिल्म फेस्टिवल मध्ये Award MiLaale aahe!
मी आठ दिवसान्न्पूर्वी पाहिलाय...
अजून एकदा पाहिन या weekend ला!
लिहावस वाटत आहे खरतर त्यावर, पण बरेच दिवसांपासुन लिहिणे बंद आहे...
Lets सी,

Submitted by कविन on 15 March, 2021 - 04:06 >> मला पण आवडला "क्रॉसिंग ब्रिजेस" ..छान आहे

'कोर्ट'कार चैतन्य ताम्हाणे याचा
"The Disciple" तुमच्यापैकी किती जणानी पाहिलाय ? >>>>>>>>>>>>>>> रिमांईंडर सेट करून ठेवलाय . नेफ्लिवर येणार आहे असं दिसतंय. तारीख नाही दिसत पण.

कुठे बघायचा ? >> @मेधावि मी साईट वरून पाहिलाय... पण मी ती लिंक दिली तर पायरेटेड म्हणून माझी प्रतिक्रिया उडवली जाऊ शकते...
लेख लिहिला गेला की तुमच्या विपु वगैरे मध्ये ड्रॉप करेन... तुमचे Netflix असेल तर तिकडे उपलब्ध आहेच Happy

@अंजली१२ Netflix ने प्रसारित केल्याशिवाय का पायरसी होउ शकते? कुठेतरी लीगल रिलीज झालाय हे मात्र खरे... बघू...

प्राईमवर प्रसाद ओक चा पिकासो पाहिला.साधा सरळ सुंदर पिक्चर.
आम्हाला तो राणीचं काम करणारा दशावतारी मुख्य कलाकारांपेक्षा जास्त आवडला.एकंदर मनोरंजक पिक्चर.फार जास्त रडवले नाहीये.फार मोठे क्लोजर देण्याचा प्रयत्न केलेला नाहीये.
फक्त तो आधीचा स्पेन ला गेलेला मुलगा दिसायला खूप लहान वाटतो.त्याला लग्नाची मुलगी दाखवायला वगैरे पटत नाही.
मुख्य मुलगा जरा भयंकर मराठी बोलतो.पण त्याला जास्त संवाद दिलेले नाहीत.डोळे बोलके आहेत.
मध्येमध्ये ताऱयांचे बेट ची आठवण आली

: माझा शेवटचा प्रतिसाद :

साधारण वर्षभरापूर्वी मी Split नावाचा के. श्याममालन चा सिनेमा पाहिला होता. मग समजले अरेच्चा हा तर दूसरा भाग आहे. ही तर सीरीज आहे.
मग Unbreakable पाहिला, परत Split पाहिला...

Unbreakable >>> Split >>> Glass

परवाच Glass Download केलाय. २५ तारखेला बघेन As a break माझी एक ठराविक गोष्ट संपली की... आणि मग दुसरी सुरू...
ज्यान्ना शक्य असेल... Psychopath thrillers हा Genre आवडत असेल तर हट्टाने ही वर दिलेली सीरीज पूर्ण करा

Bye .... Bye ....

साधारण वर्षभरापूर्वी मी Split नावाचा के. श्याममालन चा सिनेमा पाहिला होता. मग समजले अरेच्चा हा तर दूसरा भाग आहे. ही तर सीरीज आहे.
मग Unbreakable पाहिला, परत Split पाहिला...

Unbreakable >>> Split >>> Glass

परवाच Glass Download केलाय. २५ तारखेला बघेन As a break माझी एक ठराविक गोष्ट संपली की... आणि मग दुसरी सुरू...
ज्यान्ना शक्य असेल... Psychopath thrillers हा Genre आवडत असेल तर हट्टाने ही वर दिलेली सीरीज पूर्ण करा

Bye .... Bye ....

>>>>>>

१.. ते नाव के शाममालन नसून M Night Shyamalan आहे. मनोज नेलियाट्टू शामलन हे खरं नाव.

२. हे तिन्ही चित्रपट कुठल्याही प्रकारे psycopath थ्रिलर मध्ये मोडत नसून kind off superhero psychological थ्रिलर मध्ये मोडतात.

Unbreakable आणि split जितके जबरदस्त आहेत, तितकाच ग्लास हा बकवास आहे.
ह्या मुवि आवडल्यास the sixth sense हा मुवि नक्की बघा.

Ruhi बघितला.
स्त्रीचं मॅजिक रेक्रियेट करण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो, पण दिगदर्शक सपशेल अपयशी ठरलाय.
राजकुमार राव, वरुण शर्मा यांची कुणाचीही छाप पडत नाही. जान्हवी मॅडम विषयी बोलायलाच नको.

फारुख शेख अनिता राज चा जुना चित्रपट 'अब आयेगा मजा' प्राईमवर पाहिला. स्टोरी जरा भरकटलेली आहे. मध्येच स्वामी काय, मध्येच मूर्ती स्मगलिंग काय, ड्रग काय.अनिता राज छान दिसते.
सुरुवातीला जो जाहीरात वाला सीन आहे तो धमाल आहे. हर्बल आणि नॅचरल म्हणून आल्याचा स्किन सोप. Happy
सर्व जुने एन एफ डी सी कलाकार बघून मजा वाटली. किमान २ तास तरी एन्जॉय केले.
तरुण फारुक शेख, अगदी तरुण पवन मल्होत्रा, त्यावेळी हँडसम दिसणारा राजा बुंदेला, रवी वासवानी, सतिश कौशिक, जाने भी दो यारो मधला संपादक असे सगळे अगदी लहान बघून गंमत वाटली.

Pages