चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy कोठे पाहिला, लंपन?

प्राइमवर "लाल इश्क" का अशाच काहीतरी नावाचा स्वप्नील जोशीचा चित्रपट दिसला.

हॉलिवूड ऍक्शन मराठी (हो अस चॅनेल आहे) वर. म्हणजे तुम्हा चिरफाड करणाऱ्या लोकांसाठीच बनवला आहे Happy ह्या चॅनेलवर एकसे एक मराठी पिक्चर असतात.☺️

एक गाणं अप्रतिम आहे.. लाल इश्कचं
चांद मातला , चांद मातला ... बाकी सिनेमा विसरून गेला.
हरिश्चंद्राची फैक्टरी अजून कितव्यांदा पाहिलायं. फार फार आवडला. (नेटफ्लिक्स)
ज्यांनी नाही पाहिलायं त्यांनी पहाचं. Happy

मी आता ऐकलं पहिल्यांदा हे गाणं. हे चांद मातला ऐकताना मला "ढाई शाम रोक लै" ची आठवण का येते आहे? ते "शेवेत शेव काढून घ्या" म्हणतात तसं देवदासचा सेट म्हणा चाल म्हणा काय तरी ढापलंय...

लुटकेस बघितला . हलका फुलका मुव्ही, कुणाल खेमूला ट्रॅफिक सिग्नल नतर पहिल्यादाच सेन्टर रोल मधे बघितल.
विजयराज, रसिका,रणविर शौरी नेहमिचे कसलेले कलाकार, कथा अगदी छोटी आहे पण कॉमेडी छान फुलवली आहे.

चांद मातला , चांद मातला ... >>>> सुंदर गाणं आहे. स्वप्नीलचाच आवाज जास्त आवडला पण.. मखमली Happy
लाल समथिंग. तो चांगला होता.>>>>>>>>> लाल कप्तान?

लाल कप्तान आणि द बॉडी पाहिले.लाल कप्तान बराच इफेक्टिव्ह आहे.
द बॉडी मध्ये शेवट कळल्यावर 'काय हे, इतक्याश्या साठी फारच त्रास घेतला' असं पात्रांबद्दल वाटतं.
मध्ये निल नितीन मुकेश चा एक थ्रिलर पाहिला होता.तो बरा वाटला.पण लूपहोल्स बरीच.
नेल पॉलिश वेगळ्या कथेचा चित्रपट आहे.सुरुवातीला आपल्याला वेगळं वाटतं आणि नंतर काहीतरी वेगळंच निघतं.तुम्हारी सुलू मध्ये विद्या बालन चा नवरा होता त्याची अकटिंग आवडली.

चांद मातला ऐकताना मला "ढाई शाम रोक लै" ची आठवण का येते आहे? >>>>>>>> राधेश्याम रोक लै अस आहे ना ते?

मध्ये निल नितीन मुकेश चा एक थ्रिलर पाहिला होता.तो बरा वाटला.पण लूपहोल्स बरीच. >>>>>>> जॉनी गद्दार का?

जॉनी गद्दार नाही
निनिमु त्यात दोन्ही पायांनी पांगळा झालेला असतो.(त्यात व्योमकेश बक्षी जुन्या मालिकेतील कलाकार पण आहे.(

वाह!!! काय तयार आहेत माझे कान!!!!!!!!!!!! Wink Happy ओके, एकाच रागात रचना केल्याने ढापलंय म्हणता येणार नाही. धन्यवाद, ब्लॅककॅट.
ते ढाई श्याम असे आहे. श्याम हे अडीच अक्षरे असल्याने ढाई श्याम म्हणतात म्हणे.

थोडासा जुना (५-६ वर्षापुर्वीचा) "द मर्डर ऑन द ओरिएंट एक्प्रेस" हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर पाहिला. अगाथा ख्रिस्तीच्या ह्याच नावाच्या कथेवरून बेतलेला चित्रपट आहे. एकदम मस्त बनला पाहिला. जरुर बघा.

तो डेव्हिड सुचे वाला की दुसरा माणूस वाला? डेव्हिड सुचे वाला सॉलिड आहे. कथेत थोडे फेरफार केलेत पण तसा ओके आहे.
मला त्यातला 'वी वेअर विदाऊट सीन' वाला डायलॉग अजून आठवतो

चांद मातला व त्याची चुलत मावस भावंडे

https://ekoshapu.in/2018/09/06/songs-based-on-raag-puriya-dhanashree/

काहे छेड काही लोकांना बसंत रागात वाटते , दोन्ही रागात काही स्वर सेम आहेत

ted २ ची जाहिरात आली नेटफ्लिक्स ला म्हणून ted आणि ted २ पाहून टाकले. ....हहपुवा ... ted ला आवाज दिलेलाच दिग्दर्शक आहे . खूप मस्त ..टेडी बेअर च अनिमेशन मस्त केलय.

Drishyam-2 आलायं ,मित्रांनो.
Prime वर subtitels सकट पाहिला.
पहिल्यापेक्षा थोडा कमी थरारक आणि जास्त अआणिअ वाटला.

पहिला भाग, मी हिन्दी नंतर मल्याळम बघितला होता. भयानक आवडलेला. ( https://www.maayboli.com/node/48143?page=36#comment-3628768-- रीक्षा )
मोहनलाल बापमाणूस आहे. त्याची बायको आणि तो नविन आयजी आवडले. गीता चा नवरा इथेही आवडला.
पुढे काय होणार याची कल्पना पहिल्या सीनमध्येच येते.
पूर्वार्ध नुसता घडतो.उत्तरार्धात थोडा वेग पकडलाय.
आपल्याला फक्त उत्सुकता असते , आता जॉर्जकुट्टी कोणता गेम खेळणार .
तिसरा भाग यायची शक्यता नाही.

नेलपॉलिश आवडला. तुम्हारी सुलू मधला सुलुच्या नवऱ्याचा क्रूर, साधा कोच असतानाचा आणि मध्यन्तरानंतरचा सगळा अभिनय आवडला.
तसाच थ्रिलर असेलम्हणून दरबान पाहिला. शरद केळकर ला फार रोल नाहीये. विशेष थ्रिलर नाही वाटला.

दरबान मला फार आत्मपीडन वाला वाटला.म्हणजे कथा अर्थात चांगलीच आहे.पण हल्ली इतक्या उजडे चमन गोष्टी बघवत नाहीत.सगळ्यांना काही न काही दुःख दिलंच पाहिजे असा अट्टाहास वाटतो.
नेल पॉलिश एक वेगळी स्टोरी आहे.त्याला अजून लोकप्रियता मिळायला हवी आहे.

Pages