Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्हाइट टायगर पुस्तक काही खास
व्हाइट टायगर पुस्तक काही खास नव्हते वाटले. चित्रपट अर्धा पाहिला, चांगला वाटतोय.
व्हाईट टायगर सिनेमा फार खास
व्हाईट टायगर सिनेमा फार खास नाही पण शेवट अगदीच गुंडाळला आहे! इझी फिक्स. घरच्या लोकांची काळजी सोडणे किंवा नीतिमत्ता खुंटीला टांगणे हाच "कूप" सोडण्याचा मार्ग असा काहीसा विचित्र संदेश मिळतो. अमिताभ, रणवीर असे वागले तर प्रेक्षणीय ठरते, असा चिरकूट हिरो प्रेक्षणीय, उल्लेखनीय वाटला नाही.
व्हाईट टायगरची सुरुवात आणि
व्हाईट टायगरची सुरुवात आणि अर्धाअधिक बघून झाल्यावर असे वाटते की आता काहीतरी जबरदस्त घडणार आहे.
पण स्साला तसे काही घडतच नाही.
कोणाचा तरी पोपट करायचा असेल तर त्याला सांगावे चित्रपट एकदम भारी आहे, ईटरव्हल नंतर तर एकदम फाडू आहे. त्याला ते शेवटपर्यंत खरेही वाटेल
पुस्तक वाचले नाही, किंबहुना पुस्तकावर बेतला आहे हेच शेवटी वाचले तेव्हा समजले,
पण चित्रपट बघतानाच कोणीतरी पुस्तकावर डॉक्युमेंटरी बनवली आहे का असा फील येत होता.
अभिनयाच्या कसोटीवर चित्रपट खरा ऊतरला आहे,
पण त्याने कोणाचे पोट भरते.
व्हाइट(वाइट! winking )टायगर
व्हाइट(वाइट! )टायगर बघितला, फार काही तरी भारी बनवंन्याच्या नादात एक घिसापिटा फॉर्म्युला मुव्ही बनवलाय,स्टोरीत काहिच दम नसल्याने रियल इन्डियाच्या नावाखाली नॉर्थ साइडला कॅमेरे फिरवलेत, प्रिचो-राजकुमार राव वाया घालवलेत, महेश मान्जरेकर नेहमिसारखाच तारवटेलेला आहे,मेन हिरो बन्डल आहे.
कुठल्यातरी फेमस बुकवरुन घेतलय पण मुळ पुस्तकातल यात काहिच नाही अस नेटवर वाचल.
अलीकडेच नेफ्लिवर 3 मुव्हीज
अलीकडेच नेफ्लिवर 3 मुव्हीज बघितले.
1. व्हाईट टायगर - अगदीच बोअर वाटला. अर्धवट सोडून झोपायला गेले मी. काय तो 'हिरो'. अशक्य आगाऊ आणि unlikeable आहे. महेश मांजरेकर आणि राजकुमार राव बरे वाटले पण प्रिचो अशी काय दिसते थोडी लठ्ठ आणि झोपाळू.
नवऱ्याने पूर्ण बघितला आणि त्याला आवडला म्हणे. असो.
2. त्रिभंग- हा छान आहे, काहितरी वेगळं. तरी मुळात ती लेखिका घर कशाला सोडते तेच कळलं नाही त्यामुळे पुढची स्टोरी अतार्किक वाटली कारण मूळ premise च डळमळीत वाटलं. पण सगळ्यांची कामं छान आहेत, मराठी कलाकार बघायला बरं वाटलं.
3. सर- हाही मुव्ही as such गोड आहे पण परत अतार्किक, न पटण्याजोगं premise आहे. ते काही झेपलं नाही. पण संथ, तरल टेकिंग आवडलं.उगाच कोणी आरडाओरडा करतंय, कोंबड्या कापतंय असा प्रकार नाही. अश्विन तर फार आवडला, त्याच्यासाठी आणखी चार वेळा बघू शकेन! पण तरीही चित्रपट पटण्यासारखा किंवा लॉजीकल नाहीच.
आता चैतन्य ताम्हणेच्या मराठी मुव्हीची प्रतीक्षा आहे. तो नेटफ्लिक्सने लवकर रिलीज करावा.
चैतन्य ताम्हाणे चा नवीन
चैतन्य ताम्हाणे चा नवीन चित्रपट येतोय?
होप कोर्ट सारखा पकाऊ नसेल..
द गर्ल ऑन द ट्रेन वर आधारित
द गर्ल ऑन द ट्रेन वर आधारित परिणीती चोप्रा चा मुव्ही नेटफ्लिक्स वर येणार आहे. ओरिजनल खूप मस्त मुव्ही आहे. याची माती नसली केली म्हणजे मिळवलं.
अरे देवा.
अरे देवा.
नक्कीच माती केलेली असणारे. मी ओरिजिनल मुव्ही नाही बघितलाय पण कादंबरी वाचली आहे. हिंदीमध्ये नाही बघू शकणार.
द गर्ल ऑन द ट्रेन -
द गर्ल ऑन द ट्रेन - पुस्तकाच्या तुलनेत इंग्रजी सिनेमातही माती केली आहे.
कधी कधी काम करता करता तोंडी
कधी कधी काम करता करता तोंडी लावायला म्हणून न पाहीलेले, जुने चित्रपट अपेक्षा न ठेवता लावून बसते. असे खूप पाहून झालेत.
या तीन चार दिवसात सोहनी महिवाल बघून झाला.
सनी देओल आवडला. गाणी अनेकदा पाहिलेली आहेत. चित्रपटात कशी वाटतात ही उत्सुकता होती.
सोनी महिवाल ही खरी गोष्ट आहे असे कळले. या निमित्ताने ती माहीत झाली.
( मी असेही चित्रपट बघते. मनोरंजन एकच उद्देश )
मी परवा खुदा हाफिज पाहिला
मी परवा खुदा हाफिज पाहिला एक्शन थ्रीलर सिनेमा.. चांगला आहे.. तो पाहत असताना पूर्वी पाहिलेला taken सिनेमा आठवला.
सोनी महिवाल
सोनी महिवाल
लैला मजनू
शिरीन फराहाद
रोमिओ ज्युलिएट
हिर रांझा
ह्या जगप्रसिद्ध खऱ्या स्टोर्या आहेत, ह्या जोड्यात बाया कोण आणि पुरुष कोण , माहीत नाही
ब्लॅक कॅट धन्यवाद. बाकीच्या
ब्लॅक कॅट धन्यवाद. बाकीच्या माहीत होत्या.
यातल्या शिरी फरहाद चा उच्चार शिरीन आहे हे तुमच्या मुळे समजले.
हीर रांझा पण होता एक. यावर "ये दुनिया ये महफिल मेरे काम की नही" हे गाणं असलेला पिक्चर आलेला.
हा पूर्ण बघून होतच नाही.
मलाही माहीत नाही उच्चार , मी
मलाही माहीत नाही उच्चार , मी अंदाजे लिहिले
आणि ह्यातल्या बाया कोण आणि बापे कोण , हा पुलं देशपांडेंचा विनोद आहे
रोमिओ ज्युलिएट खरी आहे ?
रोमिओ ज्युलिएट खरी आहे ?
खरी का नसावी?? त्यात
खरी का नसावी?? त्यात अविश्वसनीय काही नाही. प्रेमात पडलेले दोन जीव व परिस्थितीने केलेली फरफट..
सगळ्या अयशस्वी प्रेमकहाण्या प्रसिद्ध होतात. ज्या यशस्वी होतात ते संसाराच्या जोखडात प्रेम विसरून जातात
मुळात त्यावेळी मोबाईल असते तर
मुळात त्यावेळी मोबाईल असते तर आपल्याला नंतर ज्युलिएट रोमिओ वर 'नेहमीच मी धुते डिशेस, मीच वापरते लॉन मोवर.कधीतरी कामं करत जा' म्हणून चिडचिडताना दिसली असती.
मोबाईल नसल्याने अंमळ घोटाळा झाला.
अनु
अनु
(No subject)
मोबाईल असते तर दोघेही 'जाऊदे,
मोबाईल असते तर दोघेही 'जाऊदे, इकडे काम होणे कठीण दिसतेय, दुसरीकडे बघू' करत डेटिंग साईटवर गेले असते आणि दुसरे पार्टनर बघितले असते
आम्हाला कॉलेजात पिरॅमस आणि
आम्हाला कॉलेजात पिरॅमस आणि थिसबीची कथा होती. दोघेही शेजारी राहात पण इतके वंचित की भिंतीत असलेल्या बारकुंड्या फटीतून बोलायचे. पुढे पळून गेल्यावर गैरसमज होऊन दोघेही मरतात... मोबाईल असते तर गैरसमज झालेच नसते ..
आमच्या प्रोफेसरने त्यांच्या प्रेमाचा उंचावत जाणारा आलेख फळ्यावर काढलेला.
आता वाटते, ते पळून गेले नसते आणि (दु)दैवाने लग्नबांधनात अडकले असते तर ग्राफचा शेवट जमिनीवर धाडकन आपटण्यात झाला असता
मोबाइलच्या जमान्यात पण
मोबाइलच्या जमान्यात पण सलमानच्या अयशस्वी प्रेम कहाण्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.
इज लव इनफ सर पाहिला. खुप
इज लव इनफ सर पाहिला. खुप आवडला. तिलोत्तमा, गोम्बर दोघांचा अभिनय उत्तम. सिनेमाची मांडणी उत्तम.
गोम्बर आडनाव कसेतरीच आहे..
गोम्बर आडनाव कसेतरीच आहे.. दरवेळी वाचताना गोबर येते डोळ्यापुढे
प्राईम वर द लास्ट कलर पाहिला.
प्राईम वर द लास्ट कलर पाहिला. आवडला. अजून कुणी पाहिला असल्यास चर्चा करता येईल.
आम्हाला कॉलेजात पिरॅमस आणि
आम्हाला कॉलेजात पिरॅमस आणि थिसबीची कथा होती. दोघेही शेजारी राहात पण इतके वंचित की भिंतीत असलेल्या बारकुंड्या फटीतून बोलायचे. पुढे पळून गेल्यावर गैरसमज होऊन दोघेही मरतात... मोबाईल असते तर गैरसमज झालेच नसते ..>>> +१११
हे रोमिओ आणि ज्युलिएटला तर नक्कीच लागू होतं. तेही गैरसमजामुळेच मरतात. दुसर्या व्यक्तीशी लग्न करायला लागू नये म्हणून ज्युलिएट मेल्याचं सोंग करणारं औषध घेते पण तिचा तो खुलासा करणारा निरोप रोमिओपर्यंत पोचण्याआधी ती मेल्याची बातमी येउन पोचते आणि तो तिच्या शवपेटिकेच्या शेजारी आत्महत्या करतो, मग जागी झालेली ज्युलिएट आत्महत्या करते. अगदी थोड्या मिनिटांनी चुकामूक होते. मोबाईल असता तर तिने लगेच त्याला ती नाटक करत्येय ते सांगितलं असतं आणि पुढचा घोटाळा टळला असता.
लास्ट कलर आवडला. हेल्पलेस
लास्ट कलर आवडला. हेल्पलेस वाटलं फार.
आजकाल फक्त गोविंदाचे सिनेमे बघणं शक्य आहे.
लास्ट कलर भारी सिनेमा आहे.
लास्ट कलर भारी सिनेमा आहे. पाहताना दीपा मेहताच्या वॉटर सिनेमाची आठवण येत राहते. लिसा रे स्कुलटाइम क्रश
Netflix वर To all the boys:
Netflix वर To all the boys: Always and forever पाहिला. आवडला. आधीचे दोन भागही छान आहेत.
परवा एअरटेल एक्सस्ट्रीम वर
परवा एअरटेल एक्सस्ट्रीम वर २०१९ चा गाय रिचीचा द जंटलमेन पाहिला (गाय रिचीचं नाव मुद्दाम लिहिलं, नाहितर नामसाधर्म्यावरून चिरंजीवीचा द जंटलमॅन वाटायचा, रूप सुहाना लगता है...) पाहिला नसला तर नक्की पहा, मस्त आहे...
Pages